एक घरकामगार बाई १८०० रुपयाच्या मोबदल्यासाठी काही मुलांशी वाद घालत आहे हा व्हिडियो खूप व्हायरल झाला. त्यानंतर – ‘विनोद विनोदाप्रमाणे घ्यावा’ यापासून ‘हे किती क्रूर आहे’ अशी अनेक मतं मतांतरं झाली. ती बाई अर्धशिक्षित आहे त्याहूनही जास्त कातावून गेली आहे. केलेल्या कामाचे पैसे न मिळणं, वेगवेगळी कारणं सांगून आधीच कमी असलेला पगार कापणं यामुळे समोरची व्यक्ती आपल्याला फसवणार हे तिच्या आणि तिच्यासारख्या अनेकींच्या डोक्यात फिट्ट बसलं आहे. त्यामुळे पगार हातात आला तरी तो बरोबर असेलच याची त्यांना खात्री वाटत नाही. तो व्हिडियो ज्या तत्परतेने सगळ्यांनी एकमेकांना परत परत पाठवलाय या वरून घरकामगारांचं नाही तर त्यांच्याकडून काम करून घेऊन, त्यांना कमी लेखणाऱ्या, कमी पैसे देणार्या आणि त्याची टवाळी उडवणाऱ्या, हक्क नाकारणाऱ्या मध्यमवर्गाचं पितळ उघडं पाडतोय. जुन्या ‘गोलमाल’ सिनेमात एक मजेदार गाणं आहे. “भूख रोटी कि हो तो पैसा कमाईये, पैसा कमाने के लिये पैसा चाहिये. गोलमाल हैं भाई सब गोलमाल हैं!” सगळ्या नोकरी करणाऱ्या मध्यमवर्गीय बायकांसाठी ही वस्तूस्थिती आहे. स्वत:ची प्रगती करण्यासाठी, घर चालवण्यासाठी काम करायचं असेल तर त्या घरात करत असलेल्या कामासाठी कोणाला तरी पैसे देऊन कामाला लावावं लागतं! कारण पैसे कमावण्यासाठी काम करायचं तर घरकाम, स्वयंपाक, मुलं- वृद्ध यांची देखभाल या पूर्णवेळ कामातून उसंत मिळाली पाहिजे. ऊर्जा उरली पाहिजे. ती मिळावी म्हणून स्त्रीची प्राथमिक जबाबदारी समजली जाणारी कामं करण्यासाठी इतर व्यक्ती नेमाव्या लागतात. अर्थात ही घरातली कामं करण्यासाठी त्यांना कोणतंही मानधन मिळत नसतं. त्यामुळे कमी पैशात ती कामं करण्यासाठी तयार असलेली माणसं नेमावी लागतात. बहुतांश वेळा त्या घरातल्या किंवा घराबाहेरच्या बायकाच असतात. केर काढणे, कपडे धुणे, भांडी घासणे, स्वयंपाक, इतर सफाई, मूल संभाळणं या कामासाठी मदतनीस मिळाल्याशिवाय बाईला नोकरी करणं कठीण होतं. दररोज ही सगळी कामं करणं हे वेळखाऊ, कष्टाचं आणि रटाळवाणं आहे. नोकरी न करणाऱ्या स्त्रीलाही एकटीने हे दररोज नित्यनेमाने हे रहाटगाडगं चालवणं कठीण असतं. त्यामुळे घरकाम मदतनीस हा स्वतंत्र शहरी मध्यमवर्गीय जीवनाचा अविभाज्य भाग, अत्यावश्यक झाला आहे.
घरकाम मदतनीस यांच्या कष्टावर नोकरदार, व्यावसायिक बायकांचं करियर अवलंबून असतं. घराची स्वच्छता, घरी शिजवलेलं पौष्टिक अन्न, मुलं-आजारी-वृद्ध यांची देखभाल या कामांसाठी लागणारे कष्ट, वेळ त्या देतात. स्त्रीची जबाबदारी दुसरी स्त्री/ स्त्रिया घेत असल्याने पुरुष या कामांपासून नामानिराळे राहतात. परिणामी वर्तमान पितृसत्ताक समाजव्यवस्थेला धक्का न लावता शांती आणि नात्यातला सलोखा कायम राहतो आणि संपूर्ण कुटुंबाचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकून राहतं. या बदल्यात कामगार महिलांचं घर चालतं, मुलं शिकतात, थोडी बचत होते, त्यांना मालकिणींकडून किंवा बचतगटांकडून कमी व्याजदरावर कर्ज मिळतात त्यातून या कुटुंबांच्या अनेक गरजा भागतात, थोडं स्थैर्य लाभतं.
कोरोना आला आणि सगळं उलटपालट झालं. बहुतांश स्त्रिया खाजगी, असंघटीत क्षेत्रात किंवा अर्धवेळ काम करतात. छोटे व्यवसाय चालवतात ते सगळे बंद पडले. सगळे सदस्य घरी परतले आणि घरात बंद झाले. बाह्य संपर्क तोडणे हा आजाराच्या प्रतिबंधाची सर्वात पहिली पायरी ठरली. कोरोनाची साखळी तोडण्याच्या नादात सधन घरांचं गृहस्वास्थ्य आणि घरकामगाराचं आर्थिक स्वास्थ्य यांचं अक्षरश: कंबरडं मोडलं. स्वत:चे आई -वडील, भावंडं, मुलं- नातवंडं यांना भेटणं मुश्कील झालं. घरात राहणाऱ्या व्यक्तींशिवाय कोणालाच घरात प्रवेश बंद झाला. कोरोनामुळे भांबावलेल्या सुरुवातीच्या काळात घरकामगार कामाला येऊ शकत नाहीत हे दोन्ही पक्षांना मान्य होतं. पंधरा दिवस, महिन्यात हा प्रश्न सुटेल अशी आशा वाटत होती. कोरोनाची भीती दोन्ही बाजूंना होती पण सुरुवातीला मालकांकडून कामगारांना लागण होण्याची शक्यता जास्त होती. घरकामगार महिलांना कधी नव्हे तो पंधराएकदिवस आराम मिळाला म्हणून बरं वाटलं.

इकडे सधन कुटुंबात समाजमाध्यमावर चमकण्याच्या मिषाने सगळे कामाला लागले होते. पण हा विसाव्याचा आणि एकोप्याचा भर दोन महिने पूर्ण होता होता पुरता ओसरला. सरकारी परवानगी मिळाली की कामावर जाण्यासाठी बायका लागलीच तयार होत्या. पण तोवर कोरोना त्यांच्या वस्तीत पोहोचला होता आणि सहनिवासातील व्यवस्थापन समित्यांनी करोना थोपवण्यासाठी कंबर कसली होती. तिथे जास्तीच्या मेजॉरीटीचं राज्य चालू होतं. गरीब हे अस्वच्छ वस्तीत राहणारे अशिक्षित, बेशिस्त आणि प्रमुख कोरोनावाहक ठरत होते. त्यामुळे त्यांना सहनिवासाबाहेर ठेवणं हा सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम झाला होता. दारोदार वर्तमानपत्र , कपडे इस्त्री करून देणारे, वाहनचालक, वाहन सफाई आदी सेवा देणारे यांच्या सेवांना मनाई होतीच, त्यात घरकामगार या कोरोना प्रसाराच्या दृष्टिने सर्वात जास्त धोकादायक सेवा म्हणून नाकारण्यात आल्या. त्याचवेळी घरून काम करणाऱ्या महिला, घरकाम करू न शकणारे वृद्ध, आजारी, अपंग आणि आवश्यक खबरदारी घेऊन कोरोनाकाळात सुरळीत जीवन जगू पाहणारे या लोकांना ही सेवा अत्यावश्यक आहे. घरकामगार घरात चोवीस तास राहून वैतागल्या . नवरा, मुलं, इतर कमावते हात थंडावले . बांधकाम कामगार, वाहनचालक, खाद्यपदार्थ इ. डिलिव्हरी, कंत्राटी कामगार कुणाच्याही हाताला काम नाही. मार्च महिन्याचा पगार दिल्यानंतर बहुतांश मालकांनी पगार देण्यास दिलेला नकार दिला किंवा वर्षभर तरी घरकामाला येऊ नको अशी अनेकांनी फोनवरच बोळवण केली. घरात खायला अन्न नाही. ज्या मोजक्या बायकांची शहरात जनधन खाती होती त्यांना मिळालेले हजारेक रुपये आणि रेशन कार्ड असलेल्या बायकांना मिळालेले तांदूळ आणि डाळ कुठवर पुरणार होते . त्यात बहुतांश घरकामगार नवरा असो व नसो एकटीने संसार चालवणाऱ्या. घरात खर्चाचा मेळ बसवायचा , व्यसनी पुरुष, आजारी, अपंग, अवलंबून असलेल्या नातेवाईकांचा प्रतिपाळ करायचा, प्रतिबंधित क्षेत्रात असल्याचा, गरीब वस्तीत राहत असल्याचा कलंकांचा सामना करायचा अशी अनेक अंगाने लढाई लढत आहेत.
कुठे नोकरदार महिलांना असलेली मदतीची गरज तर कुठे घरकाम करणाऱ्या बायकांची निकड यानुसार श्रमविभागणी आणि मोबदला यात चढउतार होत या क्षेत्राने कोरोना येईपर्यंत जम बसवला होता. असंघटीत क्षेत्रात घरकामगारांची संख्या झपाट्याने वाढत होती. कमी कौशल्याचं, अनौपचारिक स्वरूपाचं आणि वेळा सोयीच्या असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या, निम्न वर्गातल्या, कमी शिकलेल्या आणि घरची कामं, इतर जबाबदाऱ्या सांभाळून काम करणाऱ्या महिलांसाठी शहरात दुसऱ्या घरी घरकाम करणं ही एकमेव संधी होती. भांडी, फरशी करणाऱ्या बायकांची हळूहळू स्वयंपाक, मूल सांभाळणे, आजारी/ वृद्धांची शुश्रुषा अशी कौशल्यानुसार बढती झाली होती. एकीने सुटी घेतली तर काम अडू नये म्हणून चार कामांसाठी दोन ते चार वेगळ्या बायका कामाला ठेवण्याची काही घरात सोय केली गेली. याचा विचार करून अनेक उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये या कर्मचाऱ्यांसाठी वेगळ्या लिफ्ट, कामगारांची नोंदणी, त्यांची ओळखपत्र तयार केली गेली. त्यांच्या येण्याजाण्याच्या वेळा नोंद केल्या जातात त्या कोणत्या वस्तू घेऊन जातात याची तपसणीही होते.
जात, धर्म आदी भेद थोडे सैल होत या महिलांनी घरात, स्वयंपाकघरात शिरकाव केला तर अनेकींना कुटुंबातल्या सदस्यांचं स्थान मिळालं. या अनौपचारिकतेत असलेली असमानता, शोषण कमी व्हावं मानवी हक्क, कामगार अधिकार आणावे यासाठी अनेक कामगार संघटनांनी आपल्या घरकामगार संघटना सुरु केल्या.

ठराविक कामाला ठराविक मोबदला, हक्काच्या सुट्ट्या आणि बोनस यासाठी संघटन काम करू लागलं. अन्यायाच्या घटनांमध्ये त्यांना साथ मिळत होती. महिन्यातून चार सुट्ट्यांच्या मागण्या काही महानगरात मान्य झाल्या आहेत. असंघटीत क्षेत्रातल्या कामगार संघटनांबरोबर जोडलेल्या या संघटनांच्या मागण्यावरून काही राज्यात घरकामगार कल्याण मंडळ स्थापन झालं. हजारो महिला दरवर्षी फी भरून इथे नोंदणी करत आहेत. काही साठी ओलांडलेल्या महिलांना १०००० पेन्शनही मिळाली. कोरोनाकाळात राज्य मंडळ अस्तित्वात असल्याची काही चिन्हं दिसली नाहीत. उलट कोरोनाने हा लढा जिथून सुरु झाला तिथेच नेऊन ठेवला आहे.
हातात काम नाही. कामावर जाण्यासाठी तंदुरुस्ती प्रमाणपत्र, प्रतिबंधित क्षेत्रात राहत नसल्याचं हमी पत्र, मास्क, हातमोजे वापरणं, दारात तापाची तपासणी हे सगळे नियम पाळून जे मिळेल ते काम करण्याची आता कामगार महिलांची तयारी आहे. त्याबरोबर संकुलात त्यांनी इतर कोणाशी बोलू नये, परिसरात रेंगाळू नये, एका घरात एकजणच काम करू शकेल, एका सोसायटीत काम करणारी बाई दुसऱ्या सोसायटीत काम करणार नाही - असे प्रत्येक सोसायटीचे आपआपले नियम केले. ते मान्य करण्याशिवाय गत्यंतर नाही अशी त्यांची अवस्था आहे. सुट्ट्या, बोनस, थकेलेले पगार याबद्दल बोलणं तर लांब पण स्वयंपाकाऐवजी साफसफाई किंवा धुणीभांडी करत आहेत. खूप कमी घरात पुन्हा कामावर बोलावलं जातंय त्यामुळे अनेकींना काम नाही.

घरकामगार महिलांच्या कामाचं स्वरूपही अनेक पदरी आहे. देशात तसंच देशाबाहेर जाऊन काम करणाऱ्या घरकामगार आहेत. रोज येऊन जाणाऱ्या तर काही २४ तास घरात राहणाऱ्याही आहेत. कोरोनामुळे रोजगार बंद होणं, पगार न मिळणं, अन्न न मिळणं, आरोग्य सुविधा न मिळणं, शोषण आणि अत्याचार या समस्या त्यांना भेडसावत आहेत. त्यात संभाव्य कोरोनावाहक म्हणून कलंक आणि भेदभाव सहन करावा लागतोय. कोरोनामुळे वरवर सामंजस्याचे दिसणारे संबंध संशयाने ग्रासले आहेत. या दोन वर्गातला दुरावा आणखी गडद केला आहे. विषमता आणखी टोकदार होत आहे. हा घरकामगारांसाठी देशभर आणि देशाबाहेर काम करणाऱ्या सगळ्या संघटनांचा अनुभव आहे. घरमालकांच्या घरात अडकून पडलेल्या कामगारांची परिस्थिती आणखी वाईट आहे. सर्व सदस्य घरात असल्याने जास्त काम, सतत काम करावं लागत आहे. विसावा कमी मिळतो, बाहेर जाण्यावर बंधनं असल्याने बंदीवान झाल्या आहेत. घरी किंवा मायदेशी परतण्यासाठी प्रवासाला साधनं उपलब्ध नसल्याने त्यांची आणखी कोंडी झाली आहे. असंघटीत क्षेत्र असल्याने कोणीच दखल घेत नाहीत. पूर्ण देशात केवळ मेघालय राज्यात घरकामगार महिलांचा वेतन कायद्यात समावेश आहे. यूनियनशी जोडलेल्या बायकांकडेच कामगार कार्ड नाही, आधार कार्ड, रेशन कार्ड गावाकडे, जन-धन खातं उघडलेलं नाही अशा अनेक त्यामुळे त्यांच्यावर कामाअभावी उपासमारीची वेळ ओढवली आहे. त्यांना त्यांचे अधिकार आणि सन्मान मिळायला हवा यासाठी गेल्या दोन महिने सर्व संघटनांचे कसून प्रयत्न चालू आहेत.
घरकामगार महिलांना कामावर रुजू होऊ द्यावं यासाठी सहनिवासाच्या व्यवस्थापन समित्यांबरोबर चर्चा केल्यावर काही शर्तीवर कामाला सुरुवात झाली. कामगार मंत्री, कामगार आयुक्त यांना निवेदनं सादर केली त्याला प्रतिसाद मिळाला नाही. पण सहकारीसंस्थांच्या सहकारी निबंधक आयुक्तानी स्वत:चे वेगळे नियम बनवणाऱ्या सहनिवास समित्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी यांनी टाळेबंदी शिथिल करताना घरकामगारांचा विशेष उल्लेख करून आदेश जारी केले. माध्यमातून वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध झाल्या तरीही काही रहिवाश्यांना घरकामगारांना रुजू करण्यासाठी संकुल व्यवस्थापन समितीविरुद्ध पोलीस, न्यायालयाकडे धाव घ्यावी लागली.
काही सोसायट्यांमध्ये या विषयावर मतदान घेण्यात आलं. सोसायट्यांमध्ये घरकामगार समर्थक आणि विरोधक असे दोन तटच पडले. त्यांच्यात व्हॉटसअप युद्ध झडत आहेत. विरोधकांनी समाजमाध्यमांवर याविषयी विनोद आणि भीती पसरवणाऱ्या खोट्या क्लिप पसरवल्या. कणिक मळण्याचं यंत्र विकण्यासाठी या विद्वेषाचा लाभ उठवला गेला. या कामगार अस्वच्छ असतात अशी जाहिरात केली गेली. पण त्याचा सर्व स्तरातून निषेध केल्यावर ती जाहिरात मागे घ्यावी लागली. विकसित देशात घरातली अनेक कामं यंत्र आणि पर्यायी व्यवस्थेकडे सोपवली आहेत आणि उरलेली सर्व कामं घरातल्या सर्वांनी करण्याची सवय लागली आहे. एका धक्क्यामुळे भारतात तडकाफडकी हे घडू शकत नाही. अचानक झालेल्या या बदलाचा गृहिणी आणि घरकामगार स्त्रियांच्या शारीरिक, मानसिक आरोग्य आणि आर्थिक स्थिती यावर गंभीर परिणाम होत आहेत. एकूणच घरातल्या कामांच्या असमान जबाबदाऱ्या, स्त्रियांचे बिनमोल श्रम, चार भिंतीतले नातेसंबंध त्यांचं राजकारण आणि अर्थकारण यावर घरकामगार व्यवस्थेने घातलेलं पांघरूण कोरोनाच्या झंझावातात विदीर्ण होत आहे.
संयोगिता ढमढेरे
स्वतंत्र पत्रकार, अनुवादक आणि प्रशिक्षक आहेत.
वंचित समाज घटकांसाठी माध्यम वकालत करतात.