सतीश मनवर हा चित्रपट दिग्दर्शक म्हणून आपल्याला माहीत आहे. त्याच्या 'गाभ्रीचा पाऊस' ह्या पहिल्याच चित्रपटाला 2009 मध्ये राज्यपुरस्कार आणि अनेक सन्मान मिळाले होते. आदिवासिंच्या धर्मांतराविषयीच्या दुसर्या चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. सतीशला स्वयंपाकात विविध प्रयोग करायला आवडतात. त्याविषयी मुक्ता खरे हिने घेतलेली मुलाखत. मुक्ता एक तरुण रंगकर्मी आणि लेखिका आहे.
सतीश , तू स्वयंपाक करायला कोणत्या वयात, कोणाकडून आणि कधी शिकलास? कोणत्या परिस्थितीमध्ये?
तसं काही शिकावं नाही लागलं कधी. म्हणजे लहानपणी आपण घरी असतो तेव्हा आपण तिथे काय चाललंय ते बघत असतो, वावरत असतो तसं शिकलो. मुख्य म्हणजे माझी आई खूप छान स्वयंपाक करायची त्यामुळे ती वेगवेगळे पदार्थ करून बघायची, पाककृती घ्यायची शेजारच्या किंवा ओळखीपाळखीतल्या बायकांकडून. तर त्या पाककृती मी तिला वहीमध्ये उतरून द्यायचं काम करायचो. त्यावेळी डिजिटल वगैरे असं काही नव्हतं. त्यामुळे मी तिला ते हाताने उतरवून द्यायचो आणि त्यामध्ये कृती, साहित्य असं लिहिता लिहिता नकळत त्या पाककृती माझ्या डोक्यात जाऊन बसत . त्याशिवाय एखादा पदार्थ कसा तयार होतो, त्यामध्ये काय काय टाकावं लागतं हे मी आईला बघायचो रोज स्वयंपाक करताना त्यातून शिकत गेलो. मग कधी गरज पडली एखाद्या वेळेला चहाच कर कुठे मॅगीच कर किंवा एखादी भाजी आवडली नाही तर दुसरं काही कर असं करत गेलो.
मॅगी होतं तेव्हा?
हो तेव्हा मॅगी होतं. म्हणजे इतकाही काही जुना काळ नाही. म्हणजे साधारण ८७-८९ चा काळ असेल तो. म्हणजे मी सहावी-सातवीत असेन त्या वेळचं सांगतोय. त्यावेळेस मग मॅगी कर किंवा ऑम्लेट करायचो कधीतरी. मला सहावीत असतानाचं आठवतं की भाजी आवडली नाही म्हणून ऑम्लेट करायला घेतलं. मग आईला तर राग यायचा की मला ती भाजी खायची नाहीय. पण ती सूचना करायची की त्यात काय काय टाकायचं, कसं करायचं - असं करून मी पहिलं ऑम्लेट केलं. म्हणजे ती स्वतः करून बघितलेली अशी पहिली रेसिपी मला आठवते.
मॅगी केली तरी त्याच्यात करण्यासारखं काही नसतं, पण माझी स्वयंपाकाशी अशी ओळख झाली.
आम्ही तिघेही भाऊ होतो, घरात मुलगी नव्हती. त्यामुळे स्वयंपाक म्हणजे मुलींची काम वगैरे असं काही वेगळं बघितलं जायचं नाही. जे असेल ते ते सगळं आम्हाला घरात करावं लागायचं. त्यामुळे असेल कदाचित. पण ते जाणवलं नाही मला त्यावेळी. म्हणजे घरातल्या वातावरणातून आमच्यापर्यंत असं काही झिरपलं नाही - त्यामुळे आम्ही ही मुलींची कामं, ही मुलांची कामं असा कधी विचार केला नाही. त्यामुळे ती सगळी कामं आम्ही शिकत राहिलो आणि ते होत राहिलं आपसूकच. तर असा स्वयंपाकापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रवास होता.
त्यानंतर मी मुंबईत आलो तेव्हा गरज पडली स्वयंपाक करण्याची. मी पुण्याला महाविद्यालयात शिकत होतो तेव्हा होस्टेलच्या मेसमध्ये आम्ही जेवायचो. त्यावेळी कधी गरज पडली नाही करायची. मी एम.ए. करण्यासाठी ललित कलामध्ये पुण्याला आलो. बीए पर्यंत मी घरीच यवतमाळला राहिलो. त्यामुळे घरी असताना नियमितपणे स्वयंपाक करायची मला कधीच गरज पडली नाही आणि ललित कलामध्ये असताना तर इतकं टाईट शेड्यूल असायचं की कधी एकदा खाऊन झोपतो असं होऊन जायचं. एवढेच थकलेले असायचे सगळे. त्यामुळे तिथे पण तो वाव मिळाला नाही. पण मुंबईत काही काम मिळतं का पाहण्यासाठी स्ट्रगल सुरू झाल्यावर आम्ही काही मित्र एकत्र राहायचो. तर त्या वेळी तिथे आम्ही सुरुवातीला स्टोव्ह विकत घेतला, मग एक कुकर विकत घेतला. मग मसालेभात किंवा ऑम्लेटब्रेड, भुर्जी असं करून असं करता करता नियमितपणे घरी करून खायला सुरुवात केली. त्यावेळी असं होतं की सतत काम मिळत नसे. त्यामुळे चार ते पाच मित्र एकत्र रहायचे. त्यामुळे जो मोकळा असेल त्यातल्या कोणी ना कोणी स्वयंपाकाचं किंवा इतर काम करायचं असं करून सुरुवातीची एक-दोन वर्षं आम्ही तशी काढली. आणि ते कंटिन्यू झालं नाही. कारण तुम्हाला सारखं ते करायचा कंटाळा येतो. तुम्ही ते सगळं पेलू शकत नाही. स्वयंपाकघरामध्ये भांडी पडलेली असतात. एकंदरीतच त्या सगळ्याचा कंटाळा येतो. त्यामुळे ते परत डीस्कंटिन्यू व्हायचं. एका विशिष्ट पॉइंटला आमच्याकडे एक ताई यायच्या स्वयंपाकाला. त्यानंतर भाजी किंवा कधी कोणती भाजी करायची अशाप्रकारे मी कामं करीत असायचो. कारण बाकीचे लोक कामात असायचे आणि मी स्वतः स्क्रिप्ट लिहायचं काम करीत असल्याने घरी बसून लिहायचो. त्यामुळे घरीच असायचो आणि मला कधीच असं वाटायचं नाही की हे मी कसं करायचं. अर्थात नैसर्गिक पणे दीर्घकाळ एखादं काम करायचा असा कंटाळा येतो तसं व्हायचं.
तुझे वडील स्वयंपाक करायचे का?
नाही; कारण एकतर खूप कमी वेळ ते घरी असायचे. ते सतत दौऱ्यावर असायचे. ते बरेचदा शनिवारी, रविवारीच घरी असत आणि त्यावेळी त्यांना भेटायला येणारी पण बरीच मंडळी असायची. त्यांची वेगवेगळी कामं सुरु असायची. त्यामुळे कोणी कॉन्ट्रॅक्टर भेटायला आलाय किंवा असंच काहीतरी चालत असे. आणि शिवाय त्यांचा मित्रपरिवार ही खूप मोठा होता. त्यामुळे तेसुद्धा असायचे. त्यातून जिल्ह्याच्या ठिकाणी आमचं घर होतं आणि आजूबाजूला त्यांचं पोस्टिंग असायचं. त्यामुळे ते फार काही घरी नसत. पण एखादवेळी त्यांना सुट्टी असायची म्हणजे त्याला काय म्हणू शकतो आपण अं.. त्याला लुडबुड म्हणू शकतो आपण. म्हणजे आई करत असताना हे नको ते कर – अशा काही सूचना दे ;असंही असायचं. पण एकदा आई काही कामानिमित्त बाहेरगावी गेली होती. तेव्हा दोन-तीन दिवस बाबांना करावं लागलं होतं. त्यांनी बऱ्यापैकी निभावलं होतं. पोळ्या करणं काही शक्य नव्हतं. त्या विकत आणल्या होत्या. पण भाज्या वगैरे त्यांनी केल्या होत्या. त्यांना अनुभव नव्हता पण कधीकधी त्यांचे पदार्थ चांगले व्हायचेसुद्धा. त्यांनी चिकन वगैरे खूप चांगलं केलं होतं असं मला आठवतंय. पण इतरांना ते खूप सूचना द्यायचे असं कर तसं करू नको वगैरे असं मात्र व्हायचं.
मग त्यांचं तुझ्या स्वयंपाकाविषयी काय म्हणणं होतं ?
नाही तसा प्रसंग आला नाही फारसा. माझा मधला भाऊ तिकडे आई-वडिलांसोबत आहे यवतमाळला आणि रविवारी बरेचदा आमच्याकडे मटण किंवा चिकन असतं, ते तो करतो. पण अजूनही वडील त्याला सजेशन देतात की त्यात कुठले मसाले घालायचे काय किती प्रमाणात.. आता रोज काही मला स्वयंपाक करावा लागला नाही आणि मी तर त्यांच्यासमोर कधीच स्वयंपाक केला नाही. त्यामुळे असेल. म्हणूनच मनूचा -माझ्या बायकोचा आक्षेप होता की तू घरच्यांसमोर कधीच स्वयंपाक करत नाहीस. मी प्रयत्न केला होता की मी काहीतरी करावं पण तो पण यशस्वी झाला नाही. त्यामुळे मला असं वाटत नाही की त्याच्याविषयी वडिलांचं काही म्हणणं असेल. माझा लहान भाऊसुद्धा स्वयंपाक करतो -म्हणजे कसं की कधीतरी. साधारणपणे घरी पाहुणे, मित्रमंडळी वगैरे आले तर केलं जातं.
तुला स्वतःसाठी - म्हणजे तुझ्यासाठी आणि मनुताईसाठी; स्वयंपाक करायला आवडतं की मित्रांना जमवून मोठा घाट घालायला आवडतो?
मला शक्यतो मित्रांसाठी स्वयंपाक करायला फारच जास्ती आवडतं. म्हणजे मला एखादा पदार्थ करायचा असेल तर मी आधी कमी प्रमाणात बनवतो. स्वतः आधी चव घेऊन बघतो. चेक करतो ती मला जमते का आणि मला वाटलं की तो जमलाय तर मग मी शेयर करतो. मग मी मित्रांना बोलवतो किंवा त्यांच्यासाठी तो पदार्थ करून घेऊन जातो. ज्या कोणासाठी केला असेल त्याला विचारतो की कशी वाटली, मला जमली आहे का, ते विचारतो. मला योग्यप्रकारे तो पदार्थ जमला आहे का. असं आवडतं करायला.
जेव्हा आमचा नाटकाचा ग्रुप होता तेव्हा आम्ही बरेच जण एकत्र पार्टी करायचो त्यावेळी मी सुद्धा मी अशा प्रकारे प्रयत्न केला होता.
म्हणजे खाण्याचं डिपार्टमेंट तुझ्याकडे असायचं का?
नाही, तसं नव्हतं. एखादा पदार्थ करून तो मित्रांना खाऊ घालणं मला आधीपासूनच आवडायचं. त्यामुळे आणि रूमवरही करत असल्यामुळे तसं डिपार्टमेंट म्हणून नव्हतं माझ्याकडे. त्यानंतरही एखाद्या मित्राला भेटायला बोलून ठरवायचो की अरे आपण भेटू या आणि काहीतरी करूया आणि त्याच्यासाठी तो पदार्थ करायचा, अशाप्रकारे सुद्धा मी केलेलं आहे.
हो, मला आठवतंय जेव्हा मी तुझ्याकडे आले होते. तेव्हा तू चक्क कॅरट केक केला होतास. मला स्वतःला बेकिंग खूप कॉम्प्लिकेटेड वाटतं नेहमीच्या स्वयंपाकापेक्षा.. तर बेकिंग कुठे शिकलास तू?
असं जाणीवपूर्वक कुठे शिकलो नाही. युट्यूब वगैरे आहे. अशा माध्यमातून तुम्हाला ते कळतं. नव्या नव्या पाककृती बघता येतात. ओव्हनमध्ये त्या प्रकारे करावं असं पहिल्यापासून वाटत होतं. पण तेव्हा आमच्याकडे ओव्हन नव्हता. त्यामुळे मी कूकरमध्ये वगैरे करून पाहिलं आधी. पण ते काही यशस्वी झालं नाही. मग आम्ही ओव्हन घेतला तेव्हा तू नुकतीच येत होतीस आमच्या घरी. त्याआधी मी मायक्रोवेव्हमध्ये पदार्थ करायचा प्रयत्न केला होता. पण ओव्हन सारखे पदार्थ होत नाहीत मायक्रोवेव्हमध्ये. ओव्हनच्या हिट मध्ये आणि मायक्रोवेव्हच्या हिट मध्ये जरा फरक पडतो.. मग नवीन ओव्हन आणल्यावर नुकताच हवं आल्यामुळे त्यात पावच करून बघ किंवा कॅरट केक करून बघ किंवा किंवा चिकन करून बघ असं करायचो. आपल्याला आधीपासून तर माहीत नसतं. कधीकधी टेंपरेचर जास्त होतं किंवा पदार्थ जास्त वेळ ठेवला जातो आणि मग पदार्थ कडक कडक होऊन जातो मग ते किती वेळानंतर बंद करायचं तिकडे तुम्हाला लक्ष ठेवावं लागतं. पण मी प्रयत्न करायचो म्हणजे करून शिकायचो असं होतं ते. मी त्याचं शिक्षण असं काही घेतलं नाही.
तुला फक्त स्वयंपाक करायला आवडतो की त्याच्यानंतर पसारा आवरणं आणि स्वयंपाकघर साफ करणं असं पण आवडतं?
म्हणजे थोडंसं कसं आहे की मी जो पसारा करतो तो मी आवरतो आणि आणि माझी अशी पद्धत आहे की करतानाच आवरायचं. म्हणजे एखादं भांडं वापरलं तर त्याचा परत उपयोग होणार असेल तरीही ते मी लगेच धुवायला टाकतो. मग असंही होतं माझ्याबाबतीत की मनू म्हणते अरे ते परत लागणार आहे. मग मी ते परत घेऊन घेतो. नाहीतर मी ते लगेच आवरतो म्हणजे तिथल्या तिथे जास्तीत जास्त आवरण्याचा मी प्रयत्न करतो. म्हणजे जेव्हा तो पदार्थ तयार होतो तेव्हा फारसा पसारा राहात नाही ओट्यावर. तरीसुद्धा पसारा होतोच. त्यानंतर मग तो ओटा वगैरे धुऊन घ्यायचा म्हणजे असं मी नियमित नाही करत. पण तरी तो पसारा राहतो आणि मनूही बरेचदा आवरते. त्यात उलट माझं असं आहे की मनूने स्वयंपाक केला तर त्यानंतर पसारा आवरायला मी निरुत्साही असतो. तेव्हा मी तेवढा उत्साह दाखवत नाही. खरं तर ते स्वयंपाकघरामधलंच एक वेगळं काम आहे. अर्थात तुमच्यावर तसा प्रसंग आला तर तुम्ही ते करू शकता.
हेडशिप कोणाकडे आहे तुमच्याकडे? म्हणजे किचनमध्ये कुठे काय ठेवलं आहे किंवा कुठे ठेवायचं हे कोण ठरवतो?
आता असं काही ठरलेलं नाही आहे. त्याच्यावरून आमच्यात संघर्ष पण होतो आणि जी व्यक्ती ठरवते की आज हा पदार्थ करायचा आहे ती व्यक्ती हेड होते त्या वेळेची. म्हणजे आज समजा अमुक एक पदार्थ करायचा आहे. तिच्या म्हणण्याप्रमाणे सगळं होणं अपेक्षित असतं त्यात. जर कोणी लुडबुड केली किंवा सूचना दिल्या तर साहजिकच मग संघर्ष निर्माण होतो. जी व्यक्ती ठरवेल त्याच व्यक्तीला ते सगळं करावं लागतं. हेड तीच व्यक्ती असते. दुसरी कामं इतरांनी करायची म्हणजे चिरून देणं किंवा कापून देणं किंवा निवडून देणं हे जे सगळं आहे हे त्या दुसऱ्या पार्टनरला करावंच लागतं.
तू चित्रपट करतोस तर तुझा खाण्याशी संबंधित असा एखादा आवडता चित्रपट आहे का? म्हणजे मला ‘द हंड्रेड फूट जर्नी’ खूप आवडतो. मी कितीहीवेळा तो चित्रपट बघू शकते. तुझं तसं काही आहे का?
फिल्म फेस्टिव्हलमध्ये जे चित्रपट बघायचो ते युरोपियन किंवा फ्रेंच आहेत. त्यामध्ये त्यांची खाद्यसंस्कृती यायची ती सहज अशा पद्धतीने यायची आणि ते खरंच त्यांचं अन्न असायचं आणि जरी तो विषय स्वयंपाकाशी संबंधित नसेल तरीसुद्धा विशेषतः आपण आता जसं बघतो की डायनिंग टेबलचा सीन असतो. त्यावर जे खाण्याचे पदार्थ असतात ते नाटकी वाटत नाहीत. ते सहज वाटतं त्या सगळ्या युरोपियन चित्रपटातला तो सहजपणा मला आवडतो. बरं काही सिनेमे असे होते की खास खाण्यावरचे. अवॉर्डस कुकिंग नावाचा एक चित्रपट बघितला होता.
ही डॉक्युमेंटरी आहे का?
नाही. पण तिचं स्ट्रक्चर वेगळं आहे. एखादा पदार्थ वेगवेगळ्या प्रकारे कसा बनवलो जातो याविषयी आहे. त्यात चायनीज अमेरिकन्स आहेत किंवा इंडियन अमेरिकन्स आहेत ,ब्लॅक अमेरिकन्स आहेत, फ्रेंच , ब्रिटिश असे सगळे आहेत. वेगवेगळे लोक त्यांच्या घरात एकत्र येऊन त्यांच्या पद्धतीने टर्की बनवतात आणि त्यात त्यांचे नातेसंबंध आहेत, त्यांच्या अडचणी आहेत किंवा संघर्ष आहे. त्याविषयी पण तो चित्रपट आहे आणि त्यात टर्की हा अमेरिकेचे कल्चर असण्याचा पण भाग आहे. असं ते सगळं आहे. त्यातून कोणती खाद्यसंस्कृती तुम्हाला जास्त जवळची वाटते ते योग्य प्रकारे आलंय.
मी एक चायनीज चित्रपट बघितला होता. काहीतरी रूड समथिंग असं नाव आहे. आणि त्यामध्ये चायनीज खेड्यामध्ये रस्ता बांधण्याचे काम सुरू आहे आणि तिथे कम्युनिजम असल्यामुळे त्यावेळेस सगळ्यांना श्रमदान करावं लागतं. गावातली सगळी पुरुष मंडळी श्रमदान करतात आणि आणि स्त्रिया सगळ्या त्यांच्या त्यांच्या घरात स्वयंपाक करतात आणि मग ते सगळे पदार्थ आणून ठेवतात त्या श्रमदान करणाऱ्या लोकांसाठी. तर त्यांच्यात एक शिक्षक असतो आणि तिथे एक मुलगी आहे खेड्यातली. तो शिक्षक बाहेरगावावरून आलेला आहे आणि तिला तो आवडतोय. तर ती मुलगी तिने बनवलेला पदार्थ त्याला खायला आवडेल का याचा विचार करून रोज सकाळी उठून तयारी करते. हा त्या संपूर्ण चित्रपटाचा विषय आहे. चांगला चित्रपट आहे आणि खाद्य संस्कृतीही आहे त्यात आणि एवढं मिश्रण आहे या सगळ्याचं. असे चित्रपट मला जास्त आवडतात आणि मराठीतही काही चित्रपट आलेले आहेत त्या पद्धतीने. ‘गुलाबजाम’ आहे. माझ्या चित्रपटामध्ये सुद्धा म्हणजे ‘गाभ्रीचा पाऊस’मध्ये पुरणपोळीचा संदर्भ आहे की. एका पात्राची बायको त्याच्याविषयी काळजी वाटून पुरणपोळी करते. त्याप्रकारे नैसर्गिकपणे खाद्य संस्कृती तिथे यावी असा मी तिथे एक प्रयत्न केला होता. ते मला आवडत असल्यामुळे आपसूक तिथे आलं होतं.
तुला रोजच्या रोज स्वयंपाक करायला आवडतं की कधीकधीच ?
वेळ असेल, गरज असेल तर मी नक्कीच करतो. म्हणजे मधल्या काळात मी रोज पोहे करायचो म्हणजे सकाळचा नाश्ता माझा. साधारण दोन वर्ष केलं आणि आता डाएट बदलल्यामुळे नाश्ता करीत नाही थेट जेवतो. रोज सकाळी उठून करणं मला तसं अवघड नव्हतं. पण असं आहे की मी मॉर्निंग पर्सन असल्यामुळे सकाळी जेवढा उत्साह असतो तेवढा संध्याकाळी नसतो. म्हणजे संध्याकाळी करतो मी स्वयंपाक, तरी पण सकाळी जेवढा माझा उत्साह असतो तेवढा संध्याकाळी कदाचित नसतो असं मला वाटतं.
स्वयंपाकाची जबाबदारी तुमच्या दोघांवरच असते की मावशी असतात करायला?
नाही नाही बाई येतात. त्या एका वेळचं जेवण करतात आणि रात्रीचं जेवण आम्ही वेगळं तयार करतो. तर कधी कुठे बाहेर गेलो तर तसं किंवा घरी ठरवून आम्ही पदार्थ करतो. अजूनही एक वेळेस जेवण आम्ही स्वतः बनवतो. म्हणजे समजा भाकरीभाजी असेल – कारण आता आम्ही भाकरीच खातो- ती आरोग्यालाही चांगली आणि आवडतेही, त्यामुळे भाकरी आम्ही रोज खातो. पोळी कधीतरी खातो. म्हणजे भाकरी आणि भाजी नसेल आणि अजून काही हवं असेल जसं की कोशिंबीर वगैरे तर असं तोंडीलावणंही आम्ही करतो.
तुला पोळ्या करायला आवडतात का?
नाही. तो एकच पदार्थ असा आहे की तो मला जमत नाही. मी एक दोनदा प्रयत्न केला, पण मला ते जमलं नाही त्यावेळेस. आकार वेगळे झाले पण पोळ्या म्हणून ठीक होत्या. पण ते मला कधी जमलंच नाही जसं मला हवं होतं तसं करता नाही आलं. मी अजून प्रयत्नशील आहे त्याबाबतीत. मला ते साध्य करायचं आहे.
तुला करायला आवडणारा असा सगळ्यात आवडता पदार्थ कोणता आहे?
मला ओव्हनमध्ये अख्खं चिकन करायला खूप आवडतं. म्हणजे अख्खी कोंबडी घेऊन मसाले लावून ती बेक करायची. मोहरीच्या पेस्टमधले गोड्या पाण्यातले मासेही करायला आवडतात. मला खिमा करायला आवडतो. मग असे छोटे-मोठे पदार्थ असतात एखादी बेगुनभाजा, डाळभात वगैरे करायला मला आवडत. मला सगळंच करायला आवडतं पण सगळ्यात जास्त बिर्याणी करायला आवडते.
आणि स्वयंपाकाच्या प्रक्रियेमधली सगळ्यात आवडणारी गोष्ट कोणती? म्हणजे उदाहरणार्थ फोडणी घालायला आवडतं किंवा भाजी चिरायला आवडतं अशी तुला आवडणारी गोष्ट कोणती?
जेव्हा पदार्थ शिजत आलेला असतो तेव्हा आपण त्याची चव घेऊन पहातो ते मला खूप आवडतं. कारण त्यावेळेस आपल्याला कळतं की हा पदार्थ आता कसा होणार आहे. काही राहिलं असेल तर म्हणजे मीठ कमी असेल किंवा शिजायचं राहिलं असेल तर तुम्हाला ते त्या क्षणी कळतं. पदार्थ करतांना तो क्षण आला की मला खूप आवडतं आणि त्या क्षणी तुम्हाला कळतं की हे सगळे जमून आलं आहे. किंवा असं वाटतं की काहीतरी राहिलं आहे याच्यात, कसं करता येईल आता असंही वाटू शकतं! नाटकाची रंगीत तालीम असेल किंवा फर्स्ट चित्रपटाचा पहिला कट असेल तर जसं वाटतं ना - तसं वाटतं मला. मी या विषयावर कधी बोललो नव्हतो , छान वाटलं बोलून!

मस्त दिलखुलास !
ReplyDelete