आता असं वाटू शकतं की या व अशा सगळ्या गोष्टी, संकल्पना, घटना इत्यादि, कुठल्याही वेब सिरीज मध्ये बघणे तसं काही नवीन नाहिये; मग याबद्दल अशी नवीन ती काय चर्चा होऊ शकते? हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण सध्या कोरोना साथीच्या कालावधीमध्ये विशेषतः लोकांच्या करमणुकीसाठी प्रामुख्याने उपलब्ध असणारी सिनामागृहे बंद ठेवली आहेत, तर अशा परिस्थितीमध्ये अनेक OTT प्लॅटफॉर्म हेच आता करमणुकीचं प्रमुख माध्यम म्हणून हळूहळू नावारुपास आलेली आपणांस दिसून येईल. अर्थात मल्टिप्लेक्स सिनेमागृहे सुरु असतानाही ’सेक्रेड गेम’ सारख्या वेब सिरीज ने आपली लोकप्रियता दाखवून दिलीच होती. भारतात तरी खर्या अर्थाने सर्वसामान्य, मध्यम वर्गात तेव्हाच वेब सिरीजचं फॅड जोर धरताना आपल्याला दिसून आलं. नेटफ्लिक्स वरील या वेबसिरीजच्या आधीही OTT प्लॅटफॉर्म वरती अनेक वेबसिरीज होत्याच, इतकेच काय तर YouTube वरही गर्लियापा, वाय फिल्मस् किंवा फिल्टर कॉपी हे वेगवेगळ्या वेब सिरीज बनवतच होते आणि त्यांचे एपिसोडस् पाहण्यासाठी अगदी मोफत उपलब्ध होते. परंतु ‘सेक्रेड गेम’ची निर्मिती ज्या प्रकारची जाहिरातबाजी आणि अतिशय वैविध्यपूर्ण कलाकारांना घेऊन करण्यात आली, त्यामुळे साहजिकच प्रेक्षकांची ओढ त्या दिशेने जाताना पाहायला मिळाली. त्यात दिग्दर्शक म्हणून अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवणे, नीरज घायवान ही त्रिमूर्ती असणं ही आणखी एक जमेची बाजू होती. ’सेक्रेड गेम’ची मौखिक लोकप्रियता प्रचंड होती, मला आठवतंय memes वगैरे बनायच्या आधीही लोक त्याबद्दल प्रचंड प्रमाणात चर्चा करत होते, अगदी आमच्या पाहुण्या-रावळ्यांमधील मध्यमवयीन, OTT प्लॅटफॉर्मशी फारशी तोंडओळख नसलेले पुरुषही या बाबतीत बोलू लागले. जिथं-तिथं त्याच वेब सिरीजची चर्चा, आम्ही मित्रांनीही ’सेक्रेड गेम’ मुळेच नेटफिक्सला साईन–अप केलं व पुढे जाऊन कधी पेड सबस्क्रिप्शन केलं समजलं सुद्धा नाही आणि अशा प्रकारे करमणुकीच्या माध्यमांत, आणखी एका माध्यमाची भर पडली. मग केवळ स्टारकास्ट आणि दिग्दर्शक हेच या यशामागचं कारण आहे का? तर तसंही नाहिये. या वेब सिरीजच्या माध्यमातून, हवं त्याप्रकारे विषय मांडता येत होता, भाषेचा वापरही बिनधास्तपणे करता येत होता, सेन्सॉर बोर्डाचा तसा प्रत्यक्ष काही संबंध नाही. नग्नता, हिंसा, गुन्हेगारी, शिव्या या व अशा अनेक रोजच्या आयुष्याचा भाग असणार्या घटना प्रेक्षकांच्या पसंतीस पडत होत्या. सिनेमा आणि आता वेब सिरीज वरील किंवा टेलीव्हिजनवरील मालिका सुद्धा समाजाचा आरसा असतात. कुठल्याही संवादाच्या माध्यमांबद्दल हे म्हणता येतं! जे सिनेमात घडतं, त्याचा प्रभाव समाजावर पडताना आपल्याला दिसतो तर समाजात जे घडत असतं ते तितक्याच तीव्रतेने सिनेमांमध्ये ही पाहायला मिळतं. प्रसिद्ध शायर आणि गीतकार, गुलज़ार यांनीही हेच म्हटलंय की ‘समाजाचं प्रतिबिंबच तुम्हाला सिनेमामध्ये पाहायला मिळते.
महिलांवरील होणारा हिंसाचार हा सिनेमामध्येच जास्त वाढलाय, त्या माध्यमापर्यंतच या मुद्द्याची मर्यादा आहे, असं नाहिये तर समाजाच्या सर्व स्तरांत आणि वर्गात आपल्याला तो वाढलेला दिसून येईल’. समाजातील या बदलत जाणार्या परिस्थितीचा आपल्याला राष्ट्रीय गुन्हे नोंदणीतून आढावा घेता येईल. आता ’महिलांवरील हिंसाचार’ हा एक मुद्दा झाला पण अशा अनेक मुद्द्यांना घेऊन या सर्व वेब सिरीजचे विश्लेषण करता येणं शक्य आहे. त्यातल्याच काही मुद्द्यांना घेऊन आज आपण या लेखामध्ये चर्चा करणार आहोत.
पुरुषत्त्वाच्या प्रतिमांकडे पाहता आणि ज्या प्रकारच्या जडणघडणीची उदाहरणे या वेब सिरीज मध्ये दाखवली आहेत, तर सर्वसाधारणपणे सध्याच्या घडीला अनेक वेब सिरीज मधून हेच दिसून येईल की यांत दाखवल्या जाणार्या बहुतेक पुरुषांच्या प्रतिमा या अतिशय जातीयवादी, पितृसत्ताक, धर्मांध, हिंसा करणार्या, व्यसनी, कायम लैंगिक शोषण करणार्या, महिलांकडे ’वस्तू’ म्हणून पाहणार्या, महिला/मुलींना संधी नाकारणार्या अशाच आहेत. अर्थात याला अपवादही आहेतच! या सर्वच वेब सिरीज मधील महिला आणि मुलींच्या व्यक्तिरेखांबद्दलही खूप महत्त्वाचा लेख लिहिता येऊ शकतो, इतर भाषांत लिहिलाही असेल. सेक्रेड गेमस् सीजन १ आणि सीजन २ च्या बाबतीत, लोकप्रियते बद्दलच्या वर नमूद केलेल्या मुद्द्यांव्यतिरिक्त हिंसा, नग्नता आणि शिव्यांचा दिलखुलास वापर या काही विशेष, खास गोष्टी या वेब सिरिजमध्ये लक्षवेधक ठरल्या. अर्थात कथेची ’तशी गरज’ असणं किंवा त्या-त्या लेखकाची / दिग्दर्शकाची शैली यांचाही त्यात मोठा वाटा आहेच. यात गायतोंडे, बंटी, सरताज सिंग, खन्ना गुरुजी, शाहीद खान, डी. सी. पी. पारुळकर, काटेकर, इन्स्पेकटर माजीद अली खान, माल्कम मौराद, बिपीन भोसले अशा कितीतरी पुरुषी व्यक्तिरेखा आपल्याला यांत पाहायला मिळतील. नमूद केलेल्या व्यक्तिरेखांमध्ये गुरुजी (आश्रम सांभाळणारा) पासून ते व्हाया पोलिस जाऊन आतंकवाद्यापर्यंतच्या व्यक्तिरेखांचा सामावेश आहे. पण त्या सगळ्या व्यक्तिरेखा कुठल्या ना कुठल्या प्रकारे, कशा ना कशाच्या नावाखाली, हिंसेचं किंवा शोषणाचं समर्थनच करताना दिसत आहेत. तसं पाहायला गेलं तर आत्ताची सामाजिक परिस्थितीही तशीच आहे. अगदी वेबसिरीज मध्ये दाखवल्याप्रमाणे, कुणी धर्माच्या नावाने, कुणी राजकारणाच्या आडून, कुणी राष्ट्रवादाचा दाखला देत, कुणी मानवी वंशासाठी ’बलिदान देना होगा’ म्हणून - वंचित गटांवर, महिलांवर व बालकांवर केल्या जाणार्या जातीयवादी हिंसेचं समर्थन करणारे अनेकजण आपल्याला दिसतील. वेबसिरीज मध्ये लैंगिक हिंसेचा, शिव्यांचा वापरही केलेले अनेक संवाद खूपच लोकप्रिय आहेत, अगदी memes बनवेपर्यंत त्यांचा ’पूरेपूर’ वापर तरुण-तरुणींनी केलेला आहे. उदाहरणादाखल, आपल्याला बदला घ्यायचा आहे हे सांगण्यासाठी गायतोंडेच्या तोंडी एक संवाद आहे, “अपुन किधर था मालूम नहीं, अपुन को बस गांX मारनी थी”
गुरगाँव नावाच्या वेब सिरीजमध्ये पाहायला मिळणार्या पुरुषत्त्वाच्या प्रतिमांना विशेष सांस्कृतिक, प्रादेशिक, भौगोलिक आणि राजकीय संदर्भ आहे. विविध ठिकाणच्या संस्कृतीमध्ये राहणीमान, सणावारांमध्ये, खाद्य संस्कृतीत किंवा भाषेमध्ये जसा आपल्याला फरक पाहायला मिळतो तसा तो त्या-त्या ठिकाणच्या गुंडामध्येही पाहायला मिळतो. म्हणजे मुंबईचा भाई वेगळा, उत्तर प्रदेशचा भैय्या वेगळा आणि या गुरगाँव वेब सिरीज मधला बापू पण वेगळा. अस्सल हरियाणवी बोलणारा पण मॉडर्न बंगल्यात स्वतःचा स्विमिंग पूल असणार्या या बापूच्या कुटुंबातील एका मुलीच्या अपहरणाची ही एक कथा आहे, यामधील त्या मुलीचा भाऊ असो, तो बापू किंवा त्याला या सगळ्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मदत करणारा गोपी असो, या वेब सिरीज मधील पुरुषांच्या व्यक्तिरेखा तशाच हिंसात्मक, पितृसत्तात्मक प्रतिमांना बढावा देणार्या आहेत. बाकी वेब सिरीज मध्येही तुम्हाला हे सहज पाहायला मिळेलच पण या मध्ये ’कुटुंबप्रमुख’ म्हणूनची बापू ची व्यक्तिरेखा ही कुटुंब म्हणून अत्यंत महत्त्वाची, सामाजिक संस्थेमधील पुरुषांचं वर्चस्व अधोरेखित करणारी आहे. सगळे बरेवाईट निर्णय तोच घेतो.
‘पाताललोक’ नावाची अॅमेझॉन प्राईम वरील आणखी एक वेबसिरीज आहे तिची बांधणी/मांडणी, आपल्याला वर्णव्यवस्थेची आठवण करून दिल्यावचून राहत नाही. ‘जगात तीन लोक आहेत, स्वर्ग लोक – जिथं देवता राहतात, धरती लोक – जहाँ आदमी रहते हैं आणि (सबसे नीचे) पाताल लोक’ - यातदेखील आदमी म्हणजे मानवप्राणी असं त्यांना म्हणायचं असेल, असं आपण ’गृहीत’ धरूया. भाषा आणि तिचे गृहित अर्थ याच्यावर आपल्याला वेगळी चर्चा करायला हवी. (उदा. अगदी राजकीय पक्षाला दिलेलं ’आम आदमी पार्टी’ म्हणून पक्षाचं नाव का असेना.) अर्थात जसं मी आधीही या लेखात नमूद केलं आहे, तसं - कथेची मांडणी ही त्या त्या वेब सिरीजची ’गरज’ म्हणूनही त्यात तडजोड केलेली असते. या वेब सिरीजमध्ये दाखवल्या गेलेल्या अनेक पुरुषांच्या प्रतिमांच्या बाबतीत असं म्हणता येऊ शकतं की वर्गाधारित भेदभाव स्पष्टपणे दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिसून येतो. संजीव मेहरा नावाची एक सवर्ण व्यक्तीरेखा आणि इतर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या समाजाने ’तयार/निर्माण’ केलेल्या पुरुषांच्या प्रतिमा किंवा त्या तयार केल्या जात असताना त्यांच्यावर झालेले सामाजिकदृष्ट्या झालेले रचनात्मक अन्यायअत्याचार या दोन्हींत अनेक घटनांमधून तफावत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही अगदी पत्रकार असो, वा ’हिरो’ हाथीराम चौधरी, त्यांचा मुलगा किंवा ते गुन्हेगार, या सर्व व्यक्तिरेखा आपल्या वेगवेगळ्या भुमिकेमध्ये एकतर भरपूर हिंसा करताना दिसतात. तसंच ते त्यांच्या नात्यांमध्येही असंवेदनशील असलेले किंवा काहीनाकाही लैंगिक अॅक्टिविटी करत असणारे दाखवण्यात आलेल्या आहेत. पण उच्चवर्णीय पत्रकार जास्त असंवेदनशील आहे, मुस्लिम असिस्टंट मात्र कमी हिंसक आहे.
डिज्ने + हॉटस्टार वरील ‘स्पेशल OPS’ वेब सिरीज संसदेवरील आतंकवादी हल्ल्यासंदर्भात आहे, त्यामधील ही हिम्मत सिंग, इक़लाख ख़ान, फारूक अली, रुहानी खान, अविनाश, बालकृष्णा वा जूही असो या सगळ्या व्यक्तिरेखा आपापल्या भूमिकेमध्ये अनन्यसाधारणपणे हिंसा करतानाच दिसतात. हा हिम्मत सिंग अतिशय सनकी अधिकारी आहे आणि कितीही लोक मेले तरी चालतील पण त्याला इक़लाख ख़ानची माहिती पाहिजे आहे.
अशा या वेब सिरीजमध्ये खूप महत्त्वाच्या अशा काही महिला व्यक्तिरेखाही असतात - ज्या पितृसत्तात्मक भूमिकांचंच प्रतिनिधीत्त्व करतात. खासकरून ‘स्पेशल OPS’ या वेब सिरीजच्या अनुषंगाने पुरुषत्त्वाचे मुद्दे, महिलांच्या पितृसत्तात्मक व्यक्तिरेखांची आखणी याबद्दलही विश्लेषण करायला भरपूर वाव आहे. तरूण मुलीची आणि तिच्या मोठ्या बहिणीची धर्मांधतेच्या विळख्यात न फसता इतर लोकांना वाचवण्याची भूमिका, हिंदू – मुस्लिम समाजातील विविध विचारधारा, त्याचा पितृसत्तात्मक नियंत्रण व हिंसेशी असलेला संबंध आणि त्यांचे मालक म्हणून मिरवणार्या पुरुषांच्या व्यक्तिरेखा वगैरे अनेक अंगाने या वेब सिरीजचे विश्लेषण करता येणे शक्य आहे.
खरं तर OTT प्लॅटफॉर्म वर आलेल्या प्रत्येक वेब सिरीज किंवा चित्रपटावर एक लेख किंवा चर्चासत्र आयोजित करता येणं सहज शक्य आहे आणि इतक्या नाविन्यपूर्ण पद्धतीने बनवलेल्या, निर्माण केलेल्या कलाकृतींच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकता येईल. या सर्व वेब सिरीज चे प्रोडक्शन हाऊस कोण आहेत हे बघायला विसरू नका. भांडवलवादी, बाजार, धंदा, TRPची चढाओढ, या सर्वांना किती आणि कसे महत्त्व आहे हे पाहण्यात एक वेगळीच गंमत आहे. मी इथे खूप कमी उदाहरणे दिली आहेत, तुम्ही प्रत्यक्षात या वेब सिरीज पाहिल्या तर लक्षात येईल की या लेखामध्ये नमूद केलेले मुद्दे किंवा पुरुषत्त्वाच्या प्रतिमा या खूप मर्यादित स्वरुपात मांडल्या गेल्या आहेत. या व्यतिरीक्तही ’द फॅमिली मॅन’, ’लूटकेस’, ’माफिया’, ’अभय १ आणि २’, ’असुर’ या व अशा अनेक वेब सिरीज ऑनलाईन, विविध OTT प्लॅटफॉर्म वर उपलब्ध आहेत. माझा वैयक्तिकदृष्ट्या या सगळ्या वेब सिरीज पाहतानाचा अनुभव खूप रोमांचकारी होता.
अॅमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, डिज्ने + हॉटस्टार, झी 5, वूट सेलेक्ट, सोनी लीव, एम्. एक्स. प्लेअर, एरोस नाऊ आणि बिगफ्लिक्स (जीओ सिनेमा म्हणून एक वेगळा प्लॅटफॉर्म पण आहे) हे काही सर्वसाधारणपणे, माहितीतले OTT प्लॅटफॉर्म आहेत. याव्यतिरिक्त आवर्जून नमूद करावेसे म्हणजे Ho!Cho!, अल्ट बालाजी, उल्लू, फ्लिझ मूव्हीज हे पण असे काही प्लॅटफॉर्म आहेत, की ज्यांची लोकप्रियता ही केवळ अर्धनग्नतेच्या आधारावर सर्वज्ञात आहे! यांत’मस्तराम’ आणि इतरही वेब सिरीजचाही सामावेश आहे. अशा प्रकारच्या सेमीपॉर्न वेबसिरीज बनवणार्या प्लॅटफॉर्म बद्दलही कुणीतरी विश्लेषण करणे गरजेचे आहे कारण त्या सगळ्या कथा कहाण्या बघताना आपल्याला १९७०-८० च्या दशकातीलच चित्रफिती आपण परत २०२० मध्ये पाहत असल्याचा आभास कायम होत राहतो. त्यांत दाखवलेल्या सामाजिक मूल्यांमध्ये तर एक विलक्षणरित्या, प्रतिगामित्वाची झलक पाहायला मिळते. पण प्रेक्षक वर्गाच्या ’कामाचं’ जे आणि जेवढं आहे, ते तितकंच बघत असावेत. मजेदार गोष्ट ही आहे की Alt बालाजी हे बालाजी टेलिफिल्मस् निर्मीत OTT प्लॅटफॉर्म आहे, यामध्ये तुम्हाला महिलांचं जसं ज्या प्रकारे ’वस्तूकरण’ केलं जाऊ शकतं या प्रकारच्या वेबसिरीज आहेत पण त्यांनीच ‘डॉली किट्टी और वो चमकते सितारे’ (२०२०) या चित्रपटांची निर्मितीही केली आहे.

कधीकधी ते अपवाद म्हणून प्रतिकात्मकदृष्ट्या महिलांचं समाजातील ’महत्त्व’ अधोरेखित करतात! बालाजी टेलिफिल्म्स हे फक्त एक उदाहरण आहे, पण तुम्ही इतरही प्रॉडक्शन हाऊसेस बघा, मग यशराज असेल किंवा धर्मा प्रॉडक्शन - ’जब बात धंदे पे आती है’ - कसल्याही पद्धतीची विचारधारा निर्मात्यांसाठी अजिबात महत्त्वाची नसते. एकच प्रॉडक्शन हाऊस, दोन अगदी टोकाच्या विचारधारांना घेऊन चित्रपट किंवा वेब सिरीजची निर्मिती करू शकतात आणि त्यातून त्यांना अमाप पैसाही मिळतो. पैसा कसा कमवायचा त्याचं कौशल्यही त्यांच्याकडे आहे. त्यांना फक्त गुंतवणुक, करमणुक, बाजार आणि भांडवल हेच कळतं व त्यातच त्यांना स्वारस्य आहे. इथे प्रेक्षक म्हणून आपणही या भांडवलवादी व्यवस्थेचा खूप मोठा आणि महत्त्वाचा भाग आहोत हे विसरता कामा नये! म्हणूनच प्रेक्षकवर्ग, Consumer म्हणूनही आपली जबाबदारी खूपच जास्त आहे.
खरं सांगायचं झाल्यास, हा लेख लिहायचा म्हणून, ’पुरुषत्त्वाच्या विविध प्रतिमा’ आपण पाहिलेल्या कोण कोणत्या वेब सिरीज मध्ये, वेगवेगळ्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, असं शोधायचा प्रयत्न मी जेंव्हा OTT प्लॅटफॉर्म वर केला तर माझ्या हे लक्षात आले की, हिंसक पितृसत्तात्मक, धार्मिक, जातीयवादी, सत्तासंबंधारित शोषण याविषया व्यतिरिक्त कितीतरी जास्त वेब सिरीज आणि फिल्म्स सुद्धा या सर्वच ठिकाणी उपलब्ध आहेत. यांत काही फक्त OTT प्लॅटफॉर्म वर रिलीज झालेल्या आहेत तर काही आधीच सिनेमागृहात रिलीज झाल्या होत्या पण आत्ता सहजरित्या आपल्यासाठी इंटरनेटवर उपलब्ध आहेत. यातील काही उदाहरणे आहेत - दिल्ली क्राईम, She, गुंजन सक्सेना, हंड्रेड, आर्या, छप्पड फाड के, चिंटू का बर्थडे, मी रक्सम, अटकन चटकन, छोरिया छोरो से कम नहीं होती, अ सुटेबल बॉय, बुलबुल, स्त्री, बरेली की बर्फी, लुका छुपी, राजमा चावल, चॉपस्टीकस्, डॉली किट्टी और वो चमकते सितारे, लस्ट स्टोरीज्, हाऊस अरेस्ट, मस्का, नीरजा आणि बर्याच अशा वेब सिरीज आणि चित्रपट आहेत ज्यामधील पुरुषत्त्वाच्या प्रतिमा, पुरुष-स्त्रियांच्या व्यक्तिरेखाना ठराविक चौकटीच्यापेक्षा वेगळे असे अनेक पदर आहेत. नेटफ्लिक्स वर तर ’वुमन इन लीड रोल’ किंवा ’मुव्हीज डीयरेक्टेड बाय वुमेन’ अशा वेगळ्या कॅटेगरीज पण आहेत, आणि ही अभिनंदन करण्यासारखी गोष्ट आहे. कारण इतक्या हिंसक पितृसत्तात्मक, जातीयवादी, धर्मांध, शोषणाधारित इंटरनेटवरील या OTT प्लॅटफॉर्म वर अनेक ’सकारात्मक’, ’आशादायी’ Audio-Visual साहित्यसामग्री मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे, ही खरंतर जमेची बाजू म्हणता येईल.
वेबसिरीजचा आशय हा मुद्दा तसा क्लिष्ट आहे - कलाकृतींचं, कलाकारांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्तिरेखांना देता येणारा न्याय, समाजातील सत्य परिस्थिती पण दाखवायची आहे, पण कलाकृतीचा प्रभाव मात्र पडला पाहिजे, संदेशपण पोहोचायला हवा – त्याचसोबत पुरुषत्त्वाची एखादी सकारात्मक प्रतिमा पण प्रेक्षकांसमोर यावी, एखाद्या महिला व्यक्तिरेखाला आत्मविश्वासपूर्ण दाखवता यावं, दलित, आदिवासी, ट्रांस व्यक्ती, मुस्लिम समाजाच्या व्यथा-कथा सगळं एकाच कलाकृतीमध्ये सामावून घेतल्या जाव्या - अशा अनेक अपेक्षा कदाचित पूर्ण होणार नाहीत. त्यामुळे आपणच स्वतःला वैचारिक फिल्टर लावणे अधिक योग्य ठरेल. माऊंटन डयू च्या जाहिरातीत हृतिक रोशन “डर के आगे जीत है” म्हणत डोंगरावरून बाईक घेऊन दरीत उडी मारतो किंवा सलमान खान हेलिकॉप्टर घेऊन थम्स अप आणायला जातो, पण आपण तसं करतो का, वागतो का? आपल्याला माहिती आहे असली स्टंटबाजी आपल्याच्यानं शक्य नाही. आपण अशा actions अमलात आणायच्या का नाही याचा विवेक बुद्धीने निर्णय घेतो ना, तसंच प्रेक्षक म्हणून आपल्याला वेबसिरीज बद्दलही अजून सुजाण आणि सुज्ञ होण्याची जास्ती गरज आहे, कारण इथून पुढची परिस्थीती तर आणखी बिकट होण्याचीच शक्यता, खरंतर जास्त आहे, हाय का नाय?