वेध शिक्षणाचे, सक्षमीकरणाचे...

अक्षरा ही लिंगभाव न्याय्य समाजासाठी काम करणारी एक गैर-नफा संस्था आहे. एम्पॉवरिंग ड्रीम प्रोग्रॅम हा तरुण मुलींना शैक्षणिक सहाय्य आणि जीवन कौशल्य प्रशिक्षण देऊन सशक्त बनवून लिंग समान जगाचे स्वप्न साकार करण्यासाठीचा एक उपक्रम आहे. अक्षराचा ‘सक्षम नेतृत्व कोर्स’ जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. हा कोर्स तरुण मुलींसाठी नेतृत्व प्रशिक्षण आणि शिक्षण सहाय्य यांचे संयोजन असलेली संधी आहे.

सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना १२ वी पर्यंत शिक्षण घेणे तसे शक्य झालेय. काही मुली १२ वी पर्यंत ही पोहोचत नाहीत पण ज्या मुली पदवी(ग्रॅड्युएशन) मिळवण्यासाठी बाहेर पडतात त्या मुलीं शिक्षणबाह्य मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करतील असा आमचा विश्वास आहे. पण, पदवी शिक्षण मिळवलेल्या मुलींना सहज नोकरी मिळते का? नाही. पदवी मिळविल्या नंतरही चांगली नोकरी मिळवणे हे एक आव्हान आहेच. नोकरीच्या ठिकाणी कॉम्पुटर हाताळता आला पाहिजे, संवाद कौशल्य, ईमेल लिहिणे, इंग्रजी मधून संवाद साधणे इत्यादी अनेक कौशल्यांच्या मागण्या असतात. शिवाय त्यांना जॉब स्कील आणि एटिकेट आहेत की नाहीत हे ही पडताळले जाते. बऱ्याच वेळा मुली या शर्ती पूर्ण करू शकत नाहीत. नोकरीचे ठिकाण लांब आहे, प्रवास जमत नाही, खूप स्पर्धा आहे, नाईट शिफ्ट आहे, कामाच्या ठिकाणी पुरुषांची संख्या जास्त आहे, कामाचे ठिकाण सुरक्षित वाटत नाही ही आणि अनेक कारणे मुलींना नोकरी मिळवण्यापासून ते मिळालीच तर ती करण्यापासून परावृत्त करतात. दुसऱ्या बाजूस शैक्षणिक शिक्षणाव्यतिरिक्तच्या अन्य कौशल्य शिकण्याची माहिती कुटुंबातील मुलींना उपलब्ध होत नाही आणि बऱ्याच वेळेस अश्या संधीची माहिती असली तरी त्या अतिशय महागड्या असतात, म्हणून मुलींना परवडत नाहीत.
या सर्व बाबींचा विचार करून अक्षरासेंटरने मुलींसाठी नेतृत्व आणि जॉब स्कीलचे कॉम्बिनेशन असलेल्या कोर्स ची आखणी केली आहे. या कोर्स द्वारे मुलींना सामाजिक लिंगभेद, समानता, स्व-सुरक्षा ते जॉबस्कील पर्यंतचे प्राथमिक प्रशिक्षण दिले जाईल. स्थानिक ठिकाणी या मुलींना नेतृत्वात्मक भूमिकेमध्ये आणण्यासाठी तसेच लिंगभाव समता आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्या जातील. जेणेकरून शिक्षण पूर्ण करू न शकणाऱ्या मुलींना शिक्षणासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या विभागात नेतृत्वात्मक भूमिका घेवू शकतील.
हा कोर्स महाविद्यालयीन मुलींना (पहिल्या आणि द्वितीय वर्षाच्या पदवीधर विद्यार्थिनींना) अधिक आत्मविश्वास आणि शिक्षित बनण्यास मदत करेल. आमच्या कार्यशाळा मजेदार, परस्परसंवाद, खेळ आणि चर्चासंवादयुक्त आहेत. हा कोर्स करणाऱ्या मुलींना त्यांच्या पदवी शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध आहे.

कोण अर्ज करू शकते ?

● कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुली

● कॉलेज: प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष (पहिल्या आणि द्वितीय वर्षाच्या पदवीधर विद्यार्थिनी)

● वय: 17 ते 21 वर्षे दरम्यान

● मुंबई आणि उपनगरी भागातील रहिवासी (फक्त मुंबईत शिक्षण घेत असलेल्या आणि राहत असलेल्या मुली)

● मुंबईतील एकल महिला कुटुंबातील मुली

काय फायदे  आहेत?


➔ शिक्षणासाठी आर्थिक मदत

➔ अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र

➔ आत्मविश्वास, संवाद आणि नेतृत्व कौशल्य

➔ नोकरीसाठी आवश्यक कौशल्य

➔ स्वतःच्या शरीराबद्दल आणि अधिकारांबद्दल माहिती

➔ स्वसंरक्षण कौशल्य आणि करियर च्या दिशेने मार्गदर्शन

➔ इंग्रजी आणि संगणक कौशल्ये

नोंदणी आणि अधिक माहितीसाठी आमच्याशी येथे संपर्क साधा:

urmilas@aksharacentre.org वर लिहा किंवा फॉर्मसाठी खालील पत्त्यावर या

वेळ: सोमवार ते शुक्रवार सकाळी 2.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत

पत्ता: अक्षरा रिसोर्स सेंटर अँड लायब्ररी, सावित्रीबाई फुले जेंडर रिसोर्स सेंटर, 
(बृहन्मुंबई महानगर पालिका) दुसरा मजला, 
राजगृह बिल्डिंग, दर्शन हाइट्सच्या पुढे, 
बाळशेठ मदुरकर रोड, प्रभादेवी स्टेशनजवळ, प्रभादेवी पश्चिम

फोन नंबर: 8097962532 (दुपारी 2 ते 5.30 दरम्यान कॉल करा)

फेसबुक: @aksharacentre
इंस्टाग्राम: @aksharacentreindia

 


 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form