व्यायाम आणि मासिकपाळी


मी फिटनेस coach आहे. आणि गेल्या सात वर्षांपासून ह्या क्षेत्रात आहे. मुख्यतः मी persoanl ट्रेनिंग देतो आणि clients ना त्यांच्या ठरवलेल्या लक्ष्यापर्यन्त पोचायला मदत करतो. त्यात बऱ्याचदा काही injury च्या केसेस पण असतात आणि मला त्यात जास्त इंट्रेस्ट असतो. मी गेल्या सात वर्षांत किमान १५-२० महिलांच्या सोबत काम केलंय. ह्या दरम्यान मला बऱ्याच गोष्टी शिकता आल्या आणि अजूनही शिकतोय. माझ्या profession मधे - फक्त एखादा व्यायाम सुरक्षित आणि सुरळीतपणे घेणं एवढंच मर्यादित नसतं . fitness आणि health बद्दलचा client चा काय दृष्टिकोन आहे, त्या व्यामातून काय अपेक्षा ठेवतात , त्यांचा स्वभाव , मेहनत करण्याची तयारी इत्यादी सगळ्याच गोष्टी समजून घेण्यासाठी open conversation होण खूप महत्त्वाचं असतं. शिवाय एखाद्या specific दिवशी व्यायाम करणाऱ्याचा mood कसा आहे , झोप झालिये का , अंगदुखी आहे का ? इत्यादी गोष्टींचा परिणाम व्यायामावर होतो.
महिलांच्या सोबत काम करताना periods आणि व्यायाम ह्या बाबतीत वेगवेगळ्या गोष्टी मला लक्षात आल्या. कुठल्याही client सोबत काम करताना नक्की कुठल्या गोष्टीवर भर दिला पाहिजे, कुठल्या बाबतीत support करून त्यांना प्रोत्साहन द्यायचं आणि कुठल्या गोष्टी सोडून द्यायच्या – हे लक्षात येणं महत्त्वाचं असतं. टेक्निकली जरी सगळ्या गोष्टी माहित असल्या तरी भावनिक बाबतीत त्याचा कसा परिणाम होतो ते कळायला वेळ जातो. कधीकधी त्यांच्यासोबत माझे वाद व्हायचे (अजून पण कधी कधी होतात.) मासिकपाळी आणि मूड यांचा परस्पर संबंध आणि बऱ्याच गोष्टींची तीव्रता मला कळायची नाही. पाळीचा खाण्यावर, वागण्यावर mood वर व्यायाम करण्याच्या ईच्छेवर कसा परिणाम होतो ह्या सगळ्या गोष्टी मला हळू हळू समजल्या. PMSसोबत येणारे bloating आणि त्यामुळे आपण जाड झालोय आणि आपली शारीरिक क्षमता कमी झालीय अशी जाणीव जवळ जवळ सगळ्याच जणीमध्ये common असते. त्यामुळे चिडचिड होते, मी चांगली दिसत नाही, मला काहीच करायला जमत नाही, कश्याचा काहीच उपयोग नाही असे negative विचार येतात, ज्यामुळे confidence कमी होतो. तरी एकच गोष्ट मी सुरवातीपासून केली - ती म्हणजे periods च्या दिवसात मुळात व्यायाम करायचा की नाही हा त्यांचा चॉईस असावा. मी व्यायाम करणं कसं चांगलं आहे ते सांगतो, पण तो करायलाच पाहिजे असा भर नाही देत. periods मध्ये सोप्पा comfortable व्यायाम काय करता येईल हे मी सांगतो. पण प्रत्येकाची Periods ची intensity वेगळी असते आणि त्याच्याशी deal करायची पद्धत पण वेगळी असते. काहींना periods मध्ये almost काहीच फरक पडत नाही आणि इतर दिवसांमध्ये करतात, तसाच व्यायाम पाळी असली तरीही करतात. पण सगळ्यांनाच periods च्यावेळी व्यायाम करायला आवडेल किंवा कुठलीही विशिष्ट activity करायला आवडेल असे नसते!

जेव्हा मी माझ्या client शी periods बद्दल बोललो, तेव्हा त्यांनी मला काही अनुभव सांगितले. काहीजणीनी सांगितलं की – ‘मला व्यायाम सुरू करायच्या आधी असं वाटायचं की periods मध्ये व्यायाम करायचा नसतो; कारण मला पाळीचा खूप त्रास व्हायचा. पण आपण जेव्हा व्यायाम सुरू केला आणि मी periods मध्ये थोडा कमी intensity चा व्यायाम केला तेव्हा मला लक्षात आलं की व्यायाम केल्यावर पाळीचा त्रास कमी होतो आहे.’
एका क्लाईंट ने सांगितले की periods मध्ये cup वापरायला लागल्या नंतर पण व्यायमामध्ये खूप फरक पडला . कारण बऱ्याच मुली स्त्रिया periods मध्ये व्यायाम करायला घाबरतात, त्याच एक कारण म्हणजे व्यायाम करताना bleeding सुरू झालं तर pad slip होऊ शकतो. म्हणून cup हा एक चांगला alternative आहे कारण त्यामुळे तुमच्या हालचाली वरचे निर्बंध कमी होतात.
सध्या तरी प्रत्येक client सही त्यांच्या गरजेनुसार संवाद साधून काय बदल करता येतील त्याचा विचार मी करतोय . पण अधिक माहिती साठी काही क्लाएंट ना घेऊन एका स्त्री रोग तज्ञांना भेटायचं ठरवलं आहे. त्यामुळे त्यांना जास्त चांगली मदत करता येईल, असं मला वाटतं.
#menstrualhygiene#MHDay2023#EndPeriodStigma
#EndPeriodPoverty
#PeriodEducationForAll
#PeriodFriendlyToiletsForAll

आभास केसकर

 

 

 



Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form