स्त्रियांचे रोग म्हणजे आपल्याला फक्त गर्भाशयाचे आजार अशी समजूत असते. मात्र काही सर्वसाधारण आजार असे आहेत की जे प्राधान्याने स्त्रियांनाच होतात. पित्तखडे(Gall Stones) हा त्यापैकीच एक आजार आहे. चमचमीत, तेलकट खाणे, व्यायामाचा अभाव, तंतुमय पदार्थ कमी खाणे, व्रतवैकल्य, उपासाच्या नावाखाली मांसाहार न करणे, खूप वेळ उपाशी राहणे आणि स्त्री मधील हॉर्मोन इस्ट्रोजन ह्या कारणांनी स्त्रियांमध्ये हे जास्त प्रमाणात होतात. पुरुषांमध्ये खूप दारू पिण्याने लिव्हर सिरोसिस झाल्यास हे खडे होतात.
मी सध्या ज्या हॉस्पिटलमध्ये काम करते तेथे ऑगस्ट महिन्यात २२ शस्रक्रिया (सर्जरी) झाल्या, त्यापैकी १४ गॉल ब्लॅडरच्या होत्या आणि ज्यांच्यावर झाल्या त्यापैकी १३ स्त्रिया होत्या! त्यांचे वय २६ ते ६१ दरम्यान होते. मला आठवतंय माझ्या ओळखीच्या एका सर्जननी मला सांगितले होते की त्यांच्या मुलीच्या मैत्रिणीचे पित्ताशय १५ व्या वर्षीच काढून टाकावे लागले होते. ऑपरेशन नंतर खाण्यापिण्याची खूप बंधने येतात कारण फॅटचे पचन होत नाही. कल्पना करा या मुलीचे जगणे किती कठीण झाले असेल? तसा कोणताही अवयव महत्वाचा असतोच. गर्भाशय काढून टाकलं तर त्यातल्या त्यात वय झालेलं असेल तर कमी नुकसान होतं. पण पित्ताशय पचनासाठी आवश्यक आहे त्यामुळे ते कायमच गरजेचं आहे. जितकी आपली पचनशक्ती चांगली तितकं आपलं आरोग्य चांगलं. आपल्या आरोग्यविषयक बेफिकीरीमुळे आपण आपल्या हाताने पित्ताशयाचं नुकसान करत असतो.
माझी मैत्रीण वैशाली तशी पहिल्यापासून स्थूलच. उपास तापास खूप करायची. पण दिवसभर काही खायचे नाही आणि रात्री भरपूर खायचे. शिवाय तळलेले पदार्थ, पाणीपुरी हे सगळे खूप आवडीचे आणि अगदी ताव मारायची. ती मला काही दिवसांपासून सांगत होती,’ मला उजव्या खांद्याजवळ, पाठीत दुखते. कधी कधी मळमळते आणि उलटीही येते.’ त्यामुळे हार्टचा प्रॉब्लेम असेल का? अशी शंका तिला सतत सतावत होती. तिने ईसीजी काढला तो नॉर्मल होता. आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि अलोपॅथी सगळ्या डॉक्टरांची औषधे घेतली. पण दुखणे काही थांबत नव्हते. मी तिला म्हणाले की, सोनोग्राफी करून घे. कदाचित तुझ्या पित्ताशयात खडे असतील. तर ती म्हणाली – ‘छे छे, मला पित्त कधीच होत नाही.’ हे ऐकून मला हसू आले. मी तिला सांगितलं की – ‘पित्त’ हा शब्द एकच असला तरी तू सांगतेस ते पित्त म्हणजे ऍसिडिटी, जी जठरातील हायड्रोक्लोरिक आम्लामुळे होते. आणि पित्ताशय म्हणजे इंग्लिश मध्ये गॉल ब्लॅडर.
“हे पित्ताशय यकृताच्या (लिव्हर) मागच्या बाजूला असते. ही एक स्नायूंची पिशवी असते. लिव्हरमध्ये पित्त तयार होते आणि पित्ताशयात साठवले जाते. त्यापासून निघणारी पित्तनलिका लहान आतड्याच्या पहिल्या भागात (duodenum) उघडते. पित्तरसात कोलेस्टेरॉल आणि बिलिरुबिन असते. शिवाय काही क्षारही असतात. जेव्हा अन्न जठरातून लहान आतड्यात येते तेव्हा पित्ताशय आकुंचन पावते आणि पित्तरस लहान आतड्यात येतो. पित्तरसाचे काम स्निग्ध पदार्थांच्या पचनाला मदत करणे हे असते,” इतके सांगितल्यावर तिला पित्त आणि पित्ताशयातील फरक स्पष्ट झाला,
source- wikipedia |

“मात्र या पित्ताशयात खडे कसे होतात?” हा प्रश्न शिल्लक होताच!
“तुझ्यासारख्या तळलेले पदार्थ खूप खाणाऱ्या, मध्येच दिवसभर काही न खाणाऱ्या, बैठे काम करणाऱ्या बायकांमध्ये हे खडे होण्याचे प्रमाण जास्त असते. कारण गॉल ब्लॅडरचे काम फॅट च्या पचनाला मदत करणे हे असते. पण मधेच खूप वेळ अन्न नाही, शरीराला हालचाल नाही असे बराच काळ झाले की त्याचे काम मंदावते. त्यात पित्तरस साठून राहायला लागतो. जास्त फॅटी पदार्थ खाणाऱ्यांचा कोलेस्टेरॉल जास्तच असतो. मग पित्तरस साचून घट्ट होऊन त्याचे खडे बनायला लागतात. जोपर्यंत हे पित्ताशयात असतात तोपर्यंत काहीच लक्षणे दिसत नाहीत. मात्र ते पित्तनलिकेत गेले की उजव्या खांद्याजवळ दुखणे, तो हलत असतो तेव्हा मळमळणे, उलट्या होणे हे सगळे होते.”एवढं सांगितल्यावर वैशाली सोनोग्राफी करून घ्यायला तयार झाली. तिने माझे ऐकून सोनोग्राफी करून घेतली आणि खरंच तिला पित्तखडे असल्याचे निदान झाले. बराच काळ खडे असल्याने तिच्या पित्ताशयाच्या आतल्या आवरणाला सूज आली होती आणि एक खडा नलिकेत अडकला होता त्यामुळे ऑपरेशन करून पित्ताशय काढून टाकावे लागले. मात्र त्यानंतर तिच्या खाण्या पिण्यावर खूप बंधने आली. सगळे उपास बंद झाले, पाणीपुरी खाणे बंद करावे लागले. फळे, भाज्या भरपूर खाणे, वजन कमी करणे व व्यायाम करावे लागले. थोडक्यात पूर्ण जीवनशैली बदलावी लागली. पित्ताशय हे पचनयंत्रणारूपी इंजिनमध्ये तेलाचे काम करीत असते. ते एकदा शरिरातून काढले की पचनशक्ती लुळीपांगळी होऊन जाते.
पित्ताशयातील खडे २ प्रकारचे असतात. कोलेस्टेरॉल आणि बिलिरुबिन ह्यांचे बनलेले. काही वेळा मिक्स प्रकारचेही असतात. कोलेस्टेरॉलचा खडा एकच असतो. मात्र बिलिरुबिन किंवा मिक्स खडे अनेक असतात. पित्ताशय त्यामानाने मोठे असते, त्यात खडा असेल तर त्रास होत नाही. मात्र एखादा खडा पित्तनलिकेत अडकला तर खूप मोठ्या प्रमाणात वेदना होतात. तसेच बरीच गुंतागुंत होऊ शकते.
बिलिरुबिन चे खडे मात्र वेगळ्या प्रकारच्या पेशन्ट मध्ये होतात. ज्यांना RBC म्हणजे तांबड्या रक्तपेशी तुटण्याचा आजार आहे – थॅलसेमिया, सिकल सेल ऍनिमिया असे आजार असलेल्या मुलांमध्ये हे खडे होतात. पण हे रोग बालकांना लहानपणीच होतात.

पित्तखडे होण्याची रिस्क जास्त असणाऱ्या व्यक्ती
१. स्थूल, गरोदर, मेनोपॉजनंतर हॉर्मोन थेरपी घेणाऱ्या स्त्रिया ( इस्ट्रोजेन ह्या हॉर्मोन मुळे)२. कौटुंबिक इतिहास (फॅमिली हिस्टरी)
३. लिव्हर सिरॉसिस असलेले पेशन्ट (हे जास्त अल्कोहोल घेणाऱ्यांमध्ये आढळते)
४. आतड्यांचे आजार असलेल्या व्यक्ती
५. ज्यांची ट्रायग्लिसराईड लेव्हल जास्त आहे अश्या व्यक्ती
६. HDL म्हणजे चांगले कोलेस्टेरॉल कमी असेल तर
७. आहारात तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी असेल तर
५. ज्यांची ट्रायग्लिसराईड लेव्हल जास्त आहे अश्या व्यक्ती
६. HDL म्हणजे चांगले कोलेस्टेरॉल कमी असेल तर
७. आहारात तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी असेल तर
पित्तखड्यांमुळे खालील त्रास होऊ शकतात-
ही लक्षणे असली तर तात्काळ अल्ट्रासोनोग्राफी केल्यावर खडे दिसल्यास निदान होते.पित्तखड्यांवर उपाय म्हणून सर्जरी करून पित्ताशय काढून टाकतात. मात्र नंतर खाण्यापिण्याची खूप बंधने येतात कारण फॅट चे पचन होत नाही. त्यामुळे हे टाळणेच हितकारक आहे.
२. आहारात मासे, जवस, शेंगदाणे, बदाम इ ज्यापासून चांगले कोलेस्टेरॉल मिळते असे पदार्थ खावे.
३.तंतुमय पदार्थ जास्त खाणे (फळे, भाज्या, वगैरे)
४. व्यायाम - बैठ्या जीवनशैलीमुळे शरीरातील क्रियांचा वेग मंदावतो. त्यामुळे पित्तरस साठून राहतो व खडे बनतात. म्हणून व्यायाम करणे आवश्यक आहे.
५. जर हॉर्मोन ट्रीटमेंट किंवा गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल किंवा कोलेस्टेरॉल जास्त असेल तर ती कमी करणारी औषधे घेणे.
पित्ताशय काढून टाकल्यावर नाईलाजाने निरोगी जीवनशैली स्वीकारण्यापेक्षा पहिल्यापासूनच स्वीकारलेली बरी, ही खूणगाठ मनात बांधू या. आपल्या कुटुंबाच्या, पतीच्या आरोग्याची काळजी घेण्याला स्त्रिया प्राधान्य देतात. यात त्या अनेकदा स्वतःकडे दुर्लक्षही करतात. पण स्त्रीने आपल्या आरोग्याविषयी अधिकच जागरूक असलं पाहिजे. स्त्री निरोगी राहिली तरच कुटुंबही निरोगी व हसते खेळते राहू शकते, हे सर्वांनी आवर्जून लक्षात घ्यायला हवे.
पित्तखडे होऊ नये म्हणून पाळण्याची पथ्ये
१. वजन नियंत्रणात ठेवणे. मात्र वजन कमी करण्यासाठी कडक डाएट, कमी काळात खूप वजन कमी करणे हे करू नये.२. आहारात मासे, जवस, शेंगदाणे, बदाम इ ज्यापासून चांगले कोलेस्टेरॉल मिळते असे पदार्थ खावे.
३.तंतुमय पदार्थ जास्त खाणे (फळे, भाज्या, वगैरे)
४. व्यायाम - बैठ्या जीवनशैलीमुळे शरीरातील क्रियांचा वेग मंदावतो. त्यामुळे पित्तरस साठून राहतो व खडे बनतात. म्हणून व्यायाम करणे आवश्यक आहे.
५. जर हॉर्मोन ट्रीटमेंट किंवा गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल किंवा कोलेस्टेरॉल जास्त असेल तर ती कमी करणारी औषधे घेणे.
पित्ताशय काढून टाकल्यावर नाईलाजाने निरोगी जीवनशैली स्वीकारण्यापेक्षा पहिल्यापासूनच स्वीकारलेली बरी, ही खूणगाठ मनात बांधू या. आपल्या कुटुंबाच्या, पतीच्या आरोग्याची काळजी घेण्याला स्त्रिया प्राधान्य देतात. यात त्या अनेकदा स्वतःकडे दुर्लक्षही करतात. पण स्त्रीने आपल्या आरोग्याविषयी अधिकच जागरूक असलं पाहिजे. स्त्री निरोगी राहिली तरच कुटुंबही निरोगी व हसते खेळते राहू शकते, हे सर्वांनी आवर्जून लक्षात घ्यायला हवे.
डॉ. मंजिरी मणेरीकर