“देव सगळीकडे असू शकत नाही म्हणून त्याने 'आई ' बनवली”
“परक्या घरी गेली तरी वेळेला मुलगीच उपयोगी पडते!”
“तू माझी 'प्रिन्सेस' आहेस!”
अशी स्त्रियांच्या त्यागाची, कौतुकाची जी वाक्य आपण नेहमीच ऐकतो - ती ऐकताना आपल्याला कसं ‘बनवलं’ जातंय, इमोशनल ब्लॅकमेल केलं जातंय हे आपल्या लक्षात येतं का? जर हे तुमच्या लक्षात येत असेल तर तुमच्या मानसिक आरोग्याची पहिली आणि महत्त्वाची पायरी तुम्ही गाठली आहे असं म्हणायला हरकत नाही.

पण अडचण अशी आहे कि बऱ्याच बायका याच पायरीवर अडकून बसतात आणि त्यांच्यापेक्षा कितीतरी जास्त संख्येने बायका या पायरीपर्यंत सुद्धा पोहोचत नाहीत. मला कल्पना आहे की आता लगेच तुम्ही म्हणाल की "माझं कुटुंब नाही बाबा मला असं ब्लॅक मेल करत!” - शक्य आहे; पण कदाचित सामाजिक दबावाने ते काम आधीच केलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही.गेली वीसेक वर्ष मानसोपचाराचं काम करताना मला आलेले अनुभव आणि त्यातून मला दिसलेले काही कॉमन प्रश्न आणि स्त्रियांच्या विचार करण्याच्या कॉमन पद्धती याबद्दल मी लिहिणार आहे. मानसिक समस्या ह्या नेहमी मनोसामाजिक स्वरूपाच्या असतात, असच मला दिसून आलेलं आहे - कारण आपण काही isolation मध्ये जगत नाही!
कोरोनासत्र सुरु झाल्यापासून मला समुपदेशनासाठी ज्या स्त्रियांचे कॉल येऊ लागले, त्यात मुख्यत्वे कुटुंबाची काळजी, मरणाची भीती - स्वतःपेक्षा जास्त नवरा, मुलं, आई वडील, सासूसासरे यांच्या मरण्याची भीती ही दिसून येते आहे. एका महिलेशी बोलत असताना ती तर सहजपणे म्हणाली – “मी मेले तर फार काही फरक पडणार नाही, काही दिवसांनी 'हे' दुसरं लग्न करतील. मला रिप्लेस करणं फार अवघड नाही. पण 'ह्यांना' काही झालं तर मात्र आमच्या सगळ्यांचं आयुष्य उध्वस्त होईल. 'ह्यांची' काळजी घेणं जास्त महत्वाचं.” दुसरी एक जण म्हणाली , “मी घरी आणलेलं सामान , भाज्या २-२, ३-३ वेळा धुते. सासरे म्हातारे आहेत, त्यांना काही झालं तर?”
या उदाहरणांतून बऱ्याच गोष्टी लक्षात येतात.
स्वतःला दुय्यम मानणे
लहानपणापासून हेच तर संस्कार झालेत ना आपल्यावर ? तू मुलगी आहेस त्यामुळे घरातल्या सगळ्यांना खुश ठेवणं हे तुझं काम आहे. तुझी ख़ुशी महत्वाची नाही. आणि फार विचार करायची संधी न मिळालेल्या मुली त्यांच्याही नकळत हेच सत्य मानून जगायला शिकतात. त्यामुळे कित्येक स्त्रियांना 'तुला काय केलं कि आनंद होतो ? ' किंवा ' तुला काय खायला आवडत?' अशा सध्या प्रश्नांचं सुद्धा उत्तर देता येत नाही, विचारच केलेला नसतो आपल्या आवडी निवडीचा! खोटं वाटतंय का हे ? कारण हे वाचणाऱ्या बऱ्याचशा जणी शिकलेल्या , स्वतःचा विचार आणि जाणीव असलेल्या असतील. पण लक्षात असू द्या तुम्ही minority मध्ये आहात. माझ्याकडे समुपदेशनाला येणाऱ्या ह्या स्त्रिया स्वतःसाठी आलेल्या पण नसतात. त्यांच्या मुलांच्या कोणत्यातरी समस्येसाठी शाळेने त्यांना सल्ला दिलेला असतो समुपदेशनाला जाण्याचा. लहान मुलांच्या समस्या ह्या बहुतेक वेळा पालकांच्या समस्यांचं extension असत , मग पालकांबरोबर काम करावं लागत. खूप वेळा ह्या स्त्रियांचे नवरे तक्रार सांगतात कि - 'ही मुलांना मारते, रागावते खूप, मी कधीच नाही मारत.' ( फक्त मुलं चुकली की हिला मारतो, मुलांकडे नीट लक्ष देत नाही म्हणून ) तर या स्वतःला महत्त्व न देणाऱ्या स्त्रिया घरातील प्रत्येकाच्या आरोग्याची, आनंदाची जबाबदारी स्वतःवर घेतात, स्वतःच्या सगळ्या इच्छा, अपेक्षा, आनंद दाबून टाकतात, मारून टाकतात आणि विविध मानसिक समस्यांच्या शिकार होतात.
सुंदर दिसण्याचा ताण - आठवतंय? गुजराथमध्ये काही वर्षांपूर्वी हजारो स्त्रियांनी ब्रेस्टइम्प्लांट नामक surgery करून घेत होत्या. नवरा ‘आपला’ राहायला हवा असेल तर हे करणं गरजेचं होतं म्हणे. पिढ्यानपिढ्या हे असले सौदंर्यांचे मूर्ख साचे आणि त्याचा आपल्या नात्यांशी जोडलेला संबंध आजही स्त्रियांच्या मनातील काळजीचे, ताणाचे कारण बनलेला दिसतो. हा ताण सर्व आर्थिक, सामाजिक स्तरात आणि सर्व वयाच्या स्त्रियांमध्ये दिसतो. मी एका अत्यंत उच्चभ्रू कॉलेजमध्ये काम करते. तिथे अनेक अत्यंत देखण्या मुली सुद्धा या विचाराने आपला self-esteem ( स्वतःचे मूल्य ) गमावून बसलेल्या दिसतात. त्यात पुन्हा असेच कपडे घातले पाहिजेत, असंच दिसलं पाहिजे, वागलं पाहिजे, इथेच जाता कामा नये, इतक्या वाजता घरी आलंच पाहिजे असे सामाजिक, कौटुंबिक दबाव असतात ते वेगळेच.

हे देखील वाचा - लॉकडाऊन ते अनलॉक : स्त्रियांचे मानसिक आरोग्य
गॉसिप - गॉसिप हे महिलांच vent out होण्याचं एक माध्यम आहे. मानसशास्त्र सांगतं की जगात असं कुणीही नाही जे गॉसिप करत नाही. माझे स्वतःचे कितीतरी पुरुष मित्र माझ्यासोबत सुद्धा गॉसिप करतात. मात्र स्त्रियांच्या गॉसिपवर एवढी टीका होते, त्याची एवढी टर उडवली जाते की बऱ्याच महिलांना गॉसिप केल्याबद्दल अपराधी तरी वाटतं किंवा लाजिरवाणं तरी! याचा अर्थ दुसऱ्याला त्रास देण्याच्या हेतूने किंवा मानहानी , खोट्या गोष्टी पसरवण अशा प्रकारच्या गॉसिपच मी समर्थन करते आहे असं नव्हे. पण घरात होणारे त्रास मैत्रिणीला सांगणं, नवऱ्याच्या तक्रारी सांगणं इ. प्रकारच्या गोष्टी भावनांना वाट करून देतात आणि उपयोगी ठरतात. तेंव्हा त्याची टवाळी करणं किमान आपण महिलांनी तरी बंद केलं पाहिजे आणि त्याचा अपराधी भाव बाळगता काम नये. गॉसिप करावं लागण्यामागचं एक महत्वाचं कारण असं आहे कि घरातील पुरुष ऐकून घेत नाहीत , सासूची तक्रार नवरा ऐकून घेत नाही, कटकट करू नको म्हणतो किंवा ‘तुझं तू बघून घे, मला यात पडायचं नाही’ असं म्हणतो, खरंतर नुसतं ऐकून, समजून घेतलं तरी निम्मं दुःख हलकं होतं - पण घरात तसं घडत नाही. आणि दुसरं कारण म्हणजे समोरासमोर बोलण्यासाठी (confrontation) हिम्मत नसते.
आर्थिक परावलंबित्व - ही बोलायची हिम्मत नसते कारण बऱ्याच गोष्टीत या स्त्रिया परावलंबी असतात. 'उद्या नवऱ्याने हाकलून दिल तर?' ची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर असते. माहेरचे लोक ही आधार देत नसतात. अशा वेळेस चालवून घेणे, गप्प बसणे हाच पर्याय त्या निवडतात. पण म्हणून मनात वाटलेल्या भावना, मनस्ताप, परावलंबी असल्याबद्दलची लाज, सतत दुसऱ्याला खुश करताना येणारा ताण थोडाच नाहीसा होतो? तो तसाच राहतो मनाच्या कोपऱ्यात आणि कधीतरी मानसिक समस्येच्या स्वरूपात डोकं बाहेर काढतो. यातूनच अंगात येण्या सारख्या घटना घडू शकतात आणि त्यातून पसरणारी अंधश्रद्धा मानसिक आजारांना अजूनच खतपाणी घालते.
सहानुभूतीची अपेक्षा / सवय - जेंव्हा आपल्या समस्येबद्दल आपण काहीच करणार नसतो , करू शकणार नसतो तेंव्हा मग एक वेगळी सवय लागते. सवय कसली त्याला व्यसनच म्हणता येईल - ते म्हणजे सहानुभूती मिळवण्याचं. जिथेतिथे आपली रडकथा ऐकवून दुसऱ्यांकडून "तू किती बिचारी” हे ऐकण्याचं व्यसन. आपली रडकथा ऐकवू नये असे मी मुळीच म्हणत नाही, पण ती ऐकवून , चर्चा करून त्यातून मार्ग काढण्याऐवजी जेव्हा फक्त तू खूप चांगली आणि बिचारी हे ऐकायची सवय लागते तेंव्हा आपल्याला यातून मार्ग काढताच येणार नाही किंवा यातून काही मार्गच नाहीये या विचारावर पुन्हापुन्हा शिक्कामोर्तब होत राहतं. परिणामी निराशेचे विचार वाढत, तीव्र होत जातात. भारतात महिला आणि त्यातही गृहिणींमध्ये नैराश्याचा आजार आणि आत्महत्यांचं प्रमाण खूप जास्त आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे.
हे सगळं वाचल्यावर पुढे आपण काय करू शकतो याचा विचार ओघानेच आला!
तर आपण - स्त्रिया व स्त्रियांच्या मानसिक आरोग्याचे महत्व वाटणारे इतर सर्व - यांनी काही पथ्य बाळगूया. काही सपोर्ट तयार करू या. यात पाहिलं म्हणजे तू तुझ्यासाठी ( म्हणजे फक्त तुझ्यासाठी असं नव्हे ) जगायचं आहेस, हा विचार लहानपणापासून मुलींना सांगू या. तरुणींना सौन्दर्याच्या संकल्पनांचा पुनर्विचार करायला सांगू या, आकर्षक असणं आणि टिपिकल सौन्दर्य यातला फरक सांगू या. आकर्षण हे फक्त लैंगिक नसतं आणि नुसतं लैंगिक आकर्षण पुरेसं नसतं - हे सांगू या. तुमचे आचार विचार, आत्मविश्वास तुम्हाला कसा आकर्षक बनवू शकतात हे सांगू या. स्त्रियांच्या गॉसिपला ' problem solving ' कडे नेऊ या. एकमकींना नुसती सहानुभूती देण्यापेक्षा आधार देऊ या, मदत करूया. तुला हवं त्या पद्धतीने जगायचा तुला अधिकार आहे याची आठवण करून देऊया. हे सगळे करून मानसिक समस्या संपतील असे नाही, पण निदान आपण एकटे नाही हा दिलासा असेल असे बघूया. शेवटचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मानसिक समस्येकडे शास्त्रीय दृष्टीकोनातून बघूया. शारीरिक आजारांप्रमाणेच मानसिक आजारसुद्धा कुणालाही होऊ शकतात, हे मान्य करून - आपण त्यापासून वाचण्यासाठी काही preventive पावलं उचलली तरी, गरज पडल्यास कोणताही किंतु न बाळगता उपचार घेऊया!!
खरं म्हणजे पुरुषांना पण अनेक प्रकारची दडपणं आणि दबाव आजच्या सामाजिक परिस्थितीमुळे जाणवतात. उदाहरणार्थ कुटुंबातील "प्रॉब्लेम सॉल्व्हर” ची भूमिका, ‘कमावलेच पाहिजे’चे compulsion किंवा भावना व्यक्त करण्याला मज्जाव किंवा सतत खंबीर असण्याची अपेक्षा. या ताणांचा परिणाम म्हणून विविध प्रकारच्या मानसिक समस्यांना त्यांनाही तोंड द्यावं लागतं. रडून चालत नाही म्हणून दारूचा पर्याय निवडणारे पुरुष काही कमी नाहीत! थोडक्यात, स्त्रिया आणि पुरुष दोघांचा ही शत्रू एकच आहे, तो म्हणजे - पुरुषसत्ताक पद्धती. समतेवर आधारित समाज तयार झाला तर दोघांनाही मदतच होणार आहे. स्त्री व पुरुष हे एकमेकांच्या समोर शत्रू म्हणून उभे असण्याऐवजी एकमेकांना पूरक व्हायला हवेत. एक समजूतदार, सर्वाना व्यक्त होण्याची संधी देणारा आणि आधार देणारा समाज सर्वांच्याच मानसिक आरोग्याला उपयोगी ठरेल. कोरोनाने आपल्याला शिकवलेला सगळ्यात मोठा धडा हाच आहे की एकेकट्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी संपूर्ण समाजाच्या आरोग्याचा विचार आपल्याला केला पाहिजे. तेच तत्व मानसिक आरोग्यालाही लागू आहे - अशा समाजनिर्मितीसाठी आपण कोणतं योगदान देणार ?

खूप छान विश्लेषण मानवी मनाचं
ReplyDeleteछान
ReplyDelete.विचार करायला लावणारा लेख..
स्त्रियांना मन असते आणि ते आजारी पडू शकते .एवढे जरी समाजाला कळलं तर बरं होईल.
खूप छान
ReplyDelete