आज 4 ऑगस्ट – ‘काम करणाऱ्या एकल महिलांचा दिवस’ आहे. काल मी माझ्या बऱ्याच मैत्रिणींना या दिवसाबद्दल कळवलं, तेव्हा अर्थातच अनेक जणींना त्याविषयी माहिती नव्हतं! साहजिकच आहे – आपल्याला मातृदिन माहीत असतो, मदर्स डे / फादर्स डे किंवा फॅमिली डे माहीत असतो. Valentine day तर अनेक कारणांनी गाजत असतो! आता जागतिक महिला दिवस तर नको तितका प्रसिद्ध झालेला आहे. UNO ने 2011 साली जाहीर केलेल्या International Widows Day विषयी देखील आपण काही दिवसांपूर्वी बातम्यांमध्ये वाचलं असेल. पण आपल्याला ‘काम करणाऱ्या एकल महिलांचा दिवस’ मात्र माहीत नसतो. खरंतर बार्बरा पेन या महिलेने SWWAN(Single Working Women’s Affiliate Network) या तिच्या संस्थेतर्फे 2006 पासून हा दिवस साजरा करायला सुरुवात केली. समाजातील एकल महिलांचे महत्व लक्षात घेण्यासाठी हा दिवस साजरा करायचे त्यांनी ठरवले. कदाचित यातल्या “साजरा करण्याला” बरेच जण आक्षेप घेतील!
कारण एकल महिलांच्या बाबतीत समाजात फारशी कौतुकाची भावनाच नसते. विधवा महिलेबद्दल निदान काही प्रमाणात कणव तरी असू शकते – पण नवऱ्यापासून विभक्त बाईसाठी तर परित्यक्ता म्हणजेच “टाकलेली बाई” असा शब्द वापरला जातो. लग्न न केलेल्या किंवा घटस्फोटित महिलेला तर अनेकदा “वाईट बाई”(चवचाल, आगाऊ) ठरवले जाते. अशा बायांना शक्यतो सणसमारंभा पासून दूर ठेवलं जातं. कारण आपल्या देशात पितृसत्ताक रचनेमुळे लग्नसंस्थेला अतोनात महत्त्व आहे आणि जिचे लग्न टिकलेले आहे आणि जिला मुलं (शक्यतो मुलगे) आहेत अशा बाईलाच चांगलं समजलं जातं. ह्या “सौभाग्यवती”ला जरी नवऱ्याच्या लाथा खाऊन जगावं लागत असेल तरी स्वत:च्या हिमतीवर कमवून स्वाभिमानाने जगणाऱ्या बाईपेक्षा जास्त मान असतो, प्रतिष्ठा असते! एकल बाईने शक्यतो मान खाली घालून, बिचारेपणाने आणि दु:खी चेहऱ्याने जगावं अशीच समाजाची अपेक्षा असते. पूर्वी नाटक-सिनेमातून सुद्धा एकल महिलांचं असंच दु:खीकष्टी चित्रण केलं जात असे. पण आता काही प्रमाणात ह्या चित्रणामध्ये बदल होतोय आणि वास्तव देखील बदलत आहे.
गेल्या काही वर्षांपासून स्वेच्छेने अविवाहित राहणाऱ्या स्त्रियांच्या संख्येत जगभरातच वाढ होताना दिसतेय. आपल्या देशातही अनेक मुलींचा लग्न टाळण्याकडे किंवा पुढे ढकलत राहण्याकडे कल वाढतो आहे. भारतात 2001 पासून 2011 पर्यंतच्या कालावधीत एकल महिलांच्या संख्येत 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात अर्थातच अविवाहित, घटस्फोटित, विभक्त आणि विधवा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या एकल महिलांचा समावेश आहे. जनगणनेतल्या माहितीनुसार सध्या आपल्या देशात साधारण साडेसात कोटी (74.1 million) एकल महिला आहेत. ही आपल्या देशाच्या आतापर्यंतच्या इतिहासातली एकल महिलांची सगळ्यात मोठी संख्या आहे. तरीही एकल स्त्रिया अजूनही भारतातील सर्वात असुरक्षित गटातच आहेत! कारण त्यांच्याविषयी समाजाच्या दृष्टिकोनात मात्र फार सकारात्मक बदल घडलेला नाही.
“एकल महिलांच्या समोरची सगळ्यात मोठी समस्या असते – ती सन्मानाने जीवंत राहण्याची.”
पारुल चौधरी म्हणतात; “एकल महिलांच्या समोरची सगळ्यात मोठी समस्या असते – ती सन्मानाने जीवंत राहण्याची.” त्या National Forum for Single Women’s Rights च्या कार्यकर्त्या आहेत. अनेक जणीना निव्वळ डोक्यावरच्या छपरासाठी सासर/माहेरच्या लोकांवर अवलंबून राहावं लागतं. एकल महिलांना भाड्याने घर देण्यासाठी अगदी मुंबई पुण्यातल्या शहरात देखील लोक राजी नसतात. कोणत्याही कारणाने एकल असलेल्या महिलेला स्वत:चं आणि अनेकदा मुलांचंही पोट भरण्यासाठी घराबाहेर पडून कामधंदा करणं भागच असतं. अशावेळी त्यांना मोठ्या प्रमाणात पिळवणुकीला बळी पडावं लागतं. ActionAid ही संस्था गेल्या दोन दशकांपासून एकल महिलांच्या सोबत काम करते. त्यांच्या अनुभवानुसार सर्वच प्रकारच्या एकल महिलांना आजही लैंगिक आणि भावनिक हिंसेला सामोरे जावे लागते. ग्रामीण आणि शहरी भागातही त्यांना शिक्षण किंवा आरोग्यासारख्या मूलभूत सुविधा आणि संपत्तीमधल्या हक्कापासून देखील वंचित राहावे लागते. म्हणून Action Aid ह्या संस्थेने एकल महिलांसाठी एक ड्राफ्ट पॉलिसी तयार करून विविध सरकारी विभागांच्या कडे सादर केली आहे.
ह्या मसुदयाकडे कुठल्या सरकारी विभागाचे कधी लक्ष जाईल आणि सरकारी धोरणांत कधी बदल घडून येईल – ते काहीच सांगता येणार नाही. पण तोपर्यन्त इतक्या अडचणींना तोंड देत स्वकमाई जोरावर जगात पाय रोवून उभ्या रहाणाऱ्या एकल महिलांना सामाजिक पाठिंबा देणे आणि त्यांच्या रस्त्यात अडथळे निर्माण न करणे तरी नक्की केले पाहिजे. आणि किमान एकल महिलांनी स्वत: तरी स्वत:ची पाठ थोपटून घेतली पाहिजे.

आज 4 ऑगस्ट – ‘काम करणाऱ्या एकल महिलांचा दिवस’ आहे – आज तुम्ही एखाद्या तरी एकल महिलेचं कौतुक केलंत का ? नक्की करा.
आज नाही केलं तरी अजून वेळ गेलेली नाही - SWWAN(Single Working Women’s Affiliate Network) संस्थेतर्फे 8 ऑगस्ट पर्यंतचा आठवडा एकल महिला सप्ताह म्हणून जाहीर केलाय. चीयर्स!
वंदना खरे
संपादक
पुन्हास्त्रीउवाच
मी या वर्गात मोडते.परंतु असा दिवस असतो हे मला माहित नव्हतं.खरंतर एकल स्त्रियांच नेटवर्क बनायला हवं!
ReplyDelete