कमला भसीन यांचं नाव आणि त्यांच्या कामाबद्दल खूप ऐकून होते; कारण OBR ( One Billion Rising) ह्या कॅम्पेन च्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील समन्वयक म्हणून काम करीत होत्या. नाशिकमध्ये २०१७ साली OBR चं पहिल्यांदा आयोजन करण्यात आले होते. आमची संगिनी महिला जागृती मंडळ ही संस्था मुख्य आयोजक होती. 2019 मध्ये माझी आई (साथी अनिताताई पगारे) नेपाळला संगत च्या कोर्सला गेली होती. संगत म्हणजे South Asian Network for Gender Activity and Training. तीस - पस्तीस वर्षापूर्वी कमलादी व त्यांच्या समविचारी मित्र मैत्रिणी एकत्र करून ' संगत ' नेटवर्क सुरू केले. आई या कोर्स जाऊन आल्यानंतर कमलादीबद्दल अजून माहिती झाली. त्यांच्या विषयी नेहमी ऐकायला मिळत असे. शेवटी डिसेंबर 2019 मध्ये मी त्यांना प्रत्यक्ष भेटू शकले.मला आजही ती आमची भेट चांगलीच आठवते. नाशिकमध्ये मध्ये महाराष्ट्र महिला हिंसामुक्ती परिषद च आयोजन करण्यात येणार होते आणि या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी कमला भसीन येणार होत्या. कमलादीला भेटता येणार होतं, म्हणून माझा या परिषदेचं काम करण्याचा अजून उत्साह वाढला. आता दोन दिवस त्यांच्या सोबत राहता येणार होतं. त्यामुळे आम्ही जोमाने कामाला लागलो.19 डिसेंबरला मी कमलादीला पहिल्यांदा प्रत्यक्ष बघत होते. त्यांना त्यांची रुम दाखवायला मी मनीषाताई गुप्ते आणि डॉ. रमेश आवस्थी सरांसोबत गेले. कमलादी गाडीतून उतरल्या आणि मी त्यांना म्हटलं, “आपका बॅग मुझे दिजीए ,मैं लेती हूं .” तर कमलादी उत्तरल्या.. “मैं तुझे क्या बुढ्ढी दिख रही हूं ?” शेवटी त्यांनी त्यांची बॅग नाहीच दिली. हा एक अनुभव कायम लक्षात राहण्या सारखा आहे.
सायंकाळी कमलादीच्या हस्ते परिषदेचं उदघाटन झालं. ताईंनी जोरदार त्यांच्या शैलीत भाषण केलं आणि नंतर छानपैकी सर्वांसोबत फोटोसेशन मध्ये रमल्या. त्या इतक्या रमल्या की मला मनीषा ताईना विनंती करावी लागली की कृपया कमला ताईंना जेवायला घेऊन जा नाही तर कोणी हॉल मधून बाहेर जाणार नाही. नंतर जी काही गाण्यांची मैफिल जमली तिचं तर शब्दांत वर्णन करू शकत नाही.
त्या गात होत्या आणि सगळेजण साथ देत होते. पूर्ण परिषदेत कमलादीमुळे जान भरली गेली होती.
थोडं नटखटपणाने भरलेलं व्यक्तिमत्त्व - भरभरून उत्साह, ऊर्जा, Beauty with Brain, Caring, Powerful ... कमलादी म्हणजे फक्त एक व्यक्ती नसून चालत बोलतं विद्यापीठ होत्या.
माझ्या आयुष्यातील मला खुप आवडणाऱ्या त्रिदेवी आहेत. मला हे जग दाखवणारी माझी आई अनिता पगारे, जेष्ठ स्त्रीवादी नेत्या मनिषाताई गुप्ते आणि दि ग्रेट कमलादी भसीन. या त्रिदेवी कडून अनेक गोष्टी शिकले आणि शिकत राहील.
2021 मधले दोन दिवस किंवा दोन सकाळ मी कधीच विसरू शकत नाही. एक तर 28 मार्च 2021 ज्या दिवशी माझी आई - हे जग सोडून गेली. आणि दुसरा दिवस 25 सप्टेंबर 2021 ज्या दिवशी कमलादी आपल्या सर्वांना अलविदा म्हटल्या. माझ्या आईमुळे व मनिषा मावशी मुळे कमलादी भसीन सारख्या ग्रेट व्यक्तीला भेटता व अनुभवता आले.
कमलादीच्या कार्याला सतरंगी सलाम आणि त्यांचं कार्य मी माझ्या कामातून पुढे नेण्याचा नक्कीच प्रयत्न करीत राहीन!

तुम्हारा साथ मिलने से, एहसास- ए- कुवत आया है,
नई दुनिया बनाने का जुनुन फिर हम पे छाया है ।
कुछ तनहा तनहा मैं थी, कुछ तनहाई तुम मैं थी
दोनों में थी लाचारी, दोनों थी थकेहारी
इजहारे राज करने से, घुटन को कुछ घटाया हैं।
तुम्हारा साथ मिलने से, एहसास-ए- कुवत आया है…
त्या गात होत्या आणि सगळेजण साथ देत होते. पूर्ण परिषदेत कमलादीमुळे जान भरली गेली होती.
थोडं नटखटपणाने भरलेलं व्यक्तिमत्त्व - भरभरून उत्साह, ऊर्जा, Beauty with Brain, Caring, Powerful ... कमलादी म्हणजे फक्त एक व्यक्ती नसून चालत बोलतं विद्यापीठ होत्या.
माझ्या आयुष्यातील मला खुप आवडणाऱ्या त्रिदेवी आहेत. मला हे जग दाखवणारी माझी आई अनिता पगारे, जेष्ठ स्त्रीवादी नेत्या मनिषाताई गुप्ते आणि दि ग्रेट कमलादी भसीन. या त्रिदेवी कडून अनेक गोष्टी शिकले आणि शिकत राहील.
2021 मधले दोन दिवस किंवा दोन सकाळ मी कधीच विसरू शकत नाही. एक तर 28 मार्च 2021 ज्या दिवशी माझी आई - हे जग सोडून गेली. आणि दुसरा दिवस 25 सप्टेंबर 2021 ज्या दिवशी कमलादी आपल्या सर्वांना अलविदा म्हटल्या. माझ्या आईमुळे व मनिषा मावशी मुळे कमलादी भसीन सारख्या ग्रेट व्यक्तीला भेटता व अनुभवता आले.
कमलादीच्या कार्याला सतरंगी सलाम आणि त्यांचं कार्य मी माझ्या कामातून पुढे नेण्याचा नक्कीच प्रयत्न करीत राहीन!
कल्याणी अनिता मनोहर
Tags
आदरांजली