“रात के सोने एक बाद निंद खुली नही तो अच्छा होगा,ऐसा मुझे हर सुबह लगता है!” गोगुंदा भाभी सांगत होत्या.
त्या आणि मी लस घेण्यासाठी एका रांगेत उभे होतो. आतापर्यंत झाकून ठेवलेलं त्या तोंडावर मास्क लावून आज उघड करून सांगत होत्या. त्या गेल्या २५ वर्षांपासून इथे राहत आहेत. त्यांच्या नवऱ्याचा सिमेंट,फरशा विकण्याचा व्यवसाय आहे. तो ३० वर्षापूर्वी राजस्थान मधून इथे आला आणि इथलाच झाला. गोगुंदाभाभी लग्न होवून इकडे आल्या तेव्हा त्या मोठा घुंगट घ्यायच्या. हातात कोपरापर्यंत रंगेबेरंगी बांगड्या, केसात बिंदी आणि ओठाला लिपस्टिक असायची. आता मात्र त्या कधीमधीच घुंगट घेतात.
भाभी म्हणाल्या,“अभी आज का च देखो ना ,मुझे लस लेने के लिये ईधर आना था,तो बोले - रोटी जादा करके रख, नही तो तेरा हाथ दुखेगा और मैं भूखा रह जाऊंगा”
“त्यांनी घेतली का लस?”
“ली ना! उसका नाटक तो पुछो मत. घर आते ही सो गये. जैसे कोई बिमार आदमी है,सब खानापिना बेड पर ही मांगा,”
“अहो, काहींना त्रास होतो”
“मैने सुना है की १२ घंटे बाद तकलीफ होती है, मगर ये तो आतेही शुरू हो गये.”
“तुम्ही कधी पासून स्वयंपाक करता?”
“मैं बहुत छोटी याने की पहिली दुसरी की कक्षा मैं पढती होगी, तबसे मैं रोटी बेल रही हुं.”
“तेव्हापासून तुम्हांला यायला लागल्या?”
“तो? हमारे मे तुम्हारे जैसा लाड नही होता. आदमी लोग भी पाचवी कक्षा से दुकान पे या साईट पे काम करने के लिये जाता है, गोकुळ के पापा तो बहुत छोटे थे तभी से फरशी लगाने के काम करते हैं.”
“तुम्हांला कंटाळा नाही का येत स्वयंपाकाचा?”
“मैं तो हमेशा बोलू की औरत का मरने का टाईम आयेगा ना, तो भी वो बोलेगी -रुको मैं किचन का ओटा साफ करके आती हुं” - असं म्हणून त्या जोरजोरात हसू लागल्या.त्या हसण्यामागे खूप काही त्या लपवत असणार.
“तुम्ही सगळा स्वयंपाक करून आल्या का मग?”
“हां तो! अरे इतनाच नहीं, आज इनके रिपोर्ट आये तो उन्हे समझा की उन्हे शुगर नहीं है. तो बोले, ‘आज थोडा सुजी का हलवा बना, नही तो खीर बना’ मैं बोली आके बना देती हुं, तो बोले, नही नही तुम्हांला हाथ दुखेगा तो तुमसे नहीं होगा. फिर मैं बोली, आप आपने हाथ से बनाओ. उन्हे सबकुछ आता है,लेकिन करने का नहीं. बोलते है कि तुम्हांरे जैसा नहीं बनता.”
“तुम्हांला खूप कंटाळा येतो का स्वयंपाक करण्याचा?”
“आके भी क्या कर सकती हुं मैं? बाहर जाके काम करेंगे तो भी रसोई तो करनी ही पडती हैं, इसलिये तो मैं बोलती हुं, सोने के बाद निंद खुले ही नहीं मेरी. पर क्या करे हर रोज सुबह होती है और एक कप मसाले की चाय पी लेकर मैं काम करने की हिंम्मत जुटती हुं. गांव जाके जादा थकने से यहां अच्छा हैं. मैं आपने मन की मालिक तो हुं. आसपास गप्पे मार सकती हुं आणि थोडा फार सिलाई करके पैसा भी बचाती हुं.”
“त्या पैशाचे काय करता?”
“सच बोलू - बाजार करने के लिये जाती तब ढोकळा,काजू कतली,पाव लेकर आती हुं, ऐसी मैं खुद को छुट्टी लेती हुं” - हे सांगतांना त्या फार खुशीत होत्या.
“देखो आज घर जाके मैं भी बिलकुल लेट जानेवाली हुं,देखना तुम,”
“तेवढाच तुम्हांला आराम...”
“आराम कैसा करने का मैं सिख रही हुं” असं म्हणत गोगुंदा भाभीनी आपल्या डोक्यावरचा पदर सावरला आणि लस घ्यायला गेल्या.