नसतोस घरी तू जेव्हा


मूळ कविता 
नसतेस घरी तू जेव्हा
 जीव तुटका... तुटका होतो
 जगण्याचे विरती धागे, 
संसार फाटका होतो. 

नभ फाटून वीज पडावी 
कल्लोळ तसा ओढवतो 
ही धरा दिशाहीन होते 
अन चंद्र पोरका होतो 

येतात उन्हे दाराशी 
हिरमुसून जाती मागे 
खिडकीशी थबकून वारा
 तव गंधावाचून जातो 

ना अजून झालो मोठा 
ना स्वतंत्र अजुनी झालो 
तुज वाचून उमजत जाते 
तुज वाचून जन्मच अडतो 

तू सांग सखे मज काय 
मी सांगू या घरदारा 
समईचा जीव उदास
 माझ्यासह मिणमिण मिटतो 

तव मिठीत विरघळणार्या 
मज स्मरती लाघववेळा 
श्वासांविण हृदय अडावे 
मी तसाच अगतिक होतो


संदीप खरे 
Subversion 
नसतोस घरी तू जेव्हा 
जीव हलकाफुलका होतो. 
जगण्याचे होते गाणे
 संसार नेटका होतो 

नभी चमकून जाते वीज 
जल्लोष मनामधी होतो 
ही धरा सुगंधित होते 
अन हास्य मोहरत राहते 

थबकती उन्हे दाराशी 
मी ऊब पांघरून घेते 
खिडकीशी थबकून मीही 
गंधित वारा अनुभवते 

तव मिठीत घुसमटलेल्या 
मज स्मरती उदास वेळा 
श्वासात अडकती श्वास 
जीव माझा अगतिक होतो 

मी कधीच झाले मोठी 
मी झाले स्वतंत्र थोडी 
तू नसता उमलुनी आले
 गाईन सुखाचे गाणे 

तू मागू नको मज काही 
घेऊ दे मला विश्रांती 
खळखळून हसू दे थोडी 
आता उत्फुल्ल जगू दे


अश्विनी बर्वे 
वंदना खरे 

1 Comments

  1. There is a very expressive scene in the movie, Modern Times, at very beginning. You have put it in words in a different way. Thanks

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form