एक स्त्रीवादी व्यक्ती म्हणून मुलांचं संगोपन करणं जास्त कठीण असतं का? की स्त्रीवादी व्यक्तीला पालकत्व निभावणं सोपं जातं?
एक स्त्रीवादी व्यक्ती म्हणून वावरतांना समाजात वेगवेगळ्या प्रतिक्रियांना तोंड द्यायची सवय एव्हाना झाली आहे. पण साधारणपणे पस्तीस वर्षांपूर्वी आम्हाला मूल झालं, त्यावेळी आम्ही मोठ्या एकत्र कुटुंबात होतो. माझ्या सासरची मंडळी जिथे अजून एस.टी. जात नाही अशा छोट्या खेड्यातून आलेली, पारंपरिक विचारांची होती. आमच्या खेडेगावात त्याकाळी आम्ही एकमेकांना एकेरी हाक मारणं, बरोबरीने चालणं या गोष्टींवरही टीका होत असे. माझा नवरा आणि मी एकाच विचारांचे असलो तरी दोघंही जवळपास दिवसाचे बारा ते चौदा तास कामानिमित्त घराबाहेर असायचो. दोन्ही मुलं माझे दीर, पुतण्या आणि सासू यांच्यासोबत असत. त्यामुळे नकळत मुलगा मुलगी यांच्यासंबंधातील पारंपरिक दृष्टिकोणाच्या वातावरणात ती दोघंही काही काळ का होईना वाढली, हे खरं!
पुढे हळूहळू माझ्या सासूची मतं काही प्रमाणात बदलत गेली तरी त्या काळात एकाएकी ती बदलणं शक्य नव्हतं. दीर आणि पुतणेही त्यांच्या देखरेखीखाली वाढल्याने आणि तोपर्यंत त्यांची मतं, दृष्टिकोण हे घट्ट झाल्याने त्यांनाही बदलणं शक्य नव्हतं. घरी असतांना काही वादाचे प्रसंग त्यामुळे उद्भवलेच तर आम्ही दोघंही ठामपणे आमची मतं मांडत राहिलो. माझा नवरा त्याकाळी आमच्यावरच्या आर्थिक जबाबदाऱ्यांमुळे एक पूर्ण वेळ आणि दोन अंशकालिक नोकऱ्या करीत असल्याने सकाळी लवकर घर सोडून रात्री उशिरा घरी परतत असे. त्यामुळे सकाळी चार वाजल्यापासून रात्री बारापर्यंत बरीच कामं मला नोकरी सांभाळून उरकावी लागत. पण तो घरात असेल तेव्हा मुलांना आंघोळ घालणं, त्यांची तयारी करणं, घराची स्वच्छता राखणं, स्वयंपाक करणं हे सर्व करीत असे. त्याने असं करण्याला सासूबाईंचा विरोध असला तरी तो ठाम असल्याने त्यांना काही बोलता येत नसे. घरात फार नाही तरी बाहेर काही वेळा फार वाईट अनुभव आले. मुलांच्या नावनोंदणीच्या वेळी जात, धर्मापुढे काहीच न लिहिल्यामुळे जरा तिरस्काराने आमच्याकडे पाहिलं गेलं तर मराठी माध्यमात त्यांना शिक्षण देण्याच्या निर्णयाचीही हेटाळणी झाली. मुलांच्या परीक्षांच्या वेळी बँकेतल्या कामामुळे फक्त परीक्षेच्या वेळीच रजा घेता आली, तेव्हाही यांना मुलांच्या करियरपेक्षा स्वतःच्या करियरची अधिक काळजी अशी टीका केली गेली.
मुलगी पाच वर्षांची आणि मुलगा सात वर्षांचा असतांना सर्व दीर, पुतणे आपापल्या व्यवसायात स्थिर होऊन वेगळे झाले, सासूबाई आपल्या आईचा सांभाळ करण्यासाठी गावी गेल्या आणि आमचं चौघांचं कुटुंब स्वतंत्र झालं. बाबाला घरातली सगळी कामं माझ्या बरोबरीने करतांना पाहून मुलंही सगळी कामं आपली आहेत असं मानू लागली. आम्ही चौघं मिळून सगळी कामं करू लागलो. एकदा मी व्हर्टीगोने आजारी असतांना दहा वर्षांच्या क्षितिजने बाबा येईपर्यंत सकाळच्या जेवणासाठी फ्रीजमधलं वरण गरम करून ताजा भात केला, संध्याकाळी चहासोबत ओवीला टोस्ट करून दिले आणि बाबा घरी येईपर्यंत माझीही काळजी घेतली. मुलांना स्त्री मुक्ती संघटनेच्या पाळणाघरात ठेवल्याचेही काही फायदे झाले. मुलांचं नीट पोषण व्हावं या दृष्टीने तिथला आठवडाभराचा आहाराचा तक्ता केलेला असे. संध्याकाळी मुलांना पोटभर नाश्ता दिलेला असल्याने घरी आल्यावर ती भुकेजलेली नसत, त्यामुळे आम्हाला घरी आल्यावर थोडी उसंत मिळत असे. पाळणाघरात स्त्री मुक्ती संघटनेतर्फे मुलांसाठी जे मनोरंजनाचे कार्यक्रम आखले जात त्यामागेही स्त्रीवादी दृष्टिकोण असे, त्याचाही मुलांच्या मानसिक घडणीसाठी फायदा झाला हे कृतज्ञतेने नमूद करावंसं वाटतं.मुलं पौगंडावस्थेत असतांनाच मी स्त्री मुक्ती संघटना, मुंबई पोलीस दल आणि आयपीएच यांनी संयुक्त रित्या राबविलेल्या पौगंडावस्थेतील मुलांसाठीच्या ‘जिज्ञासा’ प्रकल्पाशी जोडली गेले. आम्ही आमच्या रहिवासी विभागानुसार अंधेरी ते बोरिवली पट्ट्यातील शाळांमधल्या आठवी ते दहावीच्या मुलांसाठी पौगंडावस्थेतील मानसिक समस्या, ताणतणावांचं नियोजन, लैंगिक शिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन, व्यसनमुक्ती अशा विषयांवर खेळांद्वारे किंवा मुलांना वेगवेगळ्या भूमिका देऊन मोकळ्या वातावरणात सत्र घेत असू. माझ्या मुलांच्या शाळेतही आम्ही ही सत्रं घेतली होती. तरीही मुलांच्या लैंगिक शिक्षणाच्या वेळी मात्र नवऱ्याने मुलाचं आणि मी मुलीचं अशा प्रकारे वाटणी केल्याचं आठवतं. खरं तर मी मुलाशी बोलायला हरकत नव्हती पण अवघड वाटलं हे खरंय! मुलांना लैंगिक शिक्षणावरची पुस्तकं सहज हाताशी लागतील अशा प्रकारे घरात ठेवलेली असत.
घरातल्या आर्थिक बाबींचं नियोजन, मुलांच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावरचे निर्णय हे सुरुवातीपासूनच मुलांसोबत मोकळ्या गप्पा, चर्चा, यांद्वारे त्यांची मतं विचारात घेऊन घेतले जात. त्यामुळे मुलं स्वतंत्र विचारांची झालीच, शिवाय आर्थिक बाबतीत स्वावलंबी होणं आवश्यक असल्याची जाणीवही त्यांना लवकर झाली. दोघांनीही आपापल्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घेतलं, त्या शिक्षणातून आपल्या पायावर उभं राहण्यासाठी कितपत मिळकत होईल याचा त्यांना अंदाज होता, त्याप्रमाणे आम्हाला फारसे पैसे मिळतील असं नाही, पण आमच्या गरजा फार नसल्याने आम्ही त्यात समाधानी असू हे त्यांनी आम्हाला सांगितलं. अर्थात त्यांच्या निर्णयाला पाठिंबा देतांना गरज पडल्यास आम्ही त्यांच्यासोबत असू हे आश्वासन आमच्याकडूनही त्यांना मिळालं.
आमच्या मुलीचं -ओवीचं काम वन्यजीवनाशी संबंधित असल्याने तिला भारतातल्या वेगवेगळ्या जंगलात जावं लागे. कधी कधी ती एकटीही असे. त्याविषयी एकदा माझा एक दाक्षिणात्य सहकारी मित्र विचारत होता, “ए शुभा, तू कैसा रे ओवी को जाने देती है अकेली जंगल में?” तेव्हा मी त्याला थोडं खरं आणि थोडं गंमतीने म्हटलं होतं, “अरे वह कराटे सीखी है ना, तो अपना बचाव करेगी खुदही.” तोही भोळेपणाने म्हणाला, “हाँ रे, मैं बी सीकायेगा मेरी बेटी को.” ओवी जरी कराटे आणि स्वसंरक्षणाचे उपाय शिकलेली असली तरी जेव्हा ती अशी एकटीदुकटी जंगलातच नव्हे तर बाहेरही अपरात्री फिरत असते तेव्हा आम्हा दोघांना काळजी वाटतेच. आपण जरी म्हणत असलो की स्त्रीला मोकळं फिरण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे तरी सभोवताली जे चाललंय त्यामुळे काळजी ही वाटतेच. (ओवी बरेच प्रसंग घडून गेल्यावर सांगते -जसं की एकदा कच्छच्या रणातल्या त्यांच्या फील्डस्टेशनवरच्या तिच्या खोलीतल्या बिछान्यावर नाग होता किंवा रणातून बाईक दामटतांना तिच्या बाजूने एक प्रकाशझोत फिरत होता(आजूबाजूला कुणीही नसतांना) किंवा एकदा जंगलात तरसांनी तिला घेरलं होतं वगैरे.) आता तर काही घडण्यासाठी निर्जन ठिकाणी जाण्याचीही गरज नाही, भर दिवसा वाहत्या रस्त्यावर काहीही घडू शकतं.
मुलांनी लग्न करायचं की नाही, मूल होऊ द्यायचं की नाही हा निर्णय आम्ही मुलांवर सोपवलेला आहे. पण आप्तनातलग, मित्रमैत्रिणी, परिचित त्याबाबत आम्हाला वेळेवारी सगळं झालं पाहिजे असं सांगू पहातात. एका जेष्ठ मित्रांनी तर आमच्या मुलाचा सगळा तपशील लिहून घेतल्यावर आम्ही त्यांना कारण विचारलं तेव्हा कळलं की ते त्याच्यासाठी स्थळ सुचविणार होते. अर्थात आम्ही त्यांना हे सांगून टाकलं की त्याचा निर्णय तो स्वतः घेईल. पण कधी कधी या बाबतीत लोकांशी वाद घालण्याची पाळी येते (हल्ली तर विशेषच, खासकरून सामाजिक माध्यमांवर). अर्थात आपण आपल्या परीने अशा सगळ्या मुद्द्यांवर व्यक्त होत राहायचं, थांबायचं नाही हा निर्णय आम्ही घेतलेला आहे.
आधीच्या पिढीची मानसिकता बदलता आली नाही किंबहुना बदलायला फार वेळ गेला असला तरी पुढच्या पिढीच्या बाबतीत ते शक्य होईलही. आजोबा स्वैंपाक आणि घरकाम करतो हे आमच्याकडे रहायला येणाऱ्या आमच्या एका दहा वर्षे वयाच्या नातवाने (भाचीच्या मुलाने) पाहिलं आणि त्याने स्वतः चपात्या करून पाहिल्या. त्याचा व्हिडियो अभिमानाने आजोबाला पाठवला तेव्हा वाटलं की होतोय हळूहळू का होईना थोडा बदल.

शुभांगी थोरात
mast
ReplyDeleteस्फटीक प्रांजळ...
ReplyDeleteसहज मनमोकळ .. ह्यातील प्रत्येक अनुभवाबद्दल तुम्हाला अधिक खोलवर जाऊन मांडता येईल. त्यातून इतरानाही शिकता येईल
ReplyDeleteछान विचार... बदल विचारपूर्वक झाला की तो मनापासून स्वीकारला जातो.
ReplyDelete