कालच कार्तिकी एकादशी झाली आहे. तब्बल दोन वर्षानंतर वारकऱ्यांना विठूमाऊलीची भेट घेता आली.
वर्षानुवर्ष हजारो भाविक पंढरीची वारी करतात. संतांचे अभंग गातात. संतसाहित्य आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. वारीमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रामीण लोक सामील झालेले दिसतात.
ग्रामीण महिलांना वारीच्या निमित्ताने रोजच्या धबडग्यातून काहीशी मुक्ती मिळते.
पण शहरातल्या मध्यमवर्गीय स्त्रीला घराबाहेर पडण्यासाठी आज काही वारीची गरज नसते.
- मग आजच्या सुशिक्षित शहरी महिलांना ह्या लोकपरंपरेशी कसं जोडून घेता येईल?
- वारकरी परंपरेतल्या संतांनी जो समतेचा संदेश दिला आहे, संत स्त्रियांनी वैयक्तिक आयुष्यात जो संघर्ष केला आहे – त्या सगळ्याशी आधुनिक स्त्रीचं काय नातं आहे?
- पण संत कवयित्रीचे हे विचार आधुनिक स्त्रीयांच्या पर्यन्त पोचणार कसे?
- आजचे वारकरी स्त्रीसंतांचे अभंग फारसे का गात नाहीत?
या प्रश्नांची उत्तरं लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी ह्या व्हिडिओ मध्ये दिली आहेत.
हा व्हिडिओ पहा आणि तुम्हाला डॉ. तारा भवाळकर यांचे विचार ऐकून काय वाटलं ते नक्की कळवा.