जेन्डर आणि आर्किटेक्चर हे अभ्यासाचे वेगवेगळे विषय म्हणून तर अत्यंत महत्वाचे आहेतच, पण दोन्ही एकत्र आल्यावर जो विषय समोर येतो त्याचाही पट खूप मोठा आहे. एका लेखात तो संपूर्ण मांडता येणं शक्य नाही पण तोंडओळख नक्कीच होऊ शकेल. त्यासा ठी एका आर्किटेक्टचा हा प्रयत्न!
"I want to be known as an architect ,
not just a ‘woman’ architect."
एकल प्रॅक्टिस करून, आर्किटेक्चर मधला नोबेल समजला जाणारा सर्वोच्च सन्मान ,
‘The Pritzker Architecture Prize’ पटकावणाऱ्या पहिल्या आणि आजवरच्या एकमेव महिला,
Ar. Zahaa Hadid ह्यांचे हे उद्गार !
पहिल्यांदा हे वाक्य वाचलं तेंव्हा खरंतर कपाळावर आठी उमटली होती. वाटलं here we are at it again . पुन्हा एकदा स्त्रियांच्या वाट्याला येणारं श्रेय येता येता राहिलं, हाती येऊनही निसटलं. सेलेब्रेशन राहून गेलं .
…
“One is not born, but rather becomes, a woman.” हे वाक्य यथावकाश आयुष्यात आलं आणि झाहाच्या वाक्यातलं कोडं सुटायला सुरुवात झाली.
आज २०१८ साली १४ वर्ष ह्या व्यवसायात काढल्यावर मागे वळून बघताना झाहाच्या वाक्याचा अर्थ नव्याने उमगतोय. पटतोय. कपाळावरची आठी जाऊन ओठांवर ओळखीचं हसू उगवतं तिचं ते वाक्य आठवून.
She, not just thought out of the box, but rather, refused to acknowledge the box . She refused to be labelled, to be boxed. Just like her designs.
(तिने फक्त चौकटच ओलांडली नाही, तर चौकटीचं अस्तित्वंच मुळी नाकारलं. कुठल्याही लेबलला नकार दिला, चौकटबद्ध होण्याला नकार दिला. तिच्या डिझाईन्स प्रमाणेच)
जेन्डर आणि आर्किटेक्चर ह्या दोन्ही विषयांची गाठ एका वाक्यात झाहाने स्वतः पुरती सोडवून टाकली. मुक्त झाली.
ह्या टप्प्यापर्यंतचा प्रवास मात्र प्रत्येकाचा/ प्रत्येकीचा वेगवेगळा असतो, खडतर तितकाच रोचक. सगळेच तिथवर पोहोचतील असंही नाही. आर्किटेक्ट व्हायचं ठरवलं तेंव्हा, खरंतर तोवर, मी एकही आर्किटेक्ट बघितलेला नव्हता. अवती भोवती आर्किटेक्चरबद्दल माहिती असलेलं कुणी नव्हतं आणि आजच्यासारखं माहितीचं जाळं तेंव्हा सर्वदूर पसरलेलं नव्हतं.
पण आपण राहतोय ती घरं त्यात व्यतीत होणारी आपली आयुष्यं ही आहेत ह्यापेक्षा कित्येकपटीने नीट नेटकी इंटरेस्टिंग असू शकतात, असायला हवी असं सतत वाटायचं. मुलगी असल्याने घरातल्या, नात्यातल्या, ओळखीच्या स्त्रियांभोवती खूप वेळ व्यतीत व्हायचा, अजूनही होतो, त्यामुळे त्यांचं जगणं खूप जवळून ऐकता, बघता, अनुभवता आलं. त्यात निम्म्याहून अधिक काळ त्यांची आयुष्यं व्यापून टाकणारी स्वयंपाकघरं तर मला लहानपणी देखील जीव घुसमटून टाकणाऱ्या labour concentration camps पेक्षा काही फार वेगळी वाटली नाहीत.
‘बाई’माणसाचं अवकाश संकोचून टाकणारी ही कोंडी फुटायला हवी होती - हे बदलायला हवं कुणीतरी असं वाटायचं. कर्त्या पुरुषांसाठी सुसज्ज बैठकीच्या खोल्या आणि अहोरात्र राबणाऱ्या स्त्रियांसाठी, त्यांच्या मुलांसाठी मात्र अंधारलेली स्वयंपाकघरं माजघरं हे समीकरण पटत नसे.
प्रश्न पैशाचा निश्चितच नव्हता, प्रश्न priorities चा होता.
आपल्या अवती भोवतीच्या spaces सगळ्यांसाठीच तितक्याच सुरक्षित, प्रसन्न, सुखावह व्हाव्यात especially स्त्रिया आणि लहान मुलांसाठी, हा विचार करणारं, ह्याला priority list वर आणणारं, ह्याचं महत्व पटवून देणारं कुणीतरी असायला हवं असं सतत वाटायचं. ही hierarchy challenge करणारं, spaces चं हे strict segregation मोडून काढणारं, Rigid boundaries break करणारं कुणीतरी...

अश्या नसणाऱ्या अनेक मितभाषी, शांत, मनमिळाऊ, समंजस, दुसऱ्याचं मन राखणाऱ्या, घरच्यांच्या शब्दाबाहेर नसणाऱ्या, “संस्कारी” वगैरे मुली देखील असतात त्यांच्या परिस्थिती बद्दल तर कल्पनाच केलेली बरी. अशा काही मुली आर्किटेक्चर मध्ये येण्याचं कारण म्हणजे त्यांच्या घरच्यांचा आर्किटेक्चर हा डेस्क जॉब आहे असा गैरसमज असायचा, अजूनही बरेचदा असतो. आर्किटेक्ट झालं की फक्त ऑफिस मध्ये बसून drawing करायला लागतं. उन्हातान्हात site वर वगैरे नाही गेलं तरी चालतं. त्यामुळे मुलींच्या (लग्नाच्या मार्केट मध्ये मागणी असलेल्या) गोऱ्या रंगाला, सडपातळ बांध्याला आणि लांबसडक केसांना, आपोआप संरक्षण मिळतं. बाहेरच्या लोकांशी संपर्कही त्यामुळे कमी येतो इत्यादी.
आता जेंव्हा मुलींचे पालक मला विचारायला येतात आर्किटेक्चर मध्ये ‘मुलींना’ किती ‘स्कोप’ आहे तेंव्हा मी सांगते, “फक्त लग्न होईपर्यंत वेळ काढायचा असेल तर उत्तम आहे, पण खरंच काम करायचं असेल तर मात्र मानेवर खडा ठेऊन उन्हात उभं रहायची तयारी हवी. Radically विचार करता यायला हवा आणि मुलं करतील त्याच्या १००% अधिक deliver करायची ताकद हवी तरच स्कोप मिळेल.” त्यावर ज्या मुलींना खरंच काहीतरी विधायक काम करण्याची ऊर्मी असते त्यांचे डोळे चमकतात इतरांच्या डोळ्यात प्रश्नचिन्ह उरतात.
जेन्डर आणि आर्किटेक्चर हे वेगवेगळे विषय म्हणून तर अभ्यासाचे अत्यंत महत्वाचे आहेतच, पण दोन्ही एकत्र आल्यावर जो विषय समोर येतो त्याचाही पट खूप मोठा आहे. एका लेखात तो संपूर्ण मांडता येणं शक्य नाही पण तोंडओळख नक्कीच होऊ शकेल. त्यासाठी हा प्रयत्न.
ह्या अभ्यासक्रमाला आपल्या गुणवत्तेवर प्रवेश मिळवून शिक्षण घेत असताना आर्कीटेक्चरबद्दल खूप passionate असणाऱ्या scholar मुली पुढे एक एक करत कशा practice बाहेर फेकल्या जातात ह्याच्या कहाण्या ऐकल्या की आधी हळहळ वाटायची, आता त्यातली विसंगती कळायला लागलीये. मुळात आर्कीटेक्चर किंवा एकूणच बांधकाम क्षेत्र (इतर अनेक क्षेत्रांप्रमाणे) हे शतकानुशतके पुरुषप्रधान आहे. त्यात स्वत:साठी अवकाश तयार करायचा असेल तर मुलींना / स्त्रियांनी स्वत:च्या शिक्षणाचं आणि व्यवसायाचं नियोजन हे भविष्यात येणारे सगळे अडथळे लक्षात घेऊन करायला हवं तरच ह्या व्यवसायातला स्त्रियांचा critical mass वाढेल आणि हा व्यवसाय स्त्रीधार्जिणा होईल. समाज बदलाची प्रक्रिया स्वतःपासूनच सुरू करायला लागेल.
ती करताना अनेकदा आपल्या प्रिय व्यक्तींना, कुटुंबियांना दुखवावं लागेल, काही कटू निर्णय घ्यावे लागतील, त्याची बोच अंतर्मनावर वागवत काही काळ जगावं लागेल. ती बोच देखील पुरुषप्रधान संस्कृतीने, आदर्श स्त्री प्रतिमेचा जो एककल्ली मारा आपल्या सगळ्यांच्या मनांवर, मतांवर शतकानुशतके केलेला आहे त्याचा परिणाम आहे, हे आपल्याला कालांतराने कळत जातं आणि ती बोच कमी कमी होत कधी नाहीशी होते ते आपलं आपल्यालाही कळत नाही.
जेन्डर आणि आर्कीटेक्चर हा मुळी विषयच निकालात निघेल तो अत्यंत आनंदाचा दिवस असेल माझ्यासारख्या अनेक स्वप्नाळू आर्किटेक्ट्स असलेल्या स्त्रियांसाठी. दिल्ली अभी दूर हैं!
ह्या बदलाला सुरुवात झालेली आहे आणि हे बदल आता झपाट्याने होऊ घातलेत हेही प्रकर्षाने जाणवतंय.
परवा माझा आर्कीटेक्चरला असलेला भाचा त्याच्या आईला म्हणाला , “Internship साठी ऑफिसेस मध्ये आमचे portfolios reject होतात आणि मुलींचे मात्र लग्गेच select करतात“, ते ऐकलं आणि गंमत वाटली. मनात म्हणलं , भले बहाद्दर !!!! हाच attitude कायम ठेवलात तर मुली मार्केटमधले पण सगळेच प्रोजेक्ट्स मिळवायला लागतील आणि ती संपवून खूप पुढे निघून जातील तो दिवस फार काही दूर नाही. हा विचार करतानाच खूप पूर्वी एका आर्कीटेक्चर कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या प्रोफेसरांशी झालेला संवाद आठवला, त्यांच्या मते viva मध्ये (तोंडी परीक्षेमध्ये) मुलींना आम्ही जास्त नापास करायला जात नाही, कारण त्या नापास होत गेल्या की त्यांच्या घरची मंडळी लग्नाची घाई करतात आणि मुलींची degree पण पूर्ण होत नाही. मनात पुन्हा आलं viva चं एकवेळ मान्य केलं तरी theory उरतेच की, तिथे विद्यार्थ्याचे लिंग कळायला मार्ग नसतो, मग कसं ठरवता कुणाला पास करायचे आणि कुणाला नापास ?? ही विसंगतीची दोन टोकं.
मुलींच्या गुणवत्तेवर अविश्वास दाखवण्यासारखं सोप्पं काम नाही जगात. माझा भाचा असो की ते प्रोफेसर. रोजच अशा वर वर casual वाटणाऱ्या comments आपल्या समाजातल्या deep rooted sexism ची पाळमुळं उघडी पाडत असतात. पूर्वी त्याचा त्रास व्हायचा आता गम्मत वाटते. त्याच भाच्याला मग कुठे मिळेना placement तेंव्हा माझ्या एका मैत्रिणीकडे पाठवलं कामाला, तिने त्याला सौजन्य म्हणून ठेऊन घेतलं त्याचा portfolio ही न बघता !!! (आणि अर्थातच ती मैत्रीण अत्यंत हुशार, कर्तबगार आर्किटेक्ट आहेच आणि योगायोगाने अविवाहित आहे). मुलींना placements का मिळतात ते आता तरी त्याला कळेल अशी आशा आहे.
एकूणच भारतात मुलींचं शिक्षण आणि व्यवसाय किंवा त्यांचं कौशल्य विकास ह्याबद्दल प्रचंड अनास्था आहेच. वरकरणी आकडे पूर्वीपेक्षा खूपच बरे दिसत असले तरी अजूनही समता, (हो समता, समानता नव्हे ) खऱ्या अर्थाने जनमानसात रुळायला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. अजूनही तिचं लग्न आणि त्यानंतर येणारं मातृत्व हेच तिच्या अस्तित्वाच्या गाभ्याशी आहेत असा समज अगदी प्रगत समजल्या जाणाऱ्या सामाजिक स्तरांमध्येही आहे. ह्या दोन्ही गोष्टी Choice आहेत हे ही बऱ्याचदा मुलींच्याही गावी नसतं. एक तर घरात किंवा सभोवतालात तसं कुणीही त्यांना सांगणारं नसतं आणि तसं जगणाऱ्या role models तर त्याहूनही विरळ्या. मुळात मुलींचं career ही त्यांची स्वतःचीही priority नसते बरेचदा. लग्न झाल्यावर काम करायला मिळेलच ही खात्री नसते आणि मिळालं तरी घरकाम आणि मुलांचं संगोपन ह्या दोन्हींचा भार अजूनही मुख्यत: मुलींवरच असतो. त्यातही कामाच्या वेळा flexible असतील तर थोडीफार आशा करता येते पण तसं नसेल तर मात्र मुलींचं career टिकणंच जिथे दुरापास्त तिथे तिच्या growth बद्दल बोलणं हे दिवास्वप्नंच ठरतं.
त्यातूनही स्वप्नं बघण्याचं धाडस आणि ती पूर्ण करण्याची जिद्द उरी बाळगणाऱ्या मुलींना आपल्या आवडीच्या क्षेत्रात female role modelsच नसणं हाही एक मोठ्ठा तोटा सहन करावा लागतो. स्वप्न बघताना एखादा बेंचमार्क समोर असेल तर आपल्या संघर्षाला निश्चित अशी दिशा मिळते. अर्थात त्यापुढेही अनेक नवनव्या वाटा समोर येतातच पण तोवर चालत राहण्याची ऊर्मी आणि ताकद आपली आपण टिकवायला मुलींना मुलांच्या कित्येक पट अधिक संघर्ष करायला लागतो. Female role models नसण्याचं कारण स्त्रियांच्या success stories दुर्लक्षित करत राहणारी प्रसारमाध्यमे आणि स्वतःचं यश, समोर होऊन निसंकोचपणे स्वीकारणे अजूनही न जमून त्याचं श्रेय स्वत: घेण्याआधी घरच्यांना, जोडीदाराला देऊन टाकण्याची घाई असलेल्या ‘यशस्वी’ स्त्रिया. जी यशाची, तीच कथा अपयशाचीही.
मुलींना fail होण्यासाठीही मुलांना मिळते तितकी space आपण समाज म्हणून देत नाही. The moment she fails she is thrown out of the race. त्या मानाने मुलांच्या failures कडे आपण खूपच सहिष्णूपणे बघतो त्यांना अनेक chances देत राहतो कारण अजूनही बऱ्याच घरांमध्ये पुरुष हाच कर्ता हा समज दृढ आहे .

अर्थात त्याचीही वेगळी आव्हानं असतातच. त्यातही तुम्हाला स्वतःसाठी space within space जाणीवपूर्वक कोरून काढावी लागते. म्हणजे अगदी professional presentation साठी बोलावून निमंत्रण पत्रिकेवर फक्त नवऱ्याचं नाव टाकणं वगैरे प्रकार लोक बिनधोकपणे करतात. तुम्ही व्यावसायिक भागीदारी वेगळी ठेऊ इच्छित असलात तरी तुम्हाला तिथेही बायको म्हणून जेंव्हा गृहीत धरलं जातं तेंव्हा तुम्हाला लोकांना त्यांची चूक लक्षात आणून द्यायला लागते. दोन पुरुष भागीदार असते तर एकाच्या नावावर दोघांनीही यावं ही अपेक्षा करण्यात आली असती का ? हा प्रश्न उपस्थित करायला लागतो. दुराभिमान नसला तरी तुमचा स्वाभिमान तुमच्या अस्तित्वाच्या गाभ्याशी सतत जागा ठेवायला लागतो.
स्त्रियांच्या कामाचं योग्य श्रेय त्यांना न देता ते गृहीत धरणं ह्याला सामाजिक अधिष्ठान आहेच आणि त्यातूनच पुरुषी यशस्वितेचं कथानक अजून दृढ होत रहातं.
ह्याला मी myth of the genius म्हणते. Behind every successful man is a woman (who is not given her due credit and/or space and time to succeed for herself. )
घरकामाचं क्रेडीट तर अजून अस्तित्वातच नाहीये मुळी. दुर्दैवाने आपल्याकडे अजूनही घराबाहेर केलेल्या कामातूनच पैसा मिळतो, आणि त्यातूनच सत्ता देखील, किमान स्वत:च्या आयुष्याचे निर्णय स्वत: घेता येण्या पुरती तरी. घरकाम तितकंच महत्वाचं काम असलं तरी ते अजूनही ना पैसा मिळवून देत ना प्रतिष्ठा! आणि (कदाचित म्हणूनच) ते बऱ्याचदा संपूर्णतः स्त्रियांच्या खांद्यावर येऊन पडतं. अशा सगळ्या वातावरणात जेंव्हा architecture सारखं अतिशय गुंतागुंतीचं वेळ खाऊ आणि अनेक मार्गांनी अनेकविध प्रकारे demanding profession मुली निवडतात तेंव्हा बऱ्याच वेळा ह्या profession मध्ये येणाऱ्या challenges चा त्यांना अंदाज नसतो. त्यात पुन्हा लग्न, मातृत्वाच्या जबाबदाऱ्याही अंगावर घेतल्या किंवा लादल्या गेल्या तर the candle burns at both ends आणि मग survival हाच एक मुद्दा समोर राहतो. तुमच्या अनेक skills तुम्हाला सतत update करत रहायला लागतात profession मध्ये relevant राहण्यासाठी. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रशिक्षण घ्यावं लागतं बाजारपेठेचा अचूक अभ्यास करायला लागतो. वेगाने बदलत जाणाऱ्या तंत्रज्ञानाची सांगड कल्पकतेशी घालून कामाचा दर्जा उंचावत न्यावा लागतो आणि हे सगळं करण्यासाठी लागणारा वेळ आणि अवकाश मिळवणं हा देखील मुलींसाठी वेगळ्या पातळीवरचा संघर्ष असतो, ज्यात बऱ्याच जणी तुटलेल्या माळेतून मणी ओघळून हरवून जावे तशा हरवतात.
ज्या थोड्याफार शिल्लक राहतात त्यांना घरात strong support system असलेल्या किंवा घरातली धुरा बायकोने किंवा आईने संपूर्णपणे सांभाळलेल्या पुरुषाशी स्पर्धा करत स्वतःची credibility सिद्ध करावी लागते. म्हणून इथे समता ही संकल्पना महत्त्वाची वाटते. समानता ही पुन्हा स्त्रियांच्याच पायावर धोंडा ठरते. सगळे parameters सारखे असतील तिथे समानता समजू शकतो पण जिथे सुरुवातच भेदभावाने होते तिथे सहृदय समता हीच खरी मानवीय संकल्पना ठरू शकते. अर्थात आपल्याला खरच समानतेपर्यंत पोहोचायची इच्छा असेल तर. Our work culture has to become more empathetic and flexible to accommodate & retain more women आणि दुसरीकडे अर्थातच घरकाम आणि बाल संगोपनाच्या आव्हानांना professional achievements न झाकोळू देता पेलण्यासाठी नवीन उपाययोजना तयार व्हायला हव्यात. मुलींवरचा अदृश्य पण असह्य domestic आणि emotional load कमी व्हायला हवा. Slowly but surely, we will reach there.
बऱ्याच पुरुषप्रधान क्षेत्रात असतं तसं glass ceiling आर्किटेक्चरमध्येही आहेच .
Ar. Robert Venturi ह्यांना 1991 चं Pritzkar Architecture Prize देण्यात आलं. तेंव्हा त्यांच्या ज्या projects चा उल्लेख पुरस्कारपत्रात केला गेला, त्यात त्यांच्या फर्ममध्ये बरोबरीच्या पार्टनर असलेल्या Ar. Denis Scott Brown ह्यांनी केलेल्या योगदानाचं श्रेय म्हणून त्यांचा केवळ नामोल्लेख करण्यात आला. पुरस्कारावर मात्र त्यांचं नाव कोरण्यात आले नाही. ह्याचं स्पष्टीकरण म्हणून ‘हा पुरस्कार कुणाही एकाच जिवंत व्यक्तीला प्रदान करण्यात येतो‘ ह्या नियमाचा दाखला देण्यात आला. बरोबर एका दशकानंतर, 2001 साली जेंव्हा हरझॉग व डी म्यूरॉन ह्या दोन्ही पुरुष पार्टनर असलेल्या फर्मने केलेल्या कामाला सन्मानित करायचं ठरलं तेंव्हा मात्र हा नियम बदलण्यात आला कारण एकत्र काम करणाऱ्या दोघांपैकी एका ‘पुरुषाला’ डावलून दुसऱ्याला हा पुरस्कार प्रदान करणं हे त्या वेळच्या ज्युरीला अन्याय्यच नव्हे तर अशक्य वाटलं !!!
ह्या नियम बदलानंतर हॉवर्ड स्कूल ऑफ डीज़ाईन च्या २०,००० विद्यार्थिनींनी एकत्र येऊन Denis ह्यांना retroactively prize award करण्यात यावं म्हणून पेटीशन दाखल केली . त्यांच्या कामाची योग्य दखल घेतली जाऊन त्याचा पूर्वलक्षी प्रभावाने तरी सन्मान करण्यात येईल ह्या आशेवर हजारो स्त्रिया एकत्र आल्या आणि तरीही ती पेटीशन बाद करण्यात आलं हाही इतिहास आहेच.
Vietnam War Memorial माझं personally अत्यंत आवडतं अर्किटेक्चर अर्बन डिझाईन प्रोजेक्ट आहे. वॉर मेमोरियल असूनही त्यात जो experience Ar. Lin create करतात त्यात त्यांच्यातलं feminine spirit निश्चितच अत्यंत महत्वाची भूमिका बजावतं. शांत, सखोल, धीरगंभीरपणे अभिव्यक्त होतं, आणि ते अनुभवणाऱ्या प्रत्येकाला हेलावून सोडतं. असं असूनही त्या म्हणतात , "वयाच्या २०व्या वर्षी मी कामावर जाताना एखाद्या पुरुष कामगारासारखी कपडे घालून जायचे. आपलं स्त्रीत्व आपल्या कामाआड येऊ नये ह्याची मी जाणीवपूर्वक काळजी घ्यायचे. मी मुद्दाम जरा ढगळ अस्ताव्यस्त अवतारात वावरायचे , मेकअप तर मी अजूनही वापरत नाही. मी कामाला जाताना फार विशेष कपडे न निवडण्याची विशेष काळजी घेते. हे माझं सुरक्षा कवच आहे ."
आपलं स्त्रीत्व आपल्या कर्तृत्वाआड येऊ नये म्हणून अनेक स्त्रियांना conscious efforts घ्यावे लागतात. समोरच्याने तुम्हाला seriously घ्यावं म्हणून जाणीवपूर्वक स्वतःची body language develop, project करावी लागते आणि ती फक्त सह्काऱ्यांसमोरच नाही तर घरात, clients, contractors, अगदी साईट वरच्या कामगारांसमोर देखील -तुमच्या स्त्री असण्यापलीकडे जाऊन तुम्हाला एक competitive professional म्हणून आदरास पात्र होण्यासाठी स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत जास्त प्रयत्न करावे लागतात. म्हणूनच समानता नव्हे समता आधी महत्वाची
Am I complaining though ??
NO.... just stating some nuanced facts.
याही पलीकडे जाऊन, व्यापक अर्थाने आर्किटेक्चर आणि बिल्डींग इंडस्ट्री मुळे आणि माणसाच्या आसुरी महत्वाकांक्षेमुळे पृथ्वीचा आणि त्यावरच्या संसाधानांचा जो काही ऱ्हास झालाय किंवा होतोय त्याची जबाबदारी जरी आपण कुणी घेऊ इच्छित नसलो तरी परिणामांपासून मात्र कुणाचीच सुटका नाही. पुढील पिढ्यांसमोर स्वच्छ हवा, पाणी, अन्न आणि निवाऱ्याचे प्रश्न अधिकच बिकट होत जाणार आहेत असं स्पष्ट दिसतंय.
ह्या पार्श्वभूमीवर स्त्रियांचं एकूणच ह्या सगळ्यात intervention महत्वाचं ठरणार आहे.
Eco feminism हा खरंतर स्त्रीवादाचा सगळ्यात महत्वाचा टप्पा. सबंध ग्रहाचं म्हणण्यापेक्षा ह्या ग्रहांवरच्या मानवजातीचं अस्तित्व कडेलोटाच्या दिशेने झपाटायाने वाटचाल करत असताना आपण आपल्या मुलांसाठी तरी थोडा थांबून विचार करणार आहोत का ? Ar.Didi Contractor ह्यांचं काम याबाबतीत मला फारच महत्वाचं वाटतं. ज्यांना रस असेल त्यांनी जरून गुगल करून त्याचं काम जाणून घ्यावं .
एकूणच ह्या पुरुषधार्जिण्या समाज आणि भांडवल व्यवस्थेत, स्त्रिया आणि लहान मुलांचा अवकाश आपण अधिक व्यापक कसा होईल हे बघणार आहोत का ? फक्त स्त्रिया आणि मुलेच का ?LGBT ह्या अल्पसंख्याक असलेल्या पण रूढार्थाने femininity/masculinity च्या संकुचित gender definitions पलीकडे असणाऱ्या समूहासाठीदेखील आपण सुरक्षित वाटावं अशा spacesतयार करणार आहोत का ? ही आपली priority आहे का? असू शकेल का? अजूनही आडवेळेला कुठे जायला लागलं तर आपल्या urban space designs ते जाणं येणं सुरक्षित आणि सुसह्य व्हावं म्हणून काहीही वेगळा विचार करताना दिसत नाहीत, कृती तर खूप लांब!
दिल्लीत निर्भया प्रकरण झालं ते आपलं समाज म्हणून अनेक पातळ्यांवर सपशेल अपयश तर अधोरेखित करतंच पण आपलं urban design पण किती grand failure आहे हे उच्चरवात सांगतं. आपण ऐकणार आहोत का नाही हा भाग वेगळा. ह्या सगळ्यांच्या मुळाशी स्त्रियांचं निर्णयप्रक्रियेत सहभागी नसणं, हे एक मोठं कारण आहे .
त्यामुळेच आमच्या office मध्ये तरी आम्ही, घर बांधू इच्छिणाऱ्या प्रत्येक client ला त्यांच्या घरातील स्त्रियांना अगदी सुरुवातीपासून डिझाईन प्रक्रियेमध्ये सहभागी करण्यास प्रोत्साहित करतो, खरं तर त्या आमच्या प्राथमिक क्लायंट्स आहेत असं आम्ही मानतो. त्यांची मतं, गरजा, आवडी निवडी गांभीर्याने ऐकतो त्यांना योग्य त्या प्रकारे डिजाईन्समध्ये रुपांतरित करायचा प्रयत्न करतो . प्रत्येक drawing वर नावासहित त्यांचा उल्लेख करतो. हे ही जाणीवपूर्वक केलं जातं कारण मी एक स्त्री असून जर दुसऱ्या स्त्रीच्या अस्तित्वाची दखल, शक्य असूनही घेत नसेन तर इतर बदल आपोआप घडतील ही अपेक्षा करणं व्यर्थ आहे. आमचं office देखील women and child friendly space असावी ह्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतं!
केवळ आमच्याच नाही तर clients सोबत येणाऱ्या त्यांच्या लहान मुलांसाठी देखील आमच्या मिटींग्स संपेपर्यंत त्यांचा वेळ मजेत जाईल अशा स्पेसेस आहेत. ही सोय असल्यामुळे स्त्रियांना देखील त्यांच्या सोईने मुलाबाळांसहित मिटींग्सना यायला अजिबात संकोच वाटत नाही. उलट मुलं इथे यायला उत्सुक असतात. त्यामुळेच सगळ्यांना वावरण्यासाठी एक democratic inclusive space आपोआप तयार होते. Staff मध्ये देखील मुलींची संख्या लक्षणीय आहे आणि त्या सगळ्या स्वतः च्या credibility वर टिकून आहेत. त्यांचं स्त्री असणं कधीही त्यांच्या कामाच्या आड येणार नाही हे तर आम्ही कटाक्षाने बघतो पण म्हणून त्यांनी पुरूषांसारखं वागावं असा त्याचा अर्थ होत नाही. स्त्री असण्याचे जे काही निसर्गसुलभ परिणाम आहेत त्यांचा योग्य आदर राखला जावा हाच प्रयत्न असतो. यशस्वितेच्या पुरुषी parameters मधून त्यांची सुटका होणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यातूनच work life balance चे धडे त्यांना आपसूक मिळतील अशी आशा आहे . घरांवर देखील फक्त कर्त्या पुरुषाचंच नव्हे तर घरात राहूनही तितक्याच कर्त्या स्त्रीचंही नाव तितक्याच आदराने आणि जाणीवपूर्वक लिहिलं जावं असा आमचा आग्रह असतो. अनेकदा तो हसत मान्य केला जातो, अनेकदा नाही. Gender is a social construct त्यामुळे त्याचे जे काही बरे वाईट परिणाम आहेत तेही social च असणार आहेत . आर्किटेक्चर हा अवकाशाशी थेट संबंध असलेला व्यवसाय असल्यामुळे ह्यात हे construct challenge करण्याचे खूप potential आहे असं मला वाटतं. We are here to collaborate,not compete. हे सोप्पं निश्चितच नाहीये पण प्रयत्न करत राह्ण्याला पर्याय नाही. Giving up is just not an option.
शेवटी आर्किटेक्ट झाहा हादीद च्या शब्दात सांगायच तर -
“If you want an easy life, don’t be an architect. “
Wahhhhh wahhhhh lay bhariii khuppp channn lihalay tayde 👍👍👍👍👍👍👍👍👍
ReplyDeleteखूपच अभ्यासू आणि जाणीवा जागृत करणारं लिखाण आहे. लिखाणामागची प्रामाणिक तळमळ आणि व्यक्त होण्यासाठी घेतलेली मेहनत दिसून येते. वाचकाला अंतर्मुख करण्याची ताकद या लेखात आहे
ReplyDelete"स्वयंपाकघरं तर मला लहानपणी देखील जीव घुसमटून टाकणाऱ्या labour concentration camps पेक्षा काही फार वेगळी वाटली नाहीत"
>> अग्गदी! हे कळवळून टाकणारं आहे. आपल्या पिढीने पाहिलंय हे लहानपणी. हे "असं" आहे हे जाणवणे हेच मुळात त्याकाळी घडत नव्हते. त्यातून कोणा एखादीला चुकून तसं जाणवले तर इतरांचे उदाहरण देऊन आवाज बंद केला जायचा.
"त्यातही नवरा आर्किटेक्ट असेल तर थोडी तरी आशा उरते. त्यातही दोघांचे school of thoughts समान असले तर बरं , नाही तर बरंच बरं !"
>> चार शब्दांत खूप काही सांगितलेय. ज्या व्यवस्थेत नवऱ्याने बायकोवर केलेली शारीरिक जबरदस्तीसुद्धा गुन्हा ठरत नाही तिथे तिच्यावर केलेली वैचारिक जबरदस्ती हा अत्याचार आहे याची जाणीव असण्याची काय अपेक्षा करावी. आजूबाजूला पदोपदी उदाहरणे दिसतात.
"तुमच्या अनेक skills तुम्हाला सतत update करत रहायला लागतात profession मध्ये relevant राहण्यासाठी... ...कामाचा दर्जा उंचावत न्यावा लागतो"
>> हे खूप खरंय आजकाल सर्वच प्रोफेशन्स मध्ये.
"जिथे सुरुवातच भेदभावाने होते तिथे सहृदय समता हीच खरी मानवीय संकल्पना ठरू शकते."
>> वाह !!!
लेखात आलेले Ar. Denis Scott Brown, Ar. Maya Lin, Ar.Didi Contractor यांचे उल्लेख व त्या अनुषंगाने कथन केलेले लेखाच्या विषयास पूरक असे प्रसंग लेखिकेचे या विषयामधील सखोल चिंतन दर्शवतात. असे प्रगल्भ विचार सर्वत्र पोहोचले पाहिजेत.
Great. Gives alag angle of thoughts.
ReplyDelete