मुलीची मासिक पाळी सुरू झाली की मुलगी मोठी झाली किंवा वयात आली असे म्हंटले जाते. कालपरवा पर्यंत अल्लड असणाऱ्या, भिरभिरणाऱ्या फुलपाखराकडे अचानक वेगळया नजरेने पाहिले जाते. कालपर्यंत ठीक होत, "आता असं नाही करायचं, इथे तिथे जायचं नाही, लवकर घरी यायचं.." अशा प्रकारच्या अनेक वाक्यांचा भाडिमार तिच्यावर होत असतो. पूर्वीपेक्षा आजही चित्र फार बदलले आहे, असे माझ्या पाहण्यात नाही. आजही मासिकपाळी सुरू होण्या अगोदर त्या त्या वयातील मुलींना त्याची पुरेपूर अशी माहिती नसते.
फार लांब न जाता माझे स्वतःचे उदाहरण सांगते. तो दिवस मला आजही खूप चांगला आठवतो. इ. ७वी, वय १२, ता. १४जानेवारी अर्थात संक्रांत. शाळा अर्ध्या दिवसाची होती. सण असल्याने रंगीत ड्रेस घालून बोलावले होते. "त्या" जागी अचानक प्रचंड खाज येऊन सुरू झालेला रक्तस्त्राव, इतका की पूर्ण कपडे लालेलाल. आपल्याला काही लागलं असेल का? असे अनेक प्रश्न डोक्यात घेउन रस्त्यावरून चालत तशीच घरी निघाले.
घरी गेल्यावर झाला प्रकार पाहून, आता हे प्रत्येक महिन्याला चार दिवस होणार, एवढे एकच वाक्य आईने सांगितले. काही वर्षे सुती कापडाच्या घड्या वापरल्यानंतर मोठ्या बहिणींच्या सांगण्यावरून sanitary pads वापरण्यास सुरूवात झाली. पुढे ९वी/ १०वीत शाळेत किंवा इतरत्र ठिकाणी ह्या विषयी जागरूकता असावी म्हणून डॉक्टर्स बोलावून व्याख्याने आयोजित केली गेली तेव्हा सगळ्याचा उलगडा झाला.
आज काळ जरी बदलला असला तरी हे चित्र बदललेल दिसत नाही. आजही मुलींना ह्या विषयी फारशी माहिती नसते. बदललेली Life style, Junk food इ. मुळे आज मुलींना पाळी यायचे वय अलीकडे सरकले आहे. इ. ५वी मधील मुली आज खूप Matured दिसतात. परंतु पालक त्यांना अजूनही अजाण, लहान समजून ह्या विषयी बोलण्यास टाळतात. उलट उत्क्रांतीच्या नियमानुसार दर दहा वर्षांनी जन्म घेत असलेल्या पिढीचा मेंदूचा विकास अफाट आहे. ही इ. ८वी नंतर शालेय स्तरावर पुरवण्यात येणारी माहिती खूप आधीच देणे गरजेचे आहे. आपली शारीरिक रचना, आपले अवयव, त्यांचे कार्य, निसर्गाचे मासिक पाळीचे प्रयोजन ह्या मागील वैज्ञानिक दृष्टीकोन ह्याबाबत फक्त मुलींशीच नाही तर त्याच बरोबर मुलांशी बोलणे देखील तितकेच गरजेचे आहे.

हाच मोकळेपणा पुढे जाऊन बऱ्याच समस्यांवर तोडगा ठरेल.
ह्यावर कायम कुजबुजत चर्चा होत आल्यामुळे, ह्या कोवळ्या वयात पडणाऱ्या कोड्यांची उत्तरे मुले चुकीच्या मार्गाने न शोधता मुळात हा कुजबुजण्याचा विषय नसून, मोकळेपणाने बोलण्याचा आहे हे समजून घेतील आणि योग्य वयात त्यांना योग्य शिकवण मिळून तीच सवयीचा भाग होउन त्यातील अवघडलेपण नाहीस होउन मोकळेपणा राहील. आणि हाच मोकळेपणा पुढे जाऊन बऱ्याच समस्यांवर तोडगा ठरेल.
शाळा, कॉलेज, ऑफिस तसेच सार्वजनिक ठिकाणी "स्वच्छ" - स्वच्छ्तागृहे, इमर्जन्सीच्यावेळी उपलब्ध मिळतील असे सॅनिटरी पॅडस् , कामाच्या ठिकाणी ह्या दिवसांत ग्राह्य केलेली रजा ह्या सगळ्या मूलभूत गोष्टी आहेत!
माझ्या सुदैवाने ह्या दिवसांत मला कुठल्याही प्रकारचा शारीरिक त्रास नसल्याने, निसर्गाने दिलेल्या नवनिर्मितीच वरदान असलेल्या ह्या सोहळ्याचा कधीही तिटकारा वाटला नाही. आजही ह्या चार दिवसात मी देवळात जाते, पूजाअर्चा पोथीपुराण वाचते. आणि ह्याचा मला पूर्ण अभिमान आहे. परंतु प्रत्येकासाठी हे इतके साधे, सरळ, सहज असेलच असं नाही.

![]() |
मासिकपाळीच्या आगेमागे होणारे त्रास |
ओटीपोटात होणाऱ्या तीव्र वेदना, कंबर आणि त्याखालील भागातील वेदना, भूक न लागणे , उलट्या, मळमळ, पायात गोळे येणे, अस्वस्थ वाटण अशा त्रासांना कित्येक जणींना सामोरे जावे लागते. ह्यावर औषधोपचार करून नियंत्रित करणे त्या मानाने सोपे असते, परंतु होणाऱ्या मानसिक त्रासाविषयी जागरूक होणे फार गरजेचं आहे. ह्या त्रासाला इतके गांभीर्याने घेउन महत्त्व दिले जात नाही. शरीरात होणाऱ्या अतीव बदलामुळे होणारे "Hormonal changes" त्याने होणारे "Mood swings", चिडचिडेपण, राग, उत्चाह नसणे, अचानक रडू येणे, कशावरही concentration न होणे इ. प्रकारचें न समजणारे, न सांगता येणारे तसेच न सहन होणाऱ्या त्रासातून कित्येक महिला जात असतात. हे चक्र पाळीच्या आठ दिवस आधी आणि आठ दिवस नंतरही राहू शकते. ह्या त्रासातून जाणाऱ्या महिलेला कुमकुवत, unpredictable, रडूबाई अशा प्रकारची कुठलीही लेबल्स न लावता फक्त समजून घेणे आवश्यक असते. आपुलकीचे, मायेचे, समजूतदारपणाचे दोन शब्द जादुई कामगिरी करु शकतात.
ह्या पलीकडे जाऊन ह्या मागे असलेल्या अंधश्रद्धांवर मात करणे ही काळाची गरज आहे. आपल्या शरीराचे जसे नैसर्गिक क्रियाकर्म आहेत जसे मलमुत्र विसर्जन, घाम येणे, सर्दी होणे अगदी तसच हे नैसर्गिक चक्र आहे. जर
" गर्भधारणा" झाली तर उपयोगी पडावी, म्हणून निसर्गाने जी तजवीज करून ठेवलेली असते, ती वापरात न आल्याने शरीर ते ह्या दिवसात बाहेर फेकत असते. त्याला विटाळ, शुद्धअशुद्ध अशी नावं न देता, जेवढे मोकळेपणाने घ्याल, वैज्ञानिक आणि शास्त्रीय दृष्टीकोनातून पहाल तेवढच ह्या सुंदर भिरभिरणाऱ्या फुलपाखरांचे जगणं सोप्पं आणि आनंददायी होईल.
म्हणून पुराणमतवादी लोकांना आपण हे समजावून सांगायला हवे, नाहीतर तीच जुनी कर्मकांड पुढे नेण्यास मदत करून, आपणच आपल्या पायावर धोंडा मारत आहोत. हे प्रथम बंद केले गेले पाहिजे. शेवटी कालची मुलगीच आजची सून, उद्याची सासू असणार आहे. ह्या चार दिवसात नेहमीसारखी नित्यकर्म, देवधर्म, पूजाअर्चा, सोवळओवळे मध्ये न आणता वैज्ञानिक विचार समोर ठेवले तर ती देखील ह्या विषयी बोलण्यात तेवढीच सहजता आणेल. आणि हीच सहजता खूप साऱ्या समस्यांवर तोडगा ठरेल!
#आतामाझीपाळी #menstrualhygiene#MHDay2023
#आतामाझीपाळी #menstrualhygiene#MHDay2023
खरंय!! मासिक पाळीसंबंधी प्रशिक्षण देत असताना असे खुप किस्से प्रशिक्षणार्थी नी सांगितले होते. यावर खरंच खूप काम करणे आवश्यक आहे.
ReplyDeleteअपर्णा कुलकर्णी - गोवंडे