आम्ही स्त्रीपणाच्या ठरवून दिलेल्या प्रचलित चौकटीत स्वतःला कधीच न बांधून घेणाऱ्या मुली!
मित्रांनाही धाकात ठेवून त्यांना चार फटके लगावणाऱ्या आम्ही मुली!
‘तुम्ही काय मुली आहात? वागणं तरी तसं आहे का तुमचं?’ असे टोमणे ऐकणाऱ्या आम्ही मुली!
आणि
वेळप्रसंगी आम्हाला ताडणाऱ्या काकांना “काका, पुढे बघा!” असंही ऐकवणाऱ्या आम्ही मुली!
व्यक्ती म्हणून आम्ही स्वतःला केवळ लिंगाच्या आधारावर बांधलेल्या सामाजिक चौकटीत जखडून घेत नाही. आम्ही जेव्हा कोणीतरी वेगळं बनण्याचा प्रयत्न करायला लागतो, तेव्हा आपोआप भोवतालच्या 'सर्वमान्य' रूढी, जीवनशैली याबद्दल असंख्य प्रश्न उद्भवायला सुरुवात होते. पण आमच्या वयाच्या इतर मुली स्वतःकडे कसं बघतात? समाजाकडे कसं बघतात? मुळात आपण ‘असुरक्षित’ आहोत असं त्यांनाही वाटतं का? मुलींचं बोल्ड आणि बिनधास्त असणं, मुलींनी sexuality बद्दल उघडपणे बोलणं ह्याबद्दल त्यांना काय वाटतं? - हे प्रश्न आम्हाला गेले काही दिवस अस्वस्थ करत होते. खरं तर मुलींची सुरक्षितता, त्यांचे असंख्य प्रश्न, त्यांच्यावरची बंधनं याबद्दल किती वेळा विविध माध्यमांतून कितीतरी जणांकडून लिहिलं, बोललं गेलंय. जेव्हापासून स्त्रियांना जखडून ठेवण्याचे प्रयत्न होत आले तेव्हापासूनच स्त्रीला तिचं माणूसपण मिळवून देण्यासाठी झगडणारा एक प्रवाहदेखील आहे! तरीही वर्षानुवर्षांनंतरसुद्धा जर तेच प्रश्न असतील तर ते वारंवार पुढे आणायला नकोत का? म्हणून आम्ही बऱ्याच समवयस्क मुलींशी बोललो…अगदी निवांत गप्पा मारल्या. तशा सगळ्याजणी पुणेकर, कॉलेजात शिकणाऱ्या ... बऱ्याचजणी बिनधास्तपणे बोलल्या पण काही मुली ह्या विषयांवर बोलायला अजिबात कम्फर्टेबल नव्हत्या. पण ज्या बोलल्या त्या अगदी मूलभूत आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर व्यक्त झाल्या. त्यांच्याशी संवाद साधताना जाणवलेली तगमग, खंत, स्वत्व शोधण्यासाठीची धडपड आणि निर्भीडपणातही दडलेली भीती आम्हाला सगळ्यांच्या समोर मांडायची आहे!

मुली आणि असुरक्षितता हे समीकरण समाजाने सोयीस्करपणे घालून ठेवलेलं आहे आणि ते आमच्यावर सतत बिंबवलं जातं. आम्हाला जाणून घ्यायचं होतं की - ह्या मुलींनाही असुरक्षित वाटतं का?
हा प्रश्न विचारताक्षणी पटकन एकीचं उत्तर आलं, “असुरक्षित वाटत नाही असं म्हणणं खोटं ठरेल. I do feel unsafe” मग unsafe वाटतं म्हणजे नक्की काय ?
यावर काही स्वाभाविक उत्तरं अशी आली की
- “रात्रीच्या वेळी एखाद्या निर्मनुष्य रस्त्यावरून जाण्याची वेळ आलीच तर भीती वाटते”
- “सतत कुणी आपला पाठलाग तर करत नाही ना असे विचार मनात येत असतात.”
- “याच आधारावर जर प्रियांका रेड्डी बलात्कार आणि हत्या प्रकरण बघितलं तर वाटतं आज मी ओळखीच्या शहरात, ओळखीच्या लोकांमध्ये सेफ असले तरी उद्या एखाद्या नवीन किंवा अनोळखी ठिकाणी गेल्यावर काय?”
- “अशा घटना ऐकल्यावर मानसिक संयम ढासळतो. जर इतक्या नियोजन पूर्ण पद्धतीने अशी घटना घडवून आणली जात असेल तर आपण त्याचा विचार सुद्धा करू शकत नाही, it is that horrible!”
आजकाल digital platform वर देखील मुलींना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्यांना यामुळे देखील असुरक्षिता जाणवते ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मुलींवर होणाऱ्या अत्याचारांची व्यापकता ही खरोखर समोर येणाऱ्या घटनांपेक्षा बरीच मोठी आहे.
श्रुती सायकॉलॉजीची विद्यार्थिनी आहे - तिने स्वत:चा अनुभव शेयर केला, “आम्ही मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या किती केसेस दाखल केल्या जातात याचा एक अभ्यास करत आहोत. जवळपास शंभर मुलींशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं की घटना दाखल करायचं किंवा न करायचं प्रमाण ५०-५० टक्के आहे. पण अनेक महिलांशी बोलून आमच्या असं लक्षात आलं की प्रत्येक महिलेवर कुठल्या न कुठल्या प्रकारचा अत्याचार झालेलाच आहे! जेव्हा एखादी बलात्काराची घटना घडते तेव्हा ह्या गोष्टी समोर तरी येतात; पण महिला रोज ज्या प्रकारच्या घटनांना सामोऱ्या जातात, त्याबद्दल काही बोललंही जात नाही.”
मुळात बलात्कारासारखे अत्याचार होण्यामागची नेमकी कारणं मुलींना काय वाटतात?
याबद्दल मेडिकल कॉलेजच्या मैत्रिणी म्हणाल्या, “रेपिस्ट्सची मानसिकता तपासली पाहिजे, They are not normal people, त्यांच्यावर काही कायदेशीर कार्यवाही करण्यापेक्षा त्यांची psychological treatment करणं जास्त गरजेचं आहे. Because once a rapist always a rapist.”
फक्त ही कारणं जाणून न घेता त्यावर विचारपूर्वक पावलं सुद्धा उचलली गेली पाहिजेत’ असं काहींचं मत आहे.
“ते असे का वागतात, त्यामागे त्यांची काही कौटुंबिक पार्श्वभूमी आहे का ज्यामुळे त्यांची वृत्ती अशी झाली आहे किंवा त्यांच्यात काही hormonal disturbances आहेत का? याचा देखील विचार झाला पाहिजे” – असंही काहीजणी म्हणतात.
"अशा प्रकारचे कृत्य करण्यामागे अनेक कारणं असू शकतात, त्यातलं एक म्हणजे revenge आणि दुसरं aggressive behaviour. "
"काही पुरुषांची एक विशिष्ट प्रकारची मानसिकता असते, त्यांना ‘नकार’ सहन होत नाही, एखाद्या मुलीने जर आपल्याला नकार दिला तर – ‘ती असं करूच कसं शकते’ - ह्या भावनेतून असे प्रसंग उद्भवतात."
"मुलींचा पोशाख हे काही कारण असू शकत नाही." रेपिस्ट्सची लैंगिक तहान भागवण्यासाठी आणि त्यांचं पुरुषी वर्चस्व दाखवून देण्यासाठी केलेलं हे कृत्य असतं. तिचं वैयक्तिक आयुष्य तर खालावतंच पण तिची सोशल लाईफ सुद्धा संपून जातं आणि ती स्वतःलाच दोष देऊ लागते. लोक त्या मुलीकडे सतत एका व्हिक्टीमच्या नजरेने बघत असतात आणि याचं कायम तिच्यावर एक मेंटल बर्डन असतं.बलात्कारानंतर मुलीवर शारीरिक परिणामांपेक्षा मानसिक परिणाम जास्त होतात, आणि ते तितक्याच भयानकरित्या होतात.
“शिवाय बलात्कार झाल्यानंतरच्या मेडिकल प्रोसिजरमध्ये मुलीच्या काही टेस्ट केल्या जातात आणि त्यासाठी मुद्दाम पुरुष डॉक्टर्सना पाठवलं जातं - ही सुद्धा विकृतीच आहे. त्या मुलीच्या मानसिक स्थितीचा त्याक्षणी सुद्धा विचार केला जात नाही” - ईशा तिची तगमग व्यक्त करताना म्हणाली.
मुलीवर दोष टाकण्याची वृत्ती ही पितृसत्ताक समाजाचं लक्षण आहे, असंही मत व्यक्त झालं.

सोनिया म्हणाली, “एक समाज म्हणून आपली मूल्यव्यवस्था नापास झालेली आहे आणि त्यामुळे मुलीला दोष देणं हे लोकांना नैतिकदृष्ट्या सोपं वाटतं”. लोकांचा अशा असंख्य घटनांकडे पाहण्याचा एक passive attitude जाणवतो. त्यामुळे लोक स्वतःहून तर काही पाऊल उचलत नाहीच पण दुसऱ्या कोणाच्या समोर येण्याची वाट बघत असतात.
समाजशास्त्रीय अभ्यासकांच्या वर्तुळात एक असा देखील समज आहे की निर्भया प्रकरणातली मुलगी एका आदर्श मुलीच्या चौकटीत बसणारी होती आणि म्हणून ते प्रकरण ग्लोरिफाय केलं गेलं. ती एकटी नसून तिच्या मित्राबरोबर होती. If she was alone and coming from a pub, the scenario might have been different.
लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांवर बलात्कार होतात. आता यापलीकडे जाऊन प्राण्यांवर देखील बलात्कार होतात,असं आपण ऐकतो. हे भयानक आहे. सतत ह्या घटना कानावर पडत असल्यामुळे मनात कायम असुरक्षिततेची भावना असते.
सुरक्षा, असुरक्षा ह्या मुलभूत पण महत्त्वाच्या प्रश्नांच्या पलीकडे एक वेगळाच मुद्दा जाणवतो, तो म्हणजे व्यसन. मग ते स्मोकिंग असो किंवा ड्रिंकिंग! ड्रग्स सुद्धा! ‘आयुष्यात एकदा तरी ट्राय केलंच पाहिजे’ या मित्रमैत्रिणींच्या सहज सल्ल्याने सुरुवात तर होते; पण त्याचं सवयीत कधी रूपांतर होतं हे समजत नाही. कुठलंही व्यसन करणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असला तरी - 'मुली आणि व्यसनं’ हा त्यातल्या त्यात सर्वाधिक चर्चेचा आणि वाद्ग्रस्त विषय. मुली सिगारेटच्या टपरीवर उभं राहून सिगारेट ओढतात म्हटलं की आजूबाजूच्यांचे डोळे वटारलेलेच दिसतात, 'मुली'ने वाईन शॉप मध्ये उभं राहून दारू विकत घेतली तर काय अनर्थ होतो? सिगारेट, दारू यांचे दुष्परिणाम सगळ्यांसाठी सारखेच असतात. त्यामुळे ते कोणीच करू नये अशी सुध्दा बऱ्याच जणींची मतं होती.

मग असं असूनही मुली ह्या व्यसनांकडे का आकर्षित होत असतील? असं विचारल्यावर सहज एक उत्तर पुढे येतं की "कदाचित त्यांच्यासाठी मोकळीक अनुभवण्याचा हा एक मार्ग असू शकतो. इट्स अ वे टू रिबेल... कारण मुलींना नेहमीच फक्त त्यांच्यावर लादलेल्या बंधनांना सामोरं जावं लागतं.”
"मुलांनी स्मोक करणं आणि मुलींनी करणं ह्यात नेहमीचाच वाद आहे. मुलांनी केलं तर ते कूल, पण तिथेच मुली स्मोक करत उभ्या असल्या तर त्या 'असंस्कारीत'? ड्रिंक्सचं सुद्धा तेच... जर मुलगी सार्वजनिक ठिकाणी उभी राहून स्मोक करताना दिसली की लगेच तिच्या 'upbringing' वर प्रश्न उभे राहतात. त्यामुळे मुलगी म्हणून मला स्मोक किंवा ड्रिंक करण्यासाठी एखाद्या 'सेफ' जागी जावं लागतं जिथे मला कोणी ओळखत नसेल. मुलगा असते तर मला ह्या गोष्टींचा विचार करायला लागला नसता”, असं एक मैत्रीण सांगते.
जेव्हा आपण हॉटेलमधेही जातो तेव्हा ड्रिंक्स ऑर्डर करताना वेटर्सकडूनही असाच समज केला जातो की मुलगा असेल तर हार्ड ड्रिंक्स घेईल आणि मुलगी आहे, फार फार तर वाईन किंवा बिअर घेईल. 'जस्ट अ मॉकटेल फॉर द लेडी!'
“समाजाचं तर जाऊच दे.. जर मी मुलगा असते तर कदाचित मी माझी पहिली बिअर माझ्या बाबांबरोबर प्यायले असते. अनफॉर्च्युनेटली मी ड्रिंक करायला जातेय हे घरी सांगण्यासाठी दोनदा विचार करावा लागतो.”- ही वैयक्तिक खंत मुलींनी बोलून दाखवली.
या सगळ्या चढाओढीत हरवून बसलेलं असतं ते आमचं स्वतंत्र अस्तित्व. आमचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व. सोनिया खूप सहज बोलून गेली “नेहमी असं म्हणतात a mother always gets the last piece of the cake. But why? Isn’t she a human first? तिला केक किंवा चॉकलेट्स आवडत नसतील? आई असली की तिने त्याग केलाच पाहिजे हे कोणी ठरवलं?” ह्या गोष्टी वाटत जरी साध्या असल्या तरी तितक्या साध्या नाहीत. ह्याची पाळंमूळ खोलवर रुजून त्यावरच पितृसत्तेचा मोठा वृक्ष विस्तारलेला आहे.
Evolve होणं हे निसर्गाचं चक्र आहे, मुली-स्त्रिया विचारांनी evolve होतील, बोलतील, पण म्हणून स्वतःसाठी उभी राहणारी बोलणारी सक्षम स्त्री म्हणून समाज तिच्याकडे पाहणार आहे का? की “Vocal woman is easy woman” असंच तिच्याकडे बघितलं जाईल? आंचल म्हणते, “अजूनही एका स्त्रीला व्यक्त होण्याआधी हजार वेळा समाजानी घालून दिलेल्या स्वतःच्या चौकटी पडताळून पाहाव्या लागतात, she also has to make sure that she is not being too outspoken or too opinianated”
मग एक मुलगी असणं हे त्यांच्यासाठी काय आहे किंवा स्त्रीत्वाची त्यांची नेमकी परिभाषा काय आहे?
काही जणींना हा प्रश्न विचारल्यावर त्या बुचकळ्यात पडल्या कारण त्यांनी याचा कधी विचारच केला नव्हता. याउलट काहींचं असं मत आहे की, ‘केवळ माझी तुलना एका पुरुषाशी आहे म्हणून मी मुलगी नाही. I am an independent woman आणि स्त्री म्हणून जगणं ही माझी निवड आहे.’
“मुळात स्त्री आणि पुरुष यांची स्वतंत्र अस्तित्व आहेत. त्यांच्यात तुलना केली जाऊ शकत नाही. पुरुष हा दणकट आणि त्या तुलनेत स्त्रीने नाजुक किंवा ग्रेसफुल असावं अशी अपेक्षा असते, ह्या तुलनेला कुठला आधार आहे?” असा प्रश्न सोनिया रंगोळेला पडलाय.
इथे हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की, बाळ जन्माला आल्यापासूनच किंबहुना जन्माला यायच्या आधीपासूनच 'मुलीला पिंक आणि मुलाला ब्ल्यू' रंगाचे टॅग्स लावले जातात. ह्या गोष्टी वाटायला खूप गोड वाटत असल्या तरी त्यामागे पेरल्या गेलेल्या लैंगिक साचेबद्धतेचा विचार केला गेला पाहिजे. एरवी 'western culture'ला नाकारणाऱ्या आपल्या दुटप्पी समाजाने ही पाश्चात्य पद्धत मात्र सोयीस्करपणे आपलीशी करून घेतली. जन्मल्यापासूनच मुलींना नाजुकसाजुक,सौम्य प्रतिमांशी जोडून टाकण्याचा हा आणखी एक प्रयत्न असतो. कदाचित म्हणूनच सोनिया सांगते की - “माझी स्त्री असण्याची व्याख्या ही एका पुरुषाशी तुलनात्मक नसावी, आधी एक माणूस म्हणून माझ्याकडे बघितलं गेलं पाहिजे,”
स्त्री-पुरुष, त्यांच्यातली तुलना याही पलीकडे जात श्रुतीला असं वाटतं, “माझं फेमिनीन असणं ही माझी निवड आहे. असं मानलं जातं की जर तुम्ही स्त्रीवादी असाल तर तुम्ही फेमिनीन राहू शकत नाही पण जर मला तसं रहायला आवडत असेल तर मी का राहू नये? मी जशी दिसते, जशी राहते त्यापासून माझे विचार वेगळे असू शकतात. मला मुलगी म्हणून जसं रहायला आवडतं ती माझ्यासाठी माझी ‘ग्रेस’ आहे. जर एखाद्या मुलीला टॉमबॉयप्रमाणे राहायला आवडत असेल तरीही ती माझ्यासाठी तितकीच स्त्री आहे. If she feels like a woman, she is a woman”.
आंचल म्हणते, “जेव्हा एक मुलगी असणं माझ्यासाठी काय आहे याचा विचार मी करते तेव्हा हे लक्षात येतं की मुलगी म्हणून मी सतत conscious असते आणि माझ्या आजूबाजूचं वातावरण जाणीवपूर्वक मला त्या गोष्टीबद्दल सावध ठेवत असतं”.
'लैंगिक समते’चं वास्तवात रूपांतर व्हायला ‘१०० हून अधिक वर्षे लागतील' असा अहवाल WEF ने दिला आहे. आंचलला याबद्दल वाटतं – “माझी अशी इच्छा आहे की पुढील 100 वर्षात माझ्या मुलीला किंवा तिच्या मुलीला त्यांच्या स्त्री असण्याबद्दल सतत जागरूक राहावं लागणार नाही आणि स्त्रीपुरुष समता ही फक्त कल्पना न राहता वास्तव असेल. तोपर्यंत आपण सगळे मुलगी असण्याचा अर्थ पुनःपुन्हा परिभाषित करत राहू.”