एकल महिलांसाठी काम करणाऱ्या संस्था

खरं तर महिलांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वच संस्थांच्या कामात एकल महिलांचा  समावेश असतो. परंतु, काही संस्था प्रामुख्याने एकल महिलांच्या समस्यांवर काम करतात. अशा काही संस्थांची माहिती इथे मांडत आहे. 



Actionaid Association India – ह्या संस्थेने एकल महिलांच्या हक्कासाठी राष्ट्रीय पातळीवर विविध अभ्यास आणि जाणीव जागृतीचे काम केले आहे. ‘#SingleButNotAlone’ हा त्यांचा अहवाल त्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. त्यांनी 2020 मध्ये एकल महिलांसाठीच्या धोरणाचा एक मसुदा केंद्रसरकारला सादर केला होता. 
अधिक माहितीसाठी - https://www.actionaidindia.org/press-release/singlebutnotalone-actionaid-campaigns-rights-entitlements-single-women/

Akshara Center अक्षरा सेंटर ही लिंगभाव न्याय्य समाजासाठी काम करणारी एक गैर-नफा संस्था आहे. एम्पॉवरिंग ड्रीम प्रोग्रॅम हा तरुण मुलींना शैक्षणिक सहाय्य आणि जीवनकौशल्य प्रशिक्षण देऊन सशक्त बनवून लिंगसमान जगाचे स्वप्न साकार करण्यासाठीचा एक उपक्रम आहे. या प्रकल्पात मुलींसाठी नेतृत्व आणि जॉबस्कीलचे कोम्बिनेशन असलेल्या कोर्सची आखणी केली आहे. त्यामध्ये एकल महिलांच्या मुलींना विशेष प्राधान्य दिले जाते – असे अक्षराच्या प्रतिनिधीने सांगितले. याबद्दलची सविस्तर माहिती अक्षरा इथे वाचता येईल. 

CORO India  – गेल्या आठ – दहा वर्षांपासून मराठवाड्यातील एकल महिलांच्या सोबत संघटना बांधणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या स्त्रियांमधील उभरते नेतृत्व शोधून ते विकसित करणे, त्या नेतृत्वाच्या क्षमता विकसित करणे आणि संविधानिक मूल्याचा दृष्टीकोन विकसित करण्याकहा दृष्टिकोण त्यामागे आहे. त्यांच्या कामाविषयीचे लेख पुढील लिंकवर वाचता येतील. एकल महिला संघटना 

MAKAAM - जे भारतातील महिला शेतकऱ्यांची ओळख आणि हक्क सुरक्षित करण्यासाठी काम करणारे हे एक राष्ट्रीय अनौपचारिक व्यासपीठ आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिला शेतकऱ्यांची स्थिती आणि महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण आणि त्यांच्या विविध समस्यांचे निराकरण करतात. 
अधिक माहितीसाठी - https://makaam.in/

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form