कोविड च्या काळामध्ये सगळ्याच गोष्टी 'फ्रॉम होम' करण्याची आपल्याला सवय झाली. चित्रपट सुद्धा सिनेमागृहात रिलीज न करता तो OTT वर दाखवण्याची प्रवृत्ती वाढली. परंतु आता पुन्हा हा प्रवाह बदलू लागला आहे , यात खासकरून २ चित्रपटांबद्दल आज सांगावेसे वाटते - इंग्रजी मधील 'बार्बी' आणि आपल्या मायबोलीतील 'बाईपण भारी देवा'.
बार्बी बाहुली बद्दल एकेकाळी लोकांच्या फार टोकाच्या भूमिका आणि प्रतिक्रिया होत्या...गैरसमज तर खूप होते, तेवढेच कुतूहल सुद्धा. तिची परफेक्ट फिगर, तिचे उंच टाचांचे बूट, निरनिराळ्या प्रकारचे कपडे आणि मेकअप यामुळे मुलींवर 'सौन्दर्याचे संकुचित अर्थ' लादले जाणे, हा मुख्य वादाचा मुद्दा होता, जागरूक पालक आजही गोंधळतात, आपल्या चिमुकलीला किंवा चिमुकल्याला बार्बी द्यावी का?
बार्बी चित्रपटामध्ये या सर्व मुद्यांना हात घातलाय! बार्बी च्या जगात, बार्बी कोणीपण बनू शकते- डॉक्टर, सायंटिस्ट, Parliamentarian इ. पण खऱ्या जगात मात्र परिस्थिती अशी नाही, लोकांना आपला तिरस्कार आहे, हे जाणून बार्बी खूप दुखावते, आणि उलट केन ला खरे जग आवडते कारण बार्बी च्या जगात, बार्बी सगळे करत असते, खऱ्या जगात पुरुषाचे वर्चस्व असते. केन हा मेटेल कम्पनी ने सन १९६१ मध्ये बार्बीचा जोडीदार म्हणून बनवलेला बाहुला आहे. तोसुद्धा बार्बी प्रमाणे फॅशनेबल कपडे घालतो. केन ला patriarchy किंवा पुरुष प्रधान संस्कृती खूप आवडते आणि तो ती संस्कृती बार्बीलैंड मध्ये घेऊन येतो.

याहून जास्ती लिहिले, तर चित्रपटाची मजा निघून जाईल. बायकांना समाजात करायला लागणार संघर्ष, कॉर्पोरेट जगात येणाऱ्या अडचणी, केन ला बार्बी शिवाय स्वतःचे अस्तित्व शोधायला लागणे, सर्व मुद्दे सुंदर पद्धतीने मांडले आहेत. यात टीका पुरुषसत्ताक पद्ध्तीवर आहे , पुरुषांवर नाही. दोघांचे आपले अस्तित्व असावे आणि कोणालाच दुसऱ्याच्या सावलीत रहायला नको, हि महत्त्वाची शिकवण या चित्रपटाने दिली आहे. "patriarchy" हा शब्द एखाद्या मेनस्ट्रीम हॉलीवूड सिनेमा मध्ये येतो, ही माझ्यासाठी तरी खूप मोलाची पायरी आहे.
दुसरीकडे - 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा देखील याच धाटणीतील आहे, आणि याबद्दल सुद्धा लोकांची टोकाची मते झाली आहेत, काहींना खूप आवडला, काहींना अजिबात नाही. हा चित्रपट सुद्धा पुरुषसत्तेवर भाष्य करतो, परंतु हा शब्द न वापरता! बाईपण.... मध्ये सहा बहिणींच्या भिन्न कहाण्यांमधून अनेक मुद्दे उलगडत जातात. यामध्ये कुठेही प्रेक्षकांना काही शिकवण देण्यात येत आहे, असा आभास होत नाही. मंगळागौरी सारख्या पारंपारिक संकल्पनेचा संदर्भ घेऊन पुरोगामी विचारधारा मांडणे हा प्रयोग खूप यशस्वीरीत्या या चित्रपटाने साधला आहे. यातील प्रत्येक महिलेचा अनुभव कधीतरी आपल्याला, आपल्या बहिणीला, आईला, मैत्रिणीला आला आहे. या चित्रपटात सुद्धा काही सक्षम आणि हळवे पुरुष दाखवले गेले आहेत, जे आपल्या आयुष्यातील महिलांना आधार देतात. स्त्रीने स्वतःवर लादलेली बंधने आणि पितृसत्तेचा भक्कम पगडा जिथेतिथे डोकावतो. गैरसमजांमुळे नात्यांमध्ये आलेला दुरावा आपल्याला टोचतो, पण जेव्हा बहिणी एकत्र येतात तेव्हा खंबिरपणे एकमेकींना आधार देतात आणि तिथे खरच वाटून जातं ... 'बाईपण भारी' आहे. त्या सर्व मिळून जेव्हा एकीला आधार देतात, समजावतात, आरसा दाखवतात, तेव्हा मन भरून येतं.
हे दोन्ही चित्रपट, संकल्पना, संस्कृती, यात भिन्न असले तरीही त्यात नक्कीच काही धागे सारखे आहेत. पुरुषी वर्चस्व असलेल्या जगात स्त्रीवर असणारी बंधने, तिला करायला लागणारे संघर्ष, तारेवरची कसरत हे या दोन्ही मध्ये दिसून येते. आणि दोन्ही चित्रपट यावर आपल्या आपल्या पद्धतीने भाष्य करतात. मुळात आपल्याला कित्येक लहान लहान गोष्टींवर विचार करायला प्रवृत्त करतात. मटेल कम्पनी मध्ये आजपर्यंत बोर्डावर एकही स्त्री नव्हती , हि गोष्ट आपल्याला सुन्न करते, तसेच स्ट्रेस मुळे चाळिशीतच मेनोपॉज सुरु होऊ शकतो, याने आपण हादरतो.
या सर्वात खंत वाटते ती एकच, दोन्ही चित्रपटांच्या प्रेक्षकवर्गात महिलांचा समावेश जास्ती आहे, यात पुरुषांची भर झाली पाहिजे, आणि यावर घरोघरी चर्चा झाली पाहिजे. मग काढताय ना तिकीट? एक टीप- दोन्ही चित्रपटांना आपल्या युवा वर्गातील मुलांना मुलींना आवर्जून घेऊन जा!

रेणुका मुकादम
POSH सल्लागार आणि प्रशिक्षक
(posh म्हणजे -कामाच्या ठिकाणी
लैंगिक छळणूक प्रतिबंध कायदा)
Tags
सिनेमा