लक्ष्मिपूजनाचा विधी होत असताना तांदळावर "सुषमा" हे नाव पाहिलं अन् जीव भांडेमेच पडा....(सुनील..सुषमा जुळलं ना त्यामुळे ..बच गया साला...)
पण आडनाव मात्र बदलंलं...लग्नानंतर दोन दिवसात बाहेर फिरायला निघालो...विमानानी जायचा बेत केला होता सुनिलनी...म्हणजे माझं सासर श्रीमंत होतं असं नाही हो, पण सुनिलनी मला लग्नाआधी विचारलं होतं, विमानात बसलीयस का?...मी नाही म्हणाले...म्हणून विमानप्रवासाचा घाट....तर बरेच लवकरसे विमानतळावर पोचलो...सोपस्कार करून Departure gate वर पोचलो....तिथे बसलो...मधुनमधून गप्पा चालूच होत्या....इतक्यात साधारण ४५-५० चे नवराबायको आमच्या जवळ बसायला आले...बरं त्यांनी शेजारी शेजारी बसावं ना तर नाही...(बरीच वर्ष लग्नाला झाली असणार) ...बाई माझ्या उजवीकडे शेजारच्या खुर्चित तर बुवा सुनिलच्या डावीकडच्या खुर्चित....मग गप्पा सुरू झाल्या....१०मिनीटानी मला बाईंनी नाव विचारलं....मी सवयीनी सुषमा घाटपांडे असं सांगितलं....मग थोड्यावेळात बोर्डिंग सुरू झालं ....सीटवर बसलो तर ती दोघं आमच्या शेजारच्याच सीटवर मधे फक्त पॅसेज....५ एक मिनीटानी ते दोघं विचित्र नजरेनी आमच्याकडे पहायला लागले...काही कळेना...दीड तासभराच्या प्रवासात हे घुरणं चालूच....जयपुरला उतरलो आणि हाॅटेलवर जाताजाता मी सुनिलशी ही गोष्ट बोलून दाखवली....त्यानीही काय की करून खांदे उडवले...मग सहज मी त्याला विचारलं... ते काका काय गप्पा मारत होते.... आणि बोलता बोलता लक्षात आलं की नाव विचारल्यावर सुनिलनी "सुनिल परचुरे" आणि मी "सुषमा घाटपांडे" अशी वेगवेगळी आडनावं सांगितल्यामुळे... आणि मी लग्नाचा दागीने, चुडा वगैरे जामानीमा उतरवून ठेवल्यामुळे गैरसमज झाला असणार की हे दोघं बीनलग्नाचे पळून चाललेत की काय! ...पण आता हा गैरसमज दूर करणं कठीणच.
अशी सुरवातीलाच गडबड हो....फिरून परत आलो आणि पहिल्या दिवशी ऑफिसला निघाले....मागून पुतण्या "काकू...टाटा" अशा हाकाट्या करत होता... आडनाव सवयीचं नव्हतं तसंच नातीही...शेवटी रस्त्यातल्या माणसानी मला सांगितलं -"अहो, तुम्हाला तो छोटा बोलावतोय" तेव्हा लक्षात आलं......सब गडबड.... सब गडबड!
बरं स्टेशनवर पोचले... आधी Central वाली मी आज Western ला आले...पासबीस काढला बाचकतच गाडीत चढले.... आणि एकदम एक आवाज..."अय्या, सुषम तू इथे?" ... माझी कॉलेजची मैत्रिण....”लग्न होऊन मी गोरेगावला आलेय गं” अस सांगितलं आणि आमच्या जोरदार गप्पा सुरू.....अंधेरी आलं आणि तीने विचारलं "तुझं आताचं आडनाव काय गं?" आईशप्पथ काय आपलं आडनाव?... आत्ता तरी वेळ मारून नेऊ जराश्यानी आठवेल.....वेगळा विषय काढला....गप्पा परत सुरू....पण माझं चित्त रमेना....सतत विचार ....अरे यार माझं आडनाव काय? .....दादर गेलं आणि परत त्या जीवाला माझं आडनांव जाणावंसं वाटलं....परत प्रश्न आणि माझी मात्र परिक्षेला गेल्याल्या उमेदवाराची blank झाल्यावर होते तशी अवस्था....बरं सांगावं की आठवत नाही तर ..कॉलेजातली हुशार विद्य्यार्थिनी आता dumbo झाली - असं वाटेल तिला हा prestige issue....
आता मात्र घाम फुटला...तिलाही दुसरं काहितरी सुचलं आणि मी बचावले तात्पुरती.... आता १५ मिनिटंचं उरली होती ....ती बाँबे सेंट्रल ला उतरणार होती....मग मी मोकळी....स्टेशन आलं आणि ती उतरली ...खिडकीत येऊन गप्पा सुरू....इतक्यात गर्दी कमी झाल्यामुळे गाडीतल्या माझ्या एका आतेबहिणीला मी दिसले...ती तिची जागा सोडून मला पाठीवर थाप मारून म्हणाली..."काय परचुरे मॅडम , कसं वाटतंय"......हाश्श....मला माझं आडनांव सापडलं की....तोपर्यंत गाडी हलली होती...तरी मी तोंड खिडकीला लावून जीवाच्या आकांतानी ओरडले..."अगं नीना, परचुरे आडनांव बरं माझं".....तीही पहातंच राहीली....मग तिच्याही लक्षात आलं असावं ...गाडीनी वेग घेतला होता आणि माझ्या बहिणीनी माझा ताबा घेतला...
अशी आडनावाची गंमत.... आडनाव बदलावं का की दोन आडनावं लावावी ह्या hot discussion च्या पार्श्वभुमीवर मला भूतकाळ आठवला... आम्हा बायकांची ह्या गोंधळातून सुटका करायला तरी उपाय शोधा हो!
अशी आडनावाची गंमत.... आडनाव बदलावं का की दोन आडनावं लावावी ह्या hot discussion च्या पार्श्वभुमीवर मला भूतकाळ आठवला... आम्हा बायकांची ह्या गोंधळातून सुटका करायला तरी उपाय शोधा हो!

सुषमा परचुरे
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वायू प्रदूषण विभागात अधिकारी म्हणून कार्यरत, छायाचित्रकार.
वा..आडनावाच्या विनोदातला अंडरकरंट आवडलाय.
ReplyDelete