मागच्या दोन लेखात भारतीय चित्रपटसृष्टी मध्ये निर्माती , दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या स्त्रियांची उदाहरणं पहिली. आता थोडं संगीत क्षेत्राकडे बघूया.
अनेक प्रांतातलं लोकसंगीत आणि परिसर ध्वनी गोळा करून, त्याचा अभ्यास करून, त्याचा आधुनिक ध्वनितंत्रज्ञानाशी मेळ घालून तिने एम टीव्ही साठी साउंड ट्रिपिन हा कार्यक्रम केला. 'गॅंग्ज ऑफ वास्सेपूर' या चित्रपटातल्या "ओ वुमनिया" या गाण्यानं तिला प्रसिद्धी मिळाली.
या दोन्ही टोकांच्या मधे खूप मोठी कारकीर्द असलेल्या उषा खन्ना यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून,१९५३ मधल्या 'दायरा' पासून २००३ मधल्या 'दिल परदेसी हो गया' पर्यंत पन्नास वर्ष काम केलं तेही महत्वाचं आहे. लता मंगेशकर यांनीही आनंदघन या नावानं मराठीत संगीत दिग्दर्शन केलेलं आपल्याला माहीतच आहे.एकूणच भारतीय चित्रसृष्टीत स्त्रीयांची कार्यक्षेत्रं विस्तारत गेली, हे नक्की. ज्यांची नावं आपल्यासमोर येत नाहीत, त्यांची फारशी नोंदही होत नाही अशाही अनेक स्त्रीया चित्रपटसृष्टीत अनेक विभागात काम करताहेत. त्यांचा टक्का वाढतो आहे. पुढच्या लेखात चित्रपटांच्या निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या आणखी काही स्त्रियांच्या विषयी माहिती करून घेऊ.
लोकप्रिय अभिनेत्री नर्गिस हिची आई जद्दनबाई या व्यावसायिक गायिका होत्या. त्यांच्या ग्रामोफोन रेकॉर्ड निघाल्या होत्या. अभिनेत्री म्हणूनही काही चित्रपट त्यांनी केले.१९३५ मधे त्यांनी स्वतःची 'संगीत फिल्म्स' ही कंपनी सुरू केली आणि 'तलाश ए हक' हा चित्रपट केला. त्यात त्यांनी भूमिका केली आणि संगीतही दिलं. याच काळात मुख्तार बेगम, गोहर कर्नाटकी, मुन्नीबाई यांनीही संगीत दिग्दर्शन केलं
सरस्वती देवी याही त्याच काळातल्या. त्यांचं खरं नाव खुर्शिद होमजी. माणेक आणि खुर्शिद या पार्शी कुटुंबातल्या दोघी बहिणी विष्णु नारायण भातखंडे यांच्याकडे हिदुस्तानी शास्त्रीय संगीत शिकलेल्या होत्या. मुंबईत ऑल इंडिया रेडिओ सुरू झाल्यावर या बहिणी संगीताचा कार्यक्रम करू लागल्या. हिमांशु राय यांनी त्यांना 'बॉम्बे टॉकीज' या आपल्या कंपनीत संगीताचं डिपार्टमेंट सांभाळण्यासाठी बोलावून घेतलं.१९३५ मधे 'जवानी की हवा' या चित्रपटाला खुर्शिद यानी संगीत दिलं.परंतू पारंपरिक विचारांच्या काही पार्शी मंडळींना त्यांचं हे धाडस आवडलं नाही. खूप विरोध झाला.पण हिमांशू राय यांनी मार्ग काढला.
खुर्शीदचं सरस्वती देवी आणि माणेकचं चंद्रप्रभा असं नामकरण करून त्यांची खरी ओळखच लपवली. पुढच्या गाण्यांच्या क्रेडिट्स मधे सरस्वती देवी असं नाव येऊ लागलं.१९३६ सालातल्या 'अछूत कन्या' या चित्रपटातलं 'मै बनकी चिडिया बनके बन बन डोलू रे' हे अशोक कुमार,देविका राणी यांनी गायलेलं लोकप्रिय गीताचं संगीत त्यांनी केलंय. 'कोई हमदम ना रहा' हे गाणंही मुळात यांचंच. पुढे ते 'झुमरू' या चित्रपटातून किशोर कुमार मुळे प्रसिध्द झालं.५०-५५ सालापर्यंत सरस्वतीदेवींनी संगीत दिग्दर्शनाचं काम केलं.गाणंही शिकवत राहिल्या. जीवनाच्या शेवटाला मात्र चित्रसृष्टीसाठी त्या जवळजवळ विस्मृतीत गेल्या.
सरस्वती देवी याही त्याच काळातल्या. त्यांचं खरं नाव खुर्शिद होमजी. माणेक आणि खुर्शिद या पार्शी कुटुंबातल्या दोघी बहिणी विष्णु नारायण भातखंडे यांच्याकडे हिदुस्तानी शास्त्रीय संगीत शिकलेल्या होत्या. मुंबईत ऑल इंडिया रेडिओ सुरू झाल्यावर या बहिणी संगीताचा कार्यक्रम करू लागल्या. हिमांशु राय यांनी त्यांना 'बॉम्बे टॉकीज' या आपल्या कंपनीत संगीताचं डिपार्टमेंट सांभाळण्यासाठी बोलावून घेतलं.१९३५ मधे 'जवानी की हवा' या चित्रपटाला खुर्शिद यानी संगीत दिलं.परंतू पारंपरिक विचारांच्या काही पार्शी मंडळींना त्यांचं हे धाडस आवडलं नाही. खूप विरोध झाला.पण हिमांशू राय यांनी मार्ग काढला.
सरस्वती देवी |
आता स्नेहा खानवलकर हे नाव 'हटके' चित्रपटांच्या 'हटके' संगीतामुळे पुढे आलं आहे.'सरकार राज,लव्ह सेक्स और धोका,भेजा फ्राय' सारखे वेगळ्या धाटणीचे कथापटपट आणि ‘मालेगावके सुपरमॅन’ या माहितीपटासाठी केलेलं तिचं काम महत्वाचं ठरलं.
स्नेहा खानवलकर |
उषा खन्ना |
सुषमा दातार
मास कम्युनिकेशन आणि चित्रपट
यांच्या निवृत्त व्याख्यात्या,
अभ्यासक आणि लेखिका