सिद्धार्थ मेननला आपण अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांतून पाहिलेले आहे. Disney च्या Aladdin ह्या इंग्लिश नाटकातली त्याची भूमिका गाजली होती. त्याला स्वयंपाक करायची आवड आहे. त्याविषयी त्याची ही मुलाखत मुक्ता खरे हिने घेतली आहे. मुक्ता एक तरुण रंगकर्मी आणि लेखिका आहे.
सिद्धार्थ, तू स्वयंपाक करायला कोणत्या वयात, कोणाकडून आणि कशामुळे शिकलास?
मी मुख्यतः माझ्या आईकडून शिकलो. आमच्या घरात सगळ्यांनाच खाण्याची प्रचंड आवड आहे. माझी आई भरपूर स्वयंपाक करायची. आणि खूप लहानपणी ती किचन मध्ये असताना मी तिला चिकटूनच असायचो. शिवाय मी काही फार उपद्रवी नव्हतो त्यामुळे तीलासुद्धा मधी लुडबुड वाटायची नाही. माझ्या दोन्ही आज्या आणि काकासुद्धा अप्रतिम स्वयंपाक करतात. ह्यांना बघूनच माझी आवड तयार झाली आणि पुढे शिकणं पण झालं.
तुझे वडील स्वयंपाक करायचे का? त्यांचं तुझ्या कुकींग ला प्रोत्साहन होतं का?
मी खूप लहान असताना तरी ते स्वयंपाक करत नव्हते, पण मी कॉलेज मध्ये जायला लागेपर्यंत ते स्वयंपाक करु लागले होते. आणि माझ्या स्वयंपाक करण्याला सुद्धा त्यांनी कायमच भरपूर प्रोत्साहन दिलेलं आहे. त्यांनी आणि कुटुंबातल्या इतर माणसांनी सुद्धा! खरंतर मी चौथीत असताना माझे आई वडील दोघंही कामावर जायचे आणि संध्याकाळी उशिरा परत यायचे. मी एकटाच घरी असायचो, पण त्यांनी कधीच मला पैसे देऊन असं सांगितलं नाही की - तू काहीतरी विकत आणून खा! माझी आई सांगून ठेवायची की भूक लागली तर काहीतरी करून घे. मग तसं मी हळु हळु सँडविच आणि ऑमलेट करायला शिकलो. आणि कधीतरी रविवारी माझी आई स्वतः मला बाजूला बसवून भाजी चिरायला शिकवायची.
तुला स्वतः साठी स्वयंपाक करायला आवडतं की मित्र मैत्रिणीं साठी?
फक्त स्वतःसाठी स्वयंपाक करणं तर एकदम सोपं असतं. जास्तीत जास्त अर्धा तास लागतो. पण मित्रांसाठी स्वयंपाक करण्यात मला वेगळंच समाधान वाटतं. ती अख्खी प्रोसेस च खूप थेरप्यूटिक असते. मला दुसऱ्यांना खायला घालायचा भरपूर उत्साह पण असतो आणि आवडतं सुद्धा. आम्ही बाहेरून ऑर्डर करणं शक्यतो टाळतो. आणि साधं का होईना पण घरीच काहीतरी करण्यावर भर असतो. (डोसा, पोहे, ऑमलेट वगरे) मित्रांबरोबर असले प्लॅन्स आमचे वारंवार होत असतात. माझं पुण्यात काही शूट होत असेल तर माझ्या क्रू ला मी हमखास पुण्यातल्या घरी नेतो आणि पार्टी करतो.

तुला फक्त कधीकधी स्वयंपाक करायला आवडतं की रोज करायला पण हरकत नसते ?
हरकत काहीच नाही, मी रोज स्वयंपाक करतोच. माझ्या आणि माझ्या बायकोच्या घरी पण कधीच स्वयंपाक करायला बाई कधीच नव्हती. त्यामुळे आम्ही रोजच्या रोज आमचा स्वयंपाक करतो. मी घरी असेन तेव्हा मी रात्रीचं जेवण सुद्धा सकाळीच करतो, ती माझ्या आधी घरी पोचली तर ती करते. सध्या माझी सासू आमच्या बरोबर राहत्ये. तर कधी कधी ती पण करते. असं आम्ही आळीपाळीने स्वयंपाक करतो. अगदी कोणालाच वेळ नसेल तर अगदी शेवटचा पर्याय म्हणून बाहेरून ऑर्डर करतो.
एका कोणाच्या तरी अंगावर स्वयंपाकाचं काम पडू नये म्हणून तू आणि तुझी बायको कशी काळजी घेता ?
स्वयंपाक करण्यापेक्षा पण काय बनवायचं हा निर्णय घेणं जास्त कठीण असतं. आणि ते आम्ही दोघं मिळून ठरवतो. एकदा ते ठरलं की अर्ध काम तिथेच संपतं. माझ्या बायकोचं रोज ऑफिस असतं. त्यामुळे संध्याकाळी ती भरपूर दमलेली असते. म्हणून मी घरी असताना स्वयंपाकाची जवाबदारी मीच घेतो. (सकाळी उठून बायकोचा डबा करणं, दिवसभरा चा स्वयंपाक वगैरे). सुदैवाने आम्हाला दोघांनाही किचन मध्ये वेळ घालवायला आवडतं आणि वेळ नीट manage केला की गोष्टी बरोबर होतात. मग कोणा एकावर काम पडत नाही. आमच्या दोघांच्या आई वडिलांनी आम्हाला स्वयंपाकाची सवय लावल्यामुळे हे सोपं झालेलं आहे.

तुला पोळ्या करायला आवडतं का?
नाही.. ती एकच गोष्ट अशी आहे की मी अजुन केलेली नाही. मला माहितीये पोळ्या कशा करतात, पण आम्ही भात जास्त खातो. पण माझी सासू मस्त पोळ्या करते. पण मी पोळी ऐवजी गरम गरम डोसा प्रिफर करेन, कोणीतरी बसलंय टेबलवर तर मी पटकन डोसा करून देईन. ते मला सोपं वाटतं. पण मला छानपैकी पोळ्या करायला शिकायचं आहे !
स्वयंपाकाशी संबंधित एखादी आठवण किंवा किस्सा ?
माझी सासू हल्लीच मुंबईला शिफ्ट झालिये. ती पहिल्यांदा जेव्हा ह्या नव्या घरी आली, त्यावेळी मी रात्रीचं जेवण बनवत होतो. तीला वाटत होतं की तिलाच घरी येऊन खायला करावं लागेल. पण सगळा स्वयंपाक तयार बघून ती खूप खुश झाली.
तुला बनवायला सगळ्यात जास्त आवडणारी डिश कोणती?
पास्ता. मी सॉस सुद्धा स्वतः तयार करतो. मी थाय करी पण चांगली करतो. आणि टिपिकल केरळी फिश करी. हे सगळं करायला जास्तीत जास्त पाऊण तास लागतो.
स्वयंपाकाच्या प्रोसेस मधली सगळ्यात आवडणारी गोष्ट कोणती?
अन्न शिजण्याची प्रोसेस! गॅस वर जे काही होतं ते मी सगळ्यात जास्त एन्जॉय करतो. पण भाज्या चिरायला मला थोडा कंटाळा येतो. पण सगळे जिन्नस मिक्स होताना आणि शिजताना बघायला मला खूप आवडतं. मी जर actor झालो नसतो तर नक्की शेफ झालो असतो.माझं अॅक्टिंग वर खूप प्रेम आहे. पण काय माहित... भविष्यात कधीतरी कदाचित मी स्वतःचं रेस्टोरंट काढेन ही...

तुझी आवडती फूड फिल्म?
तशा मला अनेक फिल्म्स त्यातल्या फूडसाठी आवडतात. कधीकधी तर फिल्म मधली माणसं काही खात असतील तर मला पण ते खावंसं वाटतं. पण फूडबद्दल माझी सर्वात आवडती फिल्म आहे - Ratatouille. त्या फिल्मच कॅप्शन आहे -'Anybody can Cook' - हा किती चांगला मेसेज आहे! Food comes from the heart. कुणालाही खाऊ घालणं ही खूप छान गोष्ट आहे - असं नेहमी मला वाटतं.