फुटायला हवेत कंठ
नि करायला हवा
हल्लाबोल
उतरायला हवं रस्त्यावर
नि घ्यायला हवा शोध
गल्लीबोळातून
लिंगपिसाट वा-याचा
पंख फडफडवण्याआधीच
छाटायला हवेत त्याचे मनसुबे
रोखायला हवेत
त्याचे श्वास
प्रत्येकवेळी
कुकर्माच्या झाडाला
येत नसतात
माफीची फळं
याची जाणीव
करून द्यायला हवी त्याला
तरच शाबूत राहील
कळीचं अस्तित्व
मुक्त
स्वच्छंदी
अव्याहत
कविता मोरवणकर
Tags
कविता
