४ ऑगस्ट हा Single Working Women’s day असतो हे मुळात माहीतच नव्हते. वॅलेंटाईन्स डे,फॅमिली डे, मदर्स डे, फादर्स डे हे जगभर सुप्रसिद्ध आणि आपल्या देशात कदाचित कुप्रसिद्ध दिवस आहेत. परंतु ‘एकल महिला’ ही देखील साजरी करण्याची बाब असेल, हेच कदाचित आपल्याकडे अनाकलनीय आहे!
आता हेच बघा ना, ‘पुन्हास्त्रीउवाच’ ने लेखनासाठी केलेले आवाहन पाहून आपण लिहावं ,अशी तीव्र इच्छा झाली, पण माझा पहिला प्रश्न होता - ‘माझे नाव न दर्शवता हा लेख छापाल का?’ - तरी मी सुशिक्षित, अपर मिडलक्लास मधली स्त्री आहे. पण घटस्फोटाचा ठप्पा मात्र माझ्यासाठीसुद्धा एक कलंक मानला जातो. घटस्फोटित महिलांकडे अपराधी म्हणून पाहिले जाते आणि त्यांच्या मुलांची खूप कीव केली जाते. कारण कितीही त्रास झाला तरी स्त्रीने लग्नाची बेडी मोडू नये, असंच मानायची पद्धत आहे. आपल्याकडे लग्न टिकवण्याला खूप महत्त्व आहे. मला माझ्या नवऱ्याने दुसऱ्या स्त्री साठी सोडले, पण तरीही मलाच अपराधी ठरवले जाते!
"हिच्यातच काहीतरी कमी असेल", " सासूसासऱ्यांशी जमलं नसणार, मग काय! ", "अजून करा लव्ह मेरेज!" असं कितीतरी कानावर येत रहातं ! इथे माझे रडगाणे गायचा अजिबात उद्देश नाही, उलट मी मला आलेले चॅलेंजेस कसे हाताळले हे मला सांगायचे आहे.
पूर्वी पुरुषांच्या वागण्याचा मला त्रास व्हायचा, पण आता मी ते एन्जॉय करते. स्वतःला समजावते, आपण आकर्षक आहोत म्हणून लोक अशा नजरेने पाहतात, आपण दुर्लक्ष करायचं ! आणि एखादा अगदीच मर्यादा पार करू लागला, तर त्याला रीतसर त्याची जागा दाखवून द्यायची! मुळात माझ्या फेमिनिस्ट विचारधारेला, माझे संरक्षण करायला पुरुष पाहिजे, हे पटतच नाही.
आता हेच बघा ना, ‘पुन्हास्त्रीउवाच’ ने लेखनासाठी केलेले आवाहन पाहून आपण लिहावं ,अशी तीव्र इच्छा झाली, पण माझा पहिला प्रश्न होता - ‘माझे नाव न दर्शवता हा लेख छापाल का?’ - तरी मी सुशिक्षित, अपर मिडलक्लास मधली स्त्री आहे. पण घटस्फोटाचा ठप्पा मात्र माझ्यासाठीसुद्धा एक कलंक मानला जातो. घटस्फोटित महिलांकडे अपराधी म्हणून पाहिले जाते आणि त्यांच्या मुलांची खूप कीव केली जाते. कारण कितीही त्रास झाला तरी स्त्रीने लग्नाची बेडी मोडू नये, असंच मानायची पद्धत आहे. आपल्याकडे लग्न टिकवण्याला खूप महत्त्व आहे. मला माझ्या नवऱ्याने दुसऱ्या स्त्री साठी सोडले, पण तरीही मलाच अपराधी ठरवले जाते!
"हिच्यातच काहीतरी कमी असेल", " सासूसासऱ्यांशी जमलं नसणार, मग काय! ", "अजून करा लव्ह मेरेज!" असं कितीतरी कानावर येत रहातं ! इथे माझे रडगाणे गायचा अजिबात उद्देश नाही, उलट मी मला आलेले चॅलेंजेस कसे हाताळले हे मला सांगायचे आहे.
हे देखील वाचा - 4 ऑगस्ट कशासाठी साजरा करायचा
सगळे काही आपणच करायचे आहे, आपल्याला कोणताही बॅकअप नाहीये याची जाणीव
या जाणिवेमुळे मी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायला शिकले. अनेक नवीन गोष्टी शिकले, ऑनलाईन व्यवहार, पैसे सांभाळणे, नविन ठिकाणी बिनधास्त जाणे, हे सर्व मी शिकले. आणि माझ्या लक्षात आले, केल्याने सर्व होते. मला माझ्या आई वडील, भाऊ, फॅमिली यांच्याकडून खूप आधार होता. पण ते वेगळ्या शहरात असल्यामुळे, इच्छा असूनही ते दरवेळी माझ्याकडे येऊ शकत नव्हते. मग मी माझे लोकल नेटवर्क तयार केले! सोसायटीतल्या मित्रमैत्रिणी, शेजारी, काम करणाऱ्या मावशी, ऑफिस मधले सहकारी ... हे नेटवर्क मी माझ्या चांगल्या वागण्यातून तयार केले. ‘ बिचारी मी’ अशी माझी इमेज बनवली नाही. वेळप्रसंगी सर्वांच्या अडचणीत त्यांनाही मदत केली. मध्ये मला कामासाठी प्रवास करावा लागला, नेमकी तेव्हाच मुलगी आजारी होती – पण मी काळजावर दगड ठेवून गेले! तेव्हा माझ्या या मैत्रिणी, डॉक्टर असलेला भाऊ, कामवाल्या मावशी सर्व माझ्या पाठीशी उभे राहिले. मी परत आल्यावर माझी एक मैत्रीण मला म्हणाली, ‘ अगं तू खूप स्ट्रॉंग आहेस, तुला किती जड गेलं असेल असं जाणं’ माझ्या पोरीच्या आजारापलीकडे, एका आईचं दुःख, चलबिचल तिने ओळखली. अशी लोक माझ्या आयुष्यात आहेत ही माझी खरी कमाई आहे!
मुलांची पूर्ण जवाबदारी आपल्यावर आहे या जाणिवेने कधीकधी खूप खचायला होते.
मनामध्ये अत्यन्त दुःख असताना सुद्धा, मुलांची आर्थिक जवाबदारी तुझीसुद्धा आहे, हे मी त्यांच्या वडिलांना ठासून सांगितले! तो त्यांच्या शिक्षणाचा खर्च करतो आणि याची मी अजिबात लाज वगैरे मानत नाही. उलट त्यामुळे ओढाताण करून खूप पैसे कमवायलाच हवेत अशी सक्ती माझ्यावर नाही. त्याऐवजी मी मुलांचा अभ्यास, त्यांच्यासोबत गप्पा, कधी फिल्म्स बघणे, इंडोर गेम्स यासाठी माझा वेळ देते. लॉकडाऊन मध्ये तर आम्ही खूप मजा केली. माझ्या मुलांना जाणीव आहे की आपले आईवडील एकत्र राहत नाहीत, पण आई आपल्याला वेळ देते. त्यांनी त्यांच्या वडिलांबरोबर बाहेर जावे याचीसुद्धा मी काळजी घेते. मी त्याला माफ करून पुढे आली आहे. हा प्रवास सोपा नव्हता, पण तो माझ्यासाठी गरजेचा होता!

एकटेपणापासून स्वतःची कम्पनी एन्जॉय करण्यापर्यन्त
एकटेपणा हि संकल्पना खूप व्यापक आहे. म्हणजे भरल्या घरात सुद्धा माणसाला एकलकोंडं वाटू शकतं. बऱ्याच घरातल्या सुना असे अनुभव घेतात. अगदी १० लोकांचे कुटुंब असेल तरी माझे असे कोणी नाही, हि भावना किती त्रासदायक असते! एकटेपणाचा स्वीकार करून तो आता एन्जॉय करण्यापर्यन्त मी पोचले आहे. म्हणतात ना,
Learning to enjoy one’s own company, is the greatest empowerment one can experience.
मला स्वतःची कम्पनी खूप आवडू लागली आहे. मी सिनेमा बघायला थिएटरमध्ये एकटी जाते, मॉलमध्ये सुद्धा एकटीच जाते, शॉपिंग करते, खातेपिते. माझ्या कामासाठी आजकाल बऱ्यापैकी एकटी प्रवास करते. कधी एकटीच कॉफी आणि पुस्तक घेऊन बसते. आधी मला हे सगळं करताना संकोच वाटायचा, पण आता मला त्याची सवय झाली आहे.

इतरांच्या नजरा
'जब वी मेट' या चित्रपटात एक वाक्य आहे "अकेली लडकी खुली तिजोरी कि तरहा होती हैंI” याला आपण कितीही हसलो तरी यात थोडंफार तथ्य आहेच! आपला जोडीदार नाहीये हे ज्या पुरुषांना माहित आहे, त्यांचे वागणे रातोरात बदलताना मी अनुभवले आहे. काही खुणा, सुप्त संदेश, फ्लर्टींग थोडं लूज बोलणे ... या गोष्टींचा सुरुवातीला त्रास व्हायचा ... आपण 'सिंगल' आहोत म्हणून आपण 'अव्हेलेबल' आहोत, असे समीकरण का जोडतात लोक? असा प्रश्न पडायचा. माझ्यासारख्या काही मैत्रिणींनी तर असाही अनुभव सांगितलाय, की विवाहित बायका आपल्यापासून त्यांच्या नवऱ्याला वाचवायचा प्रयत्न करतात! नवऱ्याबद्दल जास्त प्रोटेक्टिव्ह होतात. सिंगल बायांनी त्यांच्या नवऱ्याला फूस लावली तर??? नशीब असा काही अनुभव माझ्या गाठीशी नाही. पूर्वी पुरुषांच्या वागण्याचा मला त्रास व्हायचा, पण आता मी ते एन्जॉय करते. स्वतःला समजावते, आपण आकर्षक आहोत म्हणून लोक अशा नजरेने पाहतात, आपण दुर्लक्ष करायचं ! आणि एखादा अगदीच मर्यादा पार करू लागला, तर त्याला रीतसर त्याची जागा दाखवून द्यायची! मुळात माझ्या फेमिनिस्ट विचारधारेला, माझे संरक्षण करायला पुरुष पाहिजे, हे पटतच नाही.
नव्या जोडीदाराचा शोध
एकीकडे मी म्हणते की - मला स्वतःची कम्पनी आवडू लागली, संरक्षणासाठी पुरुष नको वगैरे... मग आता नवा जोडीदार कशाला? - असं तुम्हाला वाटलं का? तर ते तसं नाहीये!

मी एकटी छान जगू शकते, मी स्वतःला सक्षम केलंय तरीही मला जोडीदार हवा आहे! एकटेपणाचा स्वीकार करणे आणि तो एन्जॉय करणे, याचा अर्थ मला त्याचा त्रास होतच नाही, असंही नाही. सणवार असोत किंवा सुट्ट्या, इतरांचे 'चौकोनी' कुटुंब पाहून कुठेतरी मनाला बोचते. मलासुद्धा प्रेम हवं आहे, जोडीदार हवा आहे. मी घटस्फोटित आहे म्हणून मी उरलेलं आयुष्य फक्त मुलांना वाहून द्यावं, हे मला पटत नाही. उद्या माझी मुलं त्यांच्या आयुष्यात मग्न होतील, मग मला कोण?
आयुष्यातली सुखंदु:खं शेयर करायला, गप्पा मारायला, एखादी कॉफी सोबत घ्यायला... कुणीतरी हवंय.
यासाठी मी आधी निरनिराळ्या डेटिंगएप्स चा पर्याय निवडला. माझ्या काही मित्रमैत्रिणींनी मला प्रोत्साहन दिले, काहींनी सावध रहायला बजावलं!

माझे डेटिंगचे अनुभव मिश्र आहेत. मला खूप लोक भेटले. काही छान, Genuine , स्पष्ट, तर काही मतलबी सुद्धा! मुख्य म्हणजे, मला असे वाटायचे कि स्त्रिया खूप भोगतात घटस्फोटात. पण या डेटिंगच्या प्रक्रियेतून मला पुरुषांचीही बाजू समजली. बायकोचे बाहेर अफेअर असणे, मुलांचा ताबा बायकोकडे असल्याने मुलांना भेटता न येणे याबद्दलचे त्यांचे अनुभव कळले. त्यांना पण काही प्रमाणात समाजाचे ताशेरे ऐकावे लागतात – हे लक्षात आले. पुरुषांची हळवी बाजू यातून मला दिसली आणि त्यांनी ती बाजू मला दाखवली, हे महत्त्वाचे. या दरम्यान माझे काही छान मित्र झाले आहेत. तरी अजून रिलेशनशिप किंवा कदाचित पुढे जाऊन लग्न, इथपर्यंत गोष्टी पोचल्या नाहीत. शोध चालू आहे.
मला आशा आहे, की मला समजून घेणारा, मी जशी आहे तसा मला स्वीकारणारा जोडीदार मला मिळेल!
खूप छान
ReplyDeleteअभिनंदन अनुभव शेअर केल्याबद्दल
ReplyDeleteमस्तच
ReplyDelete