अनामिका
३ वर्षापूर्वी, तारुण्याच्या ऐन भरात नवीन स्वप्नांनी आशेने आणि उत्साहाने मन ओसंडून वाहत असतांना ...आयुष्यातल्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर जवळपास ६ वर्षानंतरच्या Toxic रिलेशनशिपमधून बाहेर पडल्यानंतर, पहिल्यांदा असं वाटलं आपण खरच "स्वतंत्र" आहोत! बाकी जिंदगी गुलझार है ....और हम पूरी तरह आझाद!

माझी चूक काय? माझ्यात काही दोष आहे का? मी प्रयत्न केले नाही का? अश्या नकारात्मक विचारांनी खूप मोठ्या भावनिक- मानसिक आंदोलनातून जावं लागलं. अश्या आणि इतक्या वाईट प्रकारे हे नातं संपेल, याचा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता...! तरीही आपण कोणत्या तरी कारणाने त्या दुष्टचक्रातून बाहेर तरी पडलो - या गोष्टीचा आनंदच अधिक आहे मला...
त्यानिमित्ताने नैराश्य आणि कडवटपणा आला होता स्वभावात... त्यावर वेगळं काम करावं लागलं....वेळीच समुपदेशन आणि self –awareness च्या अनेक प्रयत्नांमधून स्वतःला Re-discover आणि Refresh करायला मला वाव मिळाला. कधी नव्हे त्या राहून गेलल्या wish list मधल्या अनेक गोष्टी – वाचन, ट्रेक, विपस्सना, मित्र-मैत्रिणीशी गप्पा, जिम वर्कआउट आणि माझे पुढील career plans अश्या गोष्टींचा उपयोग करून मी स्वत:ला त्यातून बाहेर काढलं – मीच जणू काय माझी “कबीर- बुद्ध” झाले ! हीच मला आजवरची माझी सर्वात मोठी प्राप्ती वाटते!
मी काही लेचीपेची नाही...असं स्वतःला सांगून मी हे आव्हान स्वीकारलं आणि नेटाने माझ्या ड्रीम कॉलेज मधला माझा ड्रीम प्रोजेक्ट आणि डिग्री दोन्ही उत्तम रित्या पूर्ण केलं. अशी घातक आणि बेभरवशाची नाती आणि त्यातील माणसं माझ्या आयुष्यातून लवकर गेली आणि लौकिकार्थाने मी अधिक “माझी” झाले; म्हणून मी स्वतःला खूपच सुदैवी मानते. आयुष्याबद्दल आणि नवीन अनुभवांबद्दल मी निराश आणि उदासीन झाले नाही उलट अधिक सजग आणि स्वच्छ नजरेने पाहायला शिकले आणि नवीन अनुभव घ्यायला सज्ज झाले.
“The thing which does not kill you,always makes you strong” - याची त्या कठीण काळानंतर खात्री पटली. यापुढे कितीही मोठी संकटं येवोत - यापेक्षा वाईटात वाईट अजून काय होणार ? - आणि जे काही होणार त्यासाठी मी पुरेपूर तयार असेन.

मला माझ्या भीती- शंकांपासून मुक्त करणारा हा अनुभव मला निश्चितच माणूस आणि बाईमाणूस म्हणून अधिकच समृद्ध करणारा होता हे खरं ! डोळे खाडकन उघडणारा आणि एका झटक्यात आत्मभान देणारा हा ब्रेकअप चा अनुभव प्रत्येक बाईच्या आयुष्यात येवो! जगातल्या सगळ्या बायांचा विखारी नात्याबद्दल भ्रमनिरास होवो.
अंजली म्हसाणे
नेमेचि येतो तसा यावर्षीही १५ ऑगस्ट आलाय. प्रत्येकाची त्या त्या दिवसाची एक वेगळीच आठवण असते.
मला 15 ऑगस्टच्या दिवशी माझी स्वतंत्र सायकल मिळाली होती. लालचुटुक रंगाची चकचकीत. रेसर. तीन गियर्स पण होते तिला. साध्या रस्त्यावर, खडबडीत वाटेवर, चढावर, उतारावर.. सगळीकडेच सायकल मस्त सहज आणि जोरात पळायची. कानात वारं भरायचं. वेगाची झिंग चढायची.
सायकल मिळेपर्यंत मात्र हे सुख नव्हतं. चालत जायचं नाहीतर बसवर अवलंबून !
भराभरा आवरून शाळेसाठी बस गाठताना, गर्दीशी सामना करताना जीव गोळा व्हायचा. एक बस असायची. तिला आम्ही स्कूलबस म्हणायचो. ती वेगळी दिसायची नाही पण असायची! तिच्यात फक्त शाळेच्या मुलांनाच प्रवेश असायचा. एका दिशेने वाटेत येणार्या अनेक शाळांची मुलंमुली त्या बसमधे असत. वेगवेगळे गणवेश दिसायचे. एकमेकांशी ओळख व्हायची. गप्पा हसणं खिदळणं मस्त चालायचं. 'ए बघ तो तिच्याकडे बघतोय'… असं पण असायचं. आपल्याकडे पण कुणीतरी बघावं अशी नाजुक चोरटी इच्छा पण असायची. 'ज्ञानेश्र्वर कोणंय? पुढे या. म्हसोबा उतरा आता' असं गंमतीशीर बोलणारा कंडक्टर पण होता.
पण बर्याच वेळा ती बस चुकायचीच. बसस्टॉपवर पोहोचेपर्यंत ती येऊन गेलेली असायची. मग नेहमीच्या 'बिन स्कूल'बसमधून जावं लागायचं. माध्यमिक शाळेत जाणारी अडनिड्या वयातली मी दिसायला मोठी झाले होते. समज मात्र बाल्यावस्थेतली. गर्दीत बसमधे लोकांचे स्पर्श टाळता यायचे नाहीत. अत्यंत किळस भरून यायची. काय होतंय आणि का होतंय ते समजायचं नाही. लोक असा कुठेकुठे हात का लावताहेत ते कळायचं नाही. मग अंग चोरायचं. स्वेटर,कोट,रेनकोट यांचं चिलखत घालून संरक्षण करायचा प्रयत्न करायचा. बसमधे ओला रेनकोट घातला की शिव्या खायला लागायच्या. लोकांपासून लांब रहाण्याच्या प्रयत्नात 'कुठ्ठे जाऊ नाही' असं वाटायचं. माझ्या काही मैत्रिणी असं काही झालं की काहीतरी टोचरी वस्तू वापरायच्या. पण म्हणून हा अनुभव चुकत नव्हताच.
आणि अचानक एखाद्या देवतेसारखी ती सुंदर सायकल माझ्या आयुष्यात अवतरली. लालचुटुक रंगाची चकचकीत रेसर! माझ्या आयुष्याचा नूरच बदलून गेला. आता माझ्याभोवती तिच्या चाकांच्या लांबीचं आणि हँडलच्या रुंदीचं एक मस्त कवच तयार झालं होतं.आता ती स्पेस माझी होती.मी कधीही कुठेही जाऊ शकत होते. सायकल ही माझी खरी मैत्रीण होती. सुखात, दुःखात सदोदित बरोबर असणारी. फार नखरेही नव्हते तिचे. हवा भरली की झालं. मग ऊन पाऊस थंडीवारा चढउतार गर्दी याची पर्वा करण्याचं काही कारणच नव्हतं. त्या सायकलमुळे मला मिळालेलं स्वातंत्र्य अवर्णनीय होतं. नकोशा स्पर्शांच्या जाचातून तिने मला मुक्त केलं होतं!
प्रदिप कोकरे
सहावीची परीक्षा आटपली होती. घरच्यांनी पुढं शिकायचं नाही असं ठरवून टाकलेलं. मला पुढे शिक्षण घ्यायचंय का? वगैरेचा विचार घरात कुणीही केला नाही. वर्षभर अन्न पुरेल एवढी शेती होती. थोड्या म्हैशी होत्या आणि मोजकी गुरं. त्यांना सांभाळायचं म्हणून मी शिकायचं नाही हे त्यांचं त्यांनीच ठरवून टाकलं. सातवीचे वर्ग भरले. शिक्षक घरी समजावायला आले. पण त्यानं फार फरक पडला नाही. मला शिकायचंय हे मला माहित होतं. शिक्षण अर्धवट सोडून मुंबईला धुणीभांडी करायला गेलेली गावातली माणसं मला माहित होती. मला शिक्षण सोडून आयुष्यभर असं करणं शक्य नव्हतं. घरी आईला सांगायचो, “मला शाळेत घातलं नाय तर मी बावीवर नायतर खाणीत जीव देईन - सांगून ठेवतो.”
कुणी लक्षच देत नाही म्हटल्यावर खरंच मी जीव देण्यासाठी खाणीवर पळायला लागलो. जांभा दगडाच्या खाणी आमच्या घराशेजारीच होत्या. पावसाळ्यात तिथलं काम बंद असायचं. चिरा काढून काढून त्या बऱ्याच खोल गेलेल्यामुळे पावसाळ्यात पाणी भरलेलं असायचं. मी पुढे आणि माझ्यामागे पळणारी आई. हे असं दोनतीनदा झालं. मी हट्टी होतो. खरंच जीव वगैरे द्यायचो म्हणून नाईलाजाने दोन महिन्यांनी मला पुन्हा शाळेत घालण्यात आलं.
सातवीत वर्गातून दुसरा आलो तेव्हा घरचे म्हणाले, “काम करून शिक. तुला शिकवायची काय आमची ऐपत नाय.”
आणि मग मी काम करून शिकायला मुंबईत आलो. मुंबईनं स्वतःच्या पोरासारखा माझ्या टाळूवरून हात फिरवला. दादरला एका कुटुंबाकडे मी घरकाम करायला राहिलो. अट एवढीच की मी त्यांच्याकडे काम करायचं आणि त्या बदल्यात त्यांनी मला शिकवायचं. पुढे वरळीला एका रात्रशाळेत दहावीपर्यंत शिकलो. तिथेच एका प्रॉडक्शन हाऊस मध्ये दिवसा काम आणि रात्री शाळा. दहावीला वर्गातून तिसरा आलेलो. शाळेच्या दिवाळावर फोटोसहित नावाचं बॅनर पाहून वरळी सीफेसला जाऊन रडलेलो. हे लख्ख आठवतंय. परळच्या एका रात्र महाविद्यालयात मराठीत बीए आटपून घेतलं. गावात पदवीधर होणारा मी पहिला मुलगा.
सीएसटीला पत्रकार संघात पत्रकारितेच्या कोर्सला प्रवेश घेतला. तिथेही तिसरा आलो. कोर्सला शिकवायला येणाऱ्या एका जेष्ठ पत्रकाराच्या ओळखीवर मराठीतल्या एका बड्या पेपरात जागा आहे म्हणून कळवलं. मुलाखतीला जायच्या आधी कळलं चार हजार पगार आहे. मी तर एवढे पैसे दर महिन्याला आईला गावी पाठवत होतो. नाद सोडला!

एमएला मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतला. आणि एका प्रकाशन संस्थेत सहाय्यक संपादक म्हणून काम करायला लागलो. पैसे फार मिळत नसले तरी जेवढे मिळतात तेवढे या ढासळत्या काळात मला महत्त्वाचे वाटतात. गावात पोस्ट ग्रॅज्युएट होणार मी पहिला आहे.
अजून एक सांगायचं तर मी ‘टिंब’ या माझ्या फेसबुक पेजवरून पुस्तकं विकतो. चांगली पुस्तकं चांगल्या वाचकांपर्यंत पोहोचवणं हे त्यामागचं कारण. थोडे पैसे मिळतात, दगदग होते पण ती हवीहवीशी वाटते. स्वतःवरचा विश्वास आणि पडेल ते काम करण्याची माझी तयारी असल्यामुळे मी सगळं निभावून नेलं. माझ्यातल्या व्यक्तिस्वातंत्र्याला मी असं जपलं. ‘स्वातंत्र्य म्हणजे बंधनांचा अभाव’ अशी ढोबळ आणि वरवरची व्याख्या आपल्याकडे केली जाते. मुळात स्वतःला ओळखणं हे स्वतंत्र असण्याशी कुठेतरी बांधलेलं आहे असं मला अनेकदा जाणवत आलंय. माझ्या स्वातंत्र्याच्या व्याख्या किंवा त्याची दिशा मी स्वतःच ठरवली म्हणून कदाचित मला ते जपता आलं.
अरुणा सबाने
नुकतंच मी नवऱ्याचं घर सोडलं होतं. खरं म्हणजे त्या घरातून, त्या संसारातून सुटका होणं म्हणजे अक्षरशः तुरुंगातून सुटण्यासारखंच होतं. आता मी माझ्या मनाप्रमाणे मी जगु शकणार होते. म्हणजे काय? तर मी मला आवडतात ते पदार्थ बनवून खाऊ शकणार होते, जिथे जावेसे वाटेल, तिथे जाऊ शकणार होते, ज्या ठिकाणी बसावेसे वाटेल, त्या ठिकाणी बसू शकणार होते, आवडती गाणी ऐकू शकणार होते, पुस्तके वाचू शकणार होते, मला हव्या तशा कथा लिहू शकणार होते. आता मला ''हा नायक कोण, तो तुला कुठे भेटला, असे प्रणय प्रसंग तू का उभे केलेस, हा अनुभव तू कुठे घेतला?’ असले पांचट प्रश्न मला कुणीही विचारणार नव्हते. मला हार्मोनियम शिकायचे होते, खूप काम करायचे होते, मोर्चात सहभागी व्हायचे होते. गेली १७ वर्षे मी केवळ कुणाला चांगलं वाटावं म्हणून जगले होते. पण ज्याच्यासाठी मी माझी शक्ती खर्ची घालत होते, त्याला त्याचं काहीही सोयरसुतक नव्हतं. तो त्याच्या गुर्मीत जगात होता. पण शेवटी एक दिवस जेव्हा सगळंच सहनशक्तीच्या पलीकडे गेलं तेव्हा मी घर सोडलं. आईकडे गेले. मानसिक अवस्था सावरण्यात दीडदोन महिने गेलेच. एकदिवस मी आईला म्हणाले, ''आता मी नोकरी करणार''.

''का? कशाला? कुठे? इतकी काय घाई आहे? थांब बेटा जरा.''
''नाही ग. आता थांबायला कुठे वेळ आहे? मी नागपूरला जाते आणि नोकरी शोधते.''
बरीच चर्चा झाल्यावर नाईलाजास्तव तिने शेवटी होकार दिला आणि तिथून माझ्या वर्धानागपूर चकरा सुरु झाल्या. वर्ध्याहून सकाळी ९ च्या बसनी नागपूरला यायचं, संबंधित कार्यलयांमध्ये चकरा मारायच्या सायंकाळी वर्ध्याला घरी परतायचं. नोकरी काही सापडेना. एक दिवस सकाळपासून भटकून एकही काम नीट झालं नाही. सात वाजले. बसेस आल्या पण खचाखच भरून. जीव पूर्ण कावलाच होता. तेवढ्यात कुठलीशी एक बस येऊन माझ्या पुढ्यात थांबली. मी काहीही विचार न करता बसमध्ये चढले. बसायला बऱ्यापैकी सीट मिळाली. बसल्याबरोब्बर रिलॅक्स वाटले. जरा वेळाने टिकटिक करत कंडक्टर आलाच,
“कुठे?”
“शेवटचा बस स्टॉप कुठला?”
“भरत नगर”
“एक तिकीट द्या”

मी पैसे दिले, त्याने तिकीट दिले. बस आपल्या तालात धावत होती, मी माझ्या तालात डोळे मिटून शांत बसले होते. शेजारी कोण येऊन बसलं, कुठे उतरलं काही माहिती नाही. शेवटचा बस स्टॉप आला, कंडक्टर ओरडला, "अहो बाई, उतरत नाही का?"
त्याला म्हटलं, "आता ही बस कुठे जाणार?"
"परत सोनेगाव."
"मग चला, मला तिकडेच जायचंय." विचित्र नजरेनं त्यानं माझ्याकडे पाहिलं, त्याला मी ठार वेडी वाटले असेल.
१५ मिनिटानंतर बस सुटेल, असे जोरात ओरडून तो गेला. मलाही कुठे घाई होती? निवांत बसून राहिले. आजूबाजूला बघितलं तर पाणीपुरीवाला उभा. त्याच्याजवळ जाऊन आरामात पाणीपुरी खाल्ली. टेलीफोन बुथवर जाऊन आईला फोन केला, “उशीर होतो आहे, काळजी करू नको”
जरा वेळानं कंडक्टरनं बसची बेल मारून आवाज दिला, मी बसमध्ये बसले.
"कुठे?"
"छत्रपती नगर चौक."
त्यानं माझ्याकडे तिकीट देताना, 'मूर्ख आहे का ही बाई? आता तिथूनच आली, तिथेच चालली,' या अर्थी माझ्याकडे बघितलं; पण आज मला कोण काय म्हणतय याचा विचारच करायचा नव्हता. छत्रपती चौकला पोचेपर्यंत आठ वाजून गेले होते. वर्ध्याच्या भरलेल्या बसेस येत आणि झर्रकन पुढून निघून जात. शेवटी रात्री ९ ची रातराणी थांबली. त्यातही खिडकीत जागा मिळाली. रात्रीच्या केवळ २ तासांच्या त्या प्रवासाची लज्जत आजही माझ्या मनावर रेंगाळत आहे. रात्रीचा प्रवास तर मला आजही प्रचंड आवडतो. आज वाटतं, किती क्षुल्लक गोष्ट आहे ही! त्यानंतर जपान, अमेरिकेपर्यंत एकटीने प्रवास करून आलेली, रात्रभर गाडी ड्राईव्ह करून औरंगाबाद, पुण्यापर्यंत जाणारी मी! मला त्याक्षणी हा साधा 2 तासांचा प्रवास किती सुखदायी वाटला. माझ्या स्वातंत्र्याचं जणू सिलिब्रेशन होतं ते. तो २ तासांचा प्रवास माझ्या पुढल्या मुक्त आयुष्याची नांदीच होती जणू!