अळंबी वेचणाऱ्या वैज्ञानिक मातामही...
माझ्या छकुल्या, विज्ञान, म्हणजे काय ते माहीत आहे तुला...
सृष्टीचा आणि विश्वाच्या वर्तनाचा अभ्यास तो.
सगळं आधारित आहे निरीक्षणावर, प्रयोगावर आणि मोजमापांवर
आणि मग जे वास्तव समोर येतं ते स्पष्ट करण्यासाठी नियम बनवणे.
जुन्या काळापासून, असंच मानलं जातं, पुरुषांचे मेंदू असेच तयार झालेले असतात.
की ते मांसल लठ्ठ पशूंच्या मागे धावत जातात
अज्ञाताच्या मागे अडथळे पार करत जातात
आणि मग हरवले तरी घरी परतायचे रस्ते शोधतात
कधी एखादं सांबर वाहून आणतात सगळे मिळून,
सगळं आधारित आहे निरीक्षणावर, प्रयोगावर आणि मोजमापांवर
आणि मग जे वास्तव समोर येतं ते स्पष्ट करण्यासाठी नियम बनवणे.
जुन्या काळापासून, असंच मानलं जातं, पुरुषांचे मेंदू असेच तयार झालेले असतात.
की ते मांसल लठ्ठ पशूंच्या मागे धावत जातात
अज्ञाताच्या मागे अडथळे पार करत जातात
आणि मग हरवले तरी घरी परतायचे रस्ते शोधतात
कधी एखादं सांबर वाहून आणतात सगळे मिळून,
किंवा शिकार फसण्याचा दिवस लागला तर मग रित्या हातांनी.
आणि मग स्त्रिया, ज्यांना शिकारीमागे धावायला लागत नसे
त्यांचे मेंदू धुंडाळू लागत जमिनीवरच्या खाणाखुणा,
आणि मग नजरेने वाटा बांधत रहात...
काटेरी झुडुपाजवळ डावीकडे वळायचं, आणि खुरट्या झुडपांच्या मधून पुढे,
वाटेत त्या अर्धवट उन्मळलेल्या झाडाच्या ढोलीत वाकून पहा जरा,
कारण तिथं बरेचदा अळंबी असते.
गारगोट्या तासण्याचं कसब येण्यापूर्वी,
किंवा जनावर कापायची पाती कोरण्याआधीही
बाईमाणसांनी तयार केलेलं पहिलं साधन होतं-
बाळाला काखोटीला अडकवण्याची झोळी.
आमचे हात मोकळे रहावेत म्हणून
आणि फळं, अळंबी गोळा करण्यासाठीही सोयीचं म्हणून,
मुळं, खाण्याजोगी पानं, बिया आणि सरपटते प्राणीही.
मग आलं दगडी उखळमुसळ- कुटण्यासाठी, चेचण्यासाठी,
दळण्यासाठी नि तोडण्यासाठीही.
मग कधीकधी बापईमाणसं जनावरांच्या मागं जात असत
खोलदाट घनदाट जंगलांत आणि कधीच परतत नसत. काय करणार...
हे बघ, काही प्रकारची अळंबी जीव घेते आपला
तर काही खाताच जणू देव भेटतो
आणि काही आपली भूक भागवतात. पारखायचं.
कसलीशी अळंबी कच्ची खाल्ली तर ठारच होतो आपण,
कुठली एकदाच शिजवून खाल्ली तरीही मारते.
पण तीच झऱ्याच्या पाण्यात उकळून घेतली आणि पाणी फेकून दिलं,
पुन्हा उकळली आणि पाणी फेकून दिलं,
तर आपण खाऊ शकतो सुरक्षित. निरखायचं.
विज्ञान म्हणजे...
बाळाच्या जन्माचं निरीक्षण करा, पोटाचा घेर मोजा,
स्तनांचा आकार पहा
आणि मग अनुभवातून शोध लागेल, बाळांना सुरक्षितपणे जगात कसं आणायचं.
आणि मग अनुभवातून शोध लागेल, बाळांना सुरक्षितपणे जगात कसं आणायचं.
अळंबीच्या मागावरच्या साऱ्या कशा चालतात ते ही पहा
त्या चालताना जगाकडे लक्ष ठेवतात, कायकाय निरखून पाहातात.
काहीजण जिभल्या चाटून घेत मस्त राहतात
तर काही पोट आवळून धरत मरून जातात.
मग काही नियम ठरले आणि पुढे सुरू राहिले.
नियम आखायचे असतात विज्ञानात.
आपण बनवलेली हत्यारे आपलं जीवन घडवतात
आपले कपडे, आपलं अन्न, आपल्या घरच्या वाटा...
साऱ्या गोष्टींमध्ये आपलं निरीक्षणेच उपयोगी पडतात,
प्रयोगावरची, मोजमापांवरची, सत्यावरची निरीक्षणे.
विज्ञान म्हणजे लक्षात ठेव, अभ्यास आहे,
सृष्टीचा आणि विश्वाच्या वर्तनाचा,
निरीक्षण, प्रयोग आणि मोजमापांवर आधारलेला,
आणि त्यातून उलगडणाऱ्या वास्तवासंबंधीच्या नियमांच्या आखणीचा.
आपले वंशसातत्य असेच टिकून रहाते.
एका प्राचीन वैज्ञानिक मातेने
काढली चित्रे जनावरांची, गुहेच्या भिंतींवर,
तिला मुलांना दाखवायचं होतं, कशाची शिकार करणं सुरक्षित.
सगळी तगडी झाली होती अळंबी खाऊन, फळं खाऊन.
शिकारी धावत जातात जनावरांमागे.
वैज्ञानिक जरा सावकाश चालतात,
टेकडीच्या खांद्यापर्यंत जातात
आणि मग खाली तळ्याच्या काठापर्यंत जातात,
लाल माती सुरू होते त्याच्याही पुढे जातात.
आपली बाळं वागवतात आपणच बनवलेल्या झोळ्यांतून,
आणि हात मोकळे ठेवतात पारखून अळंबी वेचण्यासाठी.