कोरोनोत्तर काळात इंटरनेट वापरुन घरातून काम करणाऱ्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. अनेक ऑनलाइन सेमिनार्स, वेबीनार्स, काही शाळाकॉलेजच्या अभ्यासाची लेक्चर्सदेखील ऑनलाइन सुरू असतात. या सगळ्यात अर्थातच पुरुषांसोबत स्त्रिया देखील सहभागी असतात. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात पूर्वीपेक्षा जास्त महिलांना सायबर गुन्हेगारीचा सामना करावा लागतो आहे. लॉकडाउनच्या काळात जशी कौटुंबिक हिंसाचारात वाढ झाली आहे तशीच सोशल मीडियावर आणि इंटरनेटच्या अवकाशातल्या लैंगिक हिंसाचारात देखील वाढ झालेली आहे, असे UNWomen ला दिसून आले आहे. दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीतील काही शाळांमधल्या मुलांनी Instagram ग्रुपच्या माध्यमातून केलेल्या हिंसक लैंगिक कारवाया गाजत होत्या. दोनच दिवसांपूर्वी एका वेबिनार मध्ये स्त्रियांच्या हक्कांविषयी काम करणार्या एका कार्यकर्तीचे प्रेझेंटेशन सुरू असताना काही पुरुषांनी हिंसक लैंगिक भाषेत बोलून आणि लिंगाचे फोटो दाखवून वेबिनार मध्ये अडथळे आणायचा प्रयत्न केला. अशा वाढत्या ऑनलाइन हिंसाचारामागच्या मनोवृत्तीची दखल घेणारा आजचा लेख अनीता पगारे यांनी लिहिला आहे. (अनीता पगारे संगिनी महिला जागृती मंडळ, नाशिक ह्या सामाजिक संस्थेच्या संस्थापक असून अनेक वर्षांपासून स्त्रियांसोबत विविध मुद्द्यांवर काम करत आहेत. सध्या संगिनी तर्फे युवकांबरोबर जेंडर आणि हिंसाचार ह्या विषयावर काम सुरू आहे.)
तुम्ही सर्वांनी दिल्लीची ती ‘बॉईज लॉकर्स रुमची’ घटना वाचली, ऐकली असेलच. दोन दिवसापर्यंत मला ती एकच घटना आहे असे वाटत होते. पण प्रत्यक्षात तीन वेगवेगळ्या घडलेल्या घटना एकत्र करुन सांगितल्या जात होत्या. मला असे कळले होते की, इन्स्टाग्राम वर दिल्लीतल्या एका शाळेतल्या मुलांनी आपल्याच वर्गातल्या काही मुलींचे नग्न फोटो शेअर केले आणि त्यांच्यावर आपण सामुहिक रेप कसा करु शकतो अशी चर्चा केली! प्रत्यक्षात . दिल्ली पोलिसांनी एनडीटीव्ही ला दिलेल्या माहितीनुसार - घटना क्रमांक एक मध्ये दिल्लीतल्या वेगवेगळ्या शाळेतील मुलांचा इन्स्टाग्रामवर ‘बॉईज लोकर्स रुम’ नावाचा ग्रुप आहे जिथे त्यांनी त्यांच्या वर्गातल्या मुलींचे आक्षेपार्ह फोटो शेअर केले . त्यातल्या एका मुलाने त्याच्या वर्गातल्या एका मुलीला हे सर्व सांगितले, तीने तिच्या आईला सांगितले आणि तक्रार पोलिसात गेली. घटना क्रमांक दोन मध्ये एका मुलीने मुलाच्या नावाने ‘स्नॅपचॅट’ मध्ये खाते उघडले आणि एका मुलाची मानसिकता समजावून घेण्यासाठी त्याच्या बरोबर सामुहिक बलात्कार ह्या विषयावर चर्चा केली आणि घटना क्रमांक तीनमध्ये , एका अल्पवयीन मुलीने एका अल्पवयीन मुलावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला (गुन्हा दाखल नाही बर का!) म्हणून त्या मुलाने ११ व्या मजल्यावरून खाली उडी मारुन आत्महत्या केली. या घटनांचा काहीकाळ बराच बोलबाला झाला होता.
याविषयावर सध्याचा युवावर्ग काय विचार करतो आहे, ते समजून घेण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या भागातल्या, वेगवेगळ्या परिस्थितीत राहणाऱ्या मुलामुलींशी बोललो. असे अनेक ग्रुप असतात हे प्रत्येकाला माहीत होते. अशा ग्रुप मध्ये अश्लील जोक्स शेअर केले जातात हे देखील त्यांनी मान्य केले पण दिल्लीच्या ह्या पोरांनी मात्र हद्द पार केली असे सर्वांचे मत होते. सर्वांनी ह्या घटनेचा निषेधच केला. तोपर्यंत ह्या चर्चेत मुलगी आहे हे त्यांना माहित नव्हते ! पण जेव्हा त्यांना हे कळाले तेव्हा मात्र त्यांची प्रतिक्रिया होती - मुलांनी असे बोलले हे वाईटच पण ‘मुलीही’ आता हाताबाहेर जायला लागल्या आहेत, मुलींचेही असे ग्रुप असतात? मुलीही आता उनाडक्या करायला लागल्या आहेत ! हाच का तुमचा स्त्रीवाद ? - असे अगदी टिपिकल संस्कृती रक्षक जस बोलतात तशाच ह्या प्रतिक्रिया होत्या. मुलगा दारु प्यायला तर ते सोशल ड्रिंकिंग असते पण एक जरी मुलगी प्यायलेली दिसली किंवा दारुचे समर्थन करतांना दिसली किंवा तिला दारूची माहिती आहे असे दिसली की लगेच आपली संस्कृती, समाज रसातळाला जातो आहे असे गळा काढणारे असतात ना तसाच मला इथे ‘फील’ आला!

आई बहिणी वरुन सहजपणे शिव्या देणारी मुलंसुद्धा - मुलींची छेड काढू नये, मुलींना त्रास देऊ नये - असे म्हणतात तेव्हा त्यांना सांगायला हव की ‘बलात्कार’ हि घटना नसून ती एक मानसिकता आहे. काहीना दुर्बल मुलीपर्यंत पोहोचता येते आणि त्यांना तिच्यावर लैंगिक शोषण करण्याची संधी मिळते,तर अनेकांना ती संधी मिळत नाही. पण असे हजारो लोक आहेत जे सहजपणे उठता बसता स्त्रियांचा अपमान करतात, तिला वस्तू समजून बघतात, तिच्या निर्णयाचा आदर करीत नाहीत. आई बहिणीवरून शिव्या देणे, मुलींना वस्तू समजणे हा त्याच मानसिकतेचा भाग आहे. एकीकडे ‘आम्ही स्त्रियांचा सन्मान करणाऱ्या संस्कृतीत जन्मलो, आमच्या देशात स्त्रियांना देवी समजले जाते’ असे म्हणायचे पण आपल्या घरातल्या मुली किंवा स्त्रिया जरा बोलू लागल्या, आपल्या आवडीच्या मुला बरोबर फिरू लागल्या की यांच्या मनातला सनातनी पुरुष जागा होतो! यात काही विरोधाभास आहे हेच त्यांना कळत नाही.
आता तरुण पिढीत मैत्रीत एक वेगळीच मोकळीक असलेली दिसते. मुली त्यांच्या बरोबरीने फिरतात, निर्णय घेतात हे आनंदाने बघणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. लैंगिकता ह्या विषयाची समज असलेल्या मुलांची, पुरुषांची संख्या वाढताना दिसते आहे हा एक सकारात्मक खूण आहे. आपल्या आवडीने प्रत्येक व्यक्तीला जगता येणे , त्यासाठी आपल्या आवडीच्या प्रमाणे निर्णय घेता येणे हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे हे आता मुलीही स्पष्ट पणे बोलतांना दिसताहेत आणि मुलही बोलतांना दिसताहेत हि फारच चांगली गोष्ट आहे. स्त्री वादी चळवळीने अनेक वर्ष केलेले प्रयत्न आता जगण्यात उतरतांना दिसत आहे. आम्ही ‘बॉईज लॉकर्स रुम’ यावर एक on line सत्र घेतलं त्यात सर्वांची यावर सहमती झाली की, कुठल्याच व्यक्तीबद्दल तिच्या किंवा त्याच्या अपरोक्ष त्यांच्या ‘संमती’ शिवाय बोलल जाऊ नये. मग ते बोलण लैंगिकते बद्दल असो की इतर कुठल्याही विषयाबद्दल !
‘संमती’ शिवाय केलेलं कुठलही कृत्य हे ‘बलात्कार’च आहे. संमतीचा अर्थ कळला की व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या अधिकाराचा आदर करायला शिकतो आणि हि ‘संमती’ घेण्याची सवय घरीदारी ती व्यक्ती अमलात आणायला शिकते. त्यासाठी लहानपणापासून प्रत्येक व्यक्तीला ‘संमती’ हि संकल्पना अनुभवायला येणे गरजेचे आहे. घरातले सगळे निर्णय एकच कोणीतरी ‘प्रमुख’ पदावरची व्यक्ती घेतांना लहान मुल बघतात. ज्याच्याकडे नावाची,नात्याची, पैश्याची, शारीरिक ताकदीची, पदाची सत्ता आहे त्यानेच सर्व निर्णय घ्यायचे असतात, असंच ते शिकतात.आपण घरातल्या निर्णायात लहान मुलांना सहभागी करुन घेतले, त्यांच्या पातळीवर जाऊन त्यांना विषय समजावला किंवा घाईत निर्णय घ्यावा लागला असेल तर त्या निर्णयाची माहिती दिली तर मुलही ‘संमती’ची गरज, महत्व आणि त्याची प्रक्रिया शिकतील.
कुठल्या वयात मुलांना लैंगिकता शिक्षण द्याव हा कायमच वादाचा आणि काहीही निर्णय न निघता नुसत्या चर्चा करायचा विषय झाला आहे. माझ्या सारखे जे जे कोणी लैंगिकता या विषयावर काम करतात त्यांच्या मते कुठल्याही वयात हा विषय शिकवता येऊ शकतो. लैंगिकता शिक्षणात आपण स्वतःची लैंगिकता कशी समजावून घ्यावी, स्वतःच्या शरीरात होणारे बदल कसे समजावून घ्यावेत यावर चर्चा होते आणि ऐकणारी व्यक्ती स्वतःच्या भावनांबरोबरच दुसऱ्याच्या भावनांना किंमत देण्याची शक्यता वाढते. आम्ही ‘संगिनी’च्या वतीने शाळेतील सातवी ते दहावीच्या विध्यार्थ्यांना विशेषतः मुलग्यांना ‘मासिक पाळी’ ह्या विषयावर गप्पा मारतो. जेव्हा ह्या विषयावर सेशन घेणारी व्यक्ती मोकळेपणाने बोलते, तेव्हा मुलही मोकळेपणाने प्रश्न विचारतात. त्यांच्या मनातील चढ उत्तर, हालचाली आपल्याशी शेअर करतात. लहानपणी अनेकांना असे मोकळे वातावरण किंवा हि विषयाची सहजता अनुभवयाला मिळत नाही अशा युवाना त्यांच्या वयात, लग्न ठरताना किंवा लग्न झाल्यानंतर पालक होवू पाहणाऱ्या अशा कुठल्याही वयात हा विषय शिकवता येऊ शकतो किंवा त्यावर मोकळेपणाने चर्चा होवू शकते. अगदी आजी-आजोबाना हि हा विषय समजावून सांगायला हवा म्हणजे ते त्यांच्या नातवंडाना ‘तिथे हात लावू नका, ते घाण असतं, अव्वा, शेम शेम’ असं काही बोलणार नाहीत.

लैंगिकते विषयी उत्सुकता असल्यामुळे घाबरत घाबरत भावना व्यक्त करणारे आणि आपल्या पदाचा/पैशाचा/ सत्तेचा/ ताकदीचा गैरफायदा घेत दुसऱ्या व्यक्तीवर जोर जबरदस्ती करुन स्वतःची इच्छा पूर्ण करणारे असे दोन प्रकारचे लोक सापडतात. पहिल्या प्रकारच्या व्यक्तींना समजावून घेऊन वेळीच माहितीची मदत मिळाली, समुपदेशन मिळाले तर त्यांच्या वागण्यात बदल होतो. दुसऱ्या प्रकारातले लोक हे बरोबर अडचणीत असलेल्या लोकांनाच त्रास देतात. कुठल्याही प्रकारचा लैंगिक छळ करणे, त्रास देणे हि मानसिकता आहे. दुसऱ्या प्रकारातले लोक जेव्हा उपायांवर बोलतात तेव्हा मुलींनी अमुक कपडे घालू नये, तमूक वेळी बाहेर फिरू नये असे मुलींना किंवा महिलांनाच बंदिस्त करणारे उपाय सुचवतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ज्यांना ज्यांना लहानपणीच मोकळे वातावरण मिळाले आहे , जेव्हा गरज होती तेव्हा सर्व विषयांवर गप्पा मारायची संधी मिळाली आहे, योग्य पुस्तकं वाचायला मिळाली आहेत किंवा योग्य विचारांची, लिंग समानता मानणारी विचारधारा मिळाली आहे ती मुलंमुली म्हणतात की, नॉनव्हेज जोक्स शेअर करणे हे देखील चूक आहे.
‘बॉईज लॉकर रूम ’ फक्त दिल्लीत आहे असे समजण्याचे काही कारण नाही, कदाचित ते आपल्या घरात असू शकेल. दिल्लीतले लक्षात आले, आपल्या घरातले लक्षात आले नाही एवढाच काय तो फरक. पण म्हणून दचकून जायचे काही कारण नाही. ज्यांच्या ज्यांच्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी किंवा आयुष्यात कधीही ‘लैंगिकता ‘ याविषयावर बोलण्याची संधी येईल त्यांनी ती घेतली पाहिजे, त्यावर मोकळेपणाने बोलले पाहिजे . आपल्याला स्वतःला बोलता येत नसेल तर योग्य व्यक्तीची , योग्य माहितीच्या साधनांची मदत घेतली पाहिजे. रस्ता थोडा लांबचा आहे. पण त्यावरचा प्रवास तुम्ही आनंदाने करणार की वैतागून करणार यावर तुमच्या समाजात ‘बॉईज लॉकर्स रुम’ निर्माण होणार की नाही हे ठरेल.