एकोणीसशे नव्वद-एक्याण्णव सालची गोष्ट असावी. आमचे गर्भलिंगपरीक्षाविरोधी आंदोलन जोरात सुरू होते. महाराष्ट्रातल्या आंदोलनापासून प्रेरणा घेऊन गुजरात, गोवा व अन्य काही राज्यातही आंदोलने सुरू झाली होती. द. भारतात तेव्हा गर्भलिंगपरीक्षा व स्त्रीभ्रूणहत्या ह्या ‘रोगाची’ लागण झाली नव्हती; पण त्यांतील काही जागरूक समूहांना हा प्रश्न समजून घेणे आवश्यक वाटत होते. ह्याच संदर्भात मला म्हैसूर विद्यापीठाचे बोलावणे आले. त्यांच्या समाजशास्त्र विभागाने राज्यातील प्राध्यापकांसाठी उजळणी वर्ग (रेफ्रेशर कोर्स) आयोजला होता, ज्याचा विषय होता – ‘समकालीन सामाजिक समस्या’. मी ह्या वर्गात येऊन प्राध्यापकांसमोर गर्भलिंगपरीक्षा व त्यातून उद्भवू शकणारे लोकसंख्या असमतोलाचे संकट ह्यावर विस्ताराने मांडणी करावी असा आयोजकांचा आग्रह होता. त्यासोबत तुम्ही आणखी एक दिवस राहा आणि तुम्हाला आवडेल त्या विषयावर बोला, असेही त्यांनी सुचविले. मी निवडलेला विषय पाहून त्यांना काहीसे आश्चर्य वाटले; पण त्याला त्यांची हरकत दिसली नाही. पण माझी मांडणी झाल्यावर त्यावर बरीच कडाक्याची चर्चा झाली. माझा विषय होता - “मी स्वतःला स्त्रीवादी का म्हणवून घेतो?’
हा विषय व त्यावर झालेला वाद ह्याला एक विशिष्ट पार्श्वभूमी होती. ‘मानुषी’च्या संपादक व त्यावेळेच्या स्त्रीचळवळीतील एक महत्वाचे नाव असणाऱ्या मधु किश्वर ह्यांनी नुकताच ‘मानुषी’ मध्ये एक लेख लिहिला होतं, ज्याचे शीर्षक होते – “मी स्त्रीवादी का नाही?’ (Why I am not a feminist?’) त्या लेखाने सर्वत्र, विशेषतः स्त्रीवादी चळवळ व स्त्री अभ्यासगट ह्यांच्यात एकच खळबळ उडाली होती. स्त्रीमुक्तीचळवळीचा पहिला भर ओसरून दबलेले प्रश्न बाहेर येण्यास तेव्हा सुरुवात झाली होती. कदाचित, किश्वरांच्या लेखाच्या निमित्ताने ही खदखद पहिल्यांदाच बाहेर पडत होती. ह्या लेखात त्यांनी अशी भूमिका घेतली होती की स्त्रीवादी किंवा स्त्रीमुक्तिवादी म्हटल्याने माझ्या भूमिकेचा संकोच झाल्यासारखे मला वाटते; त्या ऐवजी मला स्वतःला केवळ मानवतावादी ( Humanist) म्हणवून घेणे अधिक आवडेल. खरे तर एखाद्या चळवळीत सक्रीय असणाऱ्या, किंवा तिचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला आपण तिचा भाग आहे हे सांगण्यास संकोच व्हावा ही बाब विचार करण्यासारखी आहे. हे कोणत्याही चळवळीत घडू शकते. त्यामागे चळवळीविषयी झालेला भ्रमनिरास असू शकतो, अधिक व्यापक किंवा वेगळी भूमिका घेण्याची प्रामाणिक गरज असू शकते किंवा सरळसरळ वैयक्तिक हिशेब असू शकतात. मला तेव्हा (आणि आताही) किश्वरांच्या ह्या भूमिकेकडे पूर्वग्रहरहित दृष्टीने पाहावे असेच वाटत होते. तसे झाले असते तर कदाचित चळवळीच्या त्या टप्प्यावर आवश्यक असे आत्मचिंतन त्यातून शक्य झाले असते. अर्थात माझा विषय वेगळाच होता. मला असे सांगायचे होते की किश्वरांची भूमिका काहीही असो, मला स्वतःला स्त्रीवादी चळवळीची नितांत गरज भासते आहे. मला तिचा एक भाग बनावेसे वाटते आहे. त्यासाठी सर्व काही प्रयत्न मी करतो आहे. चळवळीमागील विचार समजून घेऊन ते आत्मसात करण्याचा, त्यानुसार माझ्यात बदल घडवून आणण्याचा मी प्रयत्न करतोय. अनेक कृती कार्यक्रमात, उदा. मोर्च्यांमध्ये सहभाग, स्त्री व आरोग्यसंबंधित मुद्द्यांवर (उदा. गर्भलिंगपरीक्षा, स्त्री गर्भनिरोधके) अभ्यास, लिखाण व प्रचारप्रसार करून - मी आपले योगदान देत आहे. कारण मी ह्या प्रश्नाला आपला प्रश्न मानतो. माझा स्त्री पुरुष समतेवर मूल्य म्हणून विश्वास आहे. पुरुषसत्तेने अनेक शतके स्त्रियांचे शोषण करून त्यांच्यावर अत्याचार केले आहेत व आजही ते घडते आहे, ह्याची मला लाज वाटते. पुरुषसत्तेचे फायदे मला व्यक्तिगत आयुष्यात फायदे मिळत आले आहेत, ह्याची मला जाणीव आहे. ते घेऊ नयेत असा माझा प्रयत्न आहे. परंतु, पुरुष असल्यामुळे मी मूलतः शोषक प्रवृत्तीचा आहे, हे मला मान्य नाही. मी स्त्रीवाद मानतो, ह्याचा एक अर्थ समाजात ह्यापुढे होणारे बदल स्त्रियांच्या बाजूने, त्यांच्या पुढाकाराने व प्रेरणेने होतील हे मला मान्य आहे. म्हणजे ही चळवळ प्रामुख्याने स्त्रियांची आहे व ह्यात प्रेरणा व नेतृत्व त्यांचेच राहणार आहे, ह्यात मला हरकत घेण्यासारखे काही वाटत नाही. अधिक चांगला माणूस बनण्यासाठी मला तुमच्यासोबत राहायचे आहे, माझ्यासारखे विचार असणारे आणखी काही पुरुष आहेत. त्यांची संख्या आज कमी आहे, पण ती वाढावी, अधिक पुरुषांनी ह्या समतेच्या लढ्यात सामील व्हावे असे मला वाटते. मी स्वतःला स्त्रीमुक्तिवादी म्हणवून घेऊ इच्छितो, कारण ह्या संकल्पनेचा आशय मला मान्य आहे. तुम्हाला ह्याबद्दल काय वाटते? एक पुरुष स्त्रीमुक्तिविचाराचा पुरस्कर्ता किंवा समर्थक असू शकतो असे तुम्हाला वाटते का?
ह्या प्रश्नावर अजूनही परस्परविरोधी मतांचा इतका गलबला आहे की तेव्हा माझ्या भूमिकेवर गदारोळ उठला असणे स्वाभाविकच म्हणायला हवे. खरे तर ज्या मर्यादित समूहापुढे मी हे मांडले त्यातील बऱ्याच प्राध्यापकांना माझे मत पटलेदेखील. परंतु, नंतर वेळोवेळी चर्चेतून मी जेव्हा मी ही भूमिका माझ्या स्त्रीमुक्तिवादी मैत्रिणींपुढे मांडली, तेव्हा त्यावर हा गदारोळ उठला.

त्यांचे मुद्दे खालील प्रकारचे होते:
१. स्त्रीवाद किंवा स्त्रीमुक्ती ही संकल्पना स्त्री म्हणून घेतलेल्या अनुभवांशी निगडीत आहे. तू स्त्री म्हणून जगला नाहीस. अनुभूती आणि सहानुभूती ह्यात अंतर आहे.
२. आतापर्यंतचा इतिहास पुरुषांनी स्त्रियांच्या केलेल्या शोषणाचा व फसवणुकीचा आहे. आम्ही तुझ्यावर का म्हणून विश्वास ठेवावा? आता कुठे आमच्या स्वतंत्र चळवळीची सूत्रे आमच्या हातात आली आहेत. तू जे म्हणत आहेस तो आमचे नेतृत्व हिरावून घेऊन आमची चळवळ पुरुषी दावणीला बांधण्याचा पुरुषी कावा कशावरून नाही?
३. आपण संवेदनशील पुरुष आहोत असे दाखवून स्त्रियांमध्ये सहानुभूती मिळविणे व समाजात प्रतिष्ठा मिळविणे ह्यासाठी केलेला हा प्रयत्न कशावरून नाही?
४. तू चळवळीचा समर्थक किंवा सह्प्रवासी राहू शकतो, पण तिचा भाग बनून राहू शकत नाही, नेता म्हणून तर नाहीच नाही.
मला नेता व्हायचेच नव्हते. ही चळवळ केवळ स्त्रियांचीच असावी की स्त्रीपुरुष समता मानणाऱ्या सर्वाना त्यात स्थान असेल, हा माझा प्रश्न होता. कदाचित तो मी तेव्हा फारशा स्पष्टपणे विचारू शकलो नसेन. स्त्रीमुक्ती चळवळीतील बहुसंख्य स्त्रियांना त्यापूर्वी आपापल्या संघटना, पक्ष, युनियन ह्यांमध्ये पुरुषी वर्चस्ववादाचा वाईट अनुभव आला असल्यामुळे त्यांना पुरुषांविषयी वाटणारा संशयदेखील अस्थानी नव्हता. पण माझा प्रश्न त्याहून अधिक वेगळा - चळवळीच्या दिशेबद्दलचा होता. तेव्हा स्त्रीचळवळ भरात आहे असेच साऱ्यांना वाटत असल्यामुळे आपल्या गृहितकांचा पुनर्विचार करण्याचा प्रश्न तेव्हा कोणाच्या डोक्यात नव्हता, हेही आता मला समजू शकते. फक्त आपण सोबत येण्याची इच्छा दाखवली असताना आपल्याला ‘मेरे अंगने मे तुम्हारा क्या काम है?’ असे सांगून झिडकारले जावे, ह्याची बोच मला तेव्हा जाणवली, हे मात्र निश्चित.
‘पुरुष’ समजून घेताना
आपल्याला हवे ते काम करायला दुसरे माध्यम किंवा मंच शोधला पाहिजे असे मला वाटायला लागणे आणि मेन अगेन्स्ट व्हायलन्स अँड अॅब्युज (मावा) ह्या संघटनेशी माझा संबंध येणे ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडल्या. त्यानंतर माझा ‘मावा’शी असणारा संबंध पुढे २०-२२ वर्षे टिकला. मावाचे सुरुवातीचे काम हे प्रायश्चित्ताच्या भूमिकेतून केलेले होते. दीप्ती खन्ना नावाच्या तरुणीवर अॅसिडहल्ला झाला तेव्हा तिच्या व तिच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे, पैसे जमविणे इ. कामे आम्ही केली. तेव्हा आम्हाला आमच्या कामातला पहिला धडा मिळाला. आमच्या कामाची बातमी वाचून एका तुरुंगातील काही कैद्यांनी दिप्तीसाठी आर्थिक मदत पाठवली. ‘आम्ही सर्व गुन्हेगार आहोत, आपल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत आहोत. पण ह्या मुलीवर अॅसिड फेकणे हे माणुसकीच्या विरोधातले घृणास्पद कृत्य आहे. हल्ला झाल्यावरही हिम्मतीने उभ्या राहणाऱ्या ह्या मुलीच्या पाठीशी आम्ही आहोत, म्हणून आम्ही जेलमध्ये आमच्या श्रमातून केलेल्या कमाईतला काही भाग तिच्या शस्त्रक्रियेला मदत म्हणून पाठवीत आहोत, त्याचा स्वीकार करावा.’- असे पत्रही त्यांनी पाठवले होते. स्त्रियांवर पुरुषांनी केलेल्या अत्याचाराची अनेक पुरुषांना लाज वाटते, अगदी अपराधी गणल्या जाणारे पुरुषही अशा वेळी एक भूमिका घेऊन तो स्त्रियांच्या पाठीशी उभे राहण्यास तयार असतात, हा तो धडा. नंतरच्या अनुभवांनी आमचा हा धडा पक्का केला. स्त्रियांवर होणाऱ्या हिंसेला पुरुष जबाबदार आहेत, हे खरे असले तरी ‘पुरुष’ ही समस्या नव्हे, ‘पुरुषसत्ता’ ही समस्या आहे. पुरुष हे समस्येचा भाग असतील, तर ते उत्तराचाही भाग असू शकतात - हा आमच्या कामातून मिळालेला पुढचा धडा.
पुरुष असण्याच्या समस्या
कामाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही अनेक पुरुषांशी संवाद साधला. त्यात झोपडपट्टीत राहणारी किशोरवयीन मुलगे होते, महानगरे, शहरे व ग्रामीण भाग ह्यात शिकणारे कॉलेज विद्यार्थी होते, तसेच लग्न झालेले, मध्यमवयीन पुरुषही होते. त्यांच्याशी बोलताना एक वेगळेच जग आमच्यापुढे उलगडू लागले. आतापर्यंत आम्हाला जो पुरुष माहित होता, तो आक्रमक, गर्विष्ठ, स्त्रियांवर व इतर पुरुषांवर अधिकार गाजविण्यात आंनंद मानणारा, हिंसक असा होता. अनेक पुरुष तसे नाहीत हे जाणवत होते. पण पुरुषत्वाची वेगवेगळी प्रारूपे, ती कशी बनतात इ. संकल्पना अद्याप आमच्या जाणीवेच्या कक्षेबाहेर होत्या. एकदा आम्ही ‘लग्नाळू’ पुरुषांचे एक दिवसाचे शिबीर घेण्याचे ठरविले. वृत्तपत्रात निवेदन दिले – ‘तुम्ही करियरच्या तयारी साठी आयुष्यातील कितीतरी वर्षे मोजता. शाळा, कॉलेज, क्लासेस, पदव्या, प्रशिक्षणे ह्यासाठी मेहनत घेता. पण आयुष्यातील तितकीच महत्वाची गोष्ट- लग्न व संसार, नातेसंबंध – याबद्दल तुम्ही काही विचार करता का? निदान एक रविवारचा दिवस त्यासाठी द्या आणि त्याविषयीचे प्रशिक्षण घ्या.’ इंदुताई खानोलकरांची संस्था ह्या आयोजनात आमच्या सोबत होती. त्या कार्यशाळेत सहभागी झालेले पुरुष किती बदलले हे आम्हाला माहित नाही. आम्ही मात्र खूप बदललो. पुरुषाचे एक वेगळेच रूप आमच्यासमोर त्या निमित्ताने आले. ह्या कार्यशाळेत आलेले बहुतेक तरुण हे मध्यमवर्ग किंवा निम्न मध्यमवर्गातील होते. मुंबईत जन्मले-वाढले होते. जगण्याच्या प्रश्नांनी पार गांजून गेले होते. लहानपणापासून त्यांना ‘जबाबदारी घे’ हेच सांगण्यात आले होते. पैसा, करियर, मालकीची टीचभर जागा घेण्यासाठी मरमर करणे, कर्जाचे हप्ते फेडणे हेच त्यांचे आयुष्य होते. जागतिकीकरणानंतर आलेल्या असुरक्षिततेने ते ग्रासले होते. पुढच्या आयुष्यात त्यांना कसलीच शाश्वती नव्हती. कोणताही छंद जोपासायला त्यांना सवड मिळाली नव्हती. स्वतःच्या भावना व्यक्त करणे, त्यांचे नियोजन, व्यवस्थापन करणे त्यांना जमत नव्हते. लग्न ह्या गोष्टीबद्दल त्यांच्या मनात रोमँटिसिझम शिल्लक नव्हता; होती ती प्रचंड धास्ती. आयुष्यात फारशा मैत्रिणी नसणारी ही मुले. त्यांना शरीरसंबंधांबद्दल, बायकोशी नाते नीट जुळेल की नाही ह्याबद्दल, आई व बायको ह्यांच्यात संतुलन राखता येईल की नाही ह्याबद्दल प्रचंड performance anxiety होती. त्यातल्या अनेकांना आईवडिलांपासून वेगळे होऊन संसार थाटणे अशक्यप्राय वाटत होते. मोकळ्या वातावरणात वाढलेल्या मुलींबद्दल त्यांना भीती वाटत होती. आपल्या आईसारखी बायको त्यांना हवी होती व ह्या काळात तशी बायको मिळणार नाही हे त्यांना माहित होते. आधुनिक काळातील मुलीशी कसे नाते जुळवायचे हे त्यांना कळत नव्हते. पण तिच्या आकांक्षांना आपण पुरे पडू शकणार नाही ह्याची धास्ती मात्र होती. ह्या कार्यशाळेमुळे आम्हाला पुरुषसत्ता आपल्या साच्यात बसवून पुरुषांचेही विद्रुपीकरण कसे करते, ह्याचे भान येण्यास सुरुवात झाली.
ह्यापुढील प्रवास माझा एकट्याचा नव्हता. सम्यक, नारी समता मंच, मासूम, पुरुष उवाच, हॅलो मेडिकल फौंडेशन अशा कितीतरी संस्थांनी महाराष्ट्रात पुरुषांसोबत काम करायला सुरुवात केली होती. नंतरच्या काळात हिमाचल प्रदेशातील सूत्र, बडोद्यातील सहज, दिल्ली व उत्तर प्रदेशातील सेंटर फोर हेल्थ अँड सोशल जस्टीस अशा कितीतरी संघटनांनी विविध भौगोलिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीवर पुरुषत्वाचा अभ्यास केला. पुरुषी मानसिकता समजून घेण्याचे व ते बदलण्याचे काम केलं. इतर देशात सक्रीय असणाऱ्या व्हाईट रिबन मुव्हमेंट , मेन अगेन्स्ट सेक्सिझम अशा संस्था-संघटनांच्या कामाशी, मेन एंगेज सारख्या नेटवर्कशी संबंध आला. रीवीन कॉनेल, मायकेल फ्लड, बॉब पीज ह्यांसारख्या विचारकांना समजून घेता आले. ह्या पुढच्या टप्प्याच्या प्रवासात आम्हाला विविध सामाजिक समूहातील पुरुषत्वाच्या जडणघडणीतील साम्यस्थळे, वैविध्य तसेच वैशिष्ट्येही ध्यानात येऊ लागली.
आमच्या स्वतःच्या अनुभव, काम व निरीक्षण ह्यांतून आम्हाला समजले की -‘पुरुष’ म्हणून घडण होण्याच्या प्रक्रियेची सुरुवात अगदी बालपणीच होते. आपल्यावर प्रभाव टाकणारा सारा भवताल एकीकडे लिंगभाव मनात रुजवून स्त्री व पुरुष म्हणजे काय ह्याच्या चुकीच्या कल्पना आपल्या मनात रुजवीत असतो. त्याचबरोबर पुरुषत्वाची वेगवेगळी प्रारूपे आपल्यासमोर सादर करून त्यातील जास्तीत जास्त macho मॉडेल आपण स्वीकारावे ह्यासाठी प्रयत्न करीत असतो. ही प्रक्रिया तीव्र होण्याचा काल म्हणजे किशोरवय.

जेव्हा एखादी मुलगी वयात येते, तेव्हा भारतीय समाजात मुली वयात आल्यावर एकंदरीत बंधने लादली जातात, मासिक पाळीच्या काळात तिला अपवित्र मानले जाते, हे खरे असले तरी ऋतुप्राप्तीच्या निमित्ताने तिचा इतर स्त्रियांशी एक बरा-वाईट संवाद सुरू होतो. ह्याउलट पुरुषांच्या बाबतीत वयात येणे ही स्पष्ट घटना नसते. त्याविषयी कोणाशीही बोलणे शक्य नसते. आपल्या मुलग्याशी ह्या विषयावर संवाद करणारा भारतीय बाप हा तर अगदी अपवादच म्हणायला हवा. मागच्या पिढीत कदाचित मुलाहून मोठा एखादा काका किंवा चुलतभाऊ वगैरे त्याच्याशी थोडेफार बोलत असतील. पण विभक्त कुटुंबात ती शक्यता उरली नाही. मग उरतात फक्त आपल्याइतकेच अज्ञानी आणि गोंधळलेले समवयस्क. पूर्वी पिवळी पुस्तके, मासिके हे अशा ज्ञानाचे भांडार मानले जायचे. आता त्याच्या जागी हातातील मोबाईलवर सहजप्राप्त पॉर्नक्लिप्स आल्या आहेत. ह्या साऱ्यातून उलट भ्रम निर्माण होतात व ते आयुष्यभर डोक्यात ठाण मांडून बसतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्त्री-पुरुष नात्यातील सारे सौंदर्य, सारी तरलता ह्यांपासून वंचित होऊन उरते फक्त शरीरभान. नेमक्या ह्याच काळात आई त्यांना दूर लोटत असते. ‘तू आता मोठा झालास, सारखे आई आई काय लावलेस? जा, बाहेर मित्रांसोबत खेळ’ असे उद्गार आपल्याला अनेक घरी ऐकायला मिळतात. स्त्रीशी हरवलेले हे नाते नंतरच्या आयुष्यात नव्याने जोडणे हे भारतीय पुरुषाला कठीण जाते.
लहानपणापासून ज्या साच्यात त्याला अडकविले जाते त्यात performance वर खूप भर दिला असतो. यश, कर्तबगारी, पैसा, प्रतिष्ठा, स्पर्धा ह्या बाबी महत्वाच्या ठरतात, बाकी सर्व दुय्यम. रिझल्ट मुख्य, साधने दुय्यम. पोहोचणे महत्वाचे, वाटचालीचा आनंद बेपत्ता. त्याच्या माथ्यावर समाजव्यवस्था पुरुषत्वाचा मुकुट चढविते, वरून तो त्याला किती खुलून दिसतो हेही हजार पद्धतीने सांगते. तो मुकुट काटेरी आहे, त्यामुळे तो रक्तबंबाळ होतो आहे, ह्याचा त्याला विसर पडावा ह्यासाठी ही सारी रचना काम करीत असते. पुरुषसत्तेच्या व्यूहात यशस्वी ठरण्यासाठी त्याला मोठी किंमत चुकवावी लागते. आयुष्यभर त्याला आपल्या भावनांचे प्रकटीकरण, व्यवस्थापन करता येत नाही. त्याचा भावनांक अतिशय कमीच राहतो. स्त्रीला बिछान्यात नेणे आणि तिच्या अंगावर हात उचलणे ह्यांच्या अधल्यामधल्या अगणित जागा माहीत नसतात. स्पर्धा, अधिकार, सत्ता ह्यांच्या मोहात अडकल्यामुळे सामिलकी, सामुहिकता, प्रेम, जपणूक ह्यांचे मोल त्यांना समजत नाही.
बाहेरील जगात यशस्वी, आक्रमक म्हणून गणला जाणारा पुरुष आतून खूप पोकळ असतो. तो पराभवाला, ‘नाक कापले जाण्याला’, ‘नालायक ठरण्याला’ घाबरतो. आपल्या वेदना, पराभव, शल्य इतरांसमोर उघडे करणे त्याला शक्य होत नाही. रडणे हे बायकीपणाचे लक्षण आहे असे त्याच्यावर बिंबविले गेल्यामुळे त्याच्या भावनांचा निचरा होत नाही. मग व्यसने, हार्ट अॅटॅक, आत्महत्या हेच त्याच्यासाठी पर्याय ठरतात. एकूण पुरुष म्हणून कसे जगावे ह्याचे समाजाचे ठोकताळे, त्यातूनच बनलेली स्व-प्रतिमा व प्रत्यक्ष जगतानाचे अनुभव ह्यामुळे बहुसंख्य पुरुषांची आयुष्यात कोंडी होते. त्याची परिणती हिंसाचारात होत असेल तर त्यात नवल वाटायला नको.
हे सारे खरे असले तरी मर्दानगीचे जुने साचे मोडकळीत काढून नवे पुरुषभान जागविणे ही गोष्ट अशक्य नाही, उलट अतिशय आनंदप्रद आहे, हा अनुभव पुरुषांना आला की मग तेही मर्दानगीचा काटेरी मुकुट काढून मोकळे होतात. स्त्रिया, अन्य पुरुष,

लहान मुले ह्यांच्याशी अधिक सहृदयतेने वागतात. स्त्रियांना मुक्त अवकाश मिळाल्याने त्यांना असुरक्षित वाटत नाही. थोडक्यात म्हणजे निरामय सहजीवनाचा अनुभव घेण्यास ते उत्सुक बनतात हा धडाही पुरुषांसोबत काम करताना आम्हाला मिळाला. आतापर्यंतच्या नरभान ते पुरुषभान ते मानुषभान ह्या माझ्या वाटचालीतील ही काही निरीक्षणे व निष्कर्ष!
जागतिकीकरणाची गती आता अतिशय तीव्र झाली आहे. जुन्या चौकटी कोसळत आहेत. नव्या वैचारिक आधारांची रचना करताना चळवळी ठेचकाळत आहेत. मुख्य म्हणजे अनेकविध कारणांनी निर्माण झालेल्या वैचारिक पोकळीत धर्मांध, फॅसिस्ट शक्ती शिरजोर झाल्या आहेत व पुरोगामी प्रवाह बचावात्मक पवित्र्यात आहे. ह्या संदर्भबिंदूवर मला पुन्हा एकदा भगिनीभावाच्या धाग्याने साऱ्या स्त्रीजातीच्या दुःखाशी स्वतःला जोडून घेण्याची क्षमता असणाऱ्या व तसे स्वप्न पाहणाऱ्या स्त्रीचळवळीशी नव्याने जोडून घ्यावेसे वाटते. स्त्रिया व पुरुष दोघांना पितृसत्ता वेगळी वागणूक देते, पण दोघांचेही माणूसपण नाकारते, हे भान आता मला आले आहे. त्यामुळे पुरुष म्हणून माझा मुक्तीचा अनुभव व मार्ग कोणत्याही स्त्रीच्या अनुभव व मार्गापेक्षा वेगळा असेल, हे मला समजले आहे. त्यामुळे मी आता स्वतःला स्त्रीवादी म्हणवून घेण्यासाठी आग्रही नाही. मानवमुक्तीच्या ह्या प्रवाहाला ‘मानुषवाद’ म्हणायचे की अनामिक राहू द्यायचे हा विचारही आपण नंतर करू. आज महत्व आहे ते चालत राहण्याला, योग्य दिशेने, परस्परांच्या सोबतीने चालत राहण्याला. ते सध्या पुरे आहे!

रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ