देशात माता मृत्यू दर कमी करण्यासाठी दरवर्षी 11 एप्रिलला राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस साजरा केला जातो. भारत सरकारने सर्वप्रथम 2003 साली 11 एप्रिलला राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यानिमित्त बनवलेला हा व्हिडिओ जरूर पहा.
देशात मातामृत्यू दर कमी करण्यासाठी 2003 साला पासून 11 एप्रिलला राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस साजरा केला जातो. असुरक्षित मातृत्व म्हणजे माता आणि बाळांचे मृत्यू किवा अनारोग्य. आजही जगात दररोज कमीतकमी ८१० मातामृत्यू होतात, यापैकी ९९% मृत्यू हे गरीब देशात होतात. हे मृत्यू टाळता येण्यासारख्या कारणांनी होणारे असतात.
भारतात दर एक लाख नवजात बालकांमागे १०३ मातांचे मृत्यू होतात. गेल्या तीस वर्षातले हे कमी झालेले प्रमाण आहे. मातामृत्यू ही एक अशी शोकांतिका आहे जी नैसर्गिक जीवन प्रक्रिये दरम्यान – बाळंतपणात उद्भवते. याचा सगळा भार स्त्रियांवर लादला जातो. “विश्वगुरू” होऊ पहाणाऱ्या भारतात, दर्जेदार आरोग्यसेवेइतकी मूलभूत गोष्टही अजून महिलांच्या हाती आलेली नाही.
मातामृत्यूचे मूळ आहे महिलांची सामाजिक शक्तीहीनता!
हे मृत्यू रोखण्यासाठी महिलांच्या अधिकारांची पायमल्ली न होऊ देणे आवश्यक आहे
“सुरक्षित मातृत्व” हा मानवी अधिकाराचा आणि सामाजिक न्यायाचा मुद्दा आहे.
सुरक्षित मातृत्व, एक सामाजिक जबाबदारी आहे.
#SafeMotherhood #सुरक्षितमातृत्व
Tags
video
