आटपाट नगर होतं. तिथं हजारो माणसं राहायची.त्याच नगरात एक कुटुंब राहत होतं. त्याघरात एक सज्जन माणूस येई; भिक्षा वाढा म्हणे पण घरातला पुरुष भिक्षा घालयला गेला की परत मागे फिरे. एकदिवस घरातल्या सगळ्या पुरुषांनी त्या सज्जनाला गळ घातली. त्यामागचे कारण विचारलं. सज्जन काहीच बोलला नाही. तर त्या घरातला पुरुष म्हणाला, “महाराज, आम्ही लक्ष्मी पूजक आहोत. आमच्याकडे संपत्ती आहे,तुम्हांला हवी ती भिक्षा आम्ही घालू शकतो, तुम्ही हवं ते मागा."
सज्जन त्यांच्याकडे बघून हसला आणि जावू लागला. त्याने त्यांची भिक्षा घेतली नाही की दान घेतलं नाही. तेव्हा घरातल्या मोठ्या पुरुषाला वाटलं की याने आपल्याला शाप दिला असणार. तेव्हा त्याने त्या सज्जनाचे पाय धरले. “महाराज काहीही करा पण भिक्षा घ्या आणि आमच्या समस्या सोडवा. आम्ही तुमचं सगळं ऐकू.”
“तुमच्याकडे सगळं तर आहे मग समस्या काय?”
तेव्हा कर्ता पुरुष म्हणाला, “महाराज, मला चार मुलं आहे पण त्यांना बायका मिळत नाही. आमच्या घरात कोणी मुलगी द्यायला तयार नाही. काय करावं?”
“पण तुमच्याकडे लक्ष्मी आहे, संपत्ती आहे, तुम्हांला घरात मुलींची काय गरज?”
“महाराज क्षमा करा,आमचं चुकलं. माझं चुकलं.”
सज्जन म्हणाला, “अरे बाबा, घराघरात सगळ्यांना फक्त मुलगे हवे आहेत, मुलींना जन्म द्यायला कोणी तयार नाही. त्यामुळे जगाची व्यवस्था बिघडली आहे. मुलांना बायका मिळेनाश्या झाल्या,वडिलांना मुलगी नाही, भावाला बहीण नाही. अर्धं जग अनेकांना डोळ्यासमोरच नको आहे. म्हणून ही रडण्याची वेळ आली.”
“तुम्ही काहीतरी व्रत सांगा, माझी मुलं ते व्रत करतील.”
“तुला रे कशाला हवं व्रत? उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील? घरातल्या पोरी तुम्ही पळवून लावल्या, त्यांना घरात येवू दिलं नाही.”
“नाही महाराज, उतणार नाही. मातणार नाही. घेतला वसा टाकणार नाही.”
“ मग तुझ्या मुलांना मंगळागौरीचं व्रत करायला सांग.”
“त्यासाठी काय करावं लागेल महाराज?” कर्ता पुरुष म्हणाला.
“बाबा रे, तुझ्या मुलाला सांग, वेगवेगळ्या राज्यात जा. तिथल्या लोकांना भेट. त्यांना मुलींचं महत्व पटवून दे. तुमच्या घराची दुर्दशा सांग.”
असं म्हणून सज्जन निघून गेला. मग त्या माणसाचा मुलगा गावोगावी फिरू लागला. त्याने लोकांना घरात मुलगी नसल्यामुळे घराची झालेली अवस्था सांगितली. आपले आणि आपल्या भावांचे हाल सांगितले. मुली आणि मुलगे दोघंही जन्माला आले पाहिजे हे सांगितल.
एक दिवस फिरता फिरता रात्र झाली, म्हणून तो एका घराच्या आडोशाला झोपला.तेव्हा त्याला आवाज येवू लागले. काही स्त्रिया धीटपणे बाहेरून येत होत्या. त्यातली एक स्त्री म्हणाली, “तुला भीती वाटत नाही का? एकटीने फिरण्याची?”
तेव्हा ती म्हणाली, “मला कशाला भीती वाटेल?माझा भाऊ,वडील आमच्या घरातील पुरुष मंगळागौरीचं व्रत करतात. आमच्या गावातले सगळे पुरुष हे व्रत करतात म्हणून आमचं गाव निरोगी आहे.”
कर्त्या पुरुषाच्या मुलाने मंगळागौर असा शब्द ऐकला, तेव्हा उठला आणि त्याने त्या मुलीला नमस्कार केला,“ देवी तुमच्या भावाशी माझी गाठ घालून द्या, मला मंगळागौरीचं व्रत सांगा.” तेव्हा त्या मुलीनं मुलाला आपल्या भावाकडे नेलं. तिचा भाऊ म्हणाला, “दादा रे आमच्या गाव रसातळाला गेलं होतं. कोणाचा कोणावर विश्वास नव्हता, पोरीबाळी आम्ही घरात लपवून ठेवत होतो. पण तरीही संकटे येत होती तेव्हा आम्ही हे व्रत केलं.”
“हे व्रत काय असतं ते मला सांगा?”
“तुला रे कशाला हवं हे व्रत? हसशील, चेष्टा करशील, घेतला वसा टाकून देशील.”
“नाही नाही. हसणार नाही, त्रासणार नाही, घेतला वसा टाकणार नाही.”
तेव्हा बहिणीच्या भावाने सांगितलं, “घराघरातल्या पुरुषानं आपल्या घरातल्या स्त्रियांवर बंधनं घालण्यापेक्षा स्वतःच्या वासनेवर संयम ठेवायला शिकायला हवा,स्त्रीला माणूस म्हणून वागवायला हवं.”
“म्हणजे नक्की काय करायचं?”
“बाबा रे, या व्रतासाठी लागत नाही गंध, फुल, अक्षदा. लागतं फक्त निर्मळ मन,सुयोग्य विचार आणि मानवता.”
“असं व्रत मी कधी ऐकलं नाही, वाचलं नाही.”
“म्हणूनच तर आपल्या घरातली स्त्री असुरक्षित झाली. काही झालं तरी तिनेच झेलावी बंधनं सारी. म्हणजे तिचाच बळी आणि तीच गुन्हेगार. हे आता नाही चालणार. म्हणून प्रत्येक पुरुषानं स्वतःच्या भावनेवर,वासनेवर काम करायला हवं.”
“ स्वत:च्या वासनांना बांध कसा घालावा? कळलंच नाही, तर वळेल तरी कसं?”
मुलीचा भाऊ म्हणाला, “ त्यासाठी तुम्हाला आपापल्या गावातल्या पुरुषांसाठी ‘जेंडर ट्रेनिंग’ आयोजित करावी लागतील. शाळेच्या अभ्यासक्रमात स्त्रीपुरुष समतेची महती शिकवावी लागेल. स्त्रीयांवर हिंसाचार होऊ नये, यासाठी कायद्यांची कडक अंमलबजावणी करावी लागेल. मग पुरुषांना कळू लागेल. कळलं की वळू लागेल. आपल्या गावात असं वातावरण निर्माण कर, जिथं स्त्रीला वाटणार नाही तुझी भीती! म्हणजे तिच्या विचारांची,आचारांची होणार नाही क्षिती. आपल्या बहिणी,बायका,मुली यांच्याकडे माणूस म्हणून बघ. ती आहे व्यक्ती,तिच्याकडेही आहे विचार करण्याची शक्ती! म्हणून तिला घालू नको भीती, तर घे तिची संमती.”
“दादा मला समजलं. आपल्या घरातल्या मुलींना बाहेर जाण्याची,प्रवास करण्याची,काम करण्याची भीती वाटायला नको असेल तर आम्ही पुरुषांनी आपल्या मनातल्या वासनेवर ताबा मिळायला शिकायला हवं.आम्ही पुरुष जर बेताल वागलो नाही, पुरुषी अहंकारात राहिलो नाही तर मुलीही सुरक्षित राहतील. आमच्यामुळे असणारी त्यांच्यावरची बंधने गळून पडतील.”
मुलीच्या भावाला कर्त्या पुरुषाचं बदलेलं रूप पाहून आनंद झाला. त्याने मनोभावे मंगळागौरीला नमस्कार केला. जसं कर्त्या पुरुषाच्या मुलाचं परिवर्तन झालं तसं तुमचं आमचं होवू द्या.
सज्जन त्यांच्यावर रागावला, म्हणाला “ तुम्ही म्हणतात तुमच्याकडे लक्ष्मी आहे,कुठे आहे ती? भिक्षा घालायला तर येत नाही.”
“महाराज आमच्या घरात मुली जन्माला येतच नाही, आमचं कुळच असं आहे की फक्त मुलंच जन्माला येतात.”सज्जन त्यांच्याकडे बघून हसला आणि जावू लागला. त्याने त्यांची भिक्षा घेतली नाही की दान घेतलं नाही. तेव्हा घरातल्या मोठ्या पुरुषाला वाटलं की याने आपल्याला शाप दिला असणार. तेव्हा त्याने त्या सज्जनाचे पाय धरले. “महाराज काहीही करा पण भिक्षा घ्या आणि आमच्या समस्या सोडवा. आम्ही तुमचं सगळं ऐकू.”
“तुमच्याकडे सगळं तर आहे मग समस्या काय?”
तेव्हा कर्ता पुरुष म्हणाला, “महाराज, मला चार मुलं आहे पण त्यांना बायका मिळत नाही. आमच्या घरात कोणी मुलगी द्यायला तयार नाही. काय करावं?”
“पण तुमच्याकडे लक्ष्मी आहे, संपत्ती आहे, तुम्हांला घरात मुलींची काय गरज?”
“महाराज क्षमा करा,आमचं चुकलं. माझं चुकलं.”
सज्जन म्हणाला, “अरे बाबा, घराघरात सगळ्यांना फक्त मुलगे हवे आहेत, मुलींना जन्म द्यायला कोणी तयार नाही. त्यामुळे जगाची व्यवस्था बिघडली आहे. मुलांना बायका मिळेनाश्या झाल्या,वडिलांना मुलगी नाही, भावाला बहीण नाही. अर्धं जग अनेकांना डोळ्यासमोरच नको आहे. म्हणून ही रडण्याची वेळ आली.”
“तुम्ही काहीतरी व्रत सांगा, माझी मुलं ते व्रत करतील.”
“तुला रे कशाला हवं व्रत? उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील? घरातल्या पोरी तुम्ही पळवून लावल्या, त्यांना घरात येवू दिलं नाही.”
“नाही महाराज, उतणार नाही. मातणार नाही. घेतला वसा टाकणार नाही.”
“ मग तुझ्या मुलांना मंगळागौरीचं व्रत करायला सांग.”
“त्यासाठी काय करावं लागेल महाराज?” कर्ता पुरुष म्हणाला.
“बाबा रे, तुझ्या मुलाला सांग, वेगवेगळ्या राज्यात जा. तिथल्या लोकांना भेट. त्यांना मुलींचं महत्व पटवून दे. तुमच्या घराची दुर्दशा सांग.”
असं म्हणून सज्जन निघून गेला. मग त्या माणसाचा मुलगा गावोगावी फिरू लागला. त्याने लोकांना घरात मुलगी नसल्यामुळे घराची झालेली अवस्था सांगितली. आपले आणि आपल्या भावांचे हाल सांगितले. मुली आणि मुलगे दोघंही जन्माला आले पाहिजे हे सांगितल.
एक दिवस फिरता फिरता रात्र झाली, म्हणून तो एका घराच्या आडोशाला झोपला.तेव्हा त्याला आवाज येवू लागले. काही स्त्रिया धीटपणे बाहेरून येत होत्या. त्यातली एक स्त्री म्हणाली, “तुला भीती वाटत नाही का? एकटीने फिरण्याची?”
तेव्हा ती म्हणाली, “मला कशाला भीती वाटेल?माझा भाऊ,वडील आमच्या घरातील पुरुष मंगळागौरीचं व्रत करतात. आमच्या गावातले सगळे पुरुष हे व्रत करतात म्हणून आमचं गाव निरोगी आहे.”
कर्त्या पुरुषाच्या मुलाने मंगळागौर असा शब्द ऐकला, तेव्हा उठला आणि त्याने त्या मुलीला नमस्कार केला,“ देवी तुमच्या भावाशी माझी गाठ घालून द्या, मला मंगळागौरीचं व्रत सांगा.” तेव्हा त्या मुलीनं मुलाला आपल्या भावाकडे नेलं. तिचा भाऊ म्हणाला, “दादा रे आमच्या गाव रसातळाला गेलं होतं. कोणाचा कोणावर विश्वास नव्हता, पोरीबाळी आम्ही घरात लपवून ठेवत होतो. पण तरीही संकटे येत होती तेव्हा आम्ही हे व्रत केलं.”
“हे व्रत काय असतं ते मला सांगा?”
“तुला रे कशाला हवं हे व्रत? हसशील, चेष्टा करशील, घेतला वसा टाकून देशील.”
“नाही नाही. हसणार नाही, त्रासणार नाही, घेतला वसा टाकणार नाही.”
तेव्हा बहिणीच्या भावाने सांगितलं, “घराघरातल्या पुरुषानं आपल्या घरातल्या स्त्रियांवर बंधनं घालण्यापेक्षा स्वतःच्या वासनेवर संयम ठेवायला शिकायला हवा,स्त्रीला माणूस म्हणून वागवायला हवं.”
“म्हणजे नक्की काय करायचं?”
“बाबा रे, या व्रतासाठी लागत नाही गंध, फुल, अक्षदा. लागतं फक्त निर्मळ मन,सुयोग्य विचार आणि मानवता.”
“असं व्रत मी कधी ऐकलं नाही, वाचलं नाही.”
“म्हणूनच तर आपल्या घरातली स्त्री असुरक्षित झाली. काही झालं तरी तिनेच झेलावी बंधनं सारी. म्हणजे तिचाच बळी आणि तीच गुन्हेगार. हे आता नाही चालणार. म्हणून प्रत्येक पुरुषानं स्वतःच्या भावनेवर,वासनेवर काम करायला हवं.”
“ स्वत:च्या वासनांना बांध कसा घालावा? कळलंच नाही, तर वळेल तरी कसं?”
मुलीचा भाऊ म्हणाला, “ त्यासाठी तुम्हाला आपापल्या गावातल्या पुरुषांसाठी ‘जेंडर ट्रेनिंग’ आयोजित करावी लागतील. शाळेच्या अभ्यासक्रमात स्त्रीपुरुष समतेची महती शिकवावी लागेल. स्त्रीयांवर हिंसाचार होऊ नये, यासाठी कायद्यांची कडक अंमलबजावणी करावी लागेल. मग पुरुषांना कळू लागेल. कळलं की वळू लागेल. आपल्या गावात असं वातावरण निर्माण कर, जिथं स्त्रीला वाटणार नाही तुझी भीती! म्हणजे तिच्या विचारांची,आचारांची होणार नाही क्षिती. आपल्या बहिणी,बायका,मुली यांच्याकडे माणूस म्हणून बघ. ती आहे व्यक्ती,तिच्याकडेही आहे विचार करण्याची शक्ती! म्हणून तिला घालू नको भीती, तर घे तिची संमती.”
“दादा मला समजलं. आपल्या घरातल्या मुलींना बाहेर जाण्याची,प्रवास करण्याची,काम करण्याची भीती वाटायला नको असेल तर आम्ही पुरुषांनी आपल्या मनातल्या वासनेवर ताबा मिळायला शिकायला हवं.आम्ही पुरुष जर बेताल वागलो नाही, पुरुषी अहंकारात राहिलो नाही तर मुलीही सुरक्षित राहतील. आमच्यामुळे असणारी त्यांच्यावरची बंधने गळून पडतील.”
मुलीच्या भावाला कर्त्या पुरुषाचं बदलेलं रूप पाहून आनंद झाला. त्याने मनोभावे मंगळागौरीला नमस्कार केला. जसं कर्त्या पुरुषाच्या मुलाचं परिवर्तन झालं तसं तुमचं आमचं होवू द्या.
त्याला जसं मंगळागौरीचं व्रत कळलं तसं तुम्हां आम्हांला कळो.
ही कळीच्या प्रश्नाची कहाणी अनेक उत्तरांनी सुफळ संपूर्ण!
अश्विनी बर्वे