सकाळी उठतानाच ती बातमी आलीय. ती कधीतरी येऊ शकते हे माहीत असूनही खोटी ठरावी असं वाटतं. लोकांना धक्का बसलाय. त्यांना प्रत्यक्ष ओळखणारी, न ओळखणारी, त्यांच्या नाटकांवर, लिहिण्यावर प्रेम करणारी माणसं समाज माध्यमांवर भरभरून व्यक्त होताहेत. अक्षरांच्या जगात आपली खोलवर खूण उमटवत प्रचंड प्रेम, आदर मिळवून हा माणूस निघून गेलाय. नुसतं सैरभैर वाटतंय. नेमकं काय वाटतंय आहे, कळत नाही. अनेक वर्षं सहकारी म्हणून एकत्र काम केलंय. कथाकार, नाटककार, समीक्षक म्हणून वाचलंय. या सगळ्यांतून माणूस म्हणून हा चार बाेटं अधिकच उरलाय...
ताडमाड उंचीचा दाढीवाला माणूस सॅक अडकवून खालमानेनं आपल्याच तंद्रीत असल्यासारखा येतो. क्युबिकलमध्ये जातो. शांतपणे खालमानेनं कीबोर्डवर काम करत राहतो. नाटक पाहून किंवा सांस्कृतिक कार्यक्रम उरकून लिहायला बसला असेल आणि कुणी बोलायला गेल्यास तो हाकलवून लावू शकतो. एखादी गोष्ट पटली नसेल तरीही याचा आवाज कधीच चढत नाही, पण तो अधिक ठाम लागतो. काही तरी महत्त्वाचं बोलताना तिसरीकडेच बघत त्याला दाढीशी चाळा करायची सवय आहे….‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये आल्यावर अनेक दिवस जयंत पवार म्हणजे एवढंच माहीत होतं. तोवर ‘चौथी भिंत’ वाचत होते. नंतर पवारांच्या कथा, नाटकं वाचत गेले आणि मग हा माणूस होता त्याहून भलताच उंच भासायला लागला.

‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये संपादकीय पानाच्या टीममध्ये गेल्यानंतर सांस्कृतिक घडामोडींवर भाष्य असलेले त्यांचे अग्रलेख सहज ओळखू येत. त्यावेळी या पानावर 'दखल' नावाचं सदर चालवलं जायचं. त्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. फार चर्चा न झालेली महत्त्वाची एखादी घटना घेऊन त्यावरचं स्फुट अशी काहीशी ती संकल्पना होती. जेमतेम ४०० ते ४५० शब्दांचं ते असे. त्यासाठी पवार खूप वेगवेगळे विषय काढत. त्या काळात दखल प्रचंड वाचकप्रिय झालं होतं. या सदरात मला बरंच लिहायला मिळालं.
स्फुट लेखनाची ती कार्यशाळाच होती. कमी शब्दांत परिणामकारक पद्धतीनं विषय मांडायला दखलमुळे, अर्थात पवारांमुळे शिकले. कधी उगाच पसरट लिहिलं असेल तर दुसऱ्या दिवशीच्या अंकात अत्यंत रेखीवपणे कात्री चालवून ते प्रसिद्ध झालेलं असायचं. ऐनवेळी कुणाला लिहायला जमणार नसेल तर ‘तुझ्या डोक्यात काही विषय आहे का,’ म्हणत विश्वासाने त्या दिवशीची ‘दखल’ माझ्याकडे यायची.
अनेक वर्षं रविवार पुरवणीची जबाबदारी जयंत पवारांकडे होती. ते आणि मुकुंद कुळे या जोडीनं अनेक वर्षं ‘संवाद’ पुरवणी चालवली. त्यासाठीचे विषय ठरवायला मीटिंग व्हायची. मीटिंगमध्ये ते असायचे तेव्हा राजकीय, सामाजिक, संस्कृतिक घडामोडींकडे त्यांनी इतक्या वेगळ्या नजरेनं पाहिलेलं असायचं की ऐकताना थक्क व्हायला व्हायचं. वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या त्यांच्या सर्वदूर संबंधांमुळे अनेक दिग्गज माणसं ‘संवाद’मध्ये लिहिती झाली.
कधी कधी एखादा मोठा माणूस डेडलाइन विसरायचा किंवा कुठेतरी कामात अडकायचा. शुक्रवार हा पुरवणी छापायला जायचा दिवस. त्या दिवशी थेट दुपारी लेख आलाय... प्रशांत कदम विजेच्या वेगाने तो टाइप करतोय... पवार प्रसूतिगृहाच्या बाहेर बाप येरझाऱ्या घालतो तसे अस्वस्थ होऊन त्याच्या डेस्कवर चकरा मारताहेत... मुकुंदची नजर फिरून लेख पवारांकडे जातोय आणि अखेर डेडलाइनची ऐशी की तैशी करत लेख पानात विराजमान होतोय, असं चित्र अनेकदा दिसायचं.
एकदा मात्र कहर झाला होता. अर्थक्षेत्रात मोठं नाव असलेली व्यक्ती कव्हरस्टोरी लिहिणार होती. त्यांचा लेख वेळेत आलाच नाही. कहर म्हणजे त्यांचा फोनही लागेना. ते मुंबईबाहेर होते. अचानक संध्याकाळी त्यांचा फोन आला. त्यांनी तोवर काहीच लिहिलेलं नव्हतं. पण पवारांची चिकाटी मोठी. एखाद्याने वेगळा लेख लावून वेळ साजरी केली असती. पण त्यांना तोच लेख हवा होता. त्या व्यक्तीलाही जे लिहायचं होतं ते अगदी तोंडावर होतं. मग एकीकडे प्रशांत कदम टाइप करतो आहे. त्याच्या कानाशी फोन आहे. दूर कुठल्या तरी टोकावर ती व्यक्ती लेख तोंडी सांगते आहे...असा एक अतिशय रोचक सीन उशिरापर्यंत सुरू होता. एकेका शिफ्टची माणसं हळूहळू निघून गेली. लेटेस्ट बातमी घेऊन ऑनफ्लाय आवृत्तीही छापायला गेली तरी जयंत पवार आणि मंडळी त्या लेखाला अंगडं-टोपडं घालत काजळ-तीट लावत बसली होते. रात्री कधी तरी उशिरा त्या लेखासह अंक छापायला गेला आणि उत्तम संपादित झालेला तो लेख आकर्षक लेआऊटसह रविवारी छापून आला, त्याचं कौतुकही झालं.
जयंत पवारांनी दीर्घकाळ ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या दिवाळी अंकाचं संपादन केलं. त्यांच्यासोबत मुकुंद असायचा. डिझाइनसाठी सुदर्शन सुर्वे, मंगेश कारेकर आणि चित्रांसाठी चंद्रकांत गणाचार्य ही त्यांची वर्षानुवर्षे ही ठरलेली टीम होती. गणपती उठले की मग हे पंचक कामाला सुरुवात करायचं. सुदर्शन सुर्वे ही महाराष्ट्र टाइम्समधली मोठी वल्ली होती. (मुकुंद, मंगेश आणि सुदर्शन हल्ली ‘मटा’मध्ये नाहीत.) त्याला कुणालाही काहीही बोलण्याचं अघोषित हक्क होता आणि सुदर्शन तो संपादकांपासून मदतनीस उदयपर्यंत सगळ्यांवर मनमुराद बजावायचा. कामाचा एखादा तुकडा पूर्ण झाला की बसल्या जागेवरून ‘पवार...पवार’ अशी विशिष्ट हेल काढून हाळी द्यायचा. दोन चार हाकांकडे दुर्लक्ष करून सुदर्शन थांबतच नाही म्हटल्यावर पवार हातातलं काम सोडून चरफडत यायचे, काम बघायचे. चष्म्यातून बारीक नजर कम्प्युटरच्या स्क्रीनवर टाकत हाताने दाढी खाजवत ते काही तरी सूचना करून परत जात.
नवरात्रात खरं काम सुरू व्हायचं. पवार स्वत: डमी आखायचे. आधी त्यांची ए थ्री पानावर अंकाची कच्ची मांडणी तयार व्हायची. सोळा सोळाचा फॉर्म करून ते डमी मार्क करायचे. त्यांच्या या सवयीमुळे अंकाचा आराखडा हातात तयार असायचा. काम सोपं व्हायचं. त्यानंतर मात्र लगीनघाई असे. बाहेरून मागवलेले लेख एकेक करून येऊन पडत. तोवर ‘मटा’तल्या अंकात लिहिणाऱ्या लोकांना फारसा ताण नसे. एकदा का बाहेरचे लेख संपले की मग मात्र पवार चिडायच्या आत त्यांच्या हातात लेख सोपवावा लागायचा. पवारांसह ही टीम सकाळी अकरालाच येऊन रात्री उशिरापर्यंत थांबत असे. सुदर्शन आणि मंगेशच्या कम्प्युटरवर पवार डोकावताना दिसत, सूचना करत. पुन्हा जागेवर जात. दुसरीकडे गणाचार्य चित्र काढत असत. मुकुंदकडून पहिले, दुसरे वाचन करून लेख पवारांकडे जाई.
गणाचार्यांच्या चित्रांवर पवारांचं खास प्रेम होतं. त्यांच्यासाठी ते आग्रही असत. ‘मटा’च्या अंकातल्या कविता कधीही त्यांच्याशिवाय अन्य कुणाच्या चित्रांनी सजल्या नाहीत. गणाचार्य यांनीही त्यांच्या या विश्वासाला कधी तडा जाऊ दिला नाही. (पवारांच्या ‘लेखकाचा मृत्यू…’चं मुखपृष्ठही गणाचार्यांनी केलंय.)
त्यांच्या संपादनात दिघालेल्या बऱ्याच दिवाळी अंकांमध्ये मी लिहिलं आहे. लेख लिहून पवारांकडे सोपवताना धडधड असायची. वाचून झाला की बोलवायचे. लेख चांगला झालाय, असं म्हणून सुरुवात केली तर ते काही खरं नसे. पुढे पाच-सात मिनिटं शांतपणे त्यांना खटकलेले मुद्दे मांडायचे, नव्याने मांडणी कशी पाहिजे ते सुचवायचे. आपल्याला ग्रेट वाटलेलं काही त्यांना अनावश्यक वाटायचं आणि दोन ओळीत आटोपलेला मुद्दा महत्त्वाचा वाटायचा. आपण काही तरी लंगडं समर्थन द्यायचा प्रयत्न केला तर ‘हं हं’ यापलीकडे प्रतिक्रिया नसे. तो लेख कसा असायला हवा, हे त्यांनी वाचताक्षणीच नव्हे तर आधीच ठरवलेलं असे. शांतपणे त्यांच्यासमोरून उठून मजकूर पुन्हा लिहिण्यात शहाणपण असे. तो पुन्हा वाचताना पवार बरोबर सांगत होते, याचा साक्षात्कार होई. पुढे लेख वाचकांच्या पसंतीस उतरल्यावर त्यावर शिक्कामोर्तब व्हायचं. प्रेमात पडलेल्या मुलीच्या शोधात पाकिस्तानात जाऊन तिथल्या तुरुंगात अडकलेल्या हमीद अन्सारीवर लिहिलेला ‘सपनों की सरहद नहीं होती…’ हा लेख त्यांना आवडला होता. ‘भटक्यांची मुंबई’ या रिपोर्ताजच्या वेळी त्यांनी मुंबईच्या कानाकोपऱ्यातले भटक्यांचे इतके तळ सांगितले तेव्हा हा माणूस मुंबईची नस न नस जाणतो, हे अधोरेखित झालं होतं. रिपोर्ताज फॉर्ममध्ये चांगलं लिहितेस, त्यावर आणखी काम कर, म्हणायचे.
सुदर्शनसोबत संवाद आणि दिवाळी अंकाची पाने लावताना जयंत पवार त्यांच्यातला लेखक, नाटककार, समीक्षक खुर्चीवर ठेवून देत. दोघेही मूळचे कोकणी आणि गिरणगावातले. त्यामुळे अगदी इरसाल जुगलबंदी सुरू असायची. पवारांच्या लांब केसांना सुदर्शन झुल्फं म्हणायचा तेव्हा ते ऐटीत बटा मागे सारायचे. उंचीवरून तो त्यांना ‘उल्टा अमिताभ’ असं चिडवायचा. बराच वेळ काम केल्यावर सुदर्शनचं डोकं बंद पडायचं तेव्हा पवार ‘अरे जरा किडनी चालव तुझी,’ म्हणायचे. मग मागच्या दिवाळी अंकाच्या थकलेल्या पैशांवरून सुदर्शन त्यांना जाहीर धमक्या द्यायचा. ऑफिसला ही हक्काची करमणूक असायची.
दिवाळी अंकाचं काम संपलं की पवार या सगळ्यांना ते म्हणतील तिथं पार्टी द्यायचे. ज्याला जे हवं ते मिळायचं. सोबत भरपूर गप्पा. पवार गेल्यावर सुदर्शनशी बोलले तेव्हा तो सांगत होता, या पार्टीत पवार पूर्ण वेगळेच असायचे. दिलखुलास गप्पा मारायचे. पौराणिक कथांतले धमाल किस्से सांगून पोटभर हसवायचे. रात्री उशिरा टॅक्सीने सगळ्यांना घरी सोडून मग ते बोरिवलीला घरी पोहोचायचे.
जयंत पवारांनी ‘मटा सन्मान’ची धुरा अनेक वर्षं वाहिली. सन्मानसाठी एन्ट्रीज मागवण्याच्या पहिल्या जाहिरातीपासून त्यांचं काम सुरू व्हायचं. मग परीक्षकांसाठी नावं काढणं, त्यांंच्या नाटकं, सिनेमे पाहण्यासाठी वेळा ठरवणं हे सुरू राहायचं. प्रत्यक्ष सन्मानसाठीचं स्क्रिप्ट अनेक वर्षे त्यांनी स्वत: लिहिलं आहे. त्यातले चुरचुरीत संवाद, तत्कालीन घटनांवरचं तिरकस भाष्य हे नाटककार आणि कथाकार जयंत पवारांपेक्षा वेगळ्याच धाटणीचं असे. रोजची कार्यालयीन कामं, ‘सन्मान’साठीची फोनबाजी आणि अन्य धावपळ यातून त्यांना हे स्क्रिप्ट पूर्ण करायला वेळ मिळत नसे. मग ते सलग बसून ते अगदी शेवटच्या क्षणी पूर्ण करत आणि ते संबंधित अँकरिंग करणाऱ्या कलाकारांपर्यंत जाई. सन्मानच्या संध्याकाळी वर्षभरातला सर्वाधिक ताण त्यांच्या चेहऱ्यावर दिसे. बहुतांश वेळा मुख्यमंत्री निमंत्रितांमध्ये असत. ‘महाराष्ट्र भूषण’चे दिग्गज मानकरी, युवा पुरस्काराचे सन्मानार्थी, मराठी नाट्य, टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतली पडद्यावरची आणि मागची थोर मंडळी, कार्यक्रमाचे स्पॉन्सर, कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या वाहिन्यांची माणसं, टाइम्स समूहाचे वरिष्ठ अधिकारी या सगळ्यांसमोर रंगमंचावर जे सादर होणार आहे त्याची जबाबदारी आपल्यावर आहे, याचा तणाव त्यांच्या वावरामधून डोकावत असे. आम्ही पडद्यामागची व्यवस्था पाहणारी टीम त्यांना हजार प्रश्न विचारत असू. मंचामागच्या त्या टीचभर जागेत अनेक कलाकारांच्या मान-अपमानाची, रागा-संतापाची नाटकं रंगत. पवार ते सगळं त्यांच्या पद्धतीने हाताळत. कार्यक्रम संपे. वरिष्ठांकडून, उपस्थितांकडून पसंतीची पावती मिळाल्यावर ते निवांत होत. पवार निवृत्त झाले त्या वर्षी त्यांना त्याच कार्यक्रमात ‘मटा सन्मान’चं विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं तेव्हा सारं सभागृह उभं राहून टाळ्या वाजवत होतं.
लेखक, नाटककार जयंत पवार खूपच मोठे असले तरी ऑफिसात येताना त्यांनी हे ओझं कधी साेबत आणलं नाही. पवारांची मुळं गिरणगावातली, त्यामुळे गिरणगावात मोठं झालेल्यांसोबत त्यांचं खास जमायचं. तिथल्या चाळी आणि वेगाने बदलणारं जगणं याचे पवारांसह ऑफिसातले अनेक सहकारी चालते बोलते साक्षीदार होते. त्यांच्या कुटुंबातल्या वडील, काका, मामांनी गिरणागावातल्या सूत गिरणीत घाम गाळलेला असे. या गिरण्यांच्या भोवतीचं राजकारण, संप, गुंडगिरी हे या सगळ्यांनी अनुभवलं होतं. मुंबईतले बॉम्बस्फोट, त्यानंतरचं ध्रुवीकरण त्यांनी पाहिलं होतं. या गप्पा मारणारे पवार ‘अधांतर’चे लेखक असत.
साहित्यिक आणि नाटककार जयंत पवारांविषयी ते गेल्यापासून भरभरून लिहिलं जातंय. त्या-त्या क्षेत्रातली मोठी माणसं, रसिक, वाचक व्यक्त होताहेत. वंश, अधांतर, माझं घर, टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन, काय डेंजर वारा सुटलाय या त्यांच्या नाटकांनी मराठी नाटकांच्या जगात उलथापालथ घडवली. जागतिकीकरणासोबत झालेली सामान्य मुंबईकरांची पडझड त्यांनी टिपली. त्यांच्याभोवती झालेलं राजकारण, अपरिहार्यपणे झालेलं गुन्हेगारीकरण, माणसांतले विरत गेलेलं नातेसंबंध याबद्दलच्या त्यांच्या मांडणीतून नाट्यक्षेत्र ढवळून निघालं. विजय तेंडुलकरांना त्यांच्यात त्यांचा वारसदार दिसला.
‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’, ‘वरनभातलाेन्चा…’ ‘मोरी नींद नसानी हो’, ‘लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टीं’सारख्या कथासंग्रहात भेटणारी माणसं आणि त्यांचं आयुष्य आपल्या आत खोलवर चरे उमटवत जातं. कथा लिहायला त्यांनी बरीच नंतर, २०१३मध्ये सुरुवात केली. ‘लेखकाचा मृत्यू…’मधल्या कथा वेगळ्या बाजाच्या आहेत आणि त्या लघुकथा नव्हेत तर ‘गोष्टी’ आहेत, हे त्यांनी आग्रहाने मांडलं आहे. गेल्याच वर्षी प्रकाशित झालेल्या या कथांच्या ‘गोष्टीरूपा’ची चर्चा अद्याप व्हायला हवी तेवढी झालेली नाही. अर्थात पुढे ती होत राहील.
त्यांच्या साहित्यकृतींची इंग्रजी, हिंदी, कन्नडमध्ये भाषांतरं होत राहतात. हिंदी साहित्यातली बडी माणसं पवारांबद्दल, त्यांच्या साहित्याबद्दल आदराने बोलतात. त्यांच्या समीक्षेने मराठी नाट्यसमीक्षेत नवा प्रवाह निर्माण केल्याचं जाणकार म्हणतात. कुणावरही वार न करता नाटकातल्या जमेच्या आणि उण्या बाजू पवार फार समर्थपणे मांडायचे. त्यातून कधी कुणी दुखावलं गेलंय, असं व्हायचं नाही.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली तेव्हा त्यांच्या आजारपणाची पहिल्यांदा चाहूल लागली होती. ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते. पण त्यांचं दमदार भाषण मात्र वाचलं गेलं होतं. उपचारांनंतर ते पुन्हा ऑफिसात आहे तेव्हा आम्ही टाळ्या वाजवून त्यांचं जंगी स्वागत केलं होतं. खूप सारी पथ्यं होती. संध्यानं दिलेला डबा सोबत असायचा. कधी तरी ते अरबटचरबट तोंडात टाकताना दिसले की मी त्यांना संध्याची भीती घालायचे. शरीराची पडझड झाली होती पण पुन्हा काम सुरू केल्याने आनंदात असायचे. तेव्हा आमचं ऑफिस तात्पुरतं परळच्या कमला मिलच्या आवारातल्या टाइम्स टॉवरमध्ये होतं. पवार या ऑफिसात पहिल्यांदाच येत होते. सुदर्शन, मी आणि यामिनी त्यांना फिरून ते चकचकीत ऑफिस दाखवत होतो. फिरत फिरत आम्ही कोपऱ्यातल्या कॉफी रूममध्ये गेलो. काचेच्या टॉवरमधल्या उंचावरच्या त्या खिडकीतून खाली गिरणगावचे उरलेसुरले अवशेष दिसत होते. ते त्यातून ओळखीच्या खुणा शोधू लागले. बराच वेळ स्वत:शी बोलत असल्यासारखे बोलत होते. त्याच दरम्यान नवरात्र सुरू होतं. कँटीनच्या मजल्यावर जोरदार दांडिया रंगला होता. आम्ही त्यांना आग्रहाने तिकडेही घेऊन गेल्याचं आठवतं.
एकदा त्यांना कुठलं तरी मोठं पारितोषक मिळालं होतं आणि आम्ही पार्टीसाठी त्यांच्या मागे लागलो होतो. ते खूप दिवस टाळत होते. एक दिवस खिशातून हातात येतील तेवढे पैसे काढले आणि म्हणाले, जा, करा काय करायचं ते. ताबडतोब प्रशांत बोरकरने सूत्रे हातात घेतली. त्यातून महाराष्ट्र टाइम्स आणि नवभारत टाइम्सच्या सहकाऱ्यांसाठी स्नॅक्सची जंगी पार्टी झाली. त्यांना स्वत:ला मात्र यातला एक घासही चाखता आला नव्हता. पथ्य, उपचार, औषधं, तब्येतीतले चढउतार सुरू होते. वेदना, त्रास वाढत होता. उपचारात कसर नव्हती. त्यासाठी दरम्यानच्या काळात संध्या त्यांना धरमशालाला घेऊन गेली. मध्येच एकदा ते उपचार घ्यायला तयार नाहीत, असं मुकुंद म्हणाला तेव्हा त्यांच्या क्युबिकलमध्ये बसून संध्या-सईसाठी, हजारो चाहत्यांसाठी आणि आम्हा मित्रांसाठी तुम्ही असणं कसं महत्त्वाचं आहे, यावरून मी इमोशनल वाद घातला होता आणि पहिल्यांदाच त्यांच्या डोळ्यांत पाणी पाहिलं होतं.
ते निवृत्त झाले त्या वाढदिवशी केक आम्ही आणला आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या स्टाइलने भरपूर दंगा करून तो कापला. पुढे दोनच दिवसांनी त्यांचा छोटेखानी हृद्य निरोप समारंभ झाला. वातावरण हळवं झालं होतं. ‘मटा’सह ‘नवभारत टाइम्स’मधली माणसंही आवर्जून आली होती. पवारांच्या नाटक आणि अन्य साहित्याविषयी भरभरून बोलत होती. पवार कौतुक ऐकून कानकोंडे होऊन खाली मान घालून ऐकत होते. शेवटी ते ‘मटा’विषयी, सहकाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारं छोटसं पण खूप हृद्य बोलले.
त्यांच्याशी अधूनमधून फोनवर बोलणं व्हायचं. संध्याकडे कधीतरी प्रकृतीबद्दल विचारपूस व्हायची. मधूनच समर खडस, मुकुंदकडून त्यांच्या हॉस्पिटलायझेशनबद्दल कळायचं. मध्ये दादरला नयनतारा सहगल यांच्या कार्यक्रमाला गेले होते. जयंत पवार बोलणार होते. बोलायला त्रास होत होता म्हणून त्यांचं भाषण अतुल पेठे यांनी वाचून दाखवलं. सध्याच्या काळात संकोचलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धोक्यात आलेल्या लोकशाही मूल्यांबद्दल त्यांनी अत्यंत परखडपणे लिहिलं होतं. प्रकृती साथ देत नव्हती तरी लेखणी तेवढीच दमदार होती. सभागृहात लोकांचा त्या भाषणाला प्रचंड प्रतिसाद मिळत होता. प्रकाशझोतात रंगमंचावरील खुर्चीवर पवार मधोमध बसले होते. नेहमीसारखेच शांत दिसत होते.
जूनमध्ये केव्हातरी आम्ही whatsapp वर बोललो ते शेवटचं. त्यानंतर परवा थेट त्यांच्या घरी अखेरचे दिसले. नेहमीसारखेच शांत. डोक्याशी असलेल्या भिंतीवर त्यांच्या ‘तुझ्या नादानं पाहिली ...’मध्ये उल्लेख असलेला वडिलांचा जुना सुटातला आईसोबतचा फोटो होता. जणू त्यांनी लिहिल्यासारखं वडिलांच्या छातीवर डोकं ठेवून ते झोपी गेले होते. कुटुंबातली माणसं भवती होती. त्यांची बहीण उशाशी बसलेली. संध्या कोसळली होती. हजार आठवणी असणार. उमाळे येत होते. सईची प्रतीक्षा होती. तेवढ्यात कुणीतरी शाल काढून पवारांच्या अंगावर घातली. अखेरचं महावस्त्र. त्यांचा हात थोडा उघडा राहिला. त्यातून त्यांची लांबसडक लिहिती बोटं डोकावत राहिली. लेखकाची बोटं...

प्रगती बाणखेले
(लेखातील सर्व फोटो शैलेश जाधव यांनी काढलेले आहेत.)
Tags
आदरांजली