दहावी पास होऊन अकरावी साठी मी आणि बंडु तालुक्याच्या गावी परतुरला रूम पहाण्या साठी आलो.
सकाळी दहा वाजल्या पासुन आम्ही शहरात फिरत होतो.प्रत्येक कॉलनीत गेलो की, कुणाला तरी विचारायचो रूम खाली हे का? ऊत्तर यायचं काय करता? कॉलेजला आडमिशन घेतलंय... नाव काय ? कुठले? न् शेवटचा प्रश्न, सोबत कोण राहणार हे तुमच्या ?..कोन्ही नाही आम्ही दोघचं हातानं भाकरी करूण खानार..असं म्हणलं की पुढून ऊत्तर यायचं “रूम नाही”
मंग पुढची गल्ली .असं दुपारी दोन वाजे पर्यंत चालु होत. पुढच्या गल्लीतुन जाताना एक घर ऊघडं दिसलं. म्हणुन त्याच्या पाय़ऱ्या चढलो..बंडु मह्या पुढ...
त्यानं आवाज देला, “काका.”...
सात्विक चेहऱ्याचे लुंगी–बनियान घातलेले काका आले ...
त्यांचा खरकटा हात बघुन ते जेवणाच्या ताटावरूम ऊठून आले, हे लक्षात आलं. मला जर असं कोन्ही जेवनातुन ऊठील तर राग येतो..पण काका शांत होते. “काय रे पोऱ्हायहो..?”
बंडु... “रूम खाली हाईका?”
काका... “हो..या”.
बाहेर हापसा होता त्याला खेटुन आमची रूम. त्यांनी आम्हाला आत येऊन बघायला सांगीतलं. रूम आम्हाला पाहीजे तशी होती. मधे पुडदी(पार्टीशन)घातलेली असल्याने ती दोन खोल्याची वाटत होती. पाठी माघुन एक दरवाजा होता. आम्ही खोली बघुन होऊस्तर एक मुलगी आम्हाला पाणी देऊन गेली. तेवढ्यात आतुन काकी मधला दरवाजा ऊघडुन आत आल्या.
मग दोघांनी मिळुन आमची मुलाखत सुरू केली... “कुठले तुम्ही? ”
“जांबसमर्थ”
“नाव?”
“मी - संभाजी तांगडे हेव रामेश्वर तौर”
“काय करता?”
“आकरावीला आडमिशन घेतलय”
...अन् मग शेवटचा व म्हत्वाचा प्रश्न “भाकरी घालायला कोण येणार?”
हेव प्रश्न आला की मी मनात म्हणलं, चला पुढच्या गल्लीत.
मी तोंड ऊघडणार तीतक्यात बंडु म्हणला “आज्जी!”
म्या बंड्याकड पाहीलं,पण त्यांन मह्याकडं लक्षच देल नाही.
दुसरच काही बाही काकाला विचारायला… “तुम्ही कुठले?... काय करता?... असं बरच बोलनं झालं... तव्हरूक काकीन चाहा करूण आनला...मंग आम्ही भाडं विचारलं...
ते म्हणले, “अडीचशे रुपये महीना...”
मंग बंडुनं घासाघीस करूण सव्वा दोनशेवर रूम फिक्स केली.
काकीनं विचारल, “कव्हा येणार?”
म्या म्हणलं,” सोमवारी”
मंग पन्नास रुपये अडव्हान्स देऊन आम्ही तीथुन निघालो.
मेन रोडवर आल्यावर बंड्याला म्हणलं, “कडु मही आजी मागच्या वर्षीच वारली… अन् तोह्या आजीला आजा हाई, तेव काही आजीला सोडणार नाही. मंग तरीबी आजी येणार असं कामुन म्हणला?”.
मंग तो म्हणी “मंग खोली नसती मिळाली, पाहु पुढच्या पुढी.”
मंग आम्ही यादगार हाटेलीत एकरूपयात भजे जिलाबी खाल्ली,आन् जोशीच्या टेम्पुच्या फालक्यावर बसुन चोविस किलोमाटर लांब कच्च्या रस्त्यानं गावाकडं आलो.

![]() |
मी आणि बंडू |
पुढचे दोन तीन दिवस सामानाच्या आवरा आवरीत गेले.सगळी बांधाबुंध करून सोमवारच्याला आम्ही सामान घेऊन परतुरला आलो. काकीनं रूम साप-सुप करूण ठेवली होती.
आम्हा दोघाला बघुन काकी म्हणल्या ,”आजीला नाही आनलं”?
बंडु म्हणला, “आज्याला बरं नाही.साताठ दिवसानं येईल.”
त्यांनी रूम आमच्या ताब्यात देली अन् त्या पाठी माघं निघुन गेल्या. आम्ही एकमेकां कडं बघुन हासलो.पुढचे दोन-तीन घंटे आमचा संसार लावण्यात गेले. पुढच्या खोलीत गाधीची वळकटी सोडली. माझ्या आईच्या लग्नातल्या फोल्डींगच्या लोखंडी टेबल खुर्च्या होत्या. त्या मी सोबत आणल्या होत्या. टेबल खुर्ची हे जरा एक्स्ट्राच होतं, कारण तसं आम्ही दोघं ही जिव लावुन शिकणाऱ्यातले नव्हतो. पण शोसाठी मी टेबलावर वह्या पुस्तकं रचुन ठेवले. मागच्या खोलीत सोबत आणलेल्या दाळी,पिठ,स्टोव्ह ईत्यादी भांडे-बासणं व्यवस्थीत मांडुन ठुले.सहा वस्ता काका रूम मधे आले.पुढच्या खोलीत पुस्तकं –टेबल-खुर्च्या बघुन काकाला अदाज आला असावा पोऱ्हं खरच शिकायला आलेत. काकानीं पुन्हा तोच प्रश्न विचारला आणि बंडुन तेच ऊत्तर दिल..आज्जीचं!
ते गेल्यावर आम्ही सैपाकाला लागलो,घरूण आईनं कांदा ,लसुन, बटाटे, वांगे सगळं देल्यालच होतं.
बंडु म्हणला, “मी स्टोत राकेल टाकतो, तु चपात्या साठी ऊंडा तींब”..मंग त्यांन त्याचं काम सुरू केल न् म्या मस्त मऊ चुटूक ऊंडा तींबला. बंडुनं स्टोला हावा हानली..बर्णर मधी पिन टाकुन स्टो सुरू केला फ्रुऱऱऱऱऱऱर ..मला चपात्या भाकरी सुगरण बाई सारख्या येत्यात… जांबाच्या आकाराचा ऊंडा घ्यायचा,त्याला दोन्ही हातानी गोल करायचं, मंग थोडं चपटं करूण त्याचं ऊखळ.(खोलगट)बनवायचं, मंग अनखीन बोरा पेक्षा थोडी मोठी कनीक गोडतेलात बुडूनं ऊखळात घालायची..डाव्या हातानं वरवर निमुळतं करूण ऊखळाचं तोंड बंद करायचं, मंग त्याला पिठात डुबवायचं अन् हातावर घेऊन दोन अंगठ्याच्या साह्यानं गोलगोल करीत फिरवायचं...कोळपाटावर थोडं कनकीचं पिठ टाकुन बेलन्यानं पोळी लाटायची..मधी मधी डाव्या हातानं चपाती कोळपाटावर गोल फिरवायची.मना सारखा आकार आला की, डाव्या हाताच्या बोटाणे चपाती खाली हात घालुन तिला ऊजव्या हातावर घ्यायचे अन् मंग ऊजव्या हातानं गरम तव्यावर अलगत सोडायचे .खालची बाजु चांगली भाजुन झाली की,ऊजव्या हाताच्या बोटाणी ऊचलुन तव्यावर पलटी करायची. खालची बाजु वेळोवेळी ईकडं तिकडं फिरवुन निट भाजुन घ्यायची. तेवढ्याच वेळात चपातीच्या वरच्या अंगाला अंगठा सोडुन बाकी बोटाच्या साह्याने तेल लावुन घ्यायचे..खालची बाजु निट भाजुन झाली की तीला तीसरी पल्टी द्यायची. आतल्या पुडदीत वाफ तयार व्हायला लागते.अन् चपाती हवा भरल्या सारखी फुगायला लागती. त्याच काळात कोळपाटावर दुसरी चपाती तयार करण्याचा विधी एका बाजुला चालु ठेवायचा..हे सांगायला विसरलोच होतो. मग चपातीला पल्टी देऊन दुसऱ्या बाजुला ही तेल लावुन घ्यायचे..चपाती कुठल्या बाजुला कच्ची वाटते ती बाजु तव्याच्या मध्यभागी घेऊन पट..पट... शेकुन घ्यायची. चपाती भाजल्याचा अंदाज आला की तीला फडकं आथरलेल्या दुरडीत टाकायचे.अन् मंग पुढच्या चपातीला त्याच न्यायानं दुरडीत आनायचं... त् चपाती अशी करायची.
चपात्या होऊस्तर बंडुनं बेसनाची तयारी करून ठुली.कांदा बारीक कापुन घेतला ,लसुन खुडला, कठाणाचं पिठ, हाळदं, मीठ, तेल, जिरे, मव्हऱ्या तयार ठुल्या. चपात्या करूण झाल्यावर म्या काठोतीत हात धुवून घेतले. स्टोवरचा तवा खाली घेतला, अन् पातेलं ठेवलं.पातेलं थोडं तापलं की त्यात गोड तेलाची धार ओतली. तेल कडकडु लागल्यावर कापलेला कांदा टाकला...त्याला लालसर होऊस्तर परतुन घेतलं.. मंग खुडलेला लसुन तसाच लाल होऊस्तर परतीला.कांदा अन् लसुन पातेल्यात एका बाजुला केला.थोडं तेल पातेल्याच्या बुडाला आलं..मंग जिरे सोडले मंग मव्हऱ्या सोडल्या,लाल तिखट,हाळद टाकली न् हे सगळं निट हलवुन घेतलं. सगळं निट झाल्याचा अंदाज आल्यावर पाणी ओतलं..रूमवर पहीलाच दिवस असल्यानं स्टोच्या आवाजात आम्ही हळु हळु गप्पा मारल्या. तव्हरक फोडणीला आधण आलं..गावाकडुन निब्बर फनगाड्या असलेली तुऱ्हाटीची काडी आनलेलीच होती ती ऊजव्या हातात घेतली.डाव्या हातानं कठानाचं पिठ अंगठ्याच्या साह्यानं हळु हळु ऊकळी आलेल्या पातेल्यात सोडायला सुरूवात केली,अन् ऊजव्या हातानी तुऱ्हाटीची काडी पातेल्यात गरगर फिरवनं सुरू झालं. हातातलं पिठ संपलं की पुन्हा घ्यायचो अन् पुन्हा त्याचं जोमानं पिठा बरोबर काडीचा ऊजवा हात गरगर फिरवायचो.. ऊजव्या हातानं जराबी कसुर केला तर पिठल्यात गाठी तयार होत्यात..मला पिठलं जरा घटच आवडतं. काही काही जण पातळ खातेत. मधी एक टाईम असा येतु की आतली वाफ बाहेर येण्यासाठी फुगे करती.अन् त्याच्या सोबत गरम बेसन हातावर पायावर ऊडतं अन् चटके बसतेत.त्याच्या मुळच पिठ टाकायची कृती चटचट करायची. मला पाहीजी तीतकं घट्ट बेसन झाल्याचा अंदाज आला की पिठ टाकणं थांबवलं. थोडा वेळ थांबुन स्टोची किल्ली सोडली, हवा भाईर....फुस्.....रूमभर बेसणाचा घमघमाट सुटला. तीतक्यात तीन मुलं मधला दरवाजा ऊघडुन आत आली..त्यातलं सगळ्यात लहानं धटकुलं होतं.
ते म्हणलं,” काय भाजी केली’?.
म्या म्हणलं, “बेसन..खायचं का?”
त्यांन होकार्थी मान हलवली. मोठ्या भावानं त्याला डोळे वटारले पण ते धटकुलं पोरगं आमच्या जवळ मांडी घालुन बसलं.आम्ही लगेच ताटं घेतले..कारण बेसन गरम गरम खाण्यातच मज्या असती.आम्ही जेवत असताना काका-काकी त्यांची मुलगी ऊमा मोठा मुलगा पमु न् मधवा महेश पाळी-वाळी खाली डोकुन गेले.आम्ही सगळ्यायला जेवायचा आग्रह केला पण लहाणा गोयंद्या सोडुन सगळेच नगं म्हणले. दहा बारा चपात्याची चळतं.आम्ही तीघायनं फस्त केली.गोयंद्याला पिठलं लईचं आवडलं असं तेव जेवुस्तर लईदा म्हणला.
दुसऱ्या दिवशी सकाळी आमची आवरा आवरी करूण कॉलेजला चक्कर मारायचं ठरलं.
त्या आधी बंडु म्हणला,” आपुनं चहा पेऊ बिन दुधाचा. मी चहा करतो तु डबररोट्या(पाव) आन् डझनभर”
म्या म्हणलं,” ईतक्या कशाला?”
तर तेव म्हणी “तु आन् त सई...”
मी डबररोट्या घेऊन आलो, तव्हरूक बंडुन दोन मोठे गिल्लास भरूण कोरा चहा करूण ठुला होता.
मधी पेपर आथरूण एकएक करीत आम्ही एक डझन डबर रोट्यातल्या दोनच खाली ठुल्या.
बंडु म्हणी ,” आता संध्याकाळ पस्तोर भुक लागत नाही..आता थेट संध्याकाळीच सैपाक करायचा”
मंग आम्ही पाच वाजुस्तर कॉलेजात थांबलोत.मधी कॅन्टींगचे भजे आणि असंच काही बाही खाल्लं. रूमवर आल्यावर बंडु म्हणला,”आता सैपाक करायचा लई कटाळा आला..आपुन सोपी खिचडी करू”
त्यांन मोठं पातेलं काढलं तांदुळ, मुगाची दाळं, शेंगादाने,हिरव्या मिरच्या, कच्ची गोबी,शेवग्याच्या शेंगा असचं बरच कायकाय जवळ घेतलं.सगळा खिचडी विधी बंडुनच केला.गोयंद्या,महेश मधी-मधी चक्करा मारूण गेले, तेवढ्यात काकी आल्या.
शिजत असलेल्या खिचडीच्या पातेल्याकडं बघुन म्हणल्या, “कोन्ही जेवायला यायचं का काय?
आम्ही म्हणलं ,”नाही”
मंग त्या म्हणी ,”खिचडी जरा जास्तचं झाली”
बंडु म्हणला,” नाही तेवढी लागंन”
त्या हसुन आत गेल्या..खिचडी शिजुस्तरच पोरांह्य सोबत आमचा दोस्ताना एवढा पक्का झाला की गोयंद्या बरूबर महेश पण खिचडी खायला बसला..आम्ही चौघायनं ऊल्फ्यावर ऊल्फे घेत सगळ पातेलं खरडुन पुसून खाल्लं. काकी खात्री करायला आल्याच..रिकामं पातेल बघुन लई हासल्या...
चार-पाच दिवसानी काकी-काका कडुन पुन्हा विचारणा झाली, “आज्जीचं काय झालं?”
बंडु म्हणला, “कालच मोढ्यात गावातला एकजण भेटला तेव म्हणी आज्याला अजुन बरंच नाही.”
तीथुन पुढं रोज संध्याकाळी काका आम्हाला बोलुन घेत,मंग सगळ्या कुटूंबा सोबत आमच्या गप्पा रंगत.
पुढ पुढ तर असं झालं - ते म्हणायचे, “झाला का तुमचा सैपाक? मंग आना ईकडचं आपुन सोबत जेऊ”.
अन् मंग त्याह्यच्या वसरीवर आमची सगळ्यायची अंगत-पंगत बसायची. नागपंचमीला आम्ही दोघं जण चार पाच दिवस जांबला जाऊन आलो.
परत आल्यावर काकीनं विचारलं, “आज्जीला कामुन नाही आनलं?” त् बंडु म्हणी, “आता आजीलाच ताप-सर्दी डोस्कं हाता-पायाला गोळे असं दुखायला लागलं”
रविवार असला की आम्ही जरा निवांत असत. मंग वरण-भात एखांदी सुक्खी भाजी चपात्या असं ताट भरूण बनवायचोत मला भांडे घासायचा लई कटाळा! आम्ही आता आकात कुटूंबीयांच्या एवढे घरचे झालो होतो की समोरच्या हापशावर ऊमा भांडे घाशीत असली की बंडु तीच्या कडुन आमचे भांडे धुनं घ्यायचा.ऊमाने बऱ्याचदा आमचे कपडे सुध्दा धुनं दिले.ऊमाचं अन् महं नेहमी भांडण व्हायचं.
कारण असायचं “बाई बघना ह्या संभ्यानं खरकटं पाणी पायऱ्यावर टाकलं”
“बाई बघना ह्या संभ्यानं कचरा दारात टाकला”
“बाई बघना संभ्या मला ऊमी-फुमी म्हणायला.”
असं काहीना काही तीला चिडवण्यासाठी मी हटकुण तीच्या गुन्ह्यात जायचो. मंग काकी हसायच्या.प्रमोद छानं चित्र काढायचा.तो अभ्यासातही खुप हुशार होता.पमु शांत असायचा.पण गोंद्यान् महेश मह्या संग लई धिंगाणा घालायचे.एवढा धिंगाणा घालायचे की काकी ओरडायच्या.काका घरी असले की मंग मात्र मी समजुतदार असल्याचा अभिनय करायचो.मधे गणपती-महालक्षीम्याला आठ दिवस गावाकडं जाऊन आलो. पुढे पुढे आम्ही एवढे आकात कुटूंबीयाचे झालो की भाजी करताना कांदा,लसुन जे काही लागलं ते काकीच्या स्वयंपाक घरात जाऊन घरच्या सारखं ऊचलुन आनायचो.
परतुरला येऊन आता तीन-चार महीने झाले असतील. असचं एके दिवशी रात्री आम्ही सगळे जेवन करूण गप्पा मारत बसलो, तव्हा काकीनं अचानक विचारल, “ए तुमच्या आजी येणार होत्या त्याचं काय झालं”?
बंडु म्हणला, “आज्जी येणारच नव्हती कव्हाचं... त्या दिशी आम्ही सकाळी दहा वाजल्या पसुन रूम बघत होतो. सगळ्या ठिकाणी आम्ही दोघंच म्हणलं कि रुम नाही म्हणायचे.ही रूम जाऊ द्यायची नव्हती म्हणुन म्हणलं आजी येणार.”काकीनं मी जवळ बसल्यालो असल्यानं पाठीत चापट हानली..अन् म्हणल्या “लबाडायहो!” - अनं मंग काका खळखळुन हसले.

आकात कुटुंब |
आजही या आकात कुटूंबाचे अन् आमचे तसेच संबंध आहेत.मोठा प्रमोद ऱ्हद्यरोग तज्ञ आणि मधुमेह तज्ञ झाला. महेशचं परतुर मधे मोठं कपड्याचं दुकान आहे. छोटा गोयंद्या मेडीकल शॉपी चालवतो..ऊमा पुण्याला असते..काका अन् काकी आजही तीतकेच मायाळु आणि प्रेमळ आहेत.
संभाजी तांगडे
शेतकरी आणि नाटकवाला लेखक.'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकाआधी त्याने अतुल पेठे यांच्या 'दलपतसिंग येती गावा' मध्येही भूमिका केलेली होती. त्याचे सैराट, तेंडल्या इ. सिनेमेही आलेत.
छान आठवणी मांडल्या असेच रोज लिखाण करत जा न चुकता
ReplyDeleteKhup chhan athavni ani khup chhan likhan kel ahe...purn chitr dolya ne anubhalyacha bhas Zala....
ReplyDeleteआठवणी छान..!!
ReplyDeleteआकात कुटुंब छान..!!
तुम्ही दोघे ही छान..!!
अन लिखाण त्यातली आपली भाषा तर अगदी छान..!!!👍👌
खूप जुन्या आठवणी ताज्या झाल्या, मी पण सेलू येथे नूतन महाविद्यालय मध्ये 11 वी आणि 12 वी शिक्षण घेतले होते(2000--2002)मी सुद्धा स्वतः स्वयंपाक करून दोन वर्षे सेलूत शिक्षण घेतले आहे आमचे घर मालक महाजन हे सुद्धा मला किरायदार न मानता मुलगा मानत असत आता हा लेख वाचला आणि भावनाविवश झालो खूप आठवण आली त्या वेळी केलेल्या struggle ची
ReplyDeleteछान लिहिलय मस्त वाटत
ReplyDeleteThis comment has been removed by the author.

ReplyDeleteलै भारी लिव्हलय दादा!
ReplyDeleteतुमच्या खिचडीचा आस्वाद मी पण घेतलेला आहे बरं!
आणि हो त्या योगासनांचा आणि मुदगल फिरवण्याचा उल्लेख विसरलात की मुद्दाम टाळलात?��
ही गोष्ट नंतरची. अंकात कुटूंबियां कडे मी 11विला(1992) असतानाची. तुमच्याकडे मी 2002 ला आलो😍😍
Deleteमस्त दादा..
Delete