माझी आणि शरदची एका प्रवासात ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांना जेव्हा असे वाटले की ‘आपण एकमेकांशिवाय राहुच शकणार नाही’ तेव्हा आम्ही दोघांनीही आपापल्या घरी या नात्याची कल्पना दिली. माझ्या घरी, ‘मुलगा आपल्या जातीतला आहे का?’ या प्रश्नाच्या उत्तरानंतर चर्चा संपली. मी दुसर्या जातीतील असल्याचे समजताच त्याच्या घरीही विरोध झाला.
लवकरच मला मुंबईत नोकरी मिळाली. इथे माझं दुसरं कोणीही ओळखीचं नसल्यानं तो ज्या दोन मित्रांबरोबर रहात होता, त्या कुटुंबाची मीही सदस्य झाले. (हे आमच्या दोघांच्याही घरी माहित नव्हते. शरदच्या घरचे आल्यावर मी माझे सामान घेऊन मैत्रिणीकडे राहायला जात असे. या घरात आम्ही सर्व खूप गमतीजमती करत आनंदाने एकत्र राहत होतो. आमचे घरमालक प्रेमळ गृहस्थ होते. आम्ही त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या होत्या.) माझ्या गावात, आसपास रूढीवादी लग्नव्यवस्थेने स्त्रियांची होरपळलेली आयुष्ये पाहिलेली. त्यातील हिंसा, अत्याचार लहानपणापासून अनुभवलेली. त्यामुळे मला लग्न करायचे नव्हते. शरदच्याही डोक्यात लगेच लग्नाचा विचार नव्हता. पण सहजीवनाविषयी माझी मते, अटी म्हटल्या तरी चालेल, ठाम होत्या; ‘मी कुंकू/टिकली लावणार नाही, जोडवी, साडी, मंगळसूत्र घालणार नाही. मूल हवं की नको याचा याबाबतीत अजून ठरलं नाही. मी आहे तशीच राहीन आणि तुलाही बदलण्याचा प्रयत्न करणार नाही. मला माझी स्पेस हवी आहे, मीही तुझी स्पेस घेणार नाही,’ या मी त्याला अगदी लिहून दिल्या व मान्य असतील तरच आपण नातं पुढं नेऊया असे सांगितले. त्याला ते मान्य होते.
आम्हा दोघांनाही घरच्यांना सोडून लग्न करायचे नव्हते. आम्ही ठरवले होते की घरच्यांना तयार करूनच आम्ही लग्न करू. पण शरदच्या एका मित्राच्या मैत्रिणीला तिच्या कुटुंबियांनी इमोशनल ब्लॅकमेल करून तिचं लग्न दुसरीकडं लावून दिलं. त्यामुळे शरदला एक प्रकारची असुरक्षितता वाटू लागली. दोघेही भावनिक झालो. शरदच्या मते लग्न झाल्याचे कागदपत्र जवळ असले तर दोघांच्याही घरचे काहीही करणार नाहीत.
०२.०३.२००६ रोजीची सकाळ. आमच्या एका मित्राने माझ्यासाठी एक शालू आणला होता तो मी घातला. शरदचे तीन मित्र व आम्ही दोघे असे बांद्राला कोर्टात पोहोचलो. कोर्टाच्या आवारात अशीलाच्या शोधात उभ्या असणार्या व बाजाराप्रमाणे गिर्हाइकासाठी ओरडणार्या वकिलांना पाहून मी गांगरून गेले होते. अशाच एका वकिलाने आम्हाला जवळजवळ पकडले. सगळा खर्च मिळून पंधराशे रु. ठरले. त्याने सांगितले की कोर्टाच्या शेजारी एक मंदिर आहे तिथे काही पैसे देणगी म्हणून द्यायचे, तिथे एक पावती मिळेल. ती आणून वकिलाला द्यायची. सोपं तर होतं सगळं. आम्ही पावती घ्यायला गेलो तर तिथली जेष्ठ पुजारी व्यक्ती देणगी देऊनही आम्हाला विधी केल्याशिवाय पावती द्यायला तयार होईना. कित्येक जोडप्यांच्या लग्नाचे विधी करूनही यांची हौस अजून भागली नाही याचे मला प्रचंड अप्रूप वाटले. आम्हाला विधी करण्याशिवाय पर्याय नव्हता. पुजारी महाशयांनी होमामध्ये काहीबाही टाकायला लावले . मला खूप हसू येत होतं ते सगळं करताना (यावेळचे काही फोटोही आम्ही पुरावा म्हणून काढले होते!).
त्यांना आम्ही परत एकदा सांगितले की आम्हाला हे विधी करण्यात काहीही रस नाही, तेव्हा तुम्ही आटोपते घ्या. काही विधी करून त्यांना आमचे ‘लग्न झाल्यासारखे’ वाटले असावे, त्यांनी आटोपते घेतले व देणगी दिल्याची एक पावती आमच्या हाती दिली(जी अजूनपर्यंत माझ्याकडे आहे.). आम्हाला कोण आनंद झाला म्हणून सांगू! जग जिंकल्याच्या आविर्भावात आम्ही हसतहसत मंदिरातून बाहेर पडलो. समोर वकील, काहीसा चिंताग्रस्त. म्हणाला, “तुमचा मुंबईतला राहण्याचा काही पुरावा नाही, त्यामुळे इथे तुमच्या लग्नाची नोंदणी शक्य नाही.” माझ्या काळजात धस्स झालं. आणि क्षणार्धात माझ्या धस्सचे रूपांतर रुद्रावतारात झाले. मला त्याचा प्रचंड राग आला. “तुम्ही वकील कसे झालात? वकील असूनही तुम्हाला ही गोष्ट माहिती कशी नव्हती? असले कसले तुम्ही वकील? माझे पैसे द्या परत,” मी त्या वकिलावर तुटून पडले. शरद मला मागे खेचत होता. शेवटी त्याने बाराशे रुपये परत केले. माझी त्याला तीनशे रुपयेही द्यायची तयारी नव्हती. आम्ही चरफडत परत आलो. थोड्याच वेळात स्वत:च्या अज्ञानावर आणि वकिलाच्या ज्ञानावर सर्वजण हसू लागलो. त्यानंतर माहिती मिळाली की शरदचा जिल्हा सातारा येत असल्याने सातार्याच्या कोर्टात आमचे लग्न केले जाऊ शकते.
दोन दिवसांनी आम्ही सातारा गाठले. तिथे एक एकदम तरुण वकील होता, नुकतीच वकिली सुरू केलेली. हुशार वाटत होता. तो म्हणाला,”तुम्ही काही काळजी करू नका. मी सगळं करून देतो.” त्याने आमचा विवाह यवतेश्वर मंदिरात संपन्न झाल्याचे एक affidavit केले व विवाह नोंदणीसाठी ते सादर केले. तरी नोंदणी होऊ शकली नाही, चौकशी केल्यावर कळले की सातारा शहरातील रहिवासी पुरावा नसल्याने तिथे लग्नाबाबत काहीही होणे शक्य नाही. मी पूर्वी सातार्यामध्ये बी.एड करत असताना एड. वर्षा देशपांडे यांचा फोन नंबर माझ्याकडे होता. त्यांच्याशी मी बोलले. त्या म्हणल्या,”कसं होऊ शकत नाही हे मी बघते. तू तिथे थांब, आलेच मी.”
त्यांनी उघड्या टपाच्या जीपमधून दिमाखदार एंट्री केली, एकदम लेडी डॉन के माफिक!
ते घेऊन आम्ही निश्चिंतपणे ( आयुष्यात पुढे काय वाढून ठेवले आहे याची चिंता न करता, जे होईल ते दोघे मिळून निभावून नेऊ या विश्वासाने) परत निघालो. गंमत म्हणजे आम्ही बांद्राला लग्नाचे केलेले सोपस्कार वेगळ्या तारखेचे, लग्न नोंदणी वेगळ्या तारखेची. योगायोगाने वकिलाने अफिडेवीटची अंदाजे टाकलेली तारीख बांद्राच्या गोंधळाची तारीख निघाली. असो! एक मात्र झाले, (या झालेल्या की न झालेल्या कुणाला माहित!) लग्नाच्या तारखांच्या गोंधळाने, लग्नाचा वाढदिवस नक्की कधी साजरा करणार हा नवा गुंता मात्र तयार झाला! (तसंही तो साजरा करण्यात आम्हाला रस नव्हता, पण तरी कधी वाटलेच तर?)
मग आमचं लग्न गुपित राहिलं का, दोघांच्या घरच्यांनी आम्हाला स्वीकारलं का, आमचं पुन्हा लोकांसमोर लग्न झालं का, आम्ही एकमेकांची साथ दिली की नाही? याचा रोमांचक इतिहास पुन्हा कधीतरी!
लवकरच मला मुंबईत नोकरी मिळाली. इथे माझं दुसरं कोणीही ओळखीचं नसल्यानं तो ज्या दोन मित्रांबरोबर रहात होता, त्या कुटुंबाची मीही सदस्य झाले. (हे आमच्या दोघांच्याही घरी माहित नव्हते. शरदच्या घरचे आल्यावर मी माझे सामान घेऊन मैत्रिणीकडे राहायला जात असे. या घरात आम्ही सर्व खूप गमतीजमती करत आनंदाने एकत्र राहत होतो. आमचे घरमालक प्रेमळ गृहस्थ होते. आम्ही त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या होत्या.) माझ्या गावात, आसपास रूढीवादी लग्नव्यवस्थेने स्त्रियांची होरपळलेली आयुष्ये पाहिलेली. त्यातील हिंसा, अत्याचार लहानपणापासून अनुभवलेली. त्यामुळे मला लग्न करायचे नव्हते. शरदच्याही डोक्यात लगेच लग्नाचा विचार नव्हता. पण सहजीवनाविषयी माझी मते, अटी म्हटल्या तरी चालेल, ठाम होत्या; ‘मी कुंकू/टिकली लावणार नाही, जोडवी, साडी, मंगळसूत्र घालणार नाही. मूल हवं की नको याचा याबाबतीत अजून ठरलं नाही. मी आहे तशीच राहीन आणि तुलाही बदलण्याचा प्रयत्न करणार नाही. मला माझी स्पेस हवी आहे, मीही तुझी स्पेस घेणार नाही,’ या मी त्याला अगदी लिहून दिल्या व मान्य असतील तरच आपण नातं पुढं नेऊया असे सांगितले. त्याला ते मान्य होते.
आम्हा दोघांनाही घरच्यांना सोडून लग्न करायचे नव्हते. आम्ही ठरवले होते की घरच्यांना तयार करूनच आम्ही लग्न करू. पण शरदच्या एका मित्राच्या मैत्रिणीला तिच्या कुटुंबियांनी इमोशनल ब्लॅकमेल करून तिचं लग्न दुसरीकडं लावून दिलं. त्यामुळे शरदला एक प्रकारची असुरक्षितता वाटू लागली. दोघेही भावनिक झालो. शरदच्या मते लग्न झाल्याचे कागदपत्र जवळ असले तर दोघांच्याही घरचे काहीही करणार नाहीत.
‘माझा लग्न संकल्पनेत विश्वास नाही, मला वाटत नाही की कागद्पत्राचा आणि सुखी सहजीवनाचा काही संबंध आहे’ या माझ्या मतावर शरद म्हणाला, ‘तुला कागदपत्र नसल्याने फरक पडत नाही तर असल्याने तरी काय फरक पडणार आहे?’
यावेळी आणखी एक मुद्दा आला तो म्हणजे शरदच्या भावाचे लग्न ठरत होते. शरदच्या नातेवाईकांच्यात जर समजले की त्याने आंतरजातीय लग्न केले आहे तर भावाच्या लग्नाला अडथळे येतील म्हणून आम्ही दोघांनी असे ठरवले की फक्त सर्टिफिकेट काढून ठेवायचे. जोवर शरदच्या भावाचे लग्न होणार नाही तोवर आम्ही आमची लग्ननोंदणी घरी सांगणार नाही. माझा लग्न संकल्पनेत विश्वास नाही, मला वाटत नाही की कागद्पत्राचा आणि सुखी सहजीवनाचा काही संबंध आहे’ या माझ्या मतावर शरद म्हणाला, ‘तुला कागदपत्र नसल्याने फरक पडत नाही तर असल्याने तरी काय फरक पडणार आहे?’ थोडा विचार केल्यावर मला पटले.आम्हा दोघांनाही लग्नाचे कोणतेही विधी करण्यात रस नव्हता, त्यामुळे विधी न करता फक्त नोंदणी करून सर्टिफिकेट घ्यायचे ठरले. आम्ही विचार केला की फक्त सुरक्षेसाठी लग्न झाल्याचे सर्टिफिकेट काढून घेऊ, घरचे तयार होतील तेव्हा लग्नाचे बघू. इकडून तिकडून माहिती काढल्यावर समजले की सर्टिफिकेट दोन प्रकारे मिळवता येईल; कोर्टात एक महिना लागेल आणि विधीवत लग्न केलं तर एका दिवसात सर्टिफिकेट मिळेल. बांद्रा येथील न्यायालयात एका मंदिरात नोंदणी करतात आणि ती पावती कोर्टात दिली की कोर्ट लग्न झाल्याचे सर्टिफिकेट एका दिवसात मिळतं अशीही माहिती मिळाली. वेळ कमी असल्याने आम्ही ‘एका दिवसात लग्न’ होणारा पर्याय निवडला.
०२.०३.२००६ रोजीची सकाळ. आमच्या एका मित्राने माझ्यासाठी एक शालू आणला होता तो मी घातला. शरदचे तीन मित्र व आम्ही दोघे असे बांद्राला कोर्टात पोहोचलो. कोर्टाच्या आवारात अशीलाच्या शोधात उभ्या असणार्या व बाजाराप्रमाणे गिर्हाइकासाठी ओरडणार्या वकिलांना पाहून मी गांगरून गेले होते. अशाच एका वकिलाने आम्हाला जवळजवळ पकडले. सगळा खर्च मिळून पंधराशे रु. ठरले. त्याने सांगितले की कोर्टाच्या शेजारी एक मंदिर आहे तिथे काही पैसे देणगी म्हणून द्यायचे, तिथे एक पावती मिळेल. ती आणून वकिलाला द्यायची. सोपं तर होतं सगळं. आम्ही पावती घ्यायला गेलो तर तिथली जेष्ठ पुजारी व्यक्ती देणगी देऊनही आम्हाला विधी केल्याशिवाय पावती द्यायला तयार होईना. कित्येक जोडप्यांच्या लग्नाचे विधी करूनही यांची हौस अजून भागली नाही याचे मला प्रचंड अप्रूप वाटले. आम्हाला विधी करण्याशिवाय पर्याय नव्हता. पुजारी महाशयांनी होमामध्ये काहीबाही टाकायला लावले . मला खूप हसू येत होतं ते सगळं करताना (यावेळचे काही फोटोही आम्ही पुरावा म्हणून काढले होते!).
त्यांना आम्ही परत एकदा सांगितले की आम्हाला हे विधी करण्यात काहीही रस नाही, तेव्हा तुम्ही आटोपते घ्या. काही विधी करून त्यांना आमचे ‘लग्न झाल्यासारखे’ वाटले असावे, त्यांनी आटोपते घेतले व देणगी दिल्याची एक पावती आमच्या हाती दिली(जी अजूनपर्यंत माझ्याकडे आहे.). आम्हाला कोण आनंद झाला म्हणून सांगू! जग जिंकल्याच्या आविर्भावात आम्ही हसतहसत मंदिरातून बाहेर पडलो. समोर वकील, काहीसा चिंताग्रस्त. म्हणाला, “तुमचा मुंबईतला राहण्याचा काही पुरावा नाही, त्यामुळे इथे तुमच्या लग्नाची नोंदणी शक्य नाही.” माझ्या काळजात धस्स झालं. आणि क्षणार्धात माझ्या धस्सचे रूपांतर रुद्रावतारात झाले. मला त्याचा प्रचंड राग आला. “तुम्ही वकील कसे झालात? वकील असूनही तुम्हाला ही गोष्ट माहिती कशी नव्हती? असले कसले तुम्ही वकील? माझे पैसे द्या परत,” मी त्या वकिलावर तुटून पडले. शरद मला मागे खेचत होता. शेवटी त्याने बाराशे रुपये परत केले. माझी त्याला तीनशे रुपयेही द्यायची तयारी नव्हती. आम्ही चरफडत परत आलो. थोड्याच वेळात स्वत:च्या अज्ञानावर आणि वकिलाच्या ज्ञानावर सर्वजण हसू लागलो. त्यानंतर माहिती मिळाली की शरदचा जिल्हा सातारा येत असल्याने सातार्याच्या कोर्टात आमचे लग्न केले जाऊ शकते.
दोन दिवसांनी आम्ही सातारा गाठले. तिथे एक एकदम तरुण वकील होता, नुकतीच वकिली सुरू केलेली. हुशार वाटत होता. तो म्हणाला,”तुम्ही काही काळजी करू नका. मी सगळं करून देतो.” त्याने आमचा विवाह यवतेश्वर मंदिरात संपन्न झाल्याचे एक affidavit केले व विवाह नोंदणीसाठी ते सादर केले. तरी नोंदणी होऊ शकली नाही, चौकशी केल्यावर कळले की सातारा शहरातील रहिवासी पुरावा नसल्याने तिथे लग्नाबाबत काहीही होणे शक्य नाही. मी पूर्वी सातार्यामध्ये बी.एड करत असताना एड. वर्षा देशपांडे यांचा फोन नंबर माझ्याकडे होता. त्यांच्याशी मी बोलले. त्या म्हणल्या,”कसं होऊ शकत नाही हे मी बघते. तू तिथे थांब, आलेच मी.”
त्यांनी उघड्या टपाच्या जीपमधून दिमाखदार एंट्री केली, एकदम लेडी डॉन के माफिक!
त्यांनी आमचा राहण्याचा पत्ता म्हणून स्वत:चा पत्ता अफिडेवीटमध्ये टाकायला लावला. तरी नोंदणी होईना. त्यांनी तिथल्या अधिकार्यांशी बरीच चर्चा नव्हे हुज्जत घातली. शेवटी एकच पर्याय उरला होता, तो म्हणजे शरदच्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन नोंदणी करणे. तिथे धोका असा होता की शरदच्या गावाजवळून हे ठिकाण जवळ होते आणि त्याचे नातेवाईक, गावातील लोक यांची दैनंदिन येजा असल्या कारणाने घरी कळण्याला वाव होता. चर्चेअंती जायचं ठरलं, कारण आम्ही मुंबईवरून गेलो होतो, परत येणं जिकीरीचं होतं. तालुक्याचे ऑफिस बंद होण्यासाठी फक्त अर्धा तास बाकी होता. आमच्या मित्राने टरारारा गाडी चालवली. पोहोचल्यावर आमच्या मित्रांनी सगळी कागदपत्रे ऑफिसमध्ये जमा केली. मी व शरद गाडीतच बसलो, लपून! गाडीच्या आजुबाजुने शरदच्या गावाचे लोक जात होते. थोड्या वेळात मला व शरदला सही करण्यासाठी ऑफिसमध्ये बोलावले. आम्ही धडधडत्या काळजाने गेलो. तिथे आमचे फोटो काढून सह्या घेतल्या गेल्या. आम्ही ते सोपस्कर आटोपून पटकन गाडीत येऊन बसलो. छाती अजूनही धडधडत होती. थोड्याच वेळात आम्हाला आमचे सर्टिफिकेट हाती पडले. त्यावर पत्ता होता, वर्षा देशपांडे यांचा. आम्ही परत ऑफिसमध्ये गेलो. कर्मचार्यांनी सर्टिफिकिटेवर आमच्या दोघांच्याही गावचे पत्ते खोडून हाताने लिहायला लावले. आता आमच्या हाती एकदम फायनल असे लग्न नोंदणीचे सर्टिफिकेट हाती आले, खोडलेल्या पत्त्यासह!
![]() |
सर्टिफिकेटच्या आनंदात |
मग आमचं लग्न गुपित राहिलं का, दोघांच्या घरच्यांनी आम्हाला स्वीकारलं का, आमचं पुन्हा लोकांसमोर लग्न झालं का, आम्ही एकमेकांची साथ दिली की नाही? याचा रोमांचक इतिहास पुन्हा कधीतरी!
#HappyMarriage #typicalIndianmarriage #Indianmarriagesystem #विवाहसंस्था
लक्ष्मी यादव.
सामाजिक कार्यकर्ता
Tags
विवाहसंस्था
लक्ष्मी, छान लिहीलंयस. मजा आली हे वाचताना पण प्रत्यक्षात धावपळ करताना काय ताप झाला असेल त्याची कल्पना आली.
ReplyDeleteअगदी हीच धावपळ मी माझ्या लग्नासहीत तीन वेळा अनुभवली.
खूपच छान
ReplyDeleteमजा आली वाचताना... मजेशीर आहे तुमच्या लग्नाची गोष्ट!
ReplyDeleteखूपच मार्मिक पुणे लिहीलीये लग्नाची गोष्ट 👌👌(•‿•)
ReplyDeleteHmmm.....😄
ReplyDeleteखुप गमतीशीर ; आधुनिक विचारांचा जोड असलेला ,ख-या सहजीवनसाथ्यांचा सच्चा अनुभव.
ReplyDeleteसर्व प्रतिक्रियांसाठी मनापासून धन्यवाद .
ReplyDelete