पूर्वी कधीतरी असं मानलं जायचं की नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे 14 जानेवारीला येणारी संक्रांत! पण गेल्या काही वर्षांपासून सावित्रीबाई फुलेंची जयंती म्हणजे 3 जानेवारी हा नव्या वर्षातला पहिला सण म्हणून साजरा केला जावा – असे प्रयत्न सात-आठ वर्षांपूर्वी राष्ट्र सेवादल आणि काही परिवर्तनवादी लोकांनी सुरू केले. आता त्यांच्या प्रयत्नांना यश येत असल्याचं शरद कदम यांनी कौतुकाने सोशल मिडियावर सांगितलं आहे. पूर्वी महिला मंडळ किंवा संस्थाच्या पातळीवर काहीशा औपचारिक पद्धतीने केला जाणारा सावित्री बाईंच्या जयंतीचा कार्यक्रम आता घरोघरी सुद्धा ‘सावित्रीउत्सव’ म्हणून साजरा केला जातो. हाच त्यांच्या प्रयत्नांच्या मागचा उद्देश होता, असं राज आसरोंडकर म्हणाले . तेदेखील त्यांच्या ‘कायद्यानेवागा’ चळवळी तर्फे सावित्री उत्सव करतात. त्यासाठी हा नव्या वर्षातला पहिला सण कसा साजरा करायचा त्याचं एक टेम्पलेटच राष्ट्र सेवा दलाने लोकप्रिय केलं. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सावित्रीबाईंच्या जयंतीचे म्हणजे “सावित्री उत्सवाचे” मेसेजेस सोशल मिडियावर यायला लागतात. सावित्रीउत्सव२०२१ ह्या फेसबुक पेजवर अशी पोस्ट आहे की - “घराघरात पारंपारिक पद्धतीने आकाशकंदिल लावून, रांगोळ्या काढून, खायला गोडधोड करुन सावित्रीबाई व फातिमा शेख यांच्या कार्याची कृतज्ञ आठवण काढली जावी ही अपेक्षा तर आहेच. त्यात भर म्हणून नव्या त-हेने, नव्या माध्यमातून घरोघरी सावित्रिउत्सवाच्या आनंदाचे लोण पसरावेत अशीच आपल्या सर्वांची इच्छा आहे.” फुले दाम्पत्याने इतके महत्त्वाचे क्रांतिकारक काम केले आहे की त्यांच्या आठवणी जागत्या ठेवण्याचा प्रयत्न करणं जरुरीचेच आहे. पण हे “नव्या तऱ्हेने, नव्या माध्यमातून” उत्सव करणं म्हणजे काय?
“नव्या तऱ्हेने, नव्या माध्यमातून” उत्सव करणं म्हणजे काय?
पूर्वी राष्ट्र सेवा दलाच्या आवाहनात आडवी चिरी लावावी असा उल्लेख असायचा,पण आता ते सांगावं देखील लागत नाही इतकं लोकप्रिय झालं आहे. मालिका आणि सिनेमातून घराघरात पोचलेल्या अनेक मराठी अभिनेत्रींनी कपाळावर आडवी चिरी लावून सोशलमिडियावर सेल्फी पोस्ट केल्यानंतर त्यांचं अनुकरण झालं नसतं तरच नवल! आता पारंपरिक वेषात आडवी चिरी लावलेला सेल्फी पोस्ट करणे हा आता उत्सवाचा अविभाज्य भाग बनून गेला आहे. रांगोळी, कंदील, पणती आणि ही आडवी चिरी ह्या सगळ्या गोष्टी एकप्रकारे ही नव्या उत्सवाची कर्मकांडं आहेत. कदाचित विचार रुजवण्यासाठी काहीनाकाही प्रतिकं आवश्यक आहेत – असं सावित्रीउत्सवाचा प्रसार करणाऱ्यांना वाटत असेल. पण नेमका हाच भाग मला धोकादायक वाटतो!
स्त्रियांच्या वेगवेगळ्या समस्यांवर कृतिशील असणाऱ्या जाणत्या कार्यकर्त्या निशाताई शिऊरकर म्हणतात,“ जेव्हाजेव्हा अशी कर्मकांड होतात, तेव्हा त्यातला विचार हरवतो.” त्यांना वाटतं - “ त्याकाळी सावित्रीबाईंनी बालविवाहापासून केशवपनापर्यन्तच्या अनेक हिंदू रूढीना विरोध केला. त्या मानाने रंगोली, कंदील किंवा आडवी चिरी हे त्यामानाने सोपं काम आहे.”
स्त्रीयांच्या चळवळीत अनेक वर्षं कार्यरत असलेल्या मंगल पाध्ये यांनीही अशीच भावना व्यक्त केली, “अशा प्रकारची नवीन प्रथा पाडून त्यातून काही सिद्ध होत नाही, होणार नाही असं मला वाटतं. मुळातच कुंकवाचा एक सौंदर्य प्रसाधन असा उपयोग आहे असं मला वाटतं. मग चिरी असो की गोल टिकली असो. चळवळीतल्या आम्ही काही मैत्रिणींनी कुंकू,बांगड्या, मंगळसूत्र यासारख्या गोष्टी वापरणं जाणीवपूर्वक बंद केलंय. त्यासाठी खाजगी आणि सामाजिक जीवनात संघर्ष करावा लागला होता. त्यातल्याच एका कुंकवाच्या चिरीचा असा symbolic उपयोग करणं मला बरोबर वाटत नाहीये.” हे त्यांचं म्हणणं मला फारच महत्त्वाचं वाटलं.
स्त्रीवादी विचारांच्या सारिका उबाळे, शीतल पाटील, सीमा घंगाळे, विभा पिटके, अनुजा संखे, शामल गरुड, लीना कुलकर्णी, नूतन मघाडे अशा अनेक मैत्रिणीही “आडवी चिरी लावून काही साध्य होईल असे वाटत नाही” असंच म्हणत आहेत. त्यापेक्षा इतर कृतिशील उपक्रम करावेत असं अनेकजणींनी सुचवलेलं आहे.
पत्रकार संयोगीता ढमढेरे यांनी एक जवळचंच उदाहरण दिलंय - “पुरोगामी म्हणून काही नवीन उत्सव केले पाहिजे असं माझं मत आहे.काटेकोर फुटपट्टी लावून आपल्याला मासेसपर्यंत पोहोचता येणार नाही. त्यामुळं काही जाहिरात सदृश्य कल्पना किंवा समाजमाध्यमस्नेही प्रतीक वापरली तर वापरू दे..पण काही वर्षांनी का होईना लोकांनी स्वतःहून हे उत्सव साजरे केले पाहिजेत. पण बाजारकेंद्री समाजात हे शक्य वाटत नाही. 25 डिसेंबर हा भारतीय महिला दिन म्हणून कुठे साजरा होतो?”

पण राज आसरोंडकर म्हणतात की सामान्य माणसांना परिवर्तनाच्या प्रक्रियेत सहभागी करून घ्यायचं असेल तर असे सोपे उपक्रम द्यावे लागतात. त्यांना मी विचारलं की सावित्रीबाईंनी अशा कर्मकांडाच्या बेड्यातून मुक्त करण्यासाठीच काम केलं आणि आता नव्या कारणांसाठी तसंच प्रतीक नव्या पिढीसमोर आणणं हे एकप्रकारे पुन्हा चार पावलं मागे जाण्यासारखंच नाही का? तर त्यांनी वैयक्तिक रित्या ह्या कर्मकांडाशी जोडून घेत नसल्याचं सांगितलं. पण त्यांचा अशी प्रतिकं वापरण्याला फारसा विरोध देखील नाहीये. उजव्या विचारसरणीच्या मंडळींना टक्कर देण्यासाठी हे करावं लागतं – असं त्यांना वाटतं.
पण ही नवीन कर्मकांडं पुरुषांनी सुद्धा करावीत, अशी काही ‘सावित्रीउत्सव’ प्रमोट करणाऱ्या मंडळींची अपेक्षा दिसत नाही. सावित्री उत्सवाचे कुठलेही फोटो पाहिलेत तरी पारंपरिक पद्धतीच्या साड्या आणि आडवी चिरी लावणाऱ्या बाया दिसतात पण पुरुष काही जोतिबासारखा पोशाख देखील केलेले दिसत नाहीत. मुळात पुरुषांनी जोतिबांचे विचार आणि वागणूक अंगिकारावी असं तरी त्यांना वाटतं की नाही, हयाबद्दल उत्सवाच्या टेम्पलेट मध्ये स्पष्टपणे काही म्हटलेलं दिसत नाही. म्हणून समाजकारणात सहभागी असलेल्या काही पुरुषांना मी सावित्रीउत्सवाच्या स्वरूपा बद्दल विचारलं.
तेव्हा किशोर मांदळे, दिलीप चव्हाण, सुभाषचंद्र सोनार, गणेश रत्ना अनेक पुरुषांनी ह्या प्रतीकांना स्पष्ट शब्दात विरोध दर्शवला आहे. मकरंद जोशी तर विचारतात की हा नवा उत्सव गौरव आहे की का नवी बेडी? त्यांचं म्हणणं आहे की – “भारतीय परंपरेतले अनेक सण म्हणजे घरातील स्त्रीयांसाठी आकर्षक पध्दतीने घातलेली बंधने आहेत. या सण- उत्सवांची कर्मकांडे आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या गोष्टी/ पदार्थ / तयारी ही जणू फक्त घरातल्या महिलांचीच जबाबदारी आहे असा सार्वत्रिक समज अनुभवायला येतो. हे सण, याचे विधी नाकारण्याचे स्वातंत्र्य आजही सगळ्या स्तरांतील स्त्रीयांना नाही. या पारंपरिक कर्मकांडांमधून स्त्रीयांची पूर्ण मुक्तता झाली नसतानाच सावित्री उत्सव सारखी नवी कर्मकांड निर्माण होताना दिसत आहेत. जुन्या पठडीतून बाहेर पडताना त्याच धर्तीच्या नव्या पठडीचा जन्म होणार नाही याची काळजी घ्यायला नको का?”
या प्रतिक्रियेमुळे एक विरोधाभास अगदी स्पष्टपणे समोर आला. सावित्रीबाईंची जयंती असो नाहीतर जोतिबांचा स्मृतीदिवस असो; बरेच पुरुष त्यांना अभिवादन करताना म्हणतात की – “ कुठं गेल्या सावित्रीच्या लेकी? स्त्रीयांनी सावित्रीबाईंच्या कार्याची जाणीव ठेवली पाहिजे...पण आजची स्त्री वटसावित्रीच्या पूजेत वेळ वाया घालवतेय!” एका बाजूला पारंपरिक व्रत करण्याबद्दल टीका केली जाते. पण ‘सावित्रीउत्सव’ रुजवण्यासाठी जी प्रतिकं वापरायला सांगितलं जातं आहे – त्याबद्दल मात्र ही मंडळी चकार शब्द काढत नाहीत. शिवाय सावित्रिबाईंच्या कार्याची आणि त्यागाची जाणीव फक्त स्त्रियांनीच का ठेवायची? त्यांच्या त्यागामुळे पुरुषांना काहीच लाभ झालेला नाहीये का? पुरुषांचे सध्याचे सगळे वागणे सावित्रिबाईंच्या आदर्शाला स्मरून आणि त्यानुसारच चाललेले आहे का? - यावर मात्र कोणीच काही म्हणत नाही. तसंच पुरुषांनी समाज परिवर्तनात पुढाकार घ्यायला पाहिजे – असंही म्हणत नाहीत. पितृसत्तेने स्त्रियांना दुय्यम चिन्हे अंगीकारायला भाग पाडले. अनेक प्रथामधून आणि छद्मविज्ञानाच्या गावगप्पा सांगून कुंकू, मंगळसूत्र सारखी अनेक प्रतिकं माथी मारली, बायाबायांच्यात भेदभाव तयार केले. आता पुन्हा नव्या उत्सवाच्या निमित्ताने बायांच्या वरच रांगोळी , आडवी चिरी, पणती, गोडधोड करणे अशी कर्मकांडं लादली जाताहेत. थोडक्यात उत्सव नवा असला तरी जशी प्रतिकं जुनाट आहेत तशी त्यामागची मानसिकता देखील जुनीच आहे – असं आत्ता तरी दिसतं आहे!
“सावित्रीच्या लेकी” ना हा नवा सापळा लवकर लक्षात येवो, हीच आजच्या दिवशी सदिच्छा!