धीरूबेन पटेल


मी म्हणजे स्वयंपाक घरात कोंडलेली एक बावळट बाई     
अशी जर तुमची समजूत असेल
तर महाशय
गैरसमज आहे तो तुमचा
मला अगदी व्यवस्थित जाणीव असते
माझ्या जगाभोवती वाहणाऱ्या नी उसळणाऱ्या प्रवाहांची

हवेत होणारे बदल
पिकपण्यावर त्याचे होणारे परिणाम
वैद्यकीय जगातली अद्ययावत परिपत्रके
निसर्गाचा तोल बिघडवणारे ते तसले उद्योगधंदे
आंतरराष्टरीय व्यापार आणि तडजोडी
भारतीय रुपयाचं अवमूल्यन किंवा वधरणारा भाव
लढाया, आपापसात ल्या किंवा परकियां बरोबरच्या
सगळ्या सगळ्यांवर नीट लक्ष असतं माझं
आहो, शेवटी या सगळ्याचा परिणाम
माझ्या स्वयंपाक घरावर नी माझ्यावरच तर होत असतो ना!

 (अनुवाद उषा मेहता )

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form