एअरपोर्टहून हॉटेलकडे जाताना टॅक्सीवाला पोरगेलासाड्रायव्हरभयाण टॅक्सी पळवत होता. मी हातात गुगल मॅप धरून रस्त्याकडे डोळे लावून बसले होते. इकडून तिकडून गाड्यांना कट मारत, ह्याचा त्याचा कान पिळत टॅक्सी हाकता हाकता आदळलाच पठठया मागून एका कारवर. मी घाबरले. आता राडा होणार म्हणून मी पण मनाची तयारी केली. पुढची गाडी बाजूला लागत होती, हा बाजीराव आपली धन्नो तिच्या मागेलावत होता. गाडीतून एक साधारण चाळीशी पार केलेली बाई उतरली. शांतपणे पोराच्या तोंडाजवळ येऊन म्हणाली, "चलाने नहीं आती? जरा धीरे और देखके नहीं चला सकते? ध्यान किधर है तुम्हारा?" तोपर्यंत इस शेर का कुत्ता हो गया था. "सॉरी मॅडम, गलती हो गयी, माफ कर दो" म्हणत तो शरण गेलाच होता तेवढ्यात ती बाई म्हणते, "खुद तो अच्छी गाडी चला नहीं सकते और उपर से कहते हो कि औरतों को गाडी चलानी नहीं आती. वाह रे पुरुषोंकी सत्ता!" गाडी जोशात पळवणाऱ्या त्या पुरुषाला शांतपणे मान डोलावायला लावून ती बाई आपल्या गाडीत बसून निघून गेली.
स्त्रिया गाडी चालवू शकत नाही आणि रोजगार म्हणून तर या क्षेत्राकडे अजिबात पाहू शकत नाही हा समज मोडून स्त्रियांना अपारंपरिक रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील या विषयावरच्या परिषदेसाठी दिल्लीत आल्या आल्या घडलेला हा पहिला प्रसंग. बायकांनी कशी काही ठराविक कामेच करायला हवीत आणि त्यांच्याकडेच पारंपरिक रोजगाराची संधी म्हणून बघायला हवे असा समज खोडत फक्त पुरुषांच्या मानल्या गेलेल्या क्षेत्रात बायकासुद्धा काम करू शकतात, पैसे कमवू शकतात हा विचार घेऊन दिल्लीतील आझाद फौंडेशन काम करते. बायकांना आणि मुलींना चारचाकी गाडी चालवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना एका travel company सोबत जोडून देते. या बायका फक्त दिल्लीतच नाही तर कलकत्ता, इंदोर, भोपाळ जयपूर अशा शहरांमध्ये ‘सखा कॅब्ज्स’ चालवतात आणि ‘सखा ड्रायव्हर’ म्हणुन ओळखल्या जातात. महिलांसाठी अपारंपरिक रोजगार या विषयावर काम करणाऱ्या किंवा विचार करणाऱ्या जगभरातील लोकांना या आंतरराष्ट्रीय परिषदेने दिल्लीत एकत्र आणले आणि या विषयावर अनेक अंगांनी चर्चा झाली.

नाशिकमधील अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट या सामाजिक संस्थेत ग्रामीण भागातील मुलींच्या आयुष्यावर सुरू असलेल्या कृतीसंशोधनाचे काम करते. त्याच बरोबर पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे आणि महिला व त्यांचे हक्क या विषयावर मुक्त पत्रकार म्हणून लेखन करते.
स्त्रिया गाडी चालवू शकत नाही आणि रोजगार म्हणून तर या क्षेत्राकडे अजिबात पाहू शकत नाही हा समज मोडून स्त्रियांना अपारंपरिक रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील या विषयावरच्या परिषदेसाठी दिल्लीत आल्या आल्या घडलेला हा पहिला प्रसंग. बायकांनी कशी काही ठराविक कामेच करायला हवीत आणि त्यांच्याकडेच पारंपरिक रोजगाराची संधी म्हणून बघायला हवे असा समज खोडत फक्त पुरुषांच्या मानल्या गेलेल्या क्षेत्रात बायकासुद्धा काम करू शकतात, पैसे कमवू शकतात हा विचार घेऊन दिल्लीतील आझाद फौंडेशन काम करते. बायकांना आणि मुलींना चारचाकी गाडी चालवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना एका travel company सोबत जोडून देते. या बायका फक्त दिल्लीतच नाही तर कलकत्ता, इंदोर, भोपाळ जयपूर अशा शहरांमध्ये ‘सखा कॅब्ज्स’ चालवतात आणि ‘सखा ड्रायव्हर’ म्हणुन ओळखल्या जातात. महिलांसाठी अपारंपरिक रोजगार या विषयावर काम करणाऱ्या किंवा विचार करणाऱ्या जगभरातील लोकांना या आंतरराष्ट्रीय परिषदेने दिल्लीत एकत्र आणले आणि या विषयावर अनेक अंगांनी चर्चा झाली.खरं तर काम, मग ते पुरुषाने करू देत, स्त्रीने करू देत, गरिबाने अथवा श्रीमंताने, त्यात श्रम हे असतातच. पण पूर्वीपासून आपण पुरुषांनी करायची कामे आणि स्त्रियांनी करायची कामे अशी विभागणी करून स्त्रियांना एकाच प्रकारच्या कामांमध्ये गुंतवून ठेवत आलो. बाईने घरातील व्यक्तींची-मुलांची काळजी घ्यायची, त्यांना खाऊपिऊ घालायचे, सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायची आणि हे सगळे सांभाळून बाईच्या जातीला शोभेल अशी एखादी सुरक्षित नोकरी करायची अशी आधुनिक मध्यमवर्गीय स्त्रीकडून साधारण अपेक्षा असते. ही सुरक्षित नोकरी सुद्धा खरं तर बाईसाठी खूप मर्यादित संकल्पना आहे. मग बायकांनी शिक्षिका व्हायचे, अंगणवाडी सेविका व्हायचे, कपडे शिवायचे, पापड-मसाला-लोणची बनवण्याचा व्यवसाय करायचा किंवा फार फार तर आताच्या काळात डॉक्टर झाले तर सर्जन न होता भूलतज्ज्ञ व्हायचे आणि इंजिनिअर झाले तर सिव्हील किंवा मेकॅनिकल बाजू न निवडता संगणक किंवा ईएनटीसी इंजिनिअर व्हायचे असा हा आधुनिक ट्रेंड. पण पोलिस बायका, सिक्युरीटी गार्ड बायका, फायर वूमन, taxi ड्रायव्हर, वैमानिक बायका, ट्रेकर वूमन असे प्रोफेशन्स बायकांपासून एकत्र दूरच राहिले किंवा बायका तिथपर्यंत पोहचल्याच नाही. अशाच आतापर्यंत फक्त पुरुषांच्या समजल्या गेलेल्या जागांवर काम करणाऱ्या अनेक धाडसी बायका इथे भेटल्या आणि एकेकीची गोष्ट ऐकताना ही एखाद्या मोठ्या बदलाची सुरुवात तर नसावी ना असंच जाणवत होतं.
आझाद फौंडेशनच्या माध्यमातूनच दिल्लीत taxi चालवणारी एक कोवळी पोर ‘झीनत’. तिच्याकडे आणि ती चालवत असलेल्या गाडीकडे बघत असताना ठळक विरोधाभास जाणवतो. पण ही मुलगी ज्या धाडसाने तिच्या या वेगळ्या निर्णयाबद्दल बोलते ते कमालीचे आशादायी आहे. बारावी पूर्ण झाल्यानंतर आईला कॅन्सर झाल्याचे कळले आणि एका क्षणातच किशोरवयीन फेज संपून झीनत एकदमच मोठी झाली. आईच्या उपचारासाठी मोठाच पैसा उभा करायचा होता. आईवडिलांनी सांगण्याआधीच आता आपल्याला शिक्षण सोडून काहीतरी झटपट पैसे मिळवून देणारे काम शोधावे लागेल हे तिने मनोमन मान्य केले आणि तयारीला लागली. घरातल्या लोकांनी, मैत्रिणींनी, नातेवाईकांनी सगळ्यांनीच एखादा शिवण क्लास कर असे सांगितलं आणि झीनत शिवण क्लासला गेली सुद्धा. पण त्याबद्दल बोलताना ती सांगते, ‘मुझे वो करना ही नही था. सालोंसे औरतें यहीं काम करते आ रहीं हैं. मुझे कुछ अलग करना था. लेकीन घर में पैसों की जरुरत थी, तो मैंने सोचा कपडे सीके जल्दी पैसे मिल सकते है. लेकीन वहाँ मेरा मन नहीं लगा तो मैने छोड दिया. और आझादके साथ मिलके गाडी चलाना सीख लिया’ सुरुवातीला तिने निवडलेल्या या मार्गासाठी घरातून तिला फारसा पाठिंबा नव्हता. पण निश्चयाने ती तिच्या निर्णयावर टिकून राहिली. झीनत म्हणते ‘इस गाडी चलानेवाले काम ने मुझे सिर्फ पैसाही नहीं दिया, बल्कि हिम्मतभी दी. खुद की क्षमताओं पर विश्वास करना सिखाया’ आता झीनत गेल्या ३ वर्षांपासून दिल्लीत सफाईदारपणे गाडी चालवते. ती म्हणते, ‘जब लाईन में टैक्सी खड़ी होती है तो पॅसेंजर वही टैक्सी में बैठते हैं जिसमे आदमी ड्रायव्हर हो, हम लडकियाँ भी उन्हें अच्छे से पहुंचा सकतीं हैं, इसपर उनका यकीन नहीं होता. तब बुरा लगता है. लोगों ने भी अब हमारा स्वीकार करना चाहिए.’ हे सांगताना झीनतच्या चेह-याचा रंग करडा होतो.
ती म्हणते की आम्ही बायका आणि मुली गाडी चालवायला तर शिकलो, पण इथल्या रस्त्यांनी अजुन आम्हाला स्वीकारलंनाही. आपल्याकडचे रस्ते प्रचंड पितृसत्ताक आहेत. त्यांनी महिला ड्रायव्हर्स या प्रतिमेचा विचारच केलेला नाही. सगळीकडे पुरुषांसाठीच स्वच्छतागृहे असतात, पुरुषच सिक्युरिटी गार्ड असतात, पुरुषांच्याच टॅक्सीत प्रवास करणे निवडणारे प्रवासी जास्त असतात. माझ्यासारख्या अनेक मुलींनी या क्षेत्रात यायला हवे असेल तर आपल्याला तसे वातावरण तयार करावे लागेल. फक्त झीनतच नाही तर तिथे भेटलेल्या इतरही सखा ड्रायव्हर्सशी बोलताना हेच ऐकू येत होते. कलकत्त्यात टॅक्सीचालवणारी पल्लवी नावाची तृतीयपंथीय मुलगी तर म्हणते की मला समाजाने असंही स्वीकारलेलंच नाही आणि त्यात मी असं काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं काम करते म्हणजे आणखीच प्रवाहाच्या बाहेर. एकवेळ बायका आणि मुलींसाठी वातावरण बदलण्याची शक्यता तरी आहे पण माझ्यासाठी गोष्टी आणखीच हाताबाहेर आहेत. मला फक्त टाळ्या वाजवून पैसे मागताना पाहण्याची लोकांना सवय आहे. माझ्या हातात गाडीचे स्टिअरींग पाहून तर अनेकांना धक्काच बसतो. महिला ड्रायव्हर्सचे प्रश्न जिथे संपतात तिथे माझे प्रश्न सुरु होतात. २६ वर्षांची पल्लवी कलकत्त्यातील पहिली तृतीयपंथी ड्रायव्हर आहे. ती म्हणते ही संख्या वाढली तर बळ मिळेल तग धरण्यासाठी. या सगळ्या गोष्टी ऐकून नकळत ग्रॅज्युएशननंतर पुढे पत्रकारिता करायची हे ठरवताना ‘हे धोकादायक क्षेत्र असते. मुलांनीच असल्या गोष्टी कराव्या. मुलींनी नाही.’ असं म्हणत मुलींसाठी सुरक्षित क्षेत्रे सुचवणारे अनेक चेहरे डोळ्यासमोर तरळले. आणि खरंच बाईला असा काहीतरी अपारंपरिक निर्णय घेऊन त्यात सन्मानाने जम बसवायला लागणारे धाडस झीनत आणि पल्लवीच्या रुपात शेजारी बसलेले पाहिले.
महिलांनी आपल्यावर लागलेल्या पारंपरिक कामांचे लेबल काढून अशा नेहमीच्या मानल्या न गेलेल्या क्षेत्रांमध्ये काम करणे सगळ्या बाजूंनी किती नवीन आणि आव्हानाचे असु शकते याची खरी जाणीव या परिषदेत भेटलेल्या सगळ्या अपारंपरिक काम करणाऱ्या महिलांचे अनुभव ऐकताना होत होती. त्यांनी असा काहीतरी मार्ग निवडून बदलासाठी एक हात पुढे केला आहे. हे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण सगळ्यांनी समाज म्हणुन दुसरा आधाराचा, स्वीकृतीचा हात आता पुढे केला पाहिजे याच विचारात मी परिषद संपवून बाहेर पडले. बाहेर टॅक्सी आणि रिक्षांची मोठीच मोठी रांग लागली होती. त्यांच्या ‘किधर जाना है मॅडम?’ कडे दुर्लक्ष करून मी खिशातला फोन काढला आणि ‘सखा कॅब’ बुक केली. झीनत आणि पल्लवी सारख्याच दिसणा-या एका चुणचुणीत सखा ड्रायव्हरच्या साथीने माझा परतीचा प्रवास सुरु झाला आणि गाडीत एफ.एम वर गाणं सुरु होतं,‘बैठे बैठे ऐसे कैसे कोई रास्ता नया सा मिले,
तू भी चलें मैं भी चलूँ होंगे कम ये तभी फासले
हम जो चलने लगे चलने लगे हैं ये रास्ते ......’
काजल बोरस्ते




