भाषा ही मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे. आता आपण भाषाविहीन समाजाची कल्पनाही करु शकत नाही. विचारांचे भावनांचे आदानप्रदान करण्याच्या जाणिवेतून भाषा तयार झाली असावी असे अभ्यासकांचे मत आहे.
भाषेच्या संदर्भात विचार करत असतांना आपल्याला मानवी उत्पत्तीपासून विचार करावा लागेल. मानव आणि मानवेतर सृष्टीतील संप्रेषण पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास,भाषांचाअभ्यास यासारख्या अनेक गोष्टीतून अभ्यासातून,काही अंदाज मांडले गेले. या अंदाजानुसार सुमारे दोन लाख ते साठ हजार वर्षांपूर्वी मानवी समुहात भाषा अस्तित्वात आली असावी आसा अंदाज आहे. अर्थात याला अनेक मत-मतांतरेही असू शकतात.
आता स्त्रियांची भाषा हा विचार करत असताना पुन्हा भाषेच्या उगमाकडेच जायला हवं. मानवी उत्पत्तीच्या नंतर व्यक्त होण्याचे साधन म्हणून भाषा तयार झाली. मौखिक स्वरूपातून लिखित स्वरूपात आली. आणि कालांतराने जशीजशी समाजात पुरुषी सत्ता वाढत गेली तशी तशी स्त्रियांची भाषा बदलत गेली. खरंतर भाषा ही स्त्री आणि पुरुष अशी भेदांची न राहता ती एकच असायला हवी होती. परंतु आपल्या व्यवस्थेत स्त्रियांच्या जगण्यावर त्यांच्या बोलण्या-चालण्या- राहणीमानावर जी बंधने आहेत त्याचा भाषेवर खूप जास्त परिणाम दिसून येतो. या दृष्टीने विचार करतांना असे दिसून येते की स्त्रियांची भाषा खूप वेळा प्रश्नार्थक कधी संभ्रमाची कधी संकोच भीती लज्जेची झाली.
त्यांच्या भाषेत बोलण्यात नेहेमीच खूप प्रश्न असतात. त्या सतत परवानगी मागत राहतात. त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी ती गोष्ट केली असं कधीच होत नाही. त्यांना स्वतःला काही काम असलं तरी सतत दुसऱ्यां कुणाची तरी परवानगी मागत राहावी लागते.
' बाहेर जाऊ का?'
'पार्लरला जाऊन येऊ का'
'आज स्वैंपाक काय करु?'
'जेवायला वाढू का ?'
रोजच्या जगण्यात असे किती अन् काय काय प्रश्न असतात, जे स्त्रिया सतत दुसऱ्या कुणालातरी विचारत असतात.
याउलट पुरुषांची भाषा –
' मी बाहेर जाऊन येतो,मला यायला उशिर होइल, वाट बघू नको.’
‘आज मी सुट्टी घेतली आहे.’
‘ मी सिनेमाला जातोय. मी पार्टीला जातोय.' – पुरुषांची भाषा अशी काहीशी सूचनावजा, जरब, आदेश असलेली दिसुन येते.
अशा पद्धतीने स्त्री आणि पुरुषाची वेगवेगळी भाषा आपल्याकडे दिसून येते.
वर्षानुवर्षे इथल्या स्त्रियांवर बंधने आहेत त्यांना परावलंबी बनवलं गेलेलं आहे म्हणून स्त्रिया परावलंबनाची भाषा बोलतात,संभ्रमाची भाषा बोलतात.
जसं की एखाद्या बाईला साडी घ्यायची आहे, तेव्हा ती बाई आधी मुलांचा विचार करेल मुलांना कपडे घेऊया. आपल्याला घेतले नाही तरी चालेल असा विचार करेल. नवऱ्याला तीन वेळा प्रश्न विचारेल आणि तेव्हा कुठे ती एक साडी घेईल. स्वतःसाठी खर्च करतांनाही त्यांच्या मनात सदैव एक अपराधी भाव असतो. कसं दिसेल, कुणाला काय वाटेल ? या सगळ्या भावनेतून त्या आपल्या आधी इतरांचा विचार करतात. आणि हे अपराधीपण त्यांच्या मनात परंपरेने रुजवलेलं असतं. त्यामुळे स्त्रिया कुटुंबात खूप स्वार्थीपणाने आप्पलपोटेपणाने विचार करण्यास धजावत नाहीत.
हिंदू तत्त्वज्ञान, धर्मग्रंथ, पुराणे वर्षानुवर्षे स्त्रियांची भाषा कशी असावी हे सांगत आले आहेत त्या दृष्टीने रामायणातील दोन उदाहरणे पाहूया.
न सहे हि ईदृशम् वाक्यम् वैदेही जनक आत्मजे || ३-४५-३०
श्रोत्रयोः उभयोः मध्ये तप्त नाराच सन्निभम्
(हे मिथिला राजकुमारी तुम्ही मला देवते प्रमाणे आहेत आणि म्हणून मी प्रत्युत्तरादाखल कठोरपणे बोलू शकत नाही मी जाणतो की मित्रांच्यात मतभेद निर्माण करणे हा स्त्रियांचा स्वभाव असतो स्त्रिया या चंचल आणि कठोर असतात हेच खरे. त्या एका विशिष्ट इच्छेने पछाडलेले असतात तेव्हा त्या नैतिकतेच्या साऱ्या जाणिवांचा त्याग करतात.)
महाकाव्ये, पुराणे, धर्म या सगळ्यांनी स्त्रियांची भाषा कशी असावी याचे संकेतच तयार केलेले आहेत. आणि जनमानसात ते अजूनपर्यंत जाणिवपूर्वक जपून ठेवलेले दिसतात.याच पुराणांचे धर्माचे आदर्श ठेऊन तिने वागले पाहिजे. या समजूतीचे दडपण स्त्री पुरुष दोघांवरही असते. त्याचा परिणाम भाषेवर दिसुन येतो.
स्त्रियांची भाषा ही खूपवेळा मौनाचीही आहे असे दिसून येते. स्त्रियांची भाषा अबोल्याची, रागावण्याची, रुसण्याची अशी पण आहे असं दिसतं. स्त्रियांच्या बोलण्यात लटका राग, रुसवेफुगवे बऱ्याचदा आढळून येतात. बायका ह्या परिस्थितीशरण असतात आपलं म्हणणं नीटपणे मांडण्यासाठी त्यांना अवकाश मिळत नाही. मग कधी रागावून कधी रुसून तर कधी अबोला धरून मौन बाळगून त्या आपलं म्हणणं खरं करण्याचा प्रयत्न करत असतात,'जा मी बोलणारच नाही' असं म्हणून रुसून बसणाऱ्या, रागावून, भिऊन, संकोचून अबोल राहणाऱ्या, बायका घरात शेजारी-पाजारी आपण नेहेमीच पाहतो. एखादी आई जेंव्हा अशी वागते, तेव्हा त्याचा परिणाम नकळतपणे मुलीवरही होत असतो. म्हणून कधीकधी लहानपणी कट्टी करण्याचे प्रमाणही मुलांपेक्षा मुलींमध्येच जास्त असलेलं दिसून येतं. लहान मुली आपसात सतत ‘कट्टी दो, कट्टी दो’ चा खेळ खेळत असतात. हे घरातल्या मोठ्या बायकांचं एक प्रकारे अनुकरणच असतं.
समाजाकडून व व्यवस्थेकडून मिळणारं कायम दुय्यमत्व या गोष्टीचाही परिणाम बायकांच्या भाषेवर झालेला दिसून येतो.

- वनवासात असताना जंगलातील वाटेवरून चालत असताना सीता रामाला म्हणते हे प्रिय पतीदेव केवळ इंद्राच्या तलवारीचा संग घेऊन तो ब्राह्मण इतका पतित झाला असेल तर मी तुम्हाला विनंती करते की यापुढे ऋषींना छळणार्या रक्षकांना मारण्याच्या हेतूने आपण आपल्या हाती धनुष्य धारण करावे. कृपया निष्पाप राक्षसांना देखील मारू नका. मग इतर जीवांबद्दल काय बोलावे, अर्थातच मी एक अल्पमती स्त्री आहे आणि धार्मिक तत्वांच्या बाबतीत तुम्हाला उपदेश देण्याची माझी योग्यता नाही. पण तुम्हाला योग्य वाटत असेल तर कृपया माझ्या म्हणण्यावर आपले विचार मांडा. आणि तुम्हाला जे सर्वोत्तम वाटेल ते करा.'
- सीतेने मारीचाचा आवाज ऐकला तेव्हा तिला वाटले की श्रीराम नक्कीच मदतीची याचना करीत आहेत. त्यामुळे भयभीत होउन ती लक्ष्मणाकडे वळून म्हणाली, 'तुम्ही तात्काळ जा आणि काय घडले ते पहा श्रीराम मदतीसाठी आक्रोश करीत आहेत त्यांना तुमची गरज आहे.हे लक्ष्मण, माझे हृदय धडधडत आहे आणि मला श्वास घेणे कठीण होत आहे. राक्षसांनी श्रीरामांना निश्चितच घेरलेले असावे.' परंतु सीतेचे रक्षण करण्याची श्रीरामाची आज्ञा लक्ष्मणाने दृढपणे मनात ठेवली होती. आणि त्यामुळे तो तसूभरही हलला नाही. त्याची ही वरकरणी दिसणारी उदासीनता पाहून सीता खूप अस्वस्थ झाली आणि लक्ष्मणाची कठोर शब्दांत खरडपट्टी काढत म्हणाली 'तुम्ही असे केवळ उभे काय राहिला आहात ? श्रीरामाचा मृत्यू व्हावा अशी तुमची इच्छा आहे का? आता मी समजले की खरे पाहता मित्राच्या रूपात तुम्ही तुमच्या ज्येष्ठ बंधूचे शत्रू आहात मला वाटते की श्रीरामांनी प्राणत्याग करावा अशी तुमची इच्छा आहे कारण त्यामुळे माझा उपभोग घेण्यास तुम्ही मुक्त व्हाल नाहीतर तुम्ही त्यांच्या सुटकेसाठी ताबडतोब गेला असता. लक्ष्मणा, तात्काळ जा. माझे पती संकटात असतील तर माझ्या जिवंत आणि सुरक्षित राहण्याचा उपयोग तरी काय?' बाणांसारख्या या धारदार शब्दांनी लक्ष्मणाचे ह्दय घायाळ झाले आणि तो हात जोडून म्हणाला ,
न सहे हि ईदृशम् वाक्यम् वैदेही जनक आत्मजे || ३-४५-३०
श्रोत्रयोः उभयोः मध्ये तप्त नाराच सन्निभम्
(हे मिथिला राजकुमारी तुम्ही मला देवते प्रमाणे आहेत आणि म्हणून मी प्रत्युत्तरादाखल कठोरपणे बोलू शकत नाही मी जाणतो की मित्रांच्यात मतभेद निर्माण करणे हा स्त्रियांचा स्वभाव असतो स्त्रिया या चंचल आणि कठोर असतात हेच खरे. त्या एका विशिष्ट इच्छेने पछाडलेले असतात तेव्हा त्या नैतिकतेच्या साऱ्या जाणिवांचा त्याग करतात.)
महाकाव्ये, पुराणे, धर्म या सगळ्यांनी स्त्रियांची भाषा कशी असावी याचे संकेतच तयार केलेले आहेत. आणि जनमानसात ते अजूनपर्यंत जाणिवपूर्वक जपून ठेवलेले दिसतात.याच पुराणांचे धर्माचे आदर्श ठेऊन तिने वागले पाहिजे. या समजूतीचे दडपण स्त्री पुरुष दोघांवरही असते. त्याचा परिणाम भाषेवर दिसुन येतो.
स्त्रियांची भाषा ही खूपवेळा मौनाचीही आहे असे दिसून येते. स्त्रियांची भाषा अबोल्याची, रागावण्याची, रुसण्याची अशी पण आहे असं दिसतं. स्त्रियांच्या बोलण्यात लटका राग, रुसवेफुगवे बऱ्याचदा आढळून येतात. बायका ह्या परिस्थितीशरण असतात आपलं म्हणणं नीटपणे मांडण्यासाठी त्यांना अवकाश मिळत नाही. मग कधी रागावून कधी रुसून तर कधी अबोला धरून मौन बाळगून त्या आपलं म्हणणं खरं करण्याचा प्रयत्न करत असतात,'जा मी बोलणारच नाही' असं म्हणून रुसून बसणाऱ्या, रागावून, भिऊन, संकोचून अबोल राहणाऱ्या, बायका घरात शेजारी-पाजारी आपण नेहेमीच पाहतो. एखादी आई जेंव्हा अशी वागते, तेव्हा त्याचा परिणाम नकळतपणे मुलीवरही होत असतो. म्हणून कधीकधी लहानपणी कट्टी करण्याचे प्रमाणही मुलांपेक्षा मुलींमध्येच जास्त असलेलं दिसून येतं. लहान मुली आपसात सतत ‘कट्टी दो, कट्टी दो’ चा खेळ खेळत असतात. हे घरातल्या मोठ्या बायकांचं एक प्रकारे अनुकरणच असतं.
समाजाकडून व व्यवस्थेकडून मिळणारं कायम दुय्यमत्व या गोष्टीचाही परिणाम बायकांच्या भाषेवर झालेला दिसून येतो.
उदाहरणार्थ - 'मला मेलीला कशाला हवंय एवढं ? तुम्ही पोटभर जेवा'
'मला काय कोरभर भाकरी असली तरी चालेल.'
'मी काय कुठेही पडून राहील सांदीकोपर्यात'
‘मी खाइन हे शिळं अन्न, तुम्ही गरम गरम खाउन घ्या.’
अशी कायम स्वतःकडे दुय्यमत्व घेण्याची भाषा स्त्रिया बोलत असतात. हिन्दी चित्रपटांमध्येही बायकांच्या तोंडून स्वतःला हिनदीन, कनिष्ठ लेखणारी भाषा बोलवली जाते.

उदाहरणार्थ 'मै तुमरी दासी, जनम की प्यासी ! तुम्ही हो मेरा सिंगार साजन', 'मै हुँ चरणो की बस धूल','तू चंदा मै चांदनी' - अशा गीतांमधून चित्रपटांमधून हे दुय्यमत्व कायमच अधोरेखित होत असतं. ते सतत समाजमनावर बिंबवलं जातं, म्हणून स्त्रियाही स्वतःला कायम दुय्यमच लेखत असतात. नवऱ्याला, घरच्या पुरुषांना आधी जेवायला वाढणे, आपण उरलंसुरलं खाणे, लग्नात सार्वजनिक कार्यक्रमात पुरुषांची पंगत आधी बसणे, घरी आलेल्या पाहुण्या पुरुषाला आधी चहा जेवण विचारुन पाहुण्या बाईला कनिष्ठत्व देणे - यासारख्या उदाहरणांमधून सुध्दा आपल्याला हे दुय्यमत्व दिसून येतं. मराठवाड्यात तर सर्रास नवऱ्याला 'मालक' हे संबोधन वापरलं जातं. आपला कुणीतरी मालक आहे, आपण कुणाच्या तरी मालकीच्या आहोत. ही जाणीव मनात रुजलेली असल्यामुळे सुध्दा त्या स्वतःला कमकुवत दुबळ्या मानत असतात.
त्याचबरोबर स्त्रियांची भाषा लज्जेची आणि संकोचाची आहे असेही एकीकडे दिसून येतं. स्त्रियांनी कसे वागावे याचे ठराविक संकेत समाजात आढळून येतात. स्वतःहून एखाद्या गोष्टीची मागणी न करणे, जे मिळेल ते घेणे, त्यातच समाधान मानणे, संकोच करणे, लाज बाळगणे, विनम्र असणे हा स्त्रियांचा हा खरा दागिना आहे - हे स्त्रियांच्या मनावर लहानपणापासून बिंबवलं जातं. त्यामुळे संसारात, प्रेमात, सार्वजनिक ठिकाणी पुढाकार घेणारी स्त्री - उध्दट, आगावू, दिडशहाणी - समजली जाण्याचाच समाजाचा दृष्टीकोण आहे. हल्ली परिस्थिती थोडीफार बदलेली दिसून येते. मुलीही मुलांना प्रपोज करू लागल्यात. आपल्या हक्कासाठी बोलू लागल्यात, भांडू लागल्यायत. पण मग त्या बोल्ड, निर्लज्ज आणि अति शहाण्या अशा समजल्या जाण्यामुळे तिला पाहून बाकीच्या मुली स्त्रिया पुढं येण्याऐवजी चार पावलं मागेच राहातात हे सुध्दा लक्षात घेणं आवश्यक आहे.
स्त्रियांची स्वतंत्र भाषा
अशी वेगवेगळी उदाहरणे जर आपण पाहिली तर खरोखरच स्त्रियांची भाषा वेगळी आहे असे दिसून येते त्यांना मिळणारे दुय्यमत्व व्यवस्थेने स्त्रियांकडे केलेले कायम दुर्लक्ष, त्यांचं म्हणणं ऐकून न घेण्याची वृत्ती, तिच्याकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहण्याचा दृष्टिकोण यातून स्त्रियांची आपली आपली एक वेगळी भाषा जन्माला आली असं दिसतं. कारण पूर्वी स्त्रीला बैठकखोली दिवाणखाना सोडून घरातल्या इतर भागातच वावरावं लागायचं. तिने चार माणसांत दिवाणखान्यात येऊ नये असे काही संकेत प्रचलित होते. त्यामुळे तिच्या मर्यादित विश्वात भाषेचे वेगवेगळे प्रयोग जन्माला आले.आणि हे जगभर घडलेले दिसतं जसे चिनी महिलांची 'न्यू श्यू' ही भाषा. आपल्याकडेसुद्धा अशी फक्त स्त्रियांचीच असलेली एक विशिष्ट भाषा बोलली जाते. प्रदेशानिहाय काही शब्द अक्षरे वेगवेगळी असू शकतात. पण वेगवेगळी भाषा बोलली जाते हे नक्की. उदाहरणार्थ 'चकारी' ची भाषा. म्हणजे 'चिझंतू चिवना चियआहे काय ? (तुझं नाव काय आहे)चिव तू चिलाम चिपखु चिवडतोआ.( मला तु खूप आवडतो किंवा आवडते.) मग कधी कधी यातलं अक्षर बदललेलं असेल. कुठे 'न' कूठे 'अ' तर कूठे 'प' उदाहरणार्थ- ए पोरं पोरी मी मार मारलं तर तर तिकडे जर जाऊन पर पडशील ना (ऐ पोरी जर मी मारलं तर तिकडे जाऊन पडशील ना.) - अशी ही गमतीची भाषा साधारण पंचवीस तीस चाळीस वर्षांपुर्वी अनेक छोट्या गावात, खेड्यात बोलली जात असे. आताही बोलली जात असावी. ही भाषा मुली शाळेत आपसात गमतीने आणि गंभिरपणेही बोलत असत.
आजकालच्या तरुण मुलांमध्ये 'डंब शराज' हा एक खेळ फार प्रसिद्ध आहे.हा एक चित्रपटांची गाणी, नावं इ. ओळखण्याचा खेळ आहे. या खेळात एका गतातले लोक एक नाव हातांच्या खाणाखुणा करून सांगतात आणि दूसरा गत ते नाव ओळखतो. अशाच प्रकारे गोंधळी समाजातही ही कर पल्लवीची भाषा आहे. देवीच्या गोंधळ जागरण प्रसंगी अनेकजण गोंधळ्याच्या साथीदाराला कानात एक नाव सांगतात. मग तो हातांच्या, बोटांच्या खाणाखूणा करुन आपल्या सवंगड्याला ते समजावतो आणि गोंधळी ते नाव ओळखून दाखवतो. मनोरंजन किंवा गमतीचा भाग सोडला तर ही एक प्रकारची सांकेतिक आणि सुरक्षेसाठी वापरली जाणारी नवी भाषाच आहे यात शंकाच नाही. अशाच प्रकारच्या सांकेतीक भाषा स्त्रियांच्याही बोलण्यात पहायला मिळतात. ह्या आणि अशा अनेक वेगवेगळ्या भाषा सुरक्षितेच्या दृष्टीने निर्माण झाल्या. तशीच ही स्त्रियांची भाषाही तयार झाली असावी.
स्त्रियांच्या भाषेची वैशिष्ट्ये.
सामाजिक संकेतामुळे किंवा दडपणामुळे अनेक संबोधने उद्गारवाचक अभ्यास्त शब्दांचा भरपूर वापर, भरपूर विशेषणे ही स्त्रियांच्या भाषेची वैशिष्ट्ये आहेत असं आपल्याला म्हणता येईल. उदाहरणार्थ 'कडू' हा शब्द. 'कडू' हा शब्द चव दर्शवतो तसेच 'कडू' हा शब्द मराठवाड्यात एखाद्याच्या बाबतीत विशेषण म्हणूनही वापरला जातो. उदाहरणार्थ कडू कारलं, कडू भाड्या, कडू कार्ट आता ह्या विशेषनात दुसरा फरक असा आहे की तो शब्द कधी लाडाने कधी लटक्या रागाने तर कधी भांडणात शीवीसारखा पण वापरला जातो. लहान मुलांना लाडाने ही 'कडू' म्हणतात तर रागात किंवा चेष्टेनेही कडूच म्हणतात . मराठवाड्यातील बायका या शब्दाचा सर्रास वापर करतात. कडू सारखाच 'कळवातीन' हा शब्दही दोन अर्थाने वापरला जातो. खरंतर - 'कळवातीन' म्हणजेच 'कलावंतीन'. उदाहरणार्थ सुंदर दिसणे म्हणजे कळवातीन. आणि नाचणारी बाहेरख्याली स्त्री या अर्थानेही 'कळवातीन' हा शब्द वापरला जातो.
विदर्भात भामट्या/भामटी, बह्याड ,भयताड हाही शब्द द्वयर्थी वापरला जातो. कधी चेष्टा मस्करीत आणि कधी रागाने सुध्दा या शब्दाचा भरपूर वापर होतो. अशी ही भाषेची गंमत स्त्रियांच्या भाषेत पाहायला मिळते.
स्त्रिया खूप बडबड करतात असा एक आरोप स्त्रियांवर लावला जातो परंतु हा आरोप पूर्णतः खरा नाही असं मला वाटतं. व्यवस्थेने स्त्रियांचं म्हणणं कधी ऐकूनच घेतलं नाही. उदाहरणार्थ- घराघरातल्या स्त्रियांची अवस्था पहा. आपली आई, आपली आजी, आत्या ह्या खूप बोलतात. कारण त्यांच्या बोलण्याकडे पुरुष जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. म्हणून त्या पुन्हापुन्हा बोलत राहतात आणि आपलं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न करत राहतात. मग त्या बडबड्या आहेत असा शिक्का मारला जातो. पूर्वी स्त्रियांना शिक्षणाच्या कमी संधी, बाहेर पडण्यचं स्वातंत्र्य नसणे, जाणीवपूर्वक व्यवहार ज्ञान होऊ न देणे आणि यावरुन त्यांना काही कळत नसल्याचा भाव, त्यांच्याकडे होणाऱ्या दुर्लक्षाला कारणीभूत ठरतो. घर, ऑफिस, शाळा इथल्या गप्पातून प्रत्येक स्त्रीला व्यक्त व्हायचं असतं; मोकळं व्हायचं असतं. परंतु सत्तेने कायम त्यांना डावललेलं, दुर्लक्षिलेलं आहे.
'सखाराम बाईंडर' या नाटकात एक स्त्री पात्र आहे सखारामची बायको रोज स्वैपाकखोलीत एका मुंगळ्याशी बोलत असते, खिडकीतून चिमण्यांशी बोलत असते, पक्षांशी बोलत असते. एके दिवशी सखाराम घरी असतांना आपल्या पायावर चढणाऱ्या एका मुंगळ्याशी तिचा संवाद चाललेला असतो आणि सखारामचा गैरसमज होऊन तो तिला पाहण्यासाठी येतो तेव्हा ती मुंगळ्याशी बोलतांना दिसते. तेंव्हा सखाराम अतिशय विषादाने म्हणतो की 'नवरे काय अवस्था करुन ठेवतात ही बायकांची.'
अलंकाराचा सोस, मनकवडेपणा या गुणांमुळे स्त्रीची भाषा चित्रमय आणि अलंकारिक होत असते. "आज मात्र समाजाचे स्त्रीवरील दडपण कमी झाल्यामुळे स्त्रियांचे शतकानुशतकांचे मौन बोलके होऊ लागले आहे." असे नीलिमा गुंडी यांना वाटते तर मिलिंद मालशे यांच्या मते "स्त्रियांची भाषा आणि पुरुषांची भाषा वेगवेगळी होण्याचे मुख्य कारण सामाजिक किंवा सांस्कृतिक आहे त्यातही स्त्रियांची भाषा असा स्वतंत्र विचार जसा केला जातो तसा पुरुषांची भाषा असा मात्र केला जात नाही" याचा अर्थ असा की पुरुषसत्ताक संस्कृतीमुळे पुरुषांची भाषाच प्रमाणभूत मानली जाते. तर भाषेच्या प्रत्यक्ष सामाजिक वापराचा विचार केला तर स्त्रियांची बोलीच प्रमाणभाषेच्या जवळ असते .
जात वर्ग निहाय स्त्रियांची भाषा
आपल्याकडे वेगवेगळ्या जाती उपजाती यांच्याही विविध भाषा आहेत. प्रादेशिक नव्हे - प्रादेशिक भाषा वेगळ्या. तेलगु, तमिळ, पंजाबी, गुजराती इत्यादी. आणि जाती उपजाती नुसार त्या त्या समाजा अंतर्गत बोलल्या जाणाऱ्या वडार, कैकाडी, बंजारा, अशा भाषा वेगळ्या. गावातली स्त्री असो वा शहरातली सुशिक्षित स्त्री असो किंवा नोकरी करणारी झोपडपट्टीतली वा वेगवेगळ्या जाती धर्मातली किंवा आदिवासी पाड्यावरची स्त्री असो सगळ्या स्त्रियांचे प्रश्न, समस्या वेगवेगळ्या आहेत म्हणून त्यांची भाषा ही वेगवेगळी असू शकते.
शहरी किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रीची भाषा ही शिक्षण आणि वाचनाने समृद्ध झालेली समजूतदार, प्रगल्भ, शिष्टाचार असलेली असू शकते तर अर्थार्जन करणार्या स्त्रीची भाषा आत्मविश्वासाची असू शकते. याउलट कष्टकरी मजूर किंवा झोपडपट्टीतल्या स्त्रियांची भाषा ही संतापी, उद्रेकी, शिव्याशाप देणारी, भांडखोर, आक्रमक अशीही असू शकते. एखादी मजूर स्त्री दिवसभर कष्ट करते, पुरुषांच्या बरोबरीने काम करते तरीही तिला मोबदला मात्र पुरुषांपेक्षा कमी मिळतो. शिवाय घरी गेल्यानंतर तिच्या वाटणीचे काम कोणी करून ठेवत नाही तर तिलाच सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवावा लागतो, धुणीभांडी करावी लागतात. या वर्गात पुरुष व्यसनी, जुगारी असण्याचं प्रमाणही जास्त असतं. मग एकट्या स्त्रीला घराची मुलांची काळजी करून जबाबदारी पेलून कामही कष्टही करावे लागतात अशी स्त्री मग शिवीगाळ करत असेल, संतापत असेल तर तर त्यात नवल ते काय ? अशा स्त्रियांची भाषा साहाजिकच त्यांच्या जगण्यातून आलेली भाषा असते. तसेच जातीनिहाय, वर्गनिहाय ही भाषा वेगवेगळी असू शकते. राजकारणात सत्तेत असलेल्या स्त्रिया सामान्य स्त्रियांपेक्षा वेगळी भाषा बोलू शकतात. दबलेल्या पिचलेल्या स्त्रिया या हतबलतेची भाषा बोलू लागतात.
अशा प्रकारे जगण्याच्या संदर्भानुसार वेगवेगळ्या परिस्थिती नुसार स्त्रियांची भाषा बदलत असते.
स्त्रियांची भाषा सुंदर आहे.
जातवर्ण व्यवस्था, राजकारण, सत्ताकारण या सर्व गोष्टी जरी असल्या तरी या सगळ्यांच्या पलीकडे असणारी स्त्रियांची अशी स्वतंत्र भाषा आहे आणि ती खूप सुंदर आहे. स्त्रियांचं स्वतःचं एक भावविश्व आहे, सुंदर स्वप्ने आहेत,त्या स्वतंत्र विचार करू शकतात,त्यांची निरीक्षणे त्यांच्या नोंदी यातून त्यांची स्वतःची स्वतंत्र सुंदर अशी नवी भाषा निर्माण होते. काव्य निर्माण होतं. साहित्य निर्माण होतं. मग बहिणाबाईं सारखी कवयित्री म्हणून जाते – ‘अरे खोप्यामंदी खोपा सुगरनीचा चांगला /देखा पिलासाठी तिनं जीव झाडाले टांगला.’ ज्या बहिणाबाई शाळेत कधी गेल्या नाहीत त्या फक्त जात्यावर दळता दळता निश्वास टाकावा इतक्या सहजपणे गाणी रचतात कवने रचतात. धरीत्रीच्या कुशीत झोपलेलं बी-बियाणं प्रगट होताना किंवा चूल पेटेनाशी झाली तरी त्यांना काव्य दिसतं. शेतकऱ्यांच्या कष्टाचे जीवन आणि त्यांच्या जीवना बद्दल कृतज्ञता बाळगून विठ्ठलावर विश्वास ठेवावा हे सुध्दा बहिणाबाई आपल्या काव्यातून व्यक्त करतात. त्या बद्दल एक ना अनेक सुंदर सुंदर संदर्भ सांगता येतील.
'डोईचा पदर आला खांद्यावरी' असं जनाबाई कितीतरी शतकांआधी म्हणून जातात.तर 'देहासी विटाळ म्हणती सकळ आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध! देही चा विटाळ देहीच सोवळा, सोवळा तो झाला कवण धर्म! विटाळा वाचुनी उत्पत्तीचे स्थान कोण देह निर्माण नाही जगी’ असे सोयराबाई म्हणून जातात. बहिणाबाई मुक्ताबाई जनाबाईंच्या साधेपणातील काव्य असो किंवा 'हरेक ऋतुचक्रात फुटतातच मुंग्यांनाही पंख, म्हणूनच आमचं दुःख अबाधित आहे’ अशी अस्सलतेची त्याचे परिमाण लेऊन येणारी अनुराधाताईंची प्रतिमासृष्टी असो - जगण्याच्या अनुभवातून स्त्रियांची भाषा अधिकाधिक सुंदर होत जाते, हेच खरं! (क्रमशः)

सारिका उबाळे
अमरावती