मी एका कट्टर स्त्रीवादी आईची मुंबईत वाढलेली कट्टर स्त्रीवादी मुलगी आहे. त्यामुळे आयुष्यभर स्त्रीवादी असण्याचे भरपूर फायदे तसेच तोटे सुद्धा मी बघत आणि अनुभवत आले आहे. सुरुवातीची बरीच वर्षं नकळत आणि गेली दोन चार वर्षं मात्र समजून, जाणीवपूर्वक - मी स्त्रीवाद शिकण्याचा आणि अंगात भिनवून घ्यायचा सुद्धा प्रयत्न करते आहे. स्त्रीवादी पुस्तकं/कादंबर्या वाचणं, स्त्रीवादी संस्थांची फेसबुका पेजेस वाचत रहाणं, त्यांचे इव्हेंट्स आटेण्ड करणं, शिवाय रोजच्या आयुष्यात सहन कराव्या लागणार्या सेक्सिझमविषयी , स्त्रीवादी व्यक्तीच्या वाट्याला येणारा एकटेपणाबद्दल आणि पुरुष किती ओव्हर प्रिविलेज्ड आहेत हयाबद्दल माझ्या आईशी - वंदनाशी गरमागरम चर्चा झाडणं, सेक्सीस्ट मित्र-मैत्रिणींशी भांडणं करणं इत्यादी अनेक गोष्टी मी करत रहाते. ही एक भरपूर वैताग आणि कंफ्यूजनने भरलेली पण मजेदार अशी प्रोसेस असते. सिनेमांमध्ये, गाण्यांमध्ये, लोकांच्या साध्या साध्या वागण्या बोलण्यामध्ये सेक्सीझम दिसला लागला, की समजावं आपण बरोबर शिकतोय!
असाच अभ्यास करता करता मला थोडे दिवसांपूर्वी एक पुस्तक सापडलं. झालं असं की काही दिवसांपूर्वी “POINTOFVIEW” संस्थेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला गेले होते. त्या कार्यक्रमात सोहैला अब्दुल्लाली हिची मुलाखत होणार होती. शिवाय सोहैलाने तिथे तिच्या ताज्या पुस्तकातला काही भाग वाचून दाखवला.
पुस्तकाचं नाव आहे - ‘What we talk about when we talk about RAPE.’

जगभरातल्या अनेक लोकांशी बोलून आणि मुख्य म्हणजे स्वत:चे अनुभव सांगत हे पुस्तक तयार झालेलं आहे. सोहैलाने तिच्या पुस्तकात ह्यातले इतके छोटे छोटे बारकावे स्पष्ट करून दाखवले आहेत की हे पुस्तक खरंच मुलांच्या अभ्यासक्रमात का नाही असं मला हे पुस्तक वाचताना राहून राहून वाटत राहिलं! माझ्या मते – ‘बलात्कार संस्कृती’ हा स्त्रीवादाच्या अभ्यासक्रमातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा धडा आहे. कारण बलात्कार हा फक्त गुन्हा नसून ती एक संस्कृती आहे. अगदी मुलग्यांना रडू न देणे इथपासून ते एखाद्या व्यक्तिबरोबर जबरदस्तीने संभोग करणे इथपर्यंत सगळ्याचा ह्या बलात्काराच्या संस्कृतीत समावेश होतो. म्हणून ह्या पुस्तकाची ओळख करून देणं आणि सोहैलाचं तोंड भरून कौतुक करणं हा ह्या लेखाचा उद्देश.
सोहैला ही एका उच्च मध्यमवर्गीय मुस्लीम कुटुंबातली मुलगी. जवळपास सदतीस वर्षांपूर्वी, तिला बोस्टन युनिवर्सिटीत अॅडमिशन मिळाली होती आणि अमेरिकेतच स्थायिक होण्याची तिच्या कुटुंबाची जवळपास सगळी तयारी झाली होती. त्यावेळेस सोहैला साधारण सतरा वर्षांची होती. भारतातून अमेरिकेला निघण्यापूर्वी एका संध्याकाळी ती आपल्या एका मित्राबरोबर फिरायला गेली होती. तिथे चार हट्ट्याकट्ट्या पुरुषांनी या दोघांना घेरलं. चाकूचा धाक दाखवून ही माणसं दोघांना एका सुनसान टेकडीवर घेऊन गेली. त्यांना बेदम मारहाण केली आणि सोहैलावर बलात्कार केला. सोहैला आणि तिचा मित्र ह्या माणसांच्या हाता पाया पडले, ‘आम्ही कोणाला काही सांगणार नाही’ अशा वारंवार शपथा घेतल्या, तेव्हा कुठे कित्येक तासांनी त्यांनी दया येऊन ह्या दोघांना जिवंत सोडून दिलं.
पुस्तकाच्या पहिल्याच चॅप्टरचं नाव ‘who am I to talk?’ असं आहे. आपला अनुभव सांगितल्यावर सोहैला म्हणते की त्या बलात्कारानंतर जे घडलं, ते जास्त महत्त्वाचं आहे. तीन वर्षांनंतर अमेरिकेत सोहेलाला तिच्या पदवीपूर्व प्रबंधासाठी एक अनुदान मिळालं. विषय- भारतात होणारे बलात्कार. संशोधनासाठी ती पुन्हा भारतात आली, अनेक स्त्रीवादी बायकांना तसंच बलात्काराला बळी पडलेल्या बायकांना भेटली, ‘मानुषी’ नावाच्या महिलांसाठीच्या मासिकामध्ये स्वतःच्या बलात्काराच्या अनुभवाबद्दल स्वत:चे नाव न लपवता लेख लिहिला आणि प्रबंधही पूर्ण केला. पुढे कॉलेज संपल्यावर तिला केंब्रिजमधल्या रेप क्रयसिस सेंटरमध्ये नोकरी मिळाली. तिथे तिने बलात्काराला बळी पडलेल्या बायकांचं समुपदेशन केलं, निधी उभे केले, डॉक्टर/पोलिस/शिक्षकांना प्रशिक्षण दिलं आणि हे सगळं करता करताच स्वतः सुद्धा कित्येक महत्त्वाचे धडे शिकली. वेगवेगळ्या नोकर्यांमधून आणि नात्यांमधून जाताना ती पुन्हा पुन्हा लैंगिक हिंसेच्या मुद्द्याकडेच येत राहिली, जीव तोडून काम करत राहिली. त्यामागचं कारण तिला आलेला तो अनुभव नसून तिची ह्या विषयाबद्दलची आस्था हे होतं. एका भयानक अनुभवाशी सामना करायची ही किती धाडसी पद्धत आहे... तर ही आहे सोहैला.
तिच्या पुस्तकातले मला सगळ्यात जास्त आवडलेले आणि कळलेले मुद्दे मी इथे मांडणार आहे.
अब्दुलाली गाईडलाईन्स.
हा माझा ह्या पुस्तकातला सगळ्यात आवडता भाग आहे. ‘अब्दुलाली गाईडलाईन्स’ म्हणजे बलात्काराला बळी पडलेल्या बायकांशी कसं वागावं आणि कसं वागू नये जेणेकरून त्यांचा त्रास वाढणार नाही, हयाबद्दलच्या सोहैलाने दिलेल्या सूचना.
उदा. तिचा अनुभव ऐकून भयचकित व्हा. पण एकदम चक्कर येऊन पडू नका. नाहीतर तिलाच तुम्हाला सावरावं लागेल. तिच्यावर विश्वास ठेवा. पण, ‘जर’ ‘तर’ हे शब्द मुळीच वापरू नका. फक्त तिच्यावर विश्वास ठेवा.तिला काय हवं हे विचारा. अंदाज बांधण्याची काही गरज नाही. तिला मदत घेण्यासाठी प्रोत्साहन द्या. पण जबरदस्ती करू नका.
किती साध्या गोष्टी आहेत ह्या...! हे वाचताना माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे कुठलीही
तक्रार करायची असेल तर नुसतं ‘मला खूप त्रास होतोय’ एवढं म्हणणं पुरेसं नसतं. तर तो त्रास
सिद्ध करावा लागतो. नाही का? बलात्कार ही तर खूप लांबची गोष्ट राहिली पण साधं एखाद्या मैत्रिणीला जरी आपण सांगितलं की अमुक अमुक मुलाने माझा अपमान केला तरी ती ‘पण त्याच्या वागण्याचा अर्थ असा नसेल, तसा असेल’ असं एकदा तरी म्हणून बघते. एखाद्या पुरुषाला आपण आपल्या छातीकडे बघताना पाहिलं तरी आपण आपले कपडे सावरतो. का? ही वृत्ती कुठून जन्माला येते? आणि तिचा बलात्काराच्या ह्या संस्कृतिमध्ये किती मोठा वाटा आहे!
त्रास कमी करण्याचा अर्थ त्याकडे दुर्लक्ष करणं असा होत नाही. ही साधी गोष्ट आपण शिकलो तर कित्येक बळींचे मानसिक कष्ट कमी होतील.
बलात्काराचे समर्थन
बलात्कार हा जरी इतर सर्व गुन्ह्यांसारखा असला की ज्यात बळी आणि गुन्हेगार असतात तरीसुद्धा तो असा एकमेव गुन्हा असावा जिथे बळीला दोष दिला जातो. सोहैलाने ह्या पुस्तकासाठी खूप लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्यात तिचे मित्रमैत्रिणी, डॉक्टर, वकील आणि बलात्काराला बळी पडलेल्या अनेक बायका अशा सगळ्यांचा समावेश आहे. एका माणसाला तिने विचारलं ‘तू बलात्कार करण्याची कल्पना करू शकतोस का?’
त्यावर तो म्हणाला - ‘नाही. मी खून करण्याची कल्पना करू शकतो, पण बलात्कार करण्याची कल्पना नाही करू शकत.’ सोहैलाने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. आणि मी सुद्धा. खरंच, खुनाचं समर्थन करता येऊ शकतं. कोणाचा राग खूपच अनावर झाला तर खून केला जाऊ शकतो, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खून केला जाऊ शकतो, बलात्कार होण्यापासून थांबवण्यासाठी खून केला जाऊ शकतो. पण बलात्कार? एखाद्या व्यक्तीची मर्जी नसताना तिच्याबरोबर जबरदस्तीने संभोग करणे ह्याला काहीही समर्थन असू शकत नाही. ह्यावरून लक्षात येतं की बलात्कार हा किती वेगळ्या प्रकारचा गुन्हा आहे आणि त्याला किती वेगळ्या प्रकारच्या उपचारांची गरज असते. फक्त बलात्कार करणार्याला शिक्षा होणं पुरेसं नसतं तर बळीशी संवेदनशीलपणे वागणं, तिला शारीरिक, मानसिक मदत पुरवणं आणि मुख्य म्हणजे ह्यात तिची काहीही चूक नाही हे सांगणं ह्या गोष्टीसुद्धा तितक्याच महत्वाच्या असतात. पण आपला समाज अजून ह्यापासून बराच लांब असावा. मदत तर सोडाच, पण पोलिस आणि डॉक्टरांचं वागणं हे सुद्धा पीडितेला शिक्षा दिल्यासारखंच असतं.
प्रतिबंधात्मक उपाय (Rape prevention)
हा भाग वाचायला मी खूप उत्सुक होते. बलात्कार प्रतिबंध म्हणजे सोहैलाला असं कोणतं जादूचं रहस्य सापडलंय जे अजून कोणालाच सापडलं नाहीये? कदाचित इतकी वर्षं बऱ्याच बलात्कारपीडितांशी बोलून तिने बलात्कार होऊ नये म्हणून अजून एखादी गाईडलाइन तयार केली असावी. खरच ही वापरल्यावर भारतात, जागात बलात्कार होणं बंद होईल? हे सगळं डोक्यात सुरू असताना मी हा चॅप्टर वाचायला घेतला आणि फुस्स! फक्त मनातला उपरोध बाहेर काढण्यासाठी लिहिलेला एक छोटासा चॅप्टर निघाला. आणि बलात्कार प्रतिबंध म्हणजे काय, तर घरात थांबा, अनोळखी माणसं टाळा, पण नको. बलात्कार घरात सुद्धा होऊ शकतो त्यामुळे घरात थांबू नका, कुटुंबातल्या माणसांना पण टाळा. फार मैत्रीपूर्ण वागणं टाळा नाहीतर तुमच्या बलात्काऱ्याला आमंत्रण दिल्यासारखं वाटू शकतं. पण फार मैत्रीपूर्ण नसणं सुद्धा टाळा नाहीतर तुमच्या बलात्काऱ्याला आव्हान दिल्यासारखं वाटू शकतं. पण हे सगळं जरी जरी टाळलं तरीसुद्धा तुमच्यावर बलात्कार होऊ शकतो. त्यामुळे शक्य झालं तर अस्तित्वात असणंच टाळा. म्हणजे प्रश्नच मिटला. खरंच, आपल्यावर बलात्कार होऊ द्यायचा नसेल तर ह्या वरच्या उपायांव्यतिरिक्त काहीच उपाय नाहीयेत. आणि कटू सत्य हेच आहे की आपल्यावर बलात्कार झाला किंवा व्हायला लागला तर प्रत्यक्षात आपण काहीही करू शकत नाही. अगदी आपण जिवंत सुटण्याचीसुद्धा काहीच शाश्वती नाही.

पुस्तकाचा शेवट करताना सोहैला म्हणते, ‘I don’t care if I’m a mad dreamer but I think a world without rape is possible.’ ती म्हणते की तिचा अजूनही माणुसकीवर विश्वास आहे. आपल्याला ह्या समस्येवर अजून उपाय सापडलेला नसला (तो कधी सापडेल, काय असेल कुणास ठाऊक!) तरी आपण एकमेकांशी संवाद साधल्याशिवाय तो सापडणारही नाहीये. तिच्या मते आपण माणसं एकत्र येऊन बलात्कारविरहित जग तयार करू शकतो. ह्या पुस्तकातल्या मला आवडलेल्या खूप सार्या मुद्द्यांपैकी हे झाले अगदी थोडे मुद्दे. पण एवढ्याने सुद्धा मला खाडकन डोळे उघडल्यासारखं वाटलं. ह्या पुस्तकामुळे बलात्कार आणि त्याच्या संस्कृतीबद्दलची माझी समजच बदलून गेली. एकीकडे ह्या समाजाबद्दलची आणि पुरुषांबद्दलची माझी भीती अजूनच वाढली असली तरीही दुसरीकडे आपल्यावर बलात्कार होण्यात आपली काही म्हणजे काहीही चूक नाही, ह्याची परत एकदा नव्याने जाणीव सुद्धा नक्कीच झालेली आहे. सोहेलाच्या पुस्तकातून मी कितीतरी शिकले आहे. उदाहरणार्थ आपल्यावर बलात्कार झाला म्हणून आयुष्य संपत नाही. किंवा, तीच आपली ओळख सुद्धा बनून राहण्याची गरज नाही. आपण आपल्याला हवं तसं यशस्वी आयुष्य घडवू शकतो. माझी खात्री आहे की सोहेलाचं पुस्तक मी जितक्या वेळा वाचेन तितक्या वेळा मला त्यात काहीतरी नवीन नवीन सापडत राहील. म्हणून पुन्हा एकदा म्हणावंसं वाटतं – Thank You Sohaila! मला लेखक म्हणून आणि व्यक्ति म्हणून सुद्धा समृद्ध केल्याबद्दल. Thank you very very much!
मुक्ता खरे
तरुण स्त्रीवादी रंगकर्मी आणि लेखिका. मराठी वृत्तपत्रातून लेख प्रकाशित झाले आहेत. अनेक लघुपटातून आणि ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ या नाटकात सहभाग.
" बलात्कार हा जरी इतर सर्व गुन्ह्यांसारखा असला की ज्यात बळी आणि गुन्हेगार असतात तरीसुद्धा तो असा एकमेव गुन्हा असावा जिथे बळीला दोष दिला जातो."
ReplyDeleteनाही. हा एकमेव गुन्हा नाही ज्यात बळीला दोष दिला जातो. पण हो.. हाच तो एकमेव गुन्हा आहे ज्यात बळीचे दोष / निष्काळजीपणा दाखविणार्यालाही गुन्हेगारच समजलं जातं.
अधिक स्पष्टीकरणाकरिता हे वाचा -
http://at-least-i-think-so.blogspot.com/2015/03/blog-post.html